विविध ऋतुंवरील कविता

Submitted by टवणे सर on 17 July, 2025 - 11:26

मी राहतो तिथे आम्ही काही साहित्य प्रेमी अनियमितपणे उपक्रम करतो. त्यात विविध ऋतुंवरील कवितांचे सादरीकरण असा एक विषय डोक्यात आहे. त्यासाठी बरीच शोधाशोध केली तरी फक्त पावसाळ्यावरीलच कविता सापडत आहेत. त्यातल्या काही कवितांचे दुवे खाली देत आहे.

गद्यामध्ये उन्हाळा किंवा हिवाळा वगैरेंचे वर्णन येते. जसे गुंतवळ या निळासावळा कतहसंग्रहातील जीएंच्या कथेत एका माळरानावर चालू असलेल्या धरणाच्या कामाच्या ठिकाणी दुपारी भर उन्हात काय होते त्याचे वर्नन आहे. जरीलामध्ये चांगदेव पाटीभर्भर उन्हाळ्यात दुपारी पान खाऊन येताना त्या उन्हाचे भयप्रद वर्णन करतो (आणि दस्तयवस्कीला बहुतेक एक कॉम्प्लिमेन्ट पण देतो).

तश्याच इतर ऋतुंवर केलेल्या कवितांचे संकलन करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Man_Chimb_Pavasali

https://www.aathavanitli-gani.com/Song/Gadad_Jambhala_Bharala

https://www.aathavanitli-gani.com/Song/Chimb_Pavasane_Raan_Jhale

https://www.aathavanitli-gani.com/Song/Nabha_Utaru_Aala

https://www.aathavanitli-gani.com/Song/Gadad_Nile_Gadad_Nile

https://www.aathavanitli-gani.com/Song/Kshitiji_Aale_Bharate_Ga

https://www.aathavanitli-gani.com/Song/Ghan_Ghan_Mala_Nabhi

https://www.aathavanitli-gani.com/Song/Aala_Paus_Matichya_Vasat

https://www.aathavanitli-gani.com/Song/Paus_Aala_Vara_Aala

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधि रे येशिल तू
भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे (इथे अपूर्ण दिसतंय, पूर्ण सापडलं तर देते.)
हासत वसंत ये मनी अलबेला
ही गीतं चटकन आठवली.

बाकी
शारद सुंदर चंदेरी राती, कोकिळ कुहुकुकू बोले वगैरे आहेत, पण त्यात ऋतूचा उल्लेख असला तरी ती मुख्यत्वे प्रेमगीतंच आहेत.

मर्ढेकरांच्या दोन कविता आहेत. शिशिरागम , पितात सारे गोड हिवाळा

गोदागौरव- चंद्रशेखर - या कवितेत गोदावती नदीचे वेगवेगळ्या ऋतूंतील वर्णन आहे

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या
सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळत येई
माघामधली प्रभात सुंदर

मर्ढेकरच अर्थात!! अजून कोण ??

राम जन्मला गं सखी राम जन्मला ची सुरुवात चैत्राच्या वर्णनाने आहे. कालगणने नुसार कविता ठरवणार असाल तर ती पहिली घ्या Happy

ॠतूंचा उल्लेख असलेल्या या काही कविता -

पाणी - इंदिरा संत
वर कोर्‍या आभाळाची, भट्टी तापली तापली
खाली लेकरांची माय वारा पदराने घाली
--------
पानगळ - इंदिरा संत
आला शिशिर संपत, आल्या पावसाच्या सरी
--------
शिशिर - कवी अनिल
चढली शिशिर ऋतुची कळा, आली सृष्टीवरी अवकळा
--------
कापणी - बहिणाबाई चौधरी
आता लागे मार्गेसर, आली कापनी कापनी
आज करे खालेवर्‍हे डाव्या डोयाची पापनी

-----
आणि, बाईंची आवडती कविता/गाणे - श्रावणात घननिळा !

