मराठी कोडं - रंभा, मेनका आणि उर्वशी! - पुढची आवृत्ती!

Submitted by चीकू on 26 May, 2025 - 10:59

लोकहो, आधीचे कोडे मायबोलीकरांनी सोडवले आहे. आता त्याचीच एक पुढची आवृत्त्ती देत आहे Happy

सर्व गोष्टी तशाच आहेत. जी बदललेली गोष्ट आहे ती डकवत आहे.

******************************************

एक राजा रानात शिकारीला गेला. त्याच्यावर एका वाघाने हल्ला केला. राजा एकटाच कसाबसा वाघाला मारून परत आला. पण त्यात तो खूपच जखमी झाला आणि त्याची शुद्ध गेली. राजवैद्यांनी प्रधानाला गंभीरपणे सांगितले 'राजेसाहेबांना वाचवण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वर्गातील नंदनवनात कल्पवृक्ष आहे त्याचे फळ आणणे. या फळाचा रस राजसाहेबांच्या मुखात सोडल्यासच ते शुद्धीवर येतील नाहीतर प्राण वाचवणे असंभव आहे'.

राजाकडे एक इच्छाधारी विमान होते. प्रधान लगेच विमानात स्वार होऊन नंदनवनाच्या दारापाशी पोचला. दारापाशी खुद्द इंद्र उभा होता. त्याने प्रधानाला हटकलं. प्रधानाने सगळी कहाणी सांगून कल्पवृक्षाचे फळ घेऊन जायची परवानगी मागितली.

इंद्र हसून म्हणाला 'माझ्या परवानगीशिवाय जो कल्पवृक्षाला स्पर्श करतो त्याचे भस्म होते. पण तू माझ्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिलंस तरच मी तुला फळ घ्यायची परवानगी देईन. बघ, त्या समोरच्या वेलींच्या मंडपाखाली तीन अतिसुंदर स्त्रिया उभ्या आहेत. त्या तीन अप्सरा आहेत, रंभा, मेनका आणि उर्वशी. आता तू मला त्यातली रंभा कोणती, मेनका कोणती आणि उर्वशी कोणती ते बिनचूक सांगायचस. आणि मगच तू फळ घेऊन जाऊ शकशील'

प्रधान म्हणाला 'पण मी त्या तिघींना पहिल्यांदाच बघतोय. त्यातली कोणती कोण ते मला कसं कळणार?'

इंद्र म्हणाला 'त्यासाठी मी तुला त्यांना तीन प्रश्न विचारायची परवानगी देतो. हे प्रश्न असे हवेत की त्यांची उत्तरे हो किंवा नाही या दोन्हींपैकीच असली पाहिजेत. आता हे तीन प्रश्न कसे विचारायचे ते तू ठरव. तू एका अप्सरेला तीन प्रश्न विचारू शकतोस, प्रत्येक अप्सरेला एक असे तीन प्रश्न विचारू शकतोस. किंवा एकीला दोन आणि दुसरीला एक असेही विचारू शकतोस. एकूण प्रश्नसंख्या तीन हवी. आणि एका वेळी एकाच अप्सरेला प्रश्न विचारायचा. तिचे उत्तर ऐकून मग पुढ़चा प्रश्न तिला अथवा दुसरीला विचारायचा का ते तूच ठरवायच आहेस’

प्रधान म्हणाला 'ठीक आहे' आणि अप्सरांकड़े जायला निघाला.

इंद्र त्याला रोखत म्हणाला 'थांब, माझं बोलणं संपलेलं नाही. आम्ही इथे देवलोकात नेहमी सत्य बोलतो. रंभा नेहमी सत्य बोलते. पण मेनका आणि उर्वशीला तपोभंग केल्यामुळे ऋषींनी शाप दिला आहे. त्यामुळे उर्वशी नेहमी असत्य बोलते आणि मेनका कधी सत्य तर कधी असत्य बोलते.'

प्रधान मान डोलावून परत पुढे जायला निघाला पण इंद्राने त्याला परत अडवले.

