मी चार मे ला अंजली व फा या माबोकरांना भेटले.
तेथे माबोकर तोषवीही आली होती, ती सध्या सक्रिय नसते. त्या भेटीच्या गप्पा मारण्यासाठी हा धागा. वृत्तांत -
फारएण्ड -
मस्त झाले गटग. दहा-साडेदहा तास गप्पा मारत होतो. आधी अंजलीकडे भेटलो. अतिशय चवदार पन्हे घेउन तिच्या बॅकयार्ड मधे बराच वेळ बसलो होतो. नुकताच पाऊस पडून गेल्याने बाहेर एकदम आल्हाददायक म्हणतात तसे वातावरण होते. तेथे अंजलीच्या बॅकयार्ड शेती पासून ते पूर्वी केलेले रेल्वेप्रवास, विविध लोकांची डोंबिवली कनेक्शन्स ई वर गप्पा झाल्या. या गप्पांत ट्रेन्सचा विषय कोठून आला (की मीच आणला) लक्षात नाही. तेथे लाँग आयलंडबद्दलही चर्चा झाली. माझी लॉग आयलंड बद्दलची माहिती इतकीच असल्याने मी ज्ञान पाजळले नाही.
अनेक माबोबाह्य व्यक्तिमत्त्वे उपस्थित असल्याने असेल, पण बराच काळ माबोचर्चा नव्हती. ती सगळी खूप नंतर झाली.
मुख्य मेन्यू तर मस्त होताच पण मला इव्हन त्या चटण्या, लोणचे सुद्धा खूप आवडले. जेवायला आत आलो पण नाहीतर मला बॅकयार्ड मधे अजून बराच वेळ बसायला आवडले असते. प्रत्यक्ष जेवताना कोणत्या विषयावर गप्पा झाल्या ते अजिबात लक्षात नाही.
आमच्याकडे आल्यावर आधी जनरल विषयांवर चर्चा सुरू होती. म्हणजे अगदी स्टॉक्स, रिअल इस्टेट, ट्रम्प/मोदी वगैरे नाही पण बरेचसे नॉन-माबो विषय. मग थोड्या वेळाने आम्ही माबोमधे शिरलो आणि मग सगळे निघेपर्यंत माबो गप्पाच सुरू होत्या. काही लोकप्रिय आयडी, काही चांगले लिहीणारे, आता नवीन आलेले आणि चांगले लिहीणारे, माबोवर जमलेली लग्ने, माबोवर तुटलेल्या मैत्र्या, काही खमंग इतिहास - बरेच काही.
मधे रार चा फोन आला. मग तिच्याशी १५-२० मिनिटे गप्पा झाल्या. ते उपगटगही धमाल होते.
नंतर संध्याकाळी मात्र फार खाणे-पिणे झाले नाही. एकतर दुपारचे खूप जड झाले होते किंवा मी पाहिजे तितका आग्रह केला नाही. तेवढ्यापुरता तरी नो बाप्तिस्मा.
अंजली-
तर - हा शास्त्राप्रमाणे वृत्तांत.
मागचा वृत्तांत लिहून बरोबर १४ वर्षे झाली. २०११ च्या मे मधे मेगा गटग झालं होतं. न्यूजर्सीतून एक बस आली होती, डी सी वरून एक बस आली होती. शार्लटवरून लोक आले होते. आणि इथलेच काही जण. त्यामुळे अस्मिताचा मी येतेