गेले कित्येक वर्षे आपण भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची मालिका खेळणे बंद केले आहे. पण याच काळात आपण वनडे वर्ल्डकप, ट्वेंटी वर्ल्डकप, अशियाकप, चॅम्पियन ट्रॉफी या जागतिक स्पर्धात आवर्जून आणि ठरवून पाकिस्तानशी खेळतो.
हो आवर्जून आणि ठरवून खेळतो. नाईलाजाने नाही. असे मुद्दाम म्हटले आहे कारण या स्पर्धेत आता दरवेळी हे दोन संघ ठरवून एकाच ग्रुप मध्ये ठेवतात आणि यांचे जास्तीत जास्त सामने कसे होतील हे बघितले जाते.
उदाहरणार्थ, आशिया कपमध्ये सहा संघ असल्यास तीन तीन संघांचे दोन ग्रुप बनवले जातात. ज्यात भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये असतात तर उर्वरित तिसरा संघ दुबळा असतो. दुसर्या गटात लंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान असतात. परीणामी पुन्हा हे दोघे भाऊ पुढच्या राऊंडला जाऊन पुन्हा सुपर फोर मध्ये अजून एक सामना आपसात खेळतात. दोघे फायनलला पोहोचले तर दोघांना आपसात खेळायची तिसरी संधी मिळते. यावेळी आठ संघ आहेत त्यामुळे दोन्ही गटात अजून एक दुबळा संघ वाढला आहे. पण भारत-पाकिस्तान जोडी कायम आहे.
ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कपला १६ संघ असल्यास त्यांचे चार ग्रूप बनवतात. त्यात ८ प्रमुख संघांपैकी २-२ संघाच्या चार जोड्या बनवून त्यांना एकेका ग्रुपमध्ये टाकतात. भारताची जोडी नेहमी पाकिस्तानसोबतच असते. वनडे वर्ल्डकपमध्ये देखील काही वेगळे चित्र नसते. स्पर्धेत आठ संघ असो किंवा सोळा, त्यांचे दोन ग्रूप बनवा किंवा चार, पण भारत-पाक जोडी फुटणार नाही याची काळजी घेतली जाते.
नुकतेच चॅम्पियन ट्रॉफी झाली ती पाकिस्तानमध्ये खेळवली गेली. पण आपण पाकिस्तानमध्ये खेळायला जाणार नव्हतो म्हणून आपले सामने दुबईला ठेवले होते. निदान तिथे तरी दोघांना वेगळ्या ग्रुपमध्ये ठेवावे. पण नाही, तत्व म्हणजे तत्व!. तिथेही भारत पाकिस्तान एकाच ग्रुप मध्ये ठेवले आणि यजमान पाकिस्तान आपला देश सोडून भारताशी खेळायला दुबईला आला. सोशल मीडियावर कौतुकाच्या पोस्ट फिरत होत्या की बघा आम्ही किती शक्तिशाली आहोत जे यजमान संघाला आपला देश सोडून यायला भाग पाडले. पण प्रत्यक्षात ही आपली देखील लाचारी आहे असेच वाटत होते. आपल्याला सुद्धा त्यांच्याशीच खेळायचे असते. कारण हे सारे सामने नेहमी वीकेंडला प्राईम टाईमवर ठेवून, आणि यांची भरमसाठ जाहिरात करून बक्कळ पैसा कमावला जातो.
जगात सर्वात श्रीमंत असलेल्या भारतीय क्रिकेट बोर्डाला पैश्याची तितकी निकड असावी असे वाटत नाही. कारण माझ्या वाचनात आले त्यानुसार, "भारतीय कायद्यानुसार बीसीसीआय ही एक धर्मादाय संस्था मानली जाते, त्यामुळे आयपीएलमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर बीसीसीआयला आयकर भरावा लागत नाही." - चुकत असेल तर कर्रेक्ट करा.
