मी राहतो तिथे आम्ही काही साहित्य प्रेमी अनियमितपणे उपक्रम करतो. त्यात विविध ऋतुंवरील कवितांचे सादरीकरण असा एक विषय डोक्यात आहे. त्यासाठी बरीच शोधाशोध केली तरी फक्त पावसाळ्यावरीलच कविता सापडत आहेत. त्यातल्या काही कवितांचे दुवे खाली देत आहे.
गद्यामध्ये उन्हाळा किंवा हिवाळा वगैरेंचे वर्णन येते. जसे गुंतवळ या निळासावळा कतहसंग्रहातील जीएंच्या कथेत एका माळरानावर चालू असलेल्या धरणाच्या कामाच्या ठिकाणी दुपारी भर उन्हात काय होते त्याचे वर्नन आहे. जरीलामध्ये चांगदेव पाटीभर्भर उन्हाळ्यात दुपारी पान खाऊन येताना त्या उन्हाचे भयप्रद वर्णन करतो (आणि दस्तयवस्कीला बहुतेक एक कॉम्प्लिमेन्ट पण देतो).
तश्याच इतर ऋतुंवर केलेल्या कवितांचे संकलन करण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.
https://www.aathavanitli-gani.com/Song/Man_Chimb_Pavasali
https://www.aathavanitli-gani.com/Song/Gadad_Jambhala_Bharala
https://www.aathavanitli-gani.com/Song/Chimb_Pavasane_Raan_Jhale
https://www.aathavanitli-gani.com/Song/Nabha_Utaru_Aala
https://www.aathavanitli-gani.com/Song/Gadad_Nile_Gadad_Nile
https://www.aathavanitli-gani.com/Song/Kshitiji_Aale_Bharate_Ga
https://www.aathavanitli-gani.com/Song/Ghan_Ghan_Mala_Nabhi
https://www.aathavanitli-gani.com/Song/Aala_Paus_Matichya_Vasat
सर्वांना धन्यवाद. पॉवर ऑफ
सर्वांना धन्यवाद. पॉवर ऑफ मायबोली.
साळुंखे साहेब, तुमची कविता नक्की घेऊ.
धन्यवाद टवणे सर
धन्यवाद टवणे सर
बरं वाटलं . यातूनच लिहायला प्रोत्साहन मिळतं.
केशवसुत: पर्जन्याप्रत (हरपले
वर उल्लेख केलेल्यांतील काही कविता
केशवसुत: पर्जन्याप्रत (हरपले श्रेय: निवडक केशवसुत)
बालकवी: पाखरास, आवाहन, शुक्रोदय, शारदीय सौन्दर्यदेवता, पाऊस, खेड्यातील एक रात्र, मेघांचा कापूस (फुलराणी: निवडक बालकवी)
कुसुमाग्रज: हिमलाट, उषःकाल, उत्तररात्री, माध्यान्ह (रसयात्रा)
बोरकर: सांजवेळ (चांदणवेल)
मर्ढेकर: शिशिरागम, देवाजीने करुणा केली, न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, पंक्चरली जरी रात्र, अभ्रांच्या ये कुंद अफूने, झोपली ग खुळी बाळे, अजून येतो वास फुलांना, आला आषाढ श्रावण, –आणि मृगाचा पाऊस आला, शुभ्र-मोहक-तिमिर-वसना (मर्ढेकरांची कविता)
इंदिरा संत: मृण्मयी, झंझावात (त्रिदल: निवडक बालकवी, कुसुमाग्रज, इंदिरा संत)
सुरेश भट: अवेळीचा पाऊस (एल्गार)
ढसाळ: पाऊस-कळा (गोलपिठा), पावसाचे गाणे (तुही यत्ता कंची?), फाल्गुन, संवेदना ओढते ओरखडा (गांडू बगीचा), सुगी (या सत्तेत जीव रमत नाही), स्थायी दुष्काळातनं (मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले)
अरुण म्हात्रे: ऋतू शहरातले (कवितांच्या गावा जावे)
धन्यवाद चेराज. हे सर्व
धन्यवाद चेराज. हे सर्व कवितासंग्रह नाहियेत माझ्याकडे. कोणकोनते मिळताहेत ते पाहतो.
ओह, actually मी वरच्या पोस्ट
ओह, actually मी वरच्या पोस्ट मधील "वर उल्लेख केलेल्यांतील काही कविता" ह्याला एका pdf ची hyperlink सेट केली होती ज्यात ह्या माझ्याकडील कविता स्कॅन करून ठेवल्या आहेत. ती लिंक
आता स्पष्टच लिहितो: https://drive.google.com/file/d/1JbUgdIuTp0-pU25P8PJCoMjxBYFZCn2l/view?u...
Hopefully तुम्हाला उपयोगी होतील. जर access चा काही issue असेल तर सांगा. अजून काही कविता आहेत त्या weekend ला upload करेन.
Thanks a lot!!
Thanks a lot!!
बोरकरांची वर सांगितलेली
बोरकरांची वर सांगितलेली गळण्याआधी (अनुरागीणी) ही कविता अशी आहे -
गळण्याआधी सळसळुनी ही रंग उधळती पाने
आग लागल्यागत राळांचा फाग खेळती राने
ज्वाळांचे जणु लोळ झोंबती लाल, पीत, नारिंगी
पर्णांचा वर्णोत्सव घेतो उसळ्या चंगीभंगी
उन्हे सांजची सरीसरींनी त्यात ओतती सोने
झडती पाने देखील होती अमृत भरले द्रोणे
झडण्याची चाहूल लागता असा महोत्सव त्यांचा
सण गणुनी पिटितात चौघडा येणाऱ्या मरणाचा
झाडे राने उंच उडविती पर्णांतून पताका
शाखाशाखांतून टाकिती सुख संतोषशलाका
म्हणती आता अर्पण होऊ, झेल हिमसुमवर्षा
हे सामोरे सहर्ष आम्ही नव्या जिण्याच्या स्पर्शा
मीहि जाहलो उत्सुक त्यासह अर्पण होण्यासाठी
रोमांचातुनि झडती वर्षे रंगत पोटीपाठी
तुम्ही ऋतू म्हणालात म्हणून, फैजची एक नज्म खूप आवडीची आहे जी टिना सानी ने अप्रतिम गायली आहे - https://www.youtube.com/watch?v=E8xdV3-bHv8
बहार आई तो जैसे यक-बार
लौट आए हैं फिर अदम से
वो ख़्वाब सारे शबाब सारे
जो तेरे होंटों पे मर-मिटे थे
जो मिट के हर बार फिर जिए थे
निखर गए हैं गुलाब सारे
जो तेरी यादों से मुश्कबू हैं
जो तेरे उश्शाक़ का लहू हैं
उबल पड़े हैं अज़ाब सारे
मलाल-ए-अहवाल-ए-दोस्ताँ भी
ख़ुमार-ए-आग़ोश-ए-मह-वशां भी
ग़ुबार-ए-ख़ातिर के बाब सारे
तिरे हमारे
सवाल सारे जवाब सारे
बहार आई तो खुल गए हैं
नए सिरे से हिसाब सारे
https://www.rekhta.org/nazms/bahaar-aaii-faiz-ahmad-faiz-nazms?lang=hi
लोकांनी इतक्या सुंदर /
लोकांनी इतक्या सुंदर / प्रतिथयश कवींच्या कविता सांगितल्या आहेत.
तरीही धीर करून लिहिते.
तुमचा हा धागा पाहिला तेव्हाच एक आठवण झाली.
एक असाच हौशी मंडळींचा ( त्यांनी केलेलं लेखन/ कविता ) वाचण्याचा कार्यक्रम झाला.
त्यात एकानी सहा ऋतू वर प्रत्येकी एक असे हायकू सादर केले. त्यांना ते खूप छान जमून आले होते.
बोरकरांची वर सांगितलेली
बोरकरांची वर सांगितलेली गळण्याआधी >>> खूप सुंदर!
Pages