'अजून एक महत्वाचं. मी मगाशी म्हणालो की तुझ्या प्रश्नाचे उत्तर हो किंवा नाही असेच आले पाहिजे. या अप्सरांना तुझी भाषा उत्तम कळते पण अप्सरालोकाच्या नियमाप्रमाणे त्या तुला उत्तर अप्सराभाषेत देतील. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला 'आर' किंवा 'पार' असे मिळेल. एका शब्दाचा अर्थ हो असा होतो आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ नाही असा होतो. अप्सरालोकाच्या नियमाप्रमाणे कुठल्या शब्दाचा नक्की काय अर्थ होतो ते मला तुला सांगता येणार नाही'. अप्सराभाषेत हो आणि नाही यांना कोणते शब्द वापरतात ते मी तुला सांगणार नाही. फक्त त्या अर्थाचे दोन अलग शब्द आहेत एवढेच सांगेन.

प्रधानाला राजाचे प्राण वाचवण्यासाठी इंद्राच्या कोड्याचे बरोबर उत्तर देणं भाग होतं. आता प्रधान कोडे कसे सोडवेल?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानव जी गटगसाठी शुभेच्छा!
तुम्ही दाखवलेली दिशा बरोबर आहे तीन प्रश्नात उत्तर काढण्याची. मी लगेच उत्तर टाकणार नाही. तुमचे गटग झाल्यानंतरही जर कोडं अनुत्तरीत राहिलं तर जरूर प्रयत्न करा सोडवायचा Happy

दुसरा प्रश्न हा मेनका नसणारीला विचारायचा आहे. जे पूर्वीच्या कोड्यात पहिल्या प्रश्नाच्या उत्तरावरून कळते. पण नवीन कोड्यासाठी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरावरून कोण मेनका नाही हे कळत नाही.

>>मी जर तुला विचारलं की ही अप्सरा (ब कडे निर्देश करून) मेनका आहे का, तर तुझं उत्तर आर असेल का?<<
टेक्नीकली, हे दोन प्रश्न आहेत. या बेसीस वर पुढचं लॉजीक बाद... Happy

टेक्नीकली, हे दोन प्रश्न आहेत. या बेसीस वर पुढचं लॉजीक बाद... >>>> नाही, ते उपप्रश्न आहेत. मुख्य प्रश्न एकच आहे. असे कितीही उपप्रश्न एकत्र करून त्यांचा एकच प्रश्न बनविता येतो.

हो.
उत्तर सांगा म्हणे पर्यन्त सांगु नका.

नाही सांगणार Happy

सर्वांनी जरूर प्रयत्न करा. मानवजी यांनी दिलेली दिशा बरोबर आहे. तीन प्रश्नात तिघींची ओळख पटवायची आहे.

बऱ्यापैकी माथेफोड करून झाली आणि बऱ्यापैकी बाकी आहे.
दुसऱ्या प्रश्नात ही नक्कीच मेनका आहे हे कळायला हवे या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
मी आता पर्यन्त काय काय विचार केला आणि त्यात कुठं घोडं अडतंय हे नंतर इथे लिहीन, एकमेका साह्य करून कोणी सोडवले तर यासाठी.

आतापर्यन्तचा आढावा जो पुढे आपल्याला उपयुक्त ठरेल अथवा मला पुढील कोडे सुटले तर त्याचे स्पष्टीकरण द्यायला उपयुक्त ठरेल:

समजा अप्सरा रांगेत अशा क्रमाने आहेत : अ, ब, क

आपण अ ला प्रश्न विचारला: " 'ब मेनका आहे का?' याचे तुझे उत्तर होकारार्थी आहे का?"
जर याचे उत्तर जसे विचारल तसेच - म्हणजे इथे होकारार्थी - आले तर क नक्कीच मेनका नाही.
आणि याचे उत्तर जसे विचारले त्याच्या विरुद्ध आले - म्हणजे इथे नकारार्थी- तर ब नक्कीच मेनका नाही.
--------------

आणि
आपण अ ला प्रश्न विचारला: " 'ब मेनका आहे का?' याचे तुझे उत्तर नकारार्थी आहे का?"
जर याचे उत्तर जसे विचारले तसेच - म्हणजे इथे नकारार्थी - आले तरी क नक्कीच मेनका नाही.
आणि याचे उत्तर जसे विचारले त्याच्या विरुद्ध आले - म्हणजे इथे नकारार्थी - तरी ब नक्कीच मेनका नाही.