पण मग काय ती अशी लाचारी असावी जे देशप्रेम, देशाभिमान आणि राष्ट्रीय अस्मितेला दुय्यम लेखत अगदी ठरवून पाकिस्तानसोबत सामने खेळले जातात. कि असे काही आहे जे कितीही पैसा का असेना, हाव काही सुटत नाही.
आणि असे असल्यास मग स्वतःचे पोट भरणार्या कलाकारांनाच तेवढे टार्गेट का करायचे?
त्यांना वेगळा नियम आणि क्रिकेट बोर्डाला वेगळा नियम कश्याला? तिथे कोण असे सरकारचे जावई बसले आहेत?
चला भारत-पाक क्रिकेटवर बहिष्कार घालू नका. आयसीसी स्पर्धांमध्ये ते आपल्या ग्रूपमध्ये बिलकुल नको असाही हट्ट धरू नका. पण किमान रँकिंगनुसार जर दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये येत असतील तर खेळा, आणि शेड्युलनुसार कुठल्याही वीकडेला खेळा. असे ठरवून एका ग्रूपमध्ये राहून, आणि या भारत-पाक सामन्याची जाहिरात करून, त्याला प्राईम स्लॉट आणि महत्त्व देऊन त्यातून पैसा तरी कमावू नका. हि सरळ सरळ आपल्या स्वार्थासाठी केलेली सामन्यांची फिक्सिंग आहे.
एकीकडे संपूर्ण जगाने पाकिस्तानवर बहिष्कार टाकून आपल्याला साथ द्यावी अशी अपेक्षा असणारा भारत, स्वतः मात्र साधे क्रिकेट सामन्यावर बहिष्कार घालू शकत नाही? किंबहुना दोघे जास्तीत जास्त कसे खेळले जाईल हेच उलट बघतो. त्यासाठी सेटींग करतो आणि पैसे कमावतो. मग कोण सिरियसली घेणार आपल्याला?
पेहेलगाम नंतर आजही सीमाभागात चकमक होत आहेत. समोरील बाजूने हल्ले होत आहेत. आपला विरोध पाकिस्तानी जनतेला नाही. परंतु क्रिकेटचे निर्णय घेणारे पाकिस्तानी सैन्य अधिकारी सीमेवर गोळीबार करण्याचे आदेश देतात. त्यामुळे अशा लोकांना विरोध व्हायला हवा जो देशहिताच्या भावनेतून योग्यच आहे. आपल्या देशातील सरकार जर बीसीसीआय वर दबाव न आणता केवळ पैशाकडे पाहत असेल तर त्यांचे पण कान टोचावे लागतील. कि त्यांचा वाटा त्यांना पोहोचतो म्हणून शांत आहेत?
राजकीय दृष्ट्या जरी विचार केला तरी यातून आर्थिक फायदा दोन्ही देशांना होत असेल. पैश्याची गरज आपल्यापेक्षा जास्त त्यांना आहे. आपण हे सामने खेळून त्यांनाच आर्थिक मदत करत आहोत. म्हणजे फिरून आपणच दहशतवाला पैसे पुरवत आहोत आणि पोसत आहोत. सामान्य जनतेला वेगळे भावनिक आवाहन करायचे आणि आपण मात्र आपला स्वार्थ बघायचा हे धोरण चुकीचेच नाही तर कमालीचे दुटप्पी वाटते.
मध्यंतरी निव्रुत्त क्रिकेटरच्या एका स्पर्धेत आपला भारतीय संघ पाकिस्तान सोबत खेळला नाहीत. चक्क सेमीफायनल सोडून स्पर्धेतून बाहेर पडला. तेव्हा आफ्रिदीसारखे काही पाकिस्तानी क्रिकेटर वल्गना करत म्हणालेले की अश्या बिनमहत्वाच्या स्पर्धाना तुम्ही देशप्रेमाचे नाटक कराल, पण नंतर आयसीसी ट्रॉफीमध्ये तुम्ही झक मारत आमच्याशीच खेळायला याल. त्यांचे ते विधान कितीही उद्दामपणाचे वाटले तरी ते बोचरे सत्य होते आणि हे लपलेले नाही.
