
.
साहित्य:
शेंगदाणे - दोन वाट्या
वाळलेले खोबरे - दोन अर्धगोल
तीळ - एक वाटी
चिंच - सुमारे अर्धी वाटी
लाल तिखट - चार-पाच चमचे
हळद - एक चमचा
जिरे - चार चमचे
गरम मसाला - एक चमचा
सूर्यफूल तेल - आठ-दहा चमचे
मीठ - तीन-चार चमचे
अद्रक-लसण पेस्ट - चार चमचे
मध्यम आकाराची वांगी - अर्धा किलो
हिरव्या मिरच्या - आठ-दहा
कोथिंबीर - एक जुडी (बारीक चिरून एक वाटी)
ऐच्छिक:
शहाजिरे - एक चमचा
बारीक मोहरी - अर्धा चमचा
हिरवा पुदिना - दहा-बारा काड्या (बारीक चिरून अर्धी वाटी)
.
मायबोलीवर पहिल्यांदाच लिहितो आहे. पाकृ माबोकरांना आवडेल अशी आशा आहे.
तेलंगाणा खाद्य संस्कृतीत बैंगन मसाला (बगारे बैंगन असेही म्हणतात) या भाजीचे स्थान अविभाज्य आहे. कार्य-प्रसंग, सार्वजनिक अन्नप्रसाद, घरी पै-पाहुणे आले तर, अश्या वेळी बैंगन मसाला नक्कीच केला जातो. करायला सोपी, सर्वांना आवडणारी आणि उरली तरी टिकणारी ही थोडी तिखट, किंचित आंबट अशी भाजी तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे.
चला तर मग सुरुवात करुया.
चिंच धुवून तीन वाट्या गरम पाणी घालून भिजत ठेवा. वांगी धुवून घ्या. कोथिंबीर व पुदिना निवडून धुवून ठेवा. अद्रक छिलून, लसूण सोलून पेस्ट करुन घ्या. खोबऱ्याचे चिरून बारीक तुकडे करुन घ्या.
एका मोठ्या जाड बुडाच्या पातेल्यात वा कढईत शेंगदाणे, खोबरे, तीळ याक्रमाने मध्यम आचेवर वेगवेगळे कोरडेच भाजून घ्या. करपू न देता खरपूस भाजल्यावर ताटात काढून ठेवा. पातेले कपड्याने पुसून तयार ठेवा.
वांगी कोरडी करुन घ्या. पुढची देठे किंचित कापून टाकून, दोन दोन काप देऊन ठेवा. चिरून फोडी करू नका. मिरच्या शेंडे-देठे काढून दोन भागांत उभ्या चिरून घ्या. कोथिंबीर व पुदिना बारीक चिरून घ्या.
मोठ्या आचेवर पातेल्यात दोन चमचे तेल घाला. गरम झाल्यावर थोडीशी मोहरी घाला. ती तडतडल्यावर वांगी घाला. एक चमचा मिठ घालून नीट हलवून घ्या. मंद आच करुन झाकून ठेवा. पुढे दिलेली मसाल्याची तयारी करताना अधूनमधून थोडे-थोडे हलवा. पाच-सात मिनिटात वांगी ७५% शिजतील.
मिक्सरच्या मोठ्या भांड्यात खोबरे, शेंगदाणे, तीळ याच क्रमाने फिरवून घ्या. अगदी बारीक करू नका. चिंचेचा कोळ कुस्करुन घ्या. चिंचेचे एक-दीड वाट्या पाणी मसाल्यात घालून पुन्हा थोडे फिरवून घ्या. मसाल्याची सरसरीत रवाळ पेस्ट व्हायला हवी.
पातेल्यातील वांगी दुसऱ्या भांड्यात काढून ठेवा. त्याच पातेल्यात सहा-आठ चमचे तेल घालून गरम झाल्यावर मोहरी घाला. तडतडू लागल्यानंतर जिरे घाला. लगेच अद्रक-लसूण पेस्ट घाला. दहा-वीस सेकंद परतून लगेच मसाला पेस्ट घाला. गॅस मोठा करुन मिश्रण नीट हलवून घ्या.
दोन मिनिटांनी गॅस मंद करा. पातेले झाकून ठेवा. अधूनमधून हलवत राहा नाहीतर तिळामुळे मसाला बुडाला चिकटून करपू शकतो.
आठ दहा मिनिटांनी मसाल्याचा सुगंध येऊ लागेल. आता शहाजिरे, हळद, तिखट, बारीक चिरलेला पुदिना, अर्धी कोथिंबीर व हिरव्या मिरच्या घाला. नीट हलवून घ्या. झाकून ठेवा. दोन मिनिटांनी वांगी व उरलेले चिंचेचे पाणी घाला. गरम मसाला घालून किंचित हलवून घ्या. वांगी सबंध दिसायला हवीत, शक्यतो फुटू नयेत. दोन मिनिटे झाकून ठेवा. गॅस बंद करुन अजून पाच मिनिटे झाकूनच राहू द्या. वाढण्याआधी उरलेली कोथिंबीर घाला.
वाफाळता बगारा खाना आणि बैंगन मसाला वाढा. तोंडी लावायला कांदा, काकडी, गाजर द्या. शेवटी पांढरा भात व दही वाढा.
वाफाळता पांढरा भात किंवा गरम पोळी यांसोबतही हा बैंगन मसाला चांगला लागतो.
- पाककृतीत तेलाचे प्रमाण कमी करु नये नाहीतर चांगली चव येत नाही.
- ही भाजी तेलकट वाटत असेल तर वाढताना तेलाचा तवंग एका बाजूने काढून टाका.