तुमचा आढावा बरोबर आहे मानवजी. आणि आधी सांगितलेली दिशा देखील.

तर तीन प्रश्न आहेत. मग तिसर्‍या प्रश्नाच्या आधी आपल्याला मेनका कोण आहे ते नक्की कळले पाहिजे.
आणि पहिल्या दोन प्रश्नांची एकत्र माहिती विचारात घेऊन मगच तिसरा प्रश्न विचारला पाहिजे.

तूर्तास एवढेच डकवत आहे. उद्या जरूर लागली तर एक मोठी हिंट देईन.

धन्यवाद चीकू.
माझ्या आधीच्या पोस्टवरून पुढे:
"'ब मेनका आहे का?'याचे तुझे उत्तर अमुक अर्थी आहे?"
असा प्रश्न विचारला तर रंभा आणि उर्वशी दोघीही एक तर त्याच अर्थी उत्तर देतात आणि तेव्हा क नक्कीच मेनका नसते.
किंवा दोघीही अमुकच्या विरुद्धार्थी उत्तर देतात तेव्हा ब नक्कीच मेनका नसते.
मेनका केव्हाही काहीही उत्तर देते.
जर आपण वरील प्रश्न अ ला दोन वेळा विचारला तर ती रंभा किंवा उर्वशी असेल तर दोन्ही वेळेला सारखेच उत्तर देइलच. उत्तर वेगळे आले याचा अर्थ ती मेनका आहे.
---------------------------------------

तर माझे आतापर्यंतचे (पूर्ण बरोबर नसलेले) उत्तर:

प्रश्न१: अ ला. "'ब मेनका आहे का?' याचे तुझे उत्तर होकारार्थी आहे का?"

आता अ त्यांच्या भाषेत काहीतरी उत्तर देईल समजा "साम".
आता साम म्हणजे होय किंवा नाही आपल्याला माहीत नाही.
सामचा अर्थ होकारार्थी असेल तर क नक्कीच मेनका नाही. नकारार्थी असेल तर ब नक्कीच मेनका नाही.
जर पुढे असे निदर्शनास आले की क नक्कीच मेनका नाही तर साम = होय,
किंवा पुढे असे निदर्शनास आले की ब नक्कीच मेनका नाही तर साम = नाही.

प्रश्न २: परत अ लाच: "'ब मेनका आहे का?' याचे तुझे उत्तर साम असे आहे का?"

आता आपण ज्या अर्थी आधी त्यांचे उत्तर आले त्याच अर्थी परत प्रश्न विचारला आहे.
अ जर रंभा किंवा उर्वशी असेल तर ती परत तेच उत्तर देईल.
मेनका असेल तर मात्र ती वेगळ्या शब्दात उत्तर देऊ शकते.
प्रश्न२ मधील परिस्थिती१: उत्तर वेगळे आले समजा "दाम".
याचा अर्थ अ नक्कीच मेनका आहे. कारण तीच त्याच अर्थी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर वेगळं देऊ शकते.
मग प्रश्न ३ ब ला : तू रंभा आहेस का याचे तुझे उत्तर साम असे आहे का? साम उत्तर आले तर ब रंभा आणि क उर्वशी. दाम उत्तर आले तर ती उर्वशी, ब उर्वशी क रंभा.

प्रश्न२ परिस्थिती २: समजा प्रश्न २ चेही उत्तर साम असेच आले.
याचा अर्थ १. क नक्कीच मेनका नाही.
२. क नक्कीच मेनका नाही याचा अर्थ आपण पहिला प्रश्न जो विचारला होता त्याचे उत्तर ज्या अर्थी विचारला (होकारार्थी) त्याच अर्थी आले असले पाहिजे. म्हणजेच साम=होय.

तर आता आपल्याला क ही नक्की मेनका नाही हे माहीत आहे आणि साम = होय हे माहीत आहे (म्हणजेच दुसरा त्यांचा जो शब्द असेल त्याचा अर्थ नाही असा आहे.).
आणि आपल्याकडे आता एकाच प्रश्नाची संधी आहे ओळखायला.
इथं सध्या घोडं अडलंय.

यावरून कुणाला पुढे किंवा वेगळेच काही सुचते का बघा.
मी पण या किंवा वेगळ्या दिशेने प्रयत्न करेन.