ईतरांचे माहीत नाही. पुढचे माहीत नाही. पण या स्पर्धेपुरते तरी मी या दोन देशातील सध्याची परीस्थिती पाहता या ठरवून खेळले जाणार्या भारत-पाक सामन्यावर बहिष्कार टाकून न बघायचा निर्णय घेतला आहे. ज्या दिवशी असा निर्णय भारतीय क्रिकेट बोर्ड आणि आपले सरकार घेईल तो सुदिन!
धन्यवाद,
- एक सामान्य भारतीय क्रिकेटप्रेमी नागरीक
“ मी ते चँपियन्स ट्रॉफीबद्दल
“ मी ते चँपियन्स ट्रॉफीबद्दल लिहिलंय.” - ओह ओके!
विनाकारण देशभक्तीचा अतिरेक
विनाकारण देशभक्तीचा अतिरेक करू नये. त्याच्या बघण्याने न बघण्याने काही एक फरक पडत नाही. त्या मॅचचे हक्क आधीच विकले गेले होते, मोठ्या लोकांचे खिसे आधीच भरले होते. कॉम्प्रमाईझ करणार सामान्य माणूस. एकतर त्या बिचाऱ्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण मोजकेच येतात. हीच गोष्ट दिवाळीची. चीनी कंदील पणत्या घेऊ नका. त्या आधीच देशात आलेल्या असतात, भरणाऱ्याचे खिसे आधीच भरले असतात पण भोगणार सर्वसामान्य. >>>>>>+१००००
हे जे काही बहिष्कार करा वगैरे आहे ते सरकार सुद्धा डायरेक्ट सांगत नाही. ते कधीच सर्व ऑपशन्स बंद करत नाहीत. मग सामान्य लोक कशाला हे पाळतात हेच समजत नाही. हीच गोष्ट मालदीव , टर्की वरच्या टुरिझम बॉयकॉटलाही लागू होते .
हे जे काही बहिष्कार करा वगैरे
हे जे काही बहिष्कार करा वगैरे आहे ते सरकार सुद्धा डायरेक्ट सांगत नाही.
>>>>>>>>>>
पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका न खेळणे हा डायरेक्ट आणि अधिकृतपणे घातलेला बहिष्कारच आहे ना..
Pycroft ना हटवण्याची मागणी
Pycroft ना हटवण्याची मागणी आयसीसीने अपेक्षेप्रमाणे फेटाळली . पाकिस्तानला सुद्धा पैशाची गरज असल्याने या कारणावरून ते स्पर्धेतून माघार घेणार नाहीत.
दुबईत राहणार्या भारतीयांनी काही मॅचवर बहिष्कार घातला नाही. भारत आणि पाकिस्तानच्या आधीच्या सामन्यांना प्रेक्षागार अर्धही भरलेलं नव्हतं. ते भारत- पाक सामन्याच्या वेळी जवळपास पूर्ण भरलं होतं.
आता एक चंमतग. अमेरिकेला वाँटेड असलेला ओसामा बिन लादेन जसा पाकिस्तानात लपला होता, तशा बांग्लादेशलाला वॉन्टेड असलेल्या शेख हसीना वाजेद भारत सरकारच्या संमतीनेच भारतात लपलेल्या आहेत . यावरून बांग्लादेशच्या क्रिकेटपटूंनी भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करायला नकार दिला तर?
तसेही ते खिलाडूवृत्तीसाठी फारच कुप्रसिद्ध आहेत.
इतर वेळी प्रेक्षागार पूर्णपणे
इतर वेळी प्रेक्षागार पूर्णपणे भरलं असतं. तिकीटांचे वाटप नेमकं कसं होतं हे माहीत नाही, पण कदाचित क्षमतेच्या अर्धी- अर्धी तिकिटं प्रत्येक देशाला दिली जात असावीत. बहिष्कार मात्र फक्त भारतीयांनीच टाकला होता; पाकिस्तानी फॅन्स आले असतील. उरलेली तिकिटं बहुधा आपल्या वाट्याची असावीत.
