Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी कालच बघितला हा. शून्य
मी कालच बघितला हा. शून्य अपेक्षेने बघित्ला आणि बरा वाटला. काही बाबी जरा अ आणि अ वाटल्या, पण ठीके. बादवे, नकुल घाणेकर म्हणजे कोण नक्की?
नकुल घाणेकर म्हणजे कोण नक्की?
नकुल घाणेकर म्हणजे कोण नक्की?- बेहेरेचा म्हणजे सुनेचा नवरा.
जिलबी बघितला. बराचसा कळलाच नाही म्हणजे कळून घ्यावा असा वाटला नाही. पहिल्या पाच मिनिटात, प्रसाद ओक डबल रोलमध्ये बघून यक झाले पण नेटाने बघत राहिले. पर्ण पेठे बुरखा घालून पाठलाग करते आणि स्वजोच काय तिचा सख्खा भाऊ दाखवलाय त्यालाही कळत नाही की ही ती आहे, तिचे डोळे आणि उंची बघूनही त्यांना कळत नाही. शिवानी सुर्वेच्या साडया मस्त आहेत. स्वजो बारीक दिसतो पण तरी तिशीतला वाटत नाही. त्याचे वडीलही पोलीस असतात मग ते रिटायर झालेले दाखवायला नको का. बाकी विशेष काही नाही, खून पडत राहतात, स्वजो सारखा सिगारेटी फुकत असतो, त्याला बायकांचा नाद असतो आणि बाहेर बाई पटवायचे पण कष्ट तो घेत नाही, गुन्हेगार किंवा गुन्ह्याचा आरोप असलेल्या माणसाची बहीण त्याला चालते. दुनियादारी मालिकेतल्या रेश्माचा नवरा यात स्वजोच्या हाताखाली काम करतोय.
अच्छा तोच नकुल होय! धन्यवाद.
अच्छा तोच नकुल होय! धन्यवाद. फार काही खास वाटला नाही त्याचा अभिनय.
अच्छा तोच नकुल होय! धन्यवाद.
अच्छा तोच नकुल होय! धन्यवाद. फार काही खास वाटला नाही त्याचा अभिनय.- मूळचा अभिनेता नाहीच आहे तो. शास्त्रीय नृत्य शिकलाय आणि सालसाचे वर्कशॉप घेतो बरीच वर्ष झाले. एका मराठी मालिकेत लीड होता आणि जय मल्हार मालिकेत होता.
सोनिया परचुरे कडे कथ्थक
सोनिया परचुरे कडे कथ्थक शिकलाय, दिसायला देखणा आहे. अजूनही चांदरात आहेचा हिरो होता, अभिनय तेव्हा यथा तथा वाटलेला, नेहेमीप्रमाणे ती सिरीयल नवीन नवीन बघितलेली.
सोनिया परचुरे कडे कथ्थक
सोनिया परचुरे कडे कथ्थक शिकलाय - हे नव्हतं माहिती
दिसायला देखणा आहे- हो, आता जास्त चांगला दिसतो पूर्वीपेक्षा
अजूनही चांदरात आहेचा हिरो होता - हे मालिकेचं नाव आठवलं नाही, नेहा गद्रे बहुतेक नायिका होती, मन उधाण वाऱ्याचे नंतर ती बरीच प्रसिद्ध झाली होती पण ही मालिका फारशी चालली नाही, फार कमी एपिसोड झाले होते आणि गुंडाळून टाकली.
बर बर
बर बर
हपा घाबरू नका यापुढे
हपा
घाबरू नका यापुढे विचारायला, ज्ञान वाढेल तुमचे आणि आमचेही स्मरणरंजन 
ह पा म्हणतील अशी
ह पा म्हणतील अशी ज्ञानप्राप्ती नको.
Btw ती नेहा गद्रे लग्न करून ऑस्ट्रेलियात गेली, फार रमली नाही इंडस्ट्रीत. दोन सिरीयलची लीड होती मात्र.
:हहपुवा:
आता नेहा गद्रे कोण…..
.
.
जाऊ द्या. पुन्हा आली म्हणे भारतात
लोल हपा Rofl
लोल हपा
हनुवटीवर तीळ अस्णारी एक सो सो अभिनय करणारी होती ती.
जाऊ द्या. पुन्हा आली म्हणे
जाऊ द्या. पुन्हा आली म्हणे भारतात >>>
तू जाऊ द्या म्हणेपर्यंत ती भारतात आली सुद्धा. आणि तेवढ्यात तिने ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनार्यावर एक फोटोशूटही केले (हे मला यूट्यूबने सांगितले. क्लिप पाहिलेली नाही). नकुल घाणेकर आधी सर्च केल्यावर नंतर सर्च मधे नुसता एन टाकल्यावर गूगलने आपोआप नेहा गद्रे पहिली सजेशन दाखवली. मी दोघांनाही कोठे (म्हणजे सिरीज/पिक्चर) पाहिल्याचे आठवत नाही. नकुलचा पहिला फोटो प्राजक्ता माळीबरोबर ललित प्रभाकरच्या पोजमधेच दिसला.
जिलबी एंगेजिंग वाटला होता बहुतेक. आता लक्षात नाही.
मलाही हे दोघेही माहिती नव्हते
विस्मरणीय काही शब्द अ/ अन
विस्मरणीय
काही शब्द अ/ अन प्रिफिक्स लावायच्या आधीच नकारार्थी असतात 
मलाही अजिबात लक्षात न्हवता. आता गूगल केला तर चेहेराच बोर वाटतोय. त्या चित्रपटात त्याला मारला लवकर बरं केलं असं मला तेव्हा वाटलेलं.
दहा पंधरा वर्षांपूर्वी होता
दहा पंधरा वर्षांपूर्वी होता तो देखणा आणि अभिनयात सुमार. आता इतक्या वर्षात त्याला बघितला नाहीये. नवीन चित्रपट, प्रोमोज तो असलेला काहीच बघितला नाहीये.
अगदीच रच्याकने, पण नकुल सुंदर
अगदीच रच्याकने, पण नकुल सुंदर होता ना? का सहदेव? त्या दोघांच्या एकेकच क्वालिटी माहित आहेत.
आता तो देखणाही नाही आणि
आता तो देखणाही नाही आणि अभिनयात मात्र तितकाच सुमार आहे. दोन्ही कडूनही गेले आहे.
पांडवांत नकुलच सुंदर होता. नकुल -सहदेव बिचारे लिंबू टिंबूच राहिले.
As for Nakula, he is the most
As for Nakula, he is the most handsome of the five. He does not want to be seen by the women of the city with their eyes full of desire. He does not want them to think wrong thoughts. Hence he has disfigured himself with dust and ashes.
पांडव द्यूतात हरून परत जातानाचं वर्णन
नकुल हॅंडसम होता काय?
नकुल हॅंडसम होता काय?
माझ्या डीपी सारखा?
He does not want them to
He does not want them to think wrong thoughts. >> किती त्या राँग थॉट्सची चिंता! आणि सोल्युशन थॉट्सच्या सोर्सला लावायचं का आपलंच तोंड काळं करायचं!? बाकी हस्तिनापुरातुन नकुलाने तोंड काळे केले, हे पूर्वी लिटरली काळे केले म्हणून म्हणत. मग कालातराने वनवासाला जाणे, दूर जाणे, नाहिसे होणे इ. ला तोंड काळे केले म्हणू लागले.
बायकोला पणाला लावताना नुसतं
बायकोला पणाला लावताना नुसतं बसून राहू शकले, वस्त्रहरण होताना निष्क्रीय राहिले, म्हणजे पुरेसे काळे आधीच झाले होते की ! जे आपल्या स्त्रीचे रक्षण करू शकले नाही, त्यांच्यावर दुसऱ्या स्त्रिया कशाला मरायला लुब्ध होतील? तेही ताबडतोब हे घडल्यावर व तेव्हाच वनवासालाच जाताना. तेव्हा तर धिक्कार होत असेल ना त्यांचा.
तेव्हा मीडिया, सोमी नसेल ना
तेव्हा मीडिया, सोमी नसेल ना सगळ्यांना लगेच कसे कळणार?
नाही. नगरजन त्यांच्यासाठी दु
नाही. नगरजन त्यांच्यासाठी दु:खी होते.
तुम्ही मंडळींनी महाभारताचं पुनर्लेखन करायला घेतलंय का?
सगळेच जणं त्यांच्यासाठी
नकुलाची आई माद्री अतिशय सुंदर असल्याने पांडूचा शाप फळला. नकुल आईसारखा सुंदर झाला असल्यास काय नवल. राजेमहाराजे सुंदर स्त्रियांशीच लग्न करायचे त्यामुळे पिढ्यानुपिढ्या सौंदर्याची आनुवंशिकता यायची.
खरंच पुनर्लेखन सुरु झाले.
विस्मरणीय >>>>
विस्मरणीय >>>>
द्यूताच्या खेळा तला रेफरी
द्यूताच्या खेळा तला रेफरी शकुनी होता हे त्यांना माहीत होतं. आणि हस्तिनापूरवासीयांना आधीपासूनच पांडवांबद्द्ल प्रेम होतं.
आता इथे आणखी अवांतर वाढवत नाही.
https://archive.org/stream/mahabharata-by-kamala-crop/Mahabharata-by-Kam...
हे वाचा. हवं तर सगळ्यांनी एकदम वाचायला घेऊ आणि वेगळ्या धाग्यावर त्यावर चर्च करू.
रामायणात काय किंवा महाभारतात
रामायणात काय किंवा महाभारतात काय.. इतरांना दिलेली वचने पाळल्या जातात, बायकोला लग्नात वचन दिले असते त्याचं काय? ते विसरलं तरी चालतं?
दशरथाने पाळलं की कैकयीला
दशरथाने पाळलं की कैकयीला दिलेलं वचन.
दशरथाने पाळलं की कैकयीला
दशरथाने पाळलं की कैकयीला दिलेलं वचन.>> मी "नातीचरामी ", ह्या लग्नात दिलेल्या वचनाबद्दल बोलतेय.
दशरथाने बायकोला युद्धात दिलेले वचन पाळलं, त्याच्या पोराचं काय? बायकोला सरळ जंगलात सोडून दिलं, लोकं नावं ठेवतात म्हणून.
त्या काळात ती वचनं होती का?
त्या काळात ती वचनं होती का?
Pages