मानवजी तुमचा प्रयत्न चांगला असला तरी तीन प्रश्नात उत्तर येणार नाही.

थोडी हिंट
- पहिले दोन प्रश्न विचारल्यावर मेनका कोण आहे हे नक्की कळतं.
- हो आणि नाही या अर्थी दोन वेगवेगळे शब्द आहेत. ते काहीही असू शकतात. उदा. आर आणि पार, साम आणि दाम किंवा क्ष आणि य.
- पहिल्या दोन प्रश्नांना काहीही उत्तरे येऊ शकतात. दोन्ही आर, दोन्ही पार किंवा आर-पार कॉम्बो. (इथे आर आणि पार हे शब्द आहेत हे गृहित धरून).
- या कॉम्बो चा काही वेगळा उपयोग करता येईल का?? आणि तसा प्रश्न फ्रेम करता येईल का?

ओके चीकू.

>>पहिले दोन प्रश्न विचारल्यावर मेनका कोण आहे हे नक्की कळतं.>> हं, इंटरेस्टींग. मी काहीतरी मिस करतोय.
परत प्रयन्त करत आहे.

हो किंवा नाही याला जे काही शब्द आहेत ते समजले तरी त्या शब्दांचा उल्लेख कोणत्यात प्रश्नात येत नाही Happy
म्हणजे पहिल्या प्रश्नावरून आपल्याला एक शब्द तर नक्कीच कळतो. उदा. तो शब्द आहे आर.
पण पुढच्या कोणत्याच प्रश्नात 'आर' हा स्पेसिफिक उल्लेख नाही, म्हणजे या प्रश्नाचे उत्तर तू आर असे देशील का असं नाही विचारलं आहे.

हे दोन शब्द आपण कसे differentiate करू शकू? आणि मग पहिल्या दोन्ही प्रश्नांच्या उत्तरांवरून (आर-आर, आर-पार, पार-आर, पार-पार) जे काही कॉम्बो मिळेल त्यावरून मेनका कोण आहे हे नक्की कळेल. मग तिसरा प्रश्न मेनका नसणारीला विचारायचा आहे.

अजून डिटेल मधे जाता येईल पण सध्या एवढी हिंट आहे. अजून हवी असेल तर सांगा मग एक मोठीच हिंट देईन ज्यावरून तर तुम्हाला नक्कीच कोडे सुटेल.

खूप कठीण कोडं
माझं डोकं नाही चालत.

एवढंच कळालं एखादं टपोरी पोरगं असतं प्रधानच्या ऐवजी तर तिघीनां जे1 झालं का विचारत बसलं असतं Lol

सॉरी पण मला उत्तर अजिबात कळेना.
म्हणून टिपी

मी आता पर्यँत विचार केला त्यानुसार:
जर त्या माहितीतल्या भाषेत उत्तर देणार असतील तर:
आपण एका प्रश्नात फक्त एवढी माहिती काढु शकतो की अमुक एक नक्कीच मेनका (किंवा रंभा किंवा उर्वशी) नाही. या पेक्षा जास्त माहिती पहिल्या प्रश्नात मिळेल असा प्रश्न मला सुचला नाही.
तेव्हा दोन प्रश्नात जर मेनका नक्की कोणती हे शोधाचे असेल तर पहिल्या प्रश्नात एक नक्कीच मेनका नाही कळले पाहिले आणि दुसऱ्या प्रश्नात दुसरी नक्कीच मेनका नाही हे कळले पाहिजे म्हणजे तिसरी नक्कीच मेनका आहे.
पहिला प्रश्न अ ला विचारल्यावर आपल्याला समजा कळले की ब नक्कीच मेनका नाही. तर दुसरा प्रश्न (अजुन कोण नक्कीच मेनका नाही हा) आपल्याला ब लाच विचारावा लागतो म्हणजे त्यावरून आपल्याला अ किंवा क नक्कीच मेनका नाही हे कळते. त्या ऐवजी आपण तो प्रश्न जर क ला विचारला तर अ नक्कीच मेनका नाही किंवा ब नक्कीच मेनका नाही असे कळु शकते. अ मेनका नाही कळले तर ठीक पण जर परत ब नक्कीच मेनका नाही कळले तर आपल्याला दोन प्रश्नात फक्त ब नक्कीच मेनका नाही एवढीच माहिती मिळेल आणि तीन प्रश्नात कोडे सुटणार नाही. तेव्हा आपल्याला त्या होय/नाही भाषेत किंवा मूळ कोड्या सारख्या आर/पार या भाषेत उत्तर देणार असतील तर आपण दुसरा प्रश्न नक्की मेनका नसणारीला विचारू शकु.

