मराठी कोडं - रंभा, मेनका आणि उर्वशी! - पुढची आवृत्ती!

Submitted by चीकू on 26 May, 2025 - 10:59

लोकहो, आधीचे कोडे मायबोलीकरांनी सोडवले आहे. आता त्याचीच एक पुढची आवृत्त्ती देत आहे Happy

सर्व गोष्टी तशाच आहेत. जी बदललेली गोष्ट आहे ती डकवत आहे.

******************************************

एक राजा रानात शिकारीला गेला. त्याच्यावर एका वाघाने हल्ला केला. राजा एकटाच कसाबसा वाघाला मारून परत आला. पण त्यात तो खूपच जखमी झाला आणि त्याची शुद्ध गेली. राजवैद्यांनी प्रधानाला गंभीरपणे सांगितले 'राजेसाहेबांना वाचवण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वर्गातील नंदनवनात कल्पवृक्ष आहे त्याचे फळ आणणे. या फळाचा रस राजसाहेबांच्या मुखात सोडल्यासच ते शुद्धीवर येतील नाहीतर प्राण वाचवणे असंभव आहे'.

राजाकडे एक इच्छाधारी विमान होते. प्रधान लगेच विमानात स्वार होऊन नंदनवनाच्या दारापाशी पोचला. दारापाशी खुद्द इंद्र उभा होता. त्याने प्रधानाला हटकलं. प्रधानाने सगळी कहाणी सांगून कल्पवृक्षाचे फळ घेऊन जायची परवानगी मागितली.

इंद्र हसून म्हणाला 'माझ्या परवानगीशिवाय जो कल्पवृक्षाला स्पर्श करतो त्याचे भस्म होते. पण तू माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिलंस तरच मी तुला फळ घ्यायची परवानगी देईन. बघ, त्या समोरच्या वेलींच्या मंडपाखाली तीन अतिसुंदर स्त्रिया उभ्या आहेत. त्या तीन अप्सरा आहेत, रंभा, मेनका आणि उर्वशी. आता तू मला त्यातली रंभा कोणती, मेनका कोणती आणि उर्वशी कोणती ते बिनचूक सांगायचस. आणि मगच तू फळ घेऊन जाऊ शकशील'

प्रधान म्हणाला 'पण मी त्या तिघींना पहिल्यांदाच बघतोय. त्यातली कोणती कोण ते मला कसं कळणार?'

इंद्र म्हणाला 'त्यासाठी मी तुला त्यांना तीन प्रश्न विचारायची परवानगी देतो. हे प्रश्न असे हवेत की त्यांची उत्तरे हो किंवा नाही या दोन्हींपैकीच असली पाहिजेत. आता हे तीन प्रश्न कसे विचारायचे ते तू ठरव. तू एका अप्सरेला तीन प्रश्न विचारू शकतोस, प्रत्येक अप्सरेला एक असे तीन प्रश्न विचारू शकतोस. किंवा एकीला दोन आणि दुसरीला एक असेही विचारू शकतोस. एकूण प्रश्नसंख्या तीन हवी. आणि एका वेळी एकाच अप्सरेला प्रश्न विचारायचा. तिचे उत्तर ऐकून मग पुढ़चा प्रश्न तिला अथवा दुसरीला विचारायचा का ते तूच ठरवायच आहेस’

प्रधान म्हणाला 'ठीक आहे' आणि अप्सरांकड़े जायला निघाला.

इंद्र त्याला रोखत म्हणाला 'थांब, माझं बोलणं संपलेलं नाही. आम्ही इथे देवलोकात नेहमी सत्य बोलतो. रंभा नेहमी सत्य बोलते. पण मेनका आणि उर्वशीला तपोभंग केल्यामुळे ऋषींनी शाप दिला आहे. त्यामुळे उर्वशी नेहमी असत्य बोलते आणि मेनका कधी सत्य तर कधी असत्य बोलते.'

प्रधान मान डोलावून परत पुढे जायला निघाला पण इंद्राने त्याला परत अडवले.

'अजून एक महत्वाचं. मी मगाशी म्हणालो की तुझ्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असेच आले पाहिजे. या अप्सरांना तुझी भाषा उत्तम कळते पण अप्सरालोकाच्या नियमाप्रमाणे त्या तुला उत्तर अप्सराभाषेत देतील. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला 'आर' किंवा 'पार' असे मिळेल. एका शब्दाचा अर्थ हो असा होतो आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ नाही असा होतो. अप्सरालोकाच्या नियमाप्रमाणे कुठल्या शब्दाचा नक्की काय अर्थ होतो ते मला तुला सांगता येणार नाही'. अप्सराभाषेत हो आणि नाही यांना कोणते शब्द वापरतात ते मी तुला सांगणार नाही. फक्त त्या अर्थाचे दोन अलग शब्द आहेत एवढेच सांगेन.

प्रधानाला राजाचे प्राण वाचवण्यासाठी इंद्राच्या कोड्याचे बरोबर उत्तर देणं भाग होतं. आता प्रधान कोडे कसे सोडवेल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केस तीन: मधली मेनका तिने रँडमली उत्तर दिले पार
उत्तर पार असेल तर डावीकडची नक्किच मेनका नाही.>>>  मेनकेच्या सर्व केस माझ्या मते बाद ठरतील. कारण मेनकेच्या कोणत्याही उत्तरावरून काहीही निष्कर्ष निघू शकत नाही ( even with permutation and combination any of other two's answers ) तिचं  उत्तर नेहमी अनप्रेडिक्टबल राहणार. ती खरही बोलू शकते, आणि खोटं ही, कोणत्यावेळी काय बोलेल याचा काही नेम नाही, हे कोडं  सोडवण्यासाठी मेनका ओळखणं आणि तिला प्रश्न  करणं  टाळणं  ही प्रायोरिटी असायला हवी. 

आता निदान पहिला प्रश्न साधारण हवा आणि त्याचं खरं उत्तर आपल्याला माहित हवं.>>>
बिंगो , पण तेव्हढ्यानेच भागणार नाही, मी विचार करतोय की  पाहिले दोन प्रश्न एकीलाच विचारावेत , खरी मेख एवढीच आहे जर ती चुकून मेनका निघाली तर राजा मरणार इतका नक्की... जसं ...
प्रश्न १ ) तो इंद्र आहे हे सत्य तू मान्य करणार आहेस का?
प्रश्न २ ) तो इंद्र आहे हे असत्य तू मान्य करणार आहेस का?

फाविद. मेनकाच्या उत्तरावरून कसलाही निष्कर्ष काढला नाहीय.
उलट आर असं उत्तर केव्हा येऊ शकतं याच्या शक्यतेत जिला प्रश्न विचारतो ती मेनकाही असू शकते अशी शक्यता धरली आहे. म्हणजे मेनका एक तर डावीकडे आहे किंवा मेनका मध्ये आहे. म्हणुन उजवीकडची नक्कीच मेनका नाही.

तेच लॉजिक पुढील पार उत्तर केव्हा येऊ शकतं या केसेस मध्ये.

तेच लॉजिक पुढील पार उत्तर केव्हा येऊ शकतं या केसेस मध्ये.>>> लाॉजिक नाही स्पष्ट झालं....

>>
केस 3: मधली मेनका आहे तिने रँडमली उत्तर दिले आर.

आर उत्तर यायला मेनका डावीकडे हवी किंवा तीच मध्ये हवी, म्हणजे उजवीकडची नक्कीच मेनका नाही.
----
केस तीन: मधली मेनका तिने रँडमली उत्तर दिले पार

पार उत्तर यायला मेनका उजवीकडे हवी किंवा तीच मध्ये हवी. म्हणजे डावीकडची नक्कीच मेनका नाही.>>>> हा जो ठळक केलेला निष्कर्ष आहे तो मेनकेच्या एका 'आर' अथवा 'पार' उत्तरावरून कसा येऊ शकतो हे मला स्पष्ट नाही होत आहे. कारण मेनका ही खरं ही बोलू शकते, किंवा खोटं ही, याचाच दुसरा अर्थ हा की ती एकाच वेळी स्वतःला रंभा ही भासवु शकते आणि उर्वशी ही.

असं गृहीत धरा रंभा, मेनका, उर्वशी या क्रमाने त्या उभ्या आहेत... आता तुमचे तीन प्रश्न मागिल उत्तराप्रमाणे विचारा, प्रश्न विचारायची सुरवात मधल्या अप्सरेपासून म्हणजेच मेनके पासून....थोडं स्पूनफिडींग डिमांड करतोय, पण मेनकेला पहील्यांदा प्रश्न विचारला असता कोणत्याही निष्कर्षाप्रत कसे काय पोहचू शकतो हे स्पष्ट होण्यासाठी तसदी देतोय..क्षमस्व....करा सुरुवात

मेनका काहीही उत्तर देऊ शकते.
तेव्हा आपल्याला मेनकेच्या स्थाना बद्दल असा प्रश्न विचारायचा आहे की ज्याचे उत्तर रंभा आणि उर्वशी दोघीही सारखेच देतील.
आणि ऊत्तर असणार होय किंवा नाही. (आर किंवा पार). मग यात आर उत्तर केव्हा येऊ शकते आंणि पार केव्हा येऊ शकते हे बघायचे आहे.

मेनका काहीही उत्तर देत असल्याने, उत्तर कुठलेही आले तरी त्यात उत्तर देणारी मेनका असु शकते ही एक शक्यता रहातेच.
तुम्ही म्हणता आहे ती शक्यता घेतली मधली मेनका आहे, तिचे उत्तर काहीही येउ शकते .
तिचे एक ऊत्तर आर येउ शकते असे गृहीत धरले आपण. आर उत्तर आलेय म्हणजे एक शक्यता मधली मेनका आहे.
या व्यतिरीक्त अजुन केव्हा आर उत्तर येउ शकते? जर मेनका डावीकडे असेल तर. आपण असा प्रश्न विचारला आहे की डावीकडे मेनका असेल तर रंभा आणि उर्वशी दोघीही आर असे उत्तर देतील. थोडक्यात आर उत्तर यायला मेनका एकतर डावीकडे हवी किंवा आपण जिला प्रश्न विचारतोय तीच मेनका आहे. याचा अर्थ मेनका उजवीकडे नक्कीच नाही.

किंवा मेनका असल्याने ती पार असेही उत्तर देउ शकते. पार उत्तर आलेय तरी सुद्धा एक शक्यता मधली मेनका आहे.
याव्यतिरीक्त आजुन केव्हा पार उत्तर येऊ शकते? जर मेनका उजवीकडे असेल तर. आपण असा प्रश्न विचारला आहे की उजवीकडे मेनका असेल तर रंभा आणि उर्वशी दोघीही पार असे उत्तर देतील. थोडक्यात पार उत्तर यायला मेनका एकतर उजवीकडे हवी किंवा आपण जिला प्रश्न विचारतोय तीच मेनका आहे. याचा अर्थ मेनका डावीकडे नक्कीच नाही.

प्रश्नः तुझ्या डावीकडची मेनका आहे का याचं तुझं उत्तर आर आहे का? (आर म्हणजे हो असं मानू व पार म्हणजे नाहीअसं मानू)

क्रम - उर्वशी, मेनका, रंभा
रँडम उत्तर - आर किंवा
रँडम उत्तर - पार
-------
क्रम -उर्वशी , रंभा, मेनका

प्रश्नः तुझ्या डावीकडची मेनका आहे का याचं तुझं उत्तर आर आहे का?
खरं उत्तर - आर
-----------

क्रम - रंभा , उर्वशी, मेनका

प्रश्नः तुझ्या डावीकडची मेनका आहे का याचं तुझं उत्तर आर आहे का?
खोटं उत्तर - पार

---------
क्रम - मेनका, उर्वशी, रंभा

प्रश्नः तुझ्या डावीकडची मेनका आहे का याचं तुझं उत्तर आर आहे का?
खोटं उत्तर - पार

---------
क्रम - मेनका, रंभा, उर्वशी

प्रश्नः तुझ्या डावीकडची मेनका आहे का याचं तुझं उत्तर आर आहे का?
खरं उत्तर - पार

---------
क्रम - रंभा, मेनका, उर्वशी

प्रश्नः तुझ्या डावीकडची मेनका आहे का याचं तुझं उत्तर आर आहे का?
रँडम उत्तर - आर किंवा
रँडम उत्तर - पार

या सहा क्रमाने त्या अप्सरा उभ्या असु शकतात, आणि त्यांनी दिलेली उत्तरे त्याच्या खाली दिल्याप्रमाणे असू शकतात. माझा प्रश्न हा होता की मेनकेच्या रँडम उत्तराला आपण रंभेच्या किंवा उर्वशीच्या फिक्स्ड उत्तरापासून differentiate कसं करणार? आपणाला तर माहीत नाही की उत्तर कोण देतयं?

मी काही मिस करतोय का?

>>क्रम - रंभा , उर्वशी, मेनका

प्रश्नः तुझ्या डावीकडची मेनका आहे का याचं तुझं उत्तर आर आहे का?>>

डावीकडे मेनका आहे.
प्रश्न फक्त "डावीकडची मेनका आहे का?" एवढाच असता तर तिचे खोटे उत्तर असते पार.
त्यांच्या भाषेत आर म्हणजे होय. म्हणुन आपण विचारलेला प्रश्न तिच्यासाठी झाला - "डावीकडची मेनका आहे का याचं माझं उत्तर होय आहे का? " पण याचं माझं उत्तर तर नाही असं असतं. (वरील प्रमाणे) हा विचारतोय ते होय असं आहे का? मी नाही म्हटलं तर खरी ठरेन. म्हणुन मी खोटी ठरायला उत्तर देणार, होय असं. म्हणुन तिचे खोटे उत्तर = आर.

---------
>>>क्रम - मेनका, उर्वशी, रंभा

प्रश्नः तुझ्या डावीकडची मेनका आहे का याचं तुझं उत्तर आर आहे का?>>>
खोटं उत्तर - आर. वरील लॉजिक प्रमाणे खोटे उत्तर : पार.

मी नाही(पार) म्हटलं तर खरी ठरेन>>>हे सत्य कसे ठरणार ?......उर्वशी फक्त विरुद्धार्थी( होकारार्थीचे नकारार्थी आणि नकारार्थीचे होकारार्थी करून) उत्तर देत नसून विचारलेल्या प्रश्नाचे असत्य उत्तर देते असे आहे ना प्रश्नात?? तिने नाही म्हणजेच पार असेच उत्तर द्यायला माझ्यामते.

क्रम - रंभा , उर्वशी, मेनका
प्रश्नः तुझ्या डावीकडची मेनका आहे का याचं तुझं उत्तर आर आहे का? == तुझ्या डावीकडची मेनका आहे का याचं तुझं उत्तर आर(हो) आहे का?

म्हणुन आपण विचारलेला प्रश्न तिच्यासाठी झाला - "डावीकडची मेनका आहे का याचं माझं (जे असत्य असायला हवं असं) उत्तर होय आहे का? " >>>> तार्कीक दृष्ट्या याच उत्तर पार(नाही)  हेच असायला हवं. कारण डावीकडे मेनका आहे ही सत्य परिस्थिती आहे या क्रमात .

त्यांच्या भाषेत आर म्हणजे होय. म्हणुन आपण विचारलेला प्रश्न तिच्यासाठी झाला - "डावीकडची मेनका आहे का याचं माझं उत्तर होय आहे का? " पण याचं माझं उत्तर तर नाही असं असतं. (वरील प्रमाणे) हा विचारतोय ते होय असं आहे का? मी नाही म्हटलं तर खरी ठरेन. म्हणुन मी खोटी ठरायला उत्तर देणार, होय असं. म्हणुन तिचे खोटे उत्तर = आर>>>> मानव आपल्या उत्तराशी सहमत.... Something like 'double negation' in programming....nice Happy

मानव सर
तुमचं उत्तर अजून पडताळून पाहिले नाही. चीकू उत्तर देणार असतील तर आता नाही थांबवणार त्यांना. पण ते उत्तर सुद्धा लगेच समजणार नाही. कदाचीत प्रोग्रामर्स मंडळींना लगेच जमत असावं.
मी कोसो दूर आहे.

मानव पृथ्वीकर यांचे अभिनंदन!!! बरोबर उत्तर आहे.

माबो वाचक यांचे उत्तर अजून नीट पडताळून बघितले नाही त्यामुळे तेही बरोबर असू शकेल.

माझे उत्तर मानवजींसारखेच आहे.

तिन्ही अप्सरांना अ, ब आणि क अशी नावे द्या. पहिला प्रश्न अ ला विचारा, ब कडे बोट दाखवून.
'मी जर तुला विचारलं की ही अप्सरा (ब कडे निर्देश करून) मेनका आहे का, तर तुझं उत्तर आर असेल का?'

अ रंभा आहे असे समजू. आर चा अर्थ हो असा आहे असं समजू.
जर उत्तर आर आले तर ब मेनका आहे, क मेनका नाही.
जर उत्तर पार आले तर ब मेनका नाही, क मेनका आहे.
आर चा अर्थ नाही असा आहे असं समजू.
जर उत्तर आर आले तर ब मेनका आहे, क मेनका नाही.
जर उत्तर पार आले तर ब मेनका नाही, क मेनका आहे.

अ उर्वशी आहे असे समजू . आर चा अर्थ हो असा आहे असं समजू.
जर उत्तर आर आले तर ब मेनका आहे, क मेनका नाही.
जर उत्तर पार आले तर ब मेनका नाही, क मेनका आहे.
आर चा अर्थ नाही असा आहे असं समजू.
जर उत्तर आर आले तर ब मेनका आहे, क मेनका नाही.
जर उत्तर पार आले तर ब मेनका नाही, क मेनका आहे.

अ मेनका आहे असे समजू
ती सत्य बोलत आहे असे समजू.
आर चा अर्थ हो असा आहे असं समजू.
उत्तर पार तर ब मेनका नाही,
आर चा अर्थ नाही असा आहे असं समजू.
उत्तर पार आले तर ब मेनका नाही

अ मेनका आहे असे समजू
ती असत्य बोलत आहे असे समजू.
आर चा अर्थ हो असा आहे असं समजू.
उत्तर पार तर ब मेनका नाही,
आर चा अर्थ नाही असा आहे असं समजू.
उत्तर पार तर ब मेनका नाही

थोडक्यात उत्तर आर आले तर क मेनका नक्की नाही, उत्तर पार आले तर ब मेनका नक्की नाही.

दुसरा प्रश्न जी अप्सरा मेनका नक्की नाही हे कळलं आहे त्या अप्सरेला विचारायचा आहे.
'मी जर तुम्हाला विचारलं की तुम्ही रंभा आहात का, तर तुमचे उत्तर आर असेल का?'
वरच्याच लॉजिक प्रमाणे उत्तर आर आले तर ती रंभा, पार आले तर उर्वशी.