ओसामा हा UN-मान्यताप्राप्त दहशतवादी होता, पण शेख हसीना अजून तशा घोषित झालेल्या नाहीत. त्यामुळे अशी तुलना योग्य नाही.
पण सध्या मात्र बांगलादेश पाकिस्तानच्या प्रभावाखाली आहेच. त्यामुळे पाकिस्तानसाठी भारतीय संघाशी हस्तांदोलन टाळण्याचा पर्याय ते निवडू शकतात, पण आर्थिकदृष्ट्या त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल.
यावरून बांग्लादेशच्या
यावरून बांग्लादेशच्या क्रिकेटपटूंनी भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन करायला नकार दिला तर? Wink
>>>>>>
त्यात काय एवढे?
म्हणजे बाकीच्यांचे माहीत नाही. पण मला काही खेद क्रोध वाटणार नाही. आपले खेळाडू सुद्धा हसतील यावर.
काही बेसिक मुद्दे.
काही बेसिक मुद्दे.
१.आपले शत्रू कोण आणि वेगळे झालेले भाऊबंद कोण?
२.दीडशे वर्षे आपल्याला लुटणारे आणि जाता जाता आपल्यात भांडणे लावणाऱ्यांचा खेळ आपल्याच वेगळ्या झालेल्या भाऊबंद बरोबर खेळावा का खेळू नये या विषयी आपण खेळखुळे लोक का चर्चा करतोय?
३.मुळात हा जो काही कप वगैरे आहे तो एक करमणुकीचा धंदा आहे आणि त्याच्या जाहिराती साठी मनोज कुमार टाईप बेगडी देशप्रेम का वापरलं जातय?
४.भारत पाकिस्तान ,काश्मीर आणि हिंदू मुसलमान वेगळे विषय आहेत का ?
५.काही निष्पाप हिंदूंना काही धर्मवेड्यामुसलमानांनीपहलगाम मध्ये मारलं,म्हणून भारतीय सेनेनेत्याचे काही तळ उध्वस्त केले आणि त्याचा बदलाघेतला.त्याचा आणि या करमणुकीसाठी केल्या जाणाऱ्या कप नावाच्या प्रकाराचा काय संबंध ?
आणि धंदा करायचा तर जाहिरात पाहिजे,ती करायची तर काहीतरी controversy पाहिजे आणि ती ठरवूनच केली आहे हे स्पष्ट दिसतेय की.
आणि माय बोलीवर असा धागा काढून हा हेतू साध्य करायला मदतच करतोय.
हे तात्पर्य
हे तात्पर्य
आणि माय बोलीवर असा धागा काढून
आणि माय बोलीवर असा धागा काढून हा हेतू साध्य करायला मदतच करतोय.
>>>>>
त्या न्यायाने तुम्ही प्रतिसाद देऊन त्याला हातभार लावत आहात माईलॉर्ड!
शुभरात्री
Unlike the players, the crowd
Unlike the players, the crowd displayed more bonhomie. The sights and sounds were familiar; faces smeared in tricolour or dark green, bodies draped in team jerseys, wearying limbs waving the flags, the louder and energetic ones chorusing, “Jeetega bhai jeetega, Pakistan jeetega” or the counter: “Harega bhai harega, Pakistan ko hum harayega”. Some of the fans merrily bonded with each other. An India supporter, wearing a Ravindra Jadeja jersey, was seen fist-pumping with a pair of Pakistan fans, besides taking selfies with them and hugging them when dispersing to their assigned seats.
Still, unlike most other games between them, one of the most sellable fixtures in all sport, the odd vacant seat could be spotted, in a stadium that could hold only 25,000.
हे इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीतून.