आणि आपल्याला त्यांच्या भाषेतले शब्द माहीत नसतील तर दुसरा प्रश्न आपण पहिल्या प्रश्नावरुन कळलेल्या मेनका नसणारीलाच खात्रीने विचारू शकत नाही.
(आणि हे बूलियन अल्जेब्रा कोडे असल्याने निरुत्तर करणारा प्रश्न तर चालणार नाही.)

तेव्हा काय उत्तर असेल याची खूप उत्सुकता आहे, तरी पण तुम्ही म्हणता ती मोठी हिंट द्या. बघतो त्यावरून काही सुचते का.

आता त्या अप्सरांना आपली (म्हणजे प्रधानाची) भाषा उत्तम कळते.
त्यांच्या भाषेत हो आणि नाही याला काहीही शब्द असले तरी एक कॉमन दुवा म्हणजे आपण त्या दोन शब्दांकडे पाहिलं,
उदा. आर आणि पार - तर आद्याक्षराच्या अनुक्रमाप्रमाणे (आपल्या म्हणजे प्रधानाच्या भाषेतील) आर पहिलं येतं आणि पार दुसरं येतं.
अर आणि आर - तर परत अर पहिलं येतं आणि आर दुसरं येतं.

आता अप्सराभाषेत बाराखडी किंवा अक्षरांचा अनुक्रम काहीही असू शकेल. पण आपली भाषा आणि आपल्या भाषेतील आद्याक्षरांचा अनुक्रम त्यांना माहिती आहे. याचा उपयोग करून पहिला प्रश्न विचारता येईल का. मग त्या प्रश्नावरून मिळालेली माहिती आणि दुसर्‍या प्रश्नावरून मिळालेली माहिती याचा एकत्र उपयोग करता येईल का?
अजून दुसरी हिंट - पहिला प्रश्न जर अ ला विचारला तर दुसरा प्रश्न ब (किंवा क) ला विचारायचा आहे.

विचार करून बघा. नाहीतर उद्या मी पहिला प्रश्न काय आहे ते टाकेन.

आपण पहिला प्रश्न एकीला विचारला, आणि मग त्याचे उत्तर काहीही येवो त्यावर अवलंबून न राहता दुसरीला दुसरा प्रश्न विचारला आणि मग दोन उत्तरांच्या आधारे नक्की कोण मेनका (किंवा रंभा किंवा उर्वशी) आहे हे कळले तरच हे कोडे सुटेल.
म्हणजे आधी त्या आपल्याच साध्या होय/नाही या भाषेत उत्तर देत असतील तरीही अशा प्रकारे कोडे सुटायला हवे.
तसे सुटले तरच नविन आवृत्तीतले कोडे सुटेल.

मी "अमुक प्रश्नाचे उत्तर तू आमच्या भाषेतील अकारविल्ह्यानुसार आधी येणाऱ्या शब्दाने देणार का?" (आणि पुढल्या प्रश्नात अकारविल्ह्यानुसार नंतर येणाऱ्या शब्दाने देणार का) अशा प्रकारच्या कॉम्बिनेशन प्रश्नांचा विचार केला.
पण वरील पोस्ट मध्ये म्हटलेले लॉजिक बसेल असे उत्तर अथवा दिशाही मिळाली नाही.

तेव्हा आता तुमचा पहिला प्रश्न द्यावा.

मानवजी सॉरी काल दिवसभर बाहेर काम असल्याने इथे येणे झाले नाही.

तुमचा पहिला प्रश्न योग्य दिशेवरच आहे Happy
दुसरा प्रश्न बरोबर नाही, तो काय आहे ते सांगू का?

तुमचा होकार असेल तर पहिले दोन्ही प्रश्न थोड्या वेळाने इथे टाकीन.
आणि उद्या पूर्ण उत्तर टाकेन (पण तोपर्यंत तुम्हाला ते नक्की येईलच :))

Pages