मराठी कोडं - रंभा, मेनका आणि उर्वशी! - पुढची आवृत्ती!

Submitted by चीकू on 26 May, 2025 - 10:59

लोकहो, आधीचे कोडे मायबोलीकरांनी सोडवले आहे. आता त्याचीच एक पुढची आवृत्त्ती देत आहे Happy

सर्व गोष्टी तशाच आहेत. जी बदललेली गोष्ट आहे ती डकवत आहे.

******************************************

एक राजा रानात शिकारीला गेला. त्याच्यावर एका वाघाने हल्ला केला. राजा एकटाच कसाबसा वाघाला मारून परत आला. पण त्यात तो खूपच जखमी झाला आणि त्याची शुद्ध गेली. राजवैद्यांनी प्रधानाला गंभीरपणे सांगितले 'राजेसाहेबांना वाचवण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वर्गातील नंदनवनात कल्पवृक्ष आहे त्याचे फळ आणणे. या फळाचा रस राजसाहेबांच्या मुखात सोडल्यासच ते शुद्धीवर येतील नाहीतर प्राण वाचवणे असंभव आहे'.

राजाकडे एक इच्छाधारी विमान होते. प्रधान लगेच विमानात स्वार होऊन नंदनवनाच्या दारापाशी पोचला. दारापाशी खुद्द इंद्र उभा होता. त्याने प्रधानाला हटकलं. प्रधानाने सगळी कहाणी सांगून कल्पवृक्षाचे फळ घेऊन जायची परवानगी मागितली.

इंद्र हसून म्हणाला 'माझ्या परवानगीशिवाय जो कल्पवृक्षाला स्पर्श करतो त्याचे भस्म होते. पण तू माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिलंस तरच मी तुला फळ घ्यायची परवानगी देईन. बघ, त्या समोरच्या वेलींच्या मंडपाखाली तीन अतिसुंदर स्त्रिया उभ्या आहेत. त्या तीन अप्सरा आहेत, रंभा, मेनका आणि उर्वशी. आता तू मला त्यातली रंभा कोणती, मेनका कोणती आणि उर्वशी कोणती ते बिनचूक सांगायचस. आणि मगच तू फळ घेऊन जाऊ शकशील'

प्रधान म्हणाला 'पण मी त्या तिघींना पहिल्यांदाच बघतोय. त्यातली कोणती कोण ते मला कसं कळणार?'

इंद्र म्हणाला 'त्यासाठी मी तुला त्यांना तीन प्रश्न विचारायची परवानगी देतो. हे प्रश्न असे हवेत की त्यांची उत्तरे हो किंवा नाही या दोन्हींपैकीच असली पाहिजेत. आता हे तीन प्रश्न कसे विचारायचे ते तू ठरव. तू एका अप्सरेला तीन प्रश्न विचारू शकतोस, प्रत्येक अप्सरेला एक असे तीन प्रश्न विचारू शकतोस. किंवा एकीला दोन आणि दुसरीला एक असेही विचारू शकतोस. एकूण प्रश्नसंख्या तीन हवी. आणि एका वेळी एकाच अप्सरेला प्रश्न विचारायचा. तिचे उत्तर ऐकून मग पुढ़चा प्रश्न तिला अथवा दुसरीला विचारायचा का ते तूच ठरवायच आहेस’

प्रधान म्हणाला 'ठीक आहे' आणि अप्सरांकड़े जायला निघाला.

इंद्र त्याला रोखत म्हणाला 'थांब, माझं बोलणं संपलेलं नाही. आम्ही इथे देवलोकात नेहमी सत्य बोलतो. रंभा नेहमी सत्य बोलते. पण मेनका आणि उर्वशीला तपोभंग केल्यामुळे ऋषींनी शाप दिला आहे. त्यामुळे उर्वशी नेहमी असत्य बोलते आणि मेनका कधी सत्य तर कधी असत्य बोलते.'

प्रधान मान डोलावून परत पुढे जायला निघाला पण इंद्राने त्याला परत अडवले.