दुबईतले स्थानिक लोक येतील ना सामना बघायला ? की मोदींच्या दौर्यात त्यांना चीअर करायला कधीकधी भारतातून लोक पाठवतात, तसे दुबईला भारतातून प्रेक्षक पाठवले होते?
शेख हसीना यांना आमच्याकडे सोपवा, अशी मागणी सध्याच्या बांग्लादेश सरकारने भारत सरकारकडे केली आहे. त्यांच्या दृष्टीने त्या वाँटेडच आहेत. आणि भारताने त्यांना लपवलं आहे हेही साम्य आहेच.
भारताने आयसीसी सदस्य देशांना थरूर, सूर्या, गोली मारो अनुराग , बांसुरी स्वराज यांचं शिष्टमंडळ पाठवून आम्ही हस्तांदोलन का केलं नाही ते समजावून सांगितलं नाही तरी पुरे झालं.
काल पाकिस्तान सामना खेळायला जात नव्हते. मॅच रेफरी तरी बदलाच अशी त्यांची मागणी होती. शेवटी त्या रेफरीने पाकिस्तानी संघाची माफी मागितल्यावर आले अशा बातम्या आहेत. मधल्यामध्ये रेफरीचं नाक कापलं.
इथे चँपियन्स कपशी तुलना झालीच आहे. यजमान पाकिस्तान. पण भारताचे सामने दुबईत. बाकी संघांनी भारताशी सामने खेळायला दुबईला जायचं आणि परत पाकिस्तानला जायचं.
आता आशियाई कपासाठी भारत यजमान आहे आणि पाकिस्तान भारतात खेळू शकत नाही तर फक्त पाकिस्तानचे सामने दुबईत ठेवायला हवे होते. बाकीच्या देशांचे भारतात.
भारतात सध्या मस्त पावसाळी वातावरण आहे. अनेक राज्यांत पूर आले आहेत. गणेशोत्सव संपले. द्सरा दिवाळीला वेळ आहे. लोकांचा वेळ चांगला गेला असता.
आता एशिया कपसाठी
काल की परवाच्या पेपरात
काल की परवाच्या पेपरात वाचलं होतं, पण इथे लिहिताना ती बातमी मिळेना म्हणून लिहिलं नाही. आज लोकसत्तेच्या वाचकपत्रांत एकाने म्हटलं आहे की सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदिलन न करण्याच्या नादात भारतीय खेळाडूंनी सामन्यामधील पंचांशीदेखील हस्तांदोलन केलं नाही.
आपली दुसरी बॅटिंग होती. निकाल लागल्यावर पाकिस्तानी खेळाडूंनी हात मिला ले, जादू की झप्पी पा ले , असं म्हणत त्या दोघा भारतीय फलंदाजांच्या , ज्यात एक कर्णधारही होता, मागे लागायला हवं होतं. एका हातात बॅट , एकीत हेल्मेट, पायात पॅडं अशा अवस्थेत त्या दोघांना पळत सुटावं लागलं असतं
Fwd post
Fwd post
कालचा भारत विरुद्ध ओमान सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवने मन जिंकणारे कृत्य केलं. सामन्यानंतर ओमानचे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मैदानाबाहेर जात असताना सूर्याने त्यांना थांबवले आणि त्यांचे कौतुक केलं. या असोसिएट देशाच्या खेळाडूंसाठी ही गोष्ट मोठी असणारच. त्यानंतर सर्वांनी सूर्यासाठी टाळ्या वाजवल्या आणि त्याच्यासोबत ग्रुप फोटो काढला. हँडशेक केला नाही म्हणून रडणाऱ्या पाकिस्तानला हे पाहून कळायला हवे की आम्ही भारतीय उगाचच कोणाचा द्वेष करीत नाहीत.
