Submitted by अनन्त्_यात्री on 26 May, 2020 - 12:41
झुंजूमुंजू आभाळात
किती सांडले केशर
सोनसळत्या सकाळी
निळे झळाळे अंबर
तळपत्या माध्यान्हीची
वितळती काचधार
धूसरशा संध्याकाळी
अदृष्टाची हुरहूर
नि:शब्दाच्या चाहुलीने
जागे रात्र काळीशार
प्रहरांच्या रंगी रंगे
बिलोरी हे कालचक्र
चक्रनेमिक्रम त्याचा
अनादि नी निरंतर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अप्रतिम चक्र वर्णन...
अप्रतिम चक्र वर्णन...
क्या बात है... फारच सुंदर...
क्या बात है...
फारच सुंदर...
खूप छान आहे कविता..
खूप छान आहे कविता..
प्रहरांच्या रंगी रंगे
बिलोरी हे कालचक्र>> हे फक्त जरा बिर्याणीत इलायची...
सुंदर
सुंदर
प्रतिसाद देणार्या सर्व
प्रतिसाद देणार्या सर्व कवितारसिकांना धन्यवाद!
कालचक्र हे निरंतर!!! खूप
कालचक्र हे निरंतर!!! खूप सुंदर!!!
खूप सुंदर..
खूप सुंदर..
शब्दांवर प्रभुत्व आहे तुमचं.
सुंदर
सुंदर
रूपाली, तो मी नव्हेच .
रूपाली, तो मी नव्हेच ..धन्यवाद!
'चंद्र'शेखर धन्यवाद!
'चंद्र'शेखर धन्यवाद!
अप्रतिम....
अप्रतिम....
वितळती काचधार वाह!!
वितळती काचधार वाह!!
दत्तात्रयजी, सामो धन्यवाद!
दत्तात्रयजी, सामो धन्यवाद!