तिसरा प्रश्न त्याच अप्सरेला विचारा.
'जर मी तुम्हाला विचारले की अ मेनका आहे का, तर तुमचे उत्तर आर असेल का?'
उत्तर आर असले तर अ मेनका आहे आणि एलिमिनेशन प्रमाणे राहिलेल्या अप्सरेची ओळख पटेल
उत्तर पार आले तर अ मेनका नाही, राहिलेली अप्सरा मेनका आणि एलिमिनेशन प्रमाणे अ ची ओळख पटेल

या कोड्याची पुढची आवृत्ती सोडवणार का? Happy

सगळं तसंच पण यावेळी अप्सराभाषेत हो आणि नाही यांना कोणते शब्द वापरतात ते आपल्याला अजिबात माहिती नाही.
मग कोडं कसं सोडवाल?

सगळं तसंच पण यावेळी अप्सराभाषेत हो आणि नाही यांना कोणते शब्द वापरतात ते आपल्याला अजिबात माहिती नाही.>>>>> प्रश्नसंख्या पण तीनच का?

हो बाकी सर्व अटी exactly तशाच.

आपल्याला फक्त अप्सराभाषेत हो आणि नाही या अर्थाचे दोन अलग शब्द आहेत एवढेच माहिती आहे. ते कोणते आहेत त्याबद्दल काहीही माहिती नाही.

चीकू ही अशी कोडी फार दमवणारी असतात. म्हणज कोडे घातले की प्रत्येकाच्या उत्तराचे खंडन करत बसावे लागते. माझ्यात तेवढी उर्जा नसल्याने मी आता ती कोडी घालतच नाही. नाहीतर नीळे डोळे - काळे डोळे बेट वगैरे काही लॉजिकल कोडी आहेत. एक समुद्री चाच्याचे आहे.

आपले आभार. आणि जर मी काही उडेदुणे बोलले असेन (स्नॅप) केले असेल तर क्षमस्व.

@सामो - तुम्ही नेटाने कोडे सोडवण्यात सामील झालात म्हणून तुमचे आभार. क्षमस्व वगैरे काही म्हणू नका प्लीज आणि तसे म्हणण्यासारखे काही झालेलेही नाही Happy आणि ही कोडी मानसिकदृष्ट्या दमवणारी असतात हे मला पूर्ण मान्य आहेच Happy

शक्य झाल्यास कोड्याची पुढची आवृत्तीही सोडवायचा प्रयत्न करा.. अर्थात सवड असल्यास Happy

चीकू थोडक्यात लिहिल्याने तुमचे उत्तर लगेच समजले.
मी स्वतःच उत्तर लिहिता लिहिता शोधत असल्याने गंडत गेले.
वीकडेज मधे कोडं सोडवायला वेळ मिळत नाही. दमायला होतं.

रानभुली, तुम्हीही नेटाने कोडे सोडवलेत त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद!
सवड होईल त्याप्रमाणे पुढची आवृत्तीही सोडवायचा प्रयत्न करा. मी उत्तर टाकण्याची घाई करणार नाही Happy

लोकहो, मजकूर संपादित करून नवीन आवृत्ती डकवली आहे. (हो आणि नाही यांना कोणते शब्द आहेत ते अजिबातच माहिती नाही).
जरूर सोडवा Happy

आता तीन दिवस गटग मध्ये बिझी असेन.
तो पर्यंत टिकणार नाही कोडे.
काय विचार केला एवढे सांगुन जातो, कुणाला दिशा मिळाली तर.

चार प्रश्नात उत्तर नक्कीच येते.
पहिला प्रश्न काहीही विचारला तर काहीतरी उत्तर येईल समजा क्ष. क्ष म्हणजे होय की नाही आपल्याला माहीत नाही.
त्याची गरज नाही. "तुझ्या डावीकडची मेनका आहे का याचे तुझे उत्तर क्ष आहे का?" अशी सुरवात करून पुढल्या तीन प्रश्नात मागील प्रमाणे कोडे सुटते.

पण तीनच प्रश्न विचारायचे आहेत. तर पहिला प्रश्न असा हवा की त्यावरून एक शब्द कळेलच पण नंतर पुढचे प्रश्न विचारल्यावर या पहिल्या प्रश्नावरून अधिकची माहिती मिळुन तिचा वापर झाला पाहिजे.

Pages