Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06
आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा
आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भरत, ही टेक्स्ट फाईल सही आहे.
भरत, ही टेक्स्ट फाईल सही आहे. बुकमार्क केली.
इतकी टेक्स्ट फाईल मिळाल्यावर 'पूर्वीच्या' माझ्या मनात 'आता शांतपणे वाचू. इंग्रजीत एकत्र असल्याने सर्च करायला, मध्येच जंप करायला सोपं होईल' असे विचार आले असते. आत्ता पहिला विचार आला की कोपायलटला हे इनपुट देऊन त्याला काय वाटतं विचारावं का काय!
अरेच्चा!!!
अरेच्चा!!!
ती नंतर आली का? हे नव्हतं माहित मला.
अरे वचनांची हायरार्की हवी ना!
अरे वचनांची हायरार्की हवी ना! कॉन्फ्लिक्टिंग वचने आली तर चार्टर ऑफ राईट्स पहिले असं आजच्या ही कायद्यात असतेच की!
बाया पायाच्या दास्या ही हिंदूच कशाला उत्क्रांतीय परंपरा आहे. आजच्या व्हॅल्युज त्रेतायुगात नका लावू!
टेक्स्ट फाईल अफाट आहे ही.
टेक्स्ट फाईल अफाट आहे ही. इतकं रूक्ष केलंय की बस रे बस.
आज अंगारकी चतु र्थीच्या
आज अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर वेगळा धागा काढा आणि हेडरमध्ये ती लिंक घाला.
महाभारत मायबोलीवर फिरून फिरून येणारा विषय आहे. त्याला शेवटचं येऊन जास्तच दिवस झालेत. त्यालाही मायबोलीची आठवण येत असेल.
यार! फॅक्च्युअल म्हणा!!! मला
यार! फॅक्च्युअल म्हणा!!! मला असंच आवडतं.
बाकी अस्मिता, तू महाभारता पॉडकास्ट ऐकलं आहेस का? मी खूप पूर्वी ऐकलं आहे, तेव्हा आपण ओळखत न्हवतो. कुणाला इंटरेस्ट असेल तर जरुन ऐका. एका अमेरिकन पॉडकास्टरचा महाभारतावरचा टेक आहे. मला फारच आवडलेला. २० -२० मिनिटांचे एकुण १०० एक एपिसोड आहेत.
नविन धागा काढला तर शिर्षक काय
नविन धागा काढला तर शिर्षक काय?
"रामायण महाभारत चर्चा सत्र इन्फीनिटीवे"?
वाल्मिकी, व्यास म्हणतील लिखाण मागे घेतो.
>>> मी "नातीचरामी ", ह्या
>>> मी "नातीचरामी ", ह्या लग्नात दिलेल्या वचनाबद्दल बोलतेय.
पण त्या काळात मुलाला वनवासाला पाठवणं किंवा बायकोला पणाला लावून हरणं हे 'अती' क्याटेगरीत येत नव्हतं!
रुक्ष टेक्स्ट फाइल घरी गेल्यावर बघते.
>>> बाकी अस्मिता, तू महाभारता
>>> बाकी अस्मिता, तू महाभारता पॉडकास्ट ऐकलं आहेस का?
मला कमिशन पाठवणेचे करावे. हुकुमावरून. धन्यवाद.
(थँक्स फॉर युवर अटेन्शन इन धिस मॅटर!)
हो हो! जरा म्हणून क्रेडीट
हो हो!
जरा म्हणून क्रेडीट घेतलं तर! आले दोन रुपे मागाला! 
नेमकं कोणतं पण? मी भरपूर
नेमकं कोणतं पण? मी भरपूर वेगवेगळे वाचलेय आणि ऐकलेय आणि आता त्याचा एक काला झाला आहे तयार. ह्या वरच्या महाभारताने वाळवंटाची सफर घडवली. अतिशयच वस्तुनिष्ठ रे बाबा!
लॉर्ड लॉर्ड म्हणताहेत वर. धागा काढला तर मी तरफडेनच अर्थात.
दिसले,
धन्यवाद.
अशा वेळीच येतात रे लोक...
अनुभव!
अनुभव!
(No subject)
पॉडकास्टची लिंकपण द्या
पॉडकास्टची लिंकपण द्या धाग्यात. स्वातीने आधी दिलेली आठवते आहे.
कमलाबाईंनी भांडारकर संशोधित प्रत समोर ठेवून लिहिलंय ते.
>>> आज अंगारकी चतुर्थीच्या
>>> आज अंगारकी चतुर्थीच्या मुहूर्तावर
हे भरतने लिहिलं?! सगळं ठीक ना?