आम्ही भारतीय उगाचच कोणाचा
<आम्ही भारतीय उगाचच कोणाचा द्वेष करीत नाहीत.>
calling Moahammed Shami
उद्या म्हणजे पुन्हा रविवारी
उद्या म्हणजे पुन्हा रविवारीच भारत पाकिस्तान सामना आहे. तेव्हा काय करायचं? पुन्हा बहिष्कार बहिष्कार खेळायचं की पाकिस्तानला हस्तांदोलन नाकारलं म्हणून मागचं सगळं विसरून सामन्याचा आनंद घ्यायचा
उद्या भारत पाकिस्तान असा
उद्या भारत पाकिस्तान असा सामना आहे. त्याची "पूर्व तयारी" म्हणून हे निमित्त मिळाले.
पाकिस्तानचा जलद गती गोलंदाज मोहम्मद आमीरने कोहलीची स्तुती केली.
"One thing is for sure, Virat is the best player and best human being in Indian cricket history, respect', Amir wrote on X.
यावरून आता सूर्या रागावला रुसला आहे अशी बातमी आहे म्हणे.
म्हणजे उद्याच्या सामन्यात काय होणार ? आपण आधीच पाकिस्तानशी गट्टी फू केली आहे. वर ओमानच्या खेळाडूंबरोबर बंधुभाव दाखवून पाकिस्तानला खिजवले आहे. अजून काय करणार? अनेक तर्क वितर्क चालू आहेत.
Wait and Watch.
भारतीय क्रिकेटर किंवा क्रिकेट
भारतीय क्रिकेटर किंवा क्रिकेट बोर्ड काय करताहेत याचा
आणि
आपण स्वतः पाकिस्तानशी क्रिकेट खेळायचे समर्थन करायचे की नाही याचा
आपसात काही संबंध नाही.
आपला निर्णय आपला स्वतःचा हवा. कोणाच्या प्रभावाखाली नसावा.
जर पाकिस्तानसोबत ठरवून क्रिकेट खेळले जात असेल तर माझा त्याला विरोधच राहील.
स्पेनने म्हणे घोषणा केली आहे
स्पेनने म्हणे घोषणा केली आहे की जर इस्रायल फुटबॉल वर्ल्डकपसाठी क्वालिफाय झालां तर ते वर्ल्डकप मधून माघार घेतील...( पॅलेस्टाईन मधील नरसंहारा मुळे)...स्पेन हे सद्य युरोपियन विजेते आहेत आणि सध्याचा त्यांचा संघ पहाता येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत जगज्जेते होण्यासाठी सर्वाधिक पसंतीचा संघ स्पेन चा आहे असं मानलं जातंय....हे म्हणजे अगदीच चाय से किटली गरम यातली गोष्ट झाली....१९६ देशांच्या स्पर्धेत २ वर्षे क्वलीफाईंग राउंडस खेळल्यानंतर जिथे मुख्य स्पर्धेतला सहभाग निश्चित होतो अशा स्पर्धेच्या विजेतेपदासाठी सर्वाधिक पसंती असलेला संघ, ज्याचं अस्तित्व देखिल कित्येक देशांनी अमान्य केलयं अशा एका मामुली देशासाठी आपलं संभाव्य जगज्जेते पद उगाचच पणाला लावतोय. ईथे विश्वविजेतेपदासाठी उण्यापुऱ्या १२ कायम सदस्य देश असलेल्या क्रिकेटच्या केवळ आशियाच्या विजेतेपदासाठी आम्ही आमची स्वतःचे नागरीक मारले जाउनही, ठरवून आणि न ठरवून अशी या बोटाची थुकी त्या बोटावर कशी बेमालूमपणे करतो किंबहुना तुम्हीदेखील ती कशी करु शकता या बाबतचे प्रबोधन त्या स्पेनचे कुणीतरी करायलाच हवे.
उद्या भारत पाकिस्तान असा
उद्या भारत पाकिस्तान असा सामना आहे. >> हा सामना पाकिस्तान जिंकला तर खरी मजा येईल.
समजले नाही उ बो
समजले नाही उ बो
नक्की काय मजा येईल यात? आणि कोणाला?