अरे वा! आभार. भरपूर वेगवेगळ्या कविता मिळाल्या.
"असे हे जगाचे फिरे चक्र बाळा" बहुतेक गदिमांनी इथे अमेरिका/कॅनडात आले असताना लिहिलेली दिसते Happy

शिशिर ॠतूचं गान - वा. रा. कांत
हलके हलके हसते गळते तरुचे पान न् पान,
पानझडीत या ऐकून घ्या गं शिशिर ॠतूचं गान

बालकवी - श्रावणमासी, शारदीय सौंदर्यदेवता, थबथबली ओथंबुनि खाली आली

मर्ढेकर - शिशिरागम, न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, आला आषाढ श्रावण, अभ्रांच्या या कुंद अफूने, अजून येतो वास फुलांना, झोपली ग खुळी बाळे, -- आणि मृगाचा पाऊस आला

ढसाळ - पाऊस-कळा (ही नेहमीच्या पावसाळी कवितापेक्षा वेगळी)

त्या बालभारतीच्या ब्लॉग लिंकवर ही एक कविता मिळाली >>> छान आहे कविता, माहीती नव्हती. कवीही अज्ञात असं लिहीलंय.

पावसात भिजतो श्रावण, सुखाचा महीना. हे माझिया प्रियाला प्रीत कळेना ह्या शोभा गुर्टुने म्हटलेल्या गाण्यात आहे.

आला पाऊस मातीच्या वासात गं.

पावसाळा ऋतुच जास्त आठवतोय मला.

महानोरांचा पावसाळी कविता असा एक संग्रहच आहे. बोरकरांची "गळण्याआधी सळसळुनी ही रंग उधळती पाने" अशी एक नॉन-पावसाळी कविता आहे. त्यांच्या अजूनही असाव्यात (वर जलद भरुनि आले तुम्ही दिलीच आहे). तुम्हाला ऋतुंच्या स्पेसिफिकली नसतील हव्या तर पाऊस सोडून इतर हवामान/वातावरणाच्या/दिवसाचा काळ असलेल्या बऱ्याच मिळतील. उदा. बालकवींची पाखरास आहे ज्यात एका सबंध दिवसाचे सुंदर प्रोग्रेशन आहे. तशी रजनीस आवाहन ही आहे. त्या कवितेची आठवण करून देणारी मर्ढेकरांची शुभ्र मोहक तिमिर वसना आहे

तुम्हाला ऋतुंच्या स्पेसिफिकली नसतील हव्या तर पाऊस सोडून इतर हवामान/वातावरणाच्या/दिवसाचा काळ असलेल्या बऱ्याच मिळतील.
>>>
इतरही हव्या आहेत. वातावरणाच्या, दिवसाचा काळ वगैरे.
माझ्या अल्प वाचनात फक्त पावसाळी कविताच येत होत्या आणि त्या मला नको होत्या म्हणून हा धागाप्रपंच. ज्याचा उपयोग झाला आहे.

अच्छा तश्या बऱ्याच मिळतील. ढसाळांच्या ही अजून आहेत - फाल्गुन, सुगी वगैरे. माझ्याकडे जेवढे कवितासंग्रह आहेत त्यातून जेवढ्या मिळतील तेवढ्या मी करतो शेअर हळू हळू. तुमच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा Happy

टवणे सर पटलं तर घ्या नायतर सोडून द्या
https://www.maayboli.com/node/86679

https://www.maayboli.com/node/71169

शिशिर ऋतुचा स्वच्छंद वात आला
कर्णी पर्नांच्या लागुनी म्हणाला
माळरानावर दूर एक वेळा
चला माझ्यासह खेळ खेळण्याला

ग्रीष्माची चाहूल कुसुमाग्रज https://gauravmarathicha.blogspot.com/2013/07/blog-post_6211.html?m=1

छान धागा. आम्ही ३ वर्षांपूर्वी एका लोकल रेडिओसाठी ऋतुचक्र या विषयावर एक कार्यक्रम केला होता तेव्हा आम्हाला हाच प्रश्न पडला होता. वरती लोकांनी दिलेल्या कविता उत्तम आहेतच. इंदिरा संत यांची ग्रीष्मातली दुपार वरती झाली नसल्यास नक्की बघा.

वसंत ऋतू आला गाणं खूप ऐकून आहे, पण जुन्या अमृतमंथन सिनेमात ऋतु वसंत आला असे एक गाणं आहे ते फारसं कुणाला माहीत नसतं. https://youtu.be/p4MQjTN0Zms?si=RAVtGesOA0JKftrj

रक्तामध्ये ओढ मातीची मनास मातीचे ताजेपण ह्या इंदीरा संतांच्या कवितेते बहुतेक सगळे ऋतू एकाच कवितेत उल्लेखले आहेत.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Raktamadhye_Odha

वैशाखमासी प्रतिवर्षी येती
आकाशमार्गे नव मेघपंक्ती
नेमेची येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा
- कवी अज्ञात

पूर्ण कविता असल्यास द्यावी.

Pages