या लॉरेन्स मॅन्झोने भांडारकर
या लॉरेन्स मॅन्झोने भांडारकर एडीशन म्हणू नका, बाँम्बे एडिशन, कलकत्ता एडिशन, क्रिटिकल एडीशन सगळ्यांचे संदर्भ घेऊन यात हे आणि त्यात ते करुन वर आजच्या काळाचा चष्मा लावून पाश्वात्य नजरेला त्यातले काय पैलू दिसतील तसे ही काही संदर्भ दिले आहेत. मजा येते ऐकायला + महाभारत कितीही वेळा ऐकलं तरी माझ्या मेंदुत सगळं फिट बसत नसल्याने काही ना काही नवंच सापडतं.
ते सार्कास्टिक आहे. मला तारीख
ते सार्कास्टिक आहे. मला तारीख सुद्धा माहित नाही, आता ह्या माहितीचा मी काय करू.
महाभारतातील बहुतेक सगळी पात्रं गुंतागुंतीची, ग्रे, थोडी हलकट, स्वार्थी, थोबाडफोड व नीच आहेत म्हणून ते अजूनही इंटरेस्टिंग आहे.
मानवदादा

मी वाचत सुद्धा नाही, डायरेक्ट वाद. वाचणं is so dated.
हो. मला आज दोन उकडीचे मोदक
हो. मला आज दोन उकडीचे मोदक मिळालेत. त्यांना स्मरून लिहिलं.
लोक पाव खाऊन बाटायचे हे ऐकलं
लोक पाव खाऊन बाटायचे हे ऐकलं होतं. मोदक खाऊन बाटल्याचं प्रथमच बघते आहे.
दुपारच्या जेवणात मालवणी चिकन
दुपारच्या जेवणात मालवणी चिकन करतोय. रात्री आता मोदक करुन उपास सोडावा का काय!
(No subject)
Kay
काय बोलताय काहीच कळत नाहीये. मी फक्त टीव्हीवर महाभारत बघितलं होतं अनेकानेक वर्षांपूर्वी. त्यानंतर त्याबद्दल काहीच वाचलेलं आणि ऐकलेलं नाही.
भीम पंजाबी बोलत असेल का?
भीम पंजाबी बोलत असेल का?
"ओए नकुल पुत्तर, रहन दे रब वास्तां, तुस्सी ना हो पाए "
भीम म्हटलं कि दारासिंग किंवा खली डोळ्यापुढं येतो. जास्तीत जास्त धर्मेंद्र.
अर्जुन जितेंद्र सारखा असावा, युधिष्ठीर ए के हंगल किंवा भारतभूषण. कर्ण विनोद खन्ना.
नकुल सचिन आणि सहदेव प्रदीप कुमार.
त्या काळात स्त्रिया पराक्रम बघत असतील कि पुरूषाचं सौंदर्य?
नकुल सारख्यांचं दु:ख हे कि स्त्रियांच्या नजरांचा त्रास होत असेल तरी सांगता येत नसेल. सगळे हसण्यावारी नेत असतील.
बलराम तटस्थ नसेल. त्या काळी शरद पवार यांनी कृष्णाचा अवतार घेतला होता. त्यांनी सैन्य दुर्योधनाला दिलं आणि स्वतः पांडवांकडून लढला. असं करून त्याने त्या काळच्या बलाढ्य पक्षात भांडणं लावून आपलं राज्य सुरक्षित ठेवलं, आपल्या भोळ्या भाबड्या भावाला मोठेपण देऊन गादीवर बसवलं, प्रत्यक्षात तो सल्ल्यासाठी आपल्यावरच अवलंबून राहणार हे त्यांना माहीत होतं. त्याला तटस्थ का रहायचं हे शिकवलं.
शिवाय कौरव पांडव दोन्हींपैकी कुणीही जिंकलं तरी दोन्हीकडे पाय ठेवलेला असल्याने जिंकणार्या पक्षाशी मधुर संबंध राहणार. त्या काळापासून शरद पवार अवतार घेत आलेत म्हणून भांडणं होत आली. या काळात त्यांनी जिवंतपणीच मोदींचा अवतार घेतला. हे रेकॉर्ड ब्रेक होणार नाही.
अरे मी नकुल घाणेकरबद्दल
अरे मी नकुल घाणेकरबद्दल विचारत होतो. तुम्ही लोक कुठून कुठे गेलात! सगळं रामायण झालं, पण नेहा गद्रे कोण हे कळालं नाही
आता पुन्हा सुरू करा म्हणतोयस
आता पुन्हा सुरू करा म्हणतोयस की काय!
(No subject)
Pages