आपले लाडके पंतप्रधान आदर्णीय
आपले लाडके पंतप्रधान आदर्णीय नरेंद्रजी मोदी आतापर्यंत राष्ट्राला उद्देशून संबोधन रात्रौ आठ वाजता करीत आलेत , असं आठवतं. चूभूद्याघ्या.
पण आज आठ वाजता भारत पाक सामना असल्याने आदर्णीय नरेंद्रजी मोदींनी राष्ट्राला संध्याकाळी पाच वाजताच संबोधित केलं असेल का?
हा सामना पाकिस्तान जिंकला तर
हा सामना पाकिस्तान जिंकला तर खरी मजा येइल असे नाही पण हायसे मात्र नक्की वाटेल.
'पहेलगाम का बदला!' , 'ऑपरेशन सिन्दूर पार्ट ३' , 'शेक हॅंड न करके पाकिस्तान को दिखा दी उसकी औकात' असले फालतू फॉरवर्ड्स तरी येणार नाहीत !
काही लोकं असे पोस्ट पाठवतात
काही लोकं असे पोस्ट पाठवतात ते येऊ नये म्हणून भारताने सामना हरला पाहिजे अशी अपेक्षा कशी करू शकतो.. यात त्या खेळाडूंची काय चूक? झाल्यास त्या पोस्ट पाठवणाऱ्यांचे बरे वाईट चिंता किंवा त्यांना ब्लॉक करा..
राजकारण माझा विषय नाही. पण
राजकारण माझा विषय नाही. पण घरात ढेकुण झाले म्हणून घर पेटवून द्यावं ही मानसिकता मी सपोर्ट करू शकत नाही. त्यामुळे भारताने जिंकावं ह्यालाच माझा पाठिंबा आहे. (आत्तापर्यंत तरी भारताने गचाळ फिल्डिंग करून, आणि पाकिस्तान ने पॉझिटीव्ह बॅटिंग करून मॅच पाकिस्तानच्या बाजूला झुकवलीय. भारताकडून कमबॅकची वाट बघगोय).
“ पोस्ट पाठवणाऱ्यांचे बरे
“ पोस्ट पाठवणाऱ्यांचे बरे वाईट चिंता किंवा त्यांना ब्लॉक करा..” +१
<< यात त्या खेळाडूंची काय चूक
<< यात त्या खेळाडूंची काय चूक? झाल्यास त्या पोस्ट पाठवणाऱ्यांचे बरे वाईट चिंता किंवा त्यांना ब्लॉक करा.. >>
------- पोस्ट पाठविणार्याची काय चूक आहे ? IT सेलने किंवा इतरांनी लिहीलेले WA मिळाले , देशप्रेमा पोटी ते पुढे ढकलले. लागलीच त्याचे बरे वाईट कशाला चिंतायचे?
उदय म्हणून ब्लॉक करा असा
उदय म्हणून ब्लॉक करा असा सल्ला दिला आहे ज्यांना अश्या पोस्टचा त्रास होतो.
भारत हरला पाहिजे हा काही त्यावर उपाय नाही.
190 च्या आसपास स्कोअर असता तर
190 च्या आसपास स्कोअर असता तर मजा आली असती.
आता तुमच्यापैकी किती जणांनी
आता तुमच्यापैकी किती जणांनी नोटीस केलं माहीत नाही पण त्यांचा जो ओपनिंग खेळाडू आहे ज्याने पन्नास मारले त्याने पन्नास झाल्यावर बॅट बंदुकीसारखी पकडून गोळ्या मारण्याची ॲक्शन केली. हे सगळे खेळाडू क्रिकेट खेळायला लागले कारण त्यांची दहशतवादात ॲडमिशन नाही झाली.
बोकलत तुम्ही म्हणत आहात तो
बोकलत तुम्ही म्हणत आहात तो मेसेज वायरल झाला आहे. एका ग्रूपवर पाहिला.
सिंदूर ३.० लोडिंग
सिंदूर ३.० लोडिंग
Pages