- मोहरी ही केवळ तेल तापले आहे का हे पाहण्यासाठी, सवय म्हणून, वापरली आहे.
- खोबळ्याऐवजी खोबऱ्याचा कीसही वापरता येतो; पण रेडिमेड कीस अगदी कोरडा वाटतो.
- तेलंगाणात (आणि एकूणच दक्षिणेत) चिंचेचे प्रमाण स्वयंपाकात जास्त असते; वरील साहित्यात चिंच जास्त वाटत असेल तर किंचित कमी करता येईल.
- ही भाजी आदल्या दिवशी करुन फ्रिजमध्ये ठेऊन दिली तर अजून चविष्ट लागते.
- चिंच आणि तेलाच्या अधिक प्रमाणामुळे ही भाजी (तसेच मिरची का सालन वगैरे) फ्रिजमध्ये तीन-चार दिवस चांगली राहते. अनेक घरी अश्या भाज्या जास्त प्रमाणात करुन ठेवतात आणि दोन-तीन दिवस भातासोबत खातात.
- या भाजीत वांग्यांऐवजी / वांग्याशिवाय मध्यम आकाराचे, लाल टोमॅटो न चिरता घालता येतात.
- वांग्यांऐवजी तोंडली घालून दोंडा-मसाला करता येतो.
- वांग्यांऐवजी मोठ्या मिरच्या घालून आणि ग्रेव्ही थोडीशी पातळ करुन मिरची-का-सालन करता येते.
- इतरही variation करता येते.
- यावेळी मी फोटोत दिसतात तशी फिक्कट जांभळी वांगी घेतली होती. पण शक्यतो बैंगन मसाल्यासाठी गडद जांभळी वांगी घेतात.
वरील पाककृतीचा तेलंगाणा भाषेत सारांश:
बैंगन मसाला कैसे बनाना पूचरैं? भोत सिम्पल है खाला।
कम तेल में बैंगनाँ तल के ल्येओ, तिल्ली-पल्ली-कोप्रा भून के, इमली का पानी डालके मिक्सी कर ल्येओ। अच्चा तेल दाल के भून ल्येओ। हरी मिरिच, पुदीना, कोतमीर दाल के, बैंगनाँ दाल के अच्चा मिक्स कर ल्येओ। गरम मसाला दाल के ग्यास बंद कर ल्येओ। हौर कुच बी नक्को करो खाला।
बगारे के सात में लगा द्येओ।
---
ता. क.: पाककृतींच्या वर्गवारीत (इतर पर्यायांशिवाय) कर्नाटकी, केरळी, दाक्षिणात्य असे पर्याय आहेत; तेलुगु, आंध्र किंवा तेलंगणा हे पर्याय नाहीत; त्यापैकी योग्य पर्याय द्यावेत असे वाटते.
बगारा खाना, कद्दू का दालचा
बगारा खाना, कद्दू का दालचा ची रेसिपी लिहिली आहे.
मायबोली वरील अन्नपूर्णा व बल्लवाचार्य यांनी नक्की करून पहावी.
शेंगदाणे - दोन वाट्या
शेंगदाणे - दोन वाट्या
वाळलेले खोबरे - दोन अर्धगोल
तीळ - एक वाटी
>>
चांगलाच मसाला आहे आणि हा आवडतो. कांदा नसतो म्हणून जास्तीच. कांद्याचे मसाल्याची ( वाटण) भाजी मी खात नाही. फारच वाईट भपकारा येतो.
मसालेदार पाककृती!
मसालेदार पाककृती!
मेरे दोडके पडवळ आएंग्ये.>>>> भाज्या अख्ख्या घालायच्या आहेत रानभुली
मस्त आहे रेसिपी.
मस्त आहे रेसिपी.
पाककृती मस्त आहेच. पण तुमचं
पाककृती मस्त आहेच. पण तुमचं लेखन , फोटो इतकं व्यवस्थेशीर आहे, त्याचं वेगळं कौतुक करायला हवं.
मिरची का सालन च तेवढं बघाच
>>> मिरची का सालन च तेवढं बघाच लवकर.
@ऋतुराज व इतर,
मिरची का सालन ची अशीच रेसिपी आहे, तिल्ली, पल्ली, कोप्रा, इमली (तीळ, शेंगदाणे, खोबरं, चिंच) याचा मसाला हा बेस असतो आणि ग्रेव्ही पातळ करतात. बाकी तपशील वरील बैंगन मसाला सारखाच असतो.
मिरची का सालन मध्ये मिरची भजी करतात ती वाली मोठी मिरची घालतात.
मोठ्या मिरचीचे चित्र आंतरजालावरून साभार

मस्त च आले आहेत सारेच फोटो...
मस्त च आले आहेत सारेच फोटो...
वांगे आवडी चे नसूनही तोपासू
कसली सॉलिड आहे, मस्तच,
कसली सॉलिड रेसिपी आहे, मस्तच, तोंडाला पाणी सुटलं.
@ऋतुराज व इतर,>>>> धन्यवाद
@ऋतुराज व इतर,>>>> धन्यवाद वामन.
चिंचेच्या कोळात हिरव्या मिरची
चिंचेच्या कोळात हिरव्या मिरची चे एक लोणचे करतात.. आंध्रा स्पेशल.. प्लीज त्याची कृती असेल तर द्या. माझ्याकडे लिहीलेली होती पण ती वहीच हरवली. बारावी नंतरच्या सुट्टीत एक सरबत लोणची कशी करायची असा क्लास केलेला. त्यात शिकवलेले
चिंचेच्या कोळात हिरव्या मिरची
डबल पोस्ट
Pages