'अजून एक महत्वाचं. मी मगाशी म्हणालो की तुझ्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असेच आले पाहिजे. या अप्सरांना तुझी भाषा उत्तम कळते पण अप्सरालोकाच्या नियमाप्रमाणे त्या तुला उत्तर अप्सराभाषेत देतील. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला 'आर' किंवा 'पार' असे मिळेल. एका शब्दाचा अर्थ हो असा होतो आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ नाही असा होतो. अप्सरालोकाच्या नियमाप्रमाणे कुठल्या शब्दाचा नक्की काय अर्थ होतो ते मला तुला सांगता येणार नाही'. अप्सराभाषेत हो आणि नाही यांना कोणते शब्द वापरतात ते मी तुला सांगणार नाही. फक्त त्या अर्थाचे दोन अलग शब्द आहेत एवढेच सांगेन.

प्रधानाला राजाचे प्राण वाचवण्यासाठी इंद्राच्या कोड्याचे बरोबर उत्तर देणं भाग होतं. आता प्रधान कोडे कसे सोडवेल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चीकू मला वाटते "अमुक प्रश्नाचे उत्तर तू आमच्या भाषेतील अकारविल्ह्यानुसार आधी येणाऱ्या शब्दाने देणार का?"
या प्रश्नाने उत्तर अकारविल्ह्यानुसार आधी येणाऱ्या शब्दाचा अर्थ काय आहे यानुसार रंभा किंवा उर्वशीपुढे विरोधाभास निर्माण होतो.
ते कसे चालेल?
उदा. आधीचाच प्रश्न अ ला विचारला "ब मेनका आहे का याचे उत्तर तू आमच्या भाषेतील अकारविल्ह्यानुसार आधी येणाऱ्या शब्दाने देणार का?"

समजा ब ही मेनकाच आहे.
आणि त्याच्या भाषेतून शब्द आहेत उस आणि कूस.
समजा उस = हो, आणि कूस = नाही.

आता अ रंभा असेल तर ती उत्तर देईल "उस". कारण तो शब्द अकारविल्ह्यानुसार आधीही आहे आणि त्याचे होय असे उत्तर दोन्ही प्रश्नांचे योग्य उत्तर आहे.

पण उस चा अर्थ नाही असेल आणि कूसचा हो.
ब मेनका आहे का? उत्तर कूस.
याचे उत्तर अकारविल्ह्यानुसार आधी येणाऱ्या शब्दाने देणार का? उस आधी व कूस तर नंतर आहे. म्हणजे यासाठी नाही म्हणायला जावे "उस" उत्तर देऊन ते अकारविल्ह्यानुसार आधी येते. पण ते आधी येत असेल तर हो म्हणजे "कूस" म्हणायला पाहिजे. पण ते तर नंतर येते. विरोधाभास. ती उत्तर देऊ शकणार नाही.

हीच परिस्थिती अ उर्वशी असेल आणि उस = होय असताना येते.

मानवजी मी पहिला प्रश्न खाली देत आहे. अजून दुसरा प्रश्न काय आहे ते देत नाही कारण तुम्हाला कदाचित पहिल्या प्रश्नावरून ते येईल.

अप्सरांना अ, ब, क अशी नावे द्या.

पहिला प्रश्न अ ला विचारा: 'जर मी तुला तू मेनका आहेस असे विचारले तर त्याचे उत्तर तुमच्या भाषेत हो आणि नाही यांना जे शब्द आहेत त्यातील माझ्या भाषेतील अकारविल्ह्यानुसार आधी येणाऱ्या शब्दाने देणार का?'

चीकू या प्रश्नावर मी बराच खल केला आहे आधीच.
"तू मेनका आहेस का?"याचे उत्तर रंभा, नाही असे आणि उर्वशी होय असे देते.
"तू मेनका आहेस का याचे उत्तर तू होय असे देणार का?"
याचे उत्तर दोघीही नाही असे देतात.
तर "तू मेनका आहेस का याचे उत्तर तू नाही असे देणार का?" याचे उत्तर दोघेहीही हो असे देतात.
(थोडक्यात उत्तर ज्या अर्थी आहे का विचारले त्याच्या विरुद्धार्थी.)

प्रश्न: जर मी तुला तू मेनका आहेस असे विचारले तर त्याचे उत्तर तुमच्या भाषेत हो आणि नाही यांना जे शब्द आहेत त्यातील माझ्या भाषेतील अकारविल्ह्यानुसार आधी येणाऱ्या शब्दाने देणार का?

अ जर रंभा आहे:
अकारविल्ह्यात आधी येणारा त्यांचा शब्द होय या अर्थी असेल
तर ती नाही म्हणजे अकारविल्ह्यात नंतर येणारे कूस असे उत्तर देऊन प्रश्नाचे तिच्या स्वभावाला अनुसरून सत्य उत्तर देते.
पण अकारविल्ह्यात आधी येणारा त्यांचा शब्द नाही या अर्थी असेल तर ती उत्तर हो म्हणजे कूस असे द्यायला गेली तर ते तर अकारविल्ह्यात नंतर येते. आणि नाही म्हणजे उस असे उत्तर द्यायला गेली तर तर ते अकारविल्ह्यात आधी येते.
मग हा विरोधाभास नव्हे का, ती निरुत्तर होते.

माझे काही चुकतेय का यात?

जर हा विरोधाभास होत नाही असे तुम्ही कन्फर्म करत असाल तर मग तसे मानुन पुढे विचार करेन.

पण अकारविल्ह्यात आधी येणारा त्यांचा शब्द नाही या अर्थी असेल तर ती उत्तर हो म्हणजे कूस असे द्यायला गेली तर ते तर अकारविल्ह्यात नंतर येते. आणि नाही म्हणजे उस असे उत्तर द्यायला गेली तर तर ते अकारविल्ह्यात आधी येते.>>>>>>

हा विरोधाभास नाही. समजा हो आणि नाही यांना पार आणि आर हे शब्द आहेत.
आता रंभेचे खरे उत्तर असणार नाही कारण ती मेनका नाही म्हणजे आर.
तिचे उत्तर आर हे अनुक्रमे पहिले आहे.
त्यामुळे तिचे पहिल्या प्रश्नाचे उत्तर असेल 'हो मी तो अनुक्रमे पहिला येणारा शब्द (आर) वापरीन' आणि हो याला शब्द आहे पार त्यामुळे तिचे फायनल उत्तर असेल पार.

फायनल उत्तर ते अकारविल्ह्याप्रमाणे नाही तर जो प्रश्न आहे 'तू मेनका आहेस का?' त्याचे उत्तर देताना ती अकारविल्ह्याप्रमाणे पहिला वा दुसरा शब्द वापरेल का? या प्रश्नाचे उत्तर आहे.

मला आशा आहे की अजून clear झालं असेल.

चीकू, ओके तो विरोधाभास नाही असे मानुयात.

तरीही माझ्या विचारांनुसार:
या प्रश्नाचे उत्तर रंभा किंवा उर्वशी अकारविल्ह्यानुसार नंतर येणाऱ्या शब्दानेच देणार.
पण मेनका काहीही उत्तर देऊ शकते.

जे उत्तर आले ते अकारविल्ह्यानुसार आधीचे आहे की नंतरचे हे आपल्याला कळायला मार्ग नाही.

मग या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरावरून पुढला प्रश्न कुणाला विचारावा याची काहीच दिशा मिळत नाही.

तर आता तुम्ही तुमचा दुसरा प्रश्न काय ते सुद्धा सांगा.

मी आधी हिंट दिल्याप्रमाणे दुसरा प्रश्न ब किंवा क यांना विचारायचा आहे (अ ला परत नाही).
आणि प्रश्न १ आणि २ यांची एकत्रित माहिती घेऊन मग तिसरा प्रश्न मेनका नसणारीला विचारायचा आहे.

दुसरा प्रश्न ब ला विचारा. म्हणजे अ सोडून कोणालाही. क ला ही विचारु शकतो.

'जर मी तुला विचारलं की तू मेनका आहेस का, तर तुझे उत्तर आणि माझ्या आधीच्या पहिल्या प्रश्नाला मिळालेले उत्तर सारखेच असेल का?'

म्हणजे जर पहिल्या प्रश्नाला अ कडून पार हे उत्तर मिळाले असेल तर दुसर्‍या प्रश्नाचे उत्तरही ब (जिला विचारलं आहे ती) पार असे देणार का?

मी हा विचार करून झाला आहे. या प्रश्नांनी मला कोडे पूर्ण सुटले नाही.
यात जर ब ने दिलेले उत्तर अ ने दिलेल्या सारखेच असेल तर ब नक्कीच मेनका आहे, कारण रंभा व उर्वशी त्या मेनका नसल्याने विचारलेल्या अर्थाच्या विरुद्धार्थी उत्तर देतील, सारखे उत्तर मेनकाच देऊ शकते. मेनका कोण आहे हे कळले की दुसऱ्या कुठलीलाही एक प्रश्न विचारून ती रंभा आहे की उर्वशी हे कळते, दोन कोण हे कळल्या की तिसरी कोण हे कळते.

पण समजा वेगळे उत्तर आले.
त्यात दोन शक्यता:
१. ब ने दिलेले उत्तर हे अकारविल्ह्यानुसार दुसरे आहे: म्हणजे अ ने दिलेले उत्तर अकारविल्ह्यानुसार पहिले आहे. याचा अर्थ अ नक्कीच मेनका आहे. कारण ती रंभा किंवा उर्वशी असती तर तिने विचारलेल्या प्रश्नाच्या (अकारविल्ह्यानुसार पहिल्यांदा येणाऱ्या शब्दाने देणार का) विरूद्धार्थाने दिले असते. वरील प्रमाणे मग दुसऱ्या कुठलीलाही एक प्रश्न विचारून कोडे सुटते.

२. ब ने दिलेले उत्तर अकारविल्ह्यानुसार पहिले आहे:
याचा अर्थ अ ने अकारविल्ह्यानुसार दुसरे उत्तर दिले होते.
म्हणजे ती रंभा-उर्वशी किंवा मेनका कुणीही असु शकते.
आणि ब ने अ सारखे उत्तर न दिल्याने ती सुद्धा रंभा-उर्वशी किंवा मेनका कुणीही असु शकते.

ब ने दिलेले उत्तर अकारविल्ह्यानुसार पहिले आहे:
याचा अर्थ अ ने अकारविल्ह्यानुसार दुसरे उत्तर दिले होते.
म्हणजे ती रंभा-उर्वशी किंवा मेनका कुणीही असु शकते.>>>
नाही हे बरोबर नाहीये. अ रंभा किंवा उर्वशी असू शकते. मेनका अकारविल्ह्यानुसार पहिलेच उत्तर देणार पहिल्या प्रश्नाला. म्हणजे इथे क नक्की मेनका आहे.

प्रश्न१: अ ला. समजा उत्तर आले "ख".

आपल्याला माहीत नाही की "ख" अकारविल्ह्यानुसार पहिले आहे की दुसरे.
मेनका कुठलेही उत्तर देऊ शकते. अकारविल्ह्यानुसार पहिले अथवा दुसरे.

प्रश्न २: ब ला "तू मेनका आहेस का याचे तुझे उत्तर "ख" आहे का"?
"ख" हेच उत्तर आले तर ब मेनका आहे.

आता दुसरा शब्द "क" असु शकतो किंवा "ग".
"क" हा अकारविल्ह्यानुसार "ख" च्या आधी आहे, "ग" हा नंतर आहे.

उत्तर "ग" असे आले. तर अ चे "ख" उत्तर हे अकारविल्ह्यानुसार आधी आहे. म्हणजे अ मेनका आहे.

उत्तर "क" आले. म्हणजे अ चे "ख" हे उत्तर अकारविल्ह्यायानुसार दुसरे आहे. मेनका काहीही उत्तर देत असल्याने ती सुद्धा ख असे उत्तर देऊ शकते. ती क असेच उत्तर का बरं देणार?

आता अ मेनका आहे असे समजू
हो आणि नाही यांना आर आणि पार हे अनुक्रमे शब्द आहेत असं समजू.
मेनका सत्य बोलत आहे असे समजू.
तर तिचे उत्तर असणार 'हो मी मेनका आहे आणि मी या प्रश्नाचे हो असे उत्तर देईन. हो हा शब्द आर म्हणजे तो अनुक्रमे पहिला येतो तर त्या शब्दाने मी उत्तर देणार'
तर तिचे फायनल उत्तर आहे हो म्हणजे आर
मेनका असत्य बोलत आहे असे समजू.
तर तिचे उत्तर असणार 'नाही मी मेनका नाही आणि मी या प्रश्नाचे नाही असे उत्तर देईन. नाही हा शब्द पार म्हणजे तो अनुक्रमे दुसरा येतो तर त्या शब्दाने मी उत्तर देणार. पण मी तर असत्य बोलत आहे म्हणजे माझे फायनल उत्तर हो म्हणजे आर पाहिजे.
तर तिचे फायनल उत्तर आहे हो म्हणजे आर.

आता अ मेनका आहे असे समजू
हो आणि नाही यांना पार आणि आर हे अनुक्रमे शब्द आहेत असं समजू.
मेनका सत्य बोलत आहे असे समजू.
तर तिचे उत्तर असणार 'हो मी मेनका आहे आणि मी या प्रश्नाचे हो असे उत्तर देईन. हो हा शब्द पार म्हणजे तो अनुक्रमे दुसरा येतो तर अनुक्रमे पहिल्या शब्दाने मी उत्तर देणार नाही '
तर तिचे फायनल उत्तर आहे नाही म्हणजे आर
मेनका असत्य बोलत आहे असे समजू.
तर तिचे उत्तर असणार 'नाही मी मेनका नाही आणि मी या प्रश्नाचे नाही असे उत्तर देईन. नाही हा शब्द आर म्हणजे तो अनुक्रमे पहिला येतो तर त्या शब्दाने मी उत्तर देणार. पण मी तर असत्य बोलत आहे म्हणजे माझे फायनल उत्तर नाही म्हणजे आर पाहिजे.
तर तिचे फायनल उत्तर आहे नाही म्हणजे आर.

तर अ मेनका असेल तर ती अकाविल्ह्याप्रमाणे जो पहिला शब्द असेल तेच तिचे उत्तर असणार पहिल्या प्रश्नाचं.

पहिल्या दोन प्रश्नांची पुढील तीन combinations मिळतील.

आर - पार : अ मेनका आहे
पार - पार: ब मेनका आहे
पार - आर: क मेनका आहे

आपल्याला मेनका कोण ते नक्की कळलं की तिसरा प्रश्न मेनका नसणारीला विचारायचा आहे.

चीकू, मेनका मी सत्य बोलणार की असत्य हे आधी ठरवते आणि मग प्रश्नाचं उत्तर देते हे काही पटले नाही. ती प्रश्न आला की तिच्या स्वभावानुसार त्याचं मनाला येईल ते कधी सत्य आणि असत्य उत्तर देईल.
तू मेनका आहेस का? होय. याच तू उत्तर अमुक असं देणार का? देईन किंवा नाही पण. आता माझ्या आलं हो, दिलं हो.
हाच प्रश्न परत परत विचारला, तर मनात आलं तेव्हा याच प्रश्नाचं उत्तर कधी हो देईन , कधी नाही देईन,प्रत्येकवेळी हो देईल आणि प्रत्येक वेळी नाही असे सुद्धा देईन.

जर मेनका पुढे प्रश्नकर्ता आला की आधी ठरवते मी आता सत्य बोलणार की असत्य आणि मग प्रश्न त्या घेतलेल्या रोल प्रमाणे प्रोसेस करून उत्तर देत असेल तर मग या सर्वच आवृत्तीच्या कोड्याला विशेष अर्थ रहात नाही.

त्यात आवृत्ती १
त्या उत्तर आपल्याच भाषेत देतात: होय/नाही
तू मेनका आहेस का याचे उत्तर हो आहे का?
मेनका नेहमी होय असेच उत्तर देणार.

आवृत्ती२: त्यांच्या भाषेत आर/पार शब्द आहेत.
तू मेनका आहेस का याचे उत्तर आर आहे का?
मेनका नेहमी आर असेच उत्तर देणार.

एका प्रश्नात मेनका कबूल करतेय मी मेनका आहे, आणि कितीही वेळा विचारा तेच उत्तर.

मानव यांच्या विचारांशी सहमत. मीसुद्धा विचार करताना मेनकेचे उत्तर हे प्रश्न विचारण्यापूर्वीच तयार असते असे समजून विचार केला होता. तीचे उत्तर कोणत्याही प्रकारे प्रेडिक्ट करता येत नाही असे मी समजून होतो.

मेनका आधीच आपला रोल ठरवत असेल तर आधीच्या आवृत्तीचं उत्तर 'नक्की कोण मेनका नाही शोधणं आणि पहिल्या प्रश्नाचं उत्तर विचारलंय त्या अर्थीच (उदा. याचे तुझं उत्तर आर आहे का, याचे आर उत्तर असे) आले असताना क नक्कीच मेनका नाही असा निष्कर्ष काढणं हे सुद्धा' काना मागुन घास घेतल्या सारखे होईल. कारण मेनका आधीच आपला रोल ठरवत असेल तर आर उत्तर आलं याचा अर्थ ब नक्कीच मेनका आहे असा सरळ निष्कर्ष बिघतो आणि मग पुढल्या एका प्रश्नात कोडे सुटते. तुम्ही त्या दिलेल्या उत्तरात ही शक्यता गृहीत धरली नाहीय. पार उत्तर आले तर मात्र क मेनका नाही हाच एक निष्कर्ष निघतो आणि पुढे दोन प्रश्न लागतील.

आणि मेनका आधीच आपला रोल ठरवत असेल तर सोपा मार्ग मग होतो रंभा कोण आहे हे शोधणे.
अ ला प्रश्न: ब रंभा आहे का? याचे तुझे उत्तर आर आहे का?
आर उत्तर आले तर ब नक्कीच रंभा आहे, तिला पुढला प्रश्न विचारुन कोडे सुटेल.
पार उत्तर आले तर ब नक्कीच रंभा नाही.
मग पुढला प्रश्न अ लाच क रंभा आहे का याचे तुझे उत्तर आर आहे का?
आर उत्तर आले क नक्कीच रंभा आहे तिला तिसरा प्रश्न विचारून कोडे सुटते.
पार ऊत्तर आले क नक्कीच रंभा. ब पण नाही. म्हणजे अ च रंभा आहे, तिला तिसरा प्रश्न विचारुन कोडे सुटते.

हेच नव्या आवृत्तीला लागु:
प्रश्न१ अ ला: ब रंभा आहे का, याचे तुझे उत्तर आमच्या भाषेतील अकारविल्ह्यानुसार आधी येणाऱ्या तुमच्या शब्दाने देणार का?

समजा त्यात उत्तर आले ख. याचा अकारविल्ह्यानुसार कुठला क्रम आपल्याला माहीत नाही. दुसरा शब्द क (अकारविल्ह्यानुसार ख च्या आधी) किंवा ग असु शकतो (अकारविल्ह्यानुसार ख च्या नंतर).

प्र२ अ ला : क रंभा आहे का याचे तुझे उत्तर ख आहे का?
उत्तर ख आले (ज्या अर्थी उत्तर आहे का त्या अर्थीच आले) तर क नक्कीच रंभा आहे, तिसरा प्रश्न तिला विचारुन कोडे सुटते.

उत्तर ग आले. म्हणजे अ चे आधीचे उत्तर अकारविल्ह्यानुसार आधी असणाऱ्या शब्दाने होते म्हणजेच ज्या अर्थाने उत्तर आहे का विचारले होते, त्या अर्थानेच. म्हणजे ब नक्कीच रंभा आहे तिला तिसरा प्रश्न विचारून कोडे सुटते.

उत्तर क आले: याचा अर्थ दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर विचारले त्याच्या विरुद्धार्थी आले, क नक्कीच मेनका नाही.
आणि आधीचे ख उत्तर अकारविल्ह्यानुसार दुसरे आहे म्हणजे ते ही विचारले त्याच्या विरुद्धार्थी म्हणजे ब सुद्धा नक्कीच रंभा नाही. अ हीच रंभा आहे. तिला तिसरा प्रश्न विचारून कोडे सुटते.

मानवजी आणि माबो वाचक, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे की आधीच्या आवृत्तीत मेनका काहीही म्हणत असली तरी जे उत्तर आहे ते येते. तिथे मेनका random खरंच आहे.

इथे नव्या आवृत्तीत मेनका कधी सत्य तर कधी असत्य बोलते म्हणजे काय बोलणार त्या वेळी ते ठरवते हे गृहीत धरल्याशिवाय हे तीन प्रश्नात सुटत नाही. जर इथे मेनका परत खरोखर random आहे, तर मग निरुत्तर केलेला प्रश्न विचारल्याशिवाय कोडं सुटणार नाही. कदाचित मी हे आधी clear करायला हवं होतं.
पण तुमचे लॉजिक अगदी बरोबर आहे! अभिनंदन तुमच्या चिकाटीबद्दलही Happy

हो हे कोडे संपले Happy

मानवजी यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन!!

पुढील कोडे टाकीन लवकरच. ते इतके डोक्याला ताप देणारे असणार नाही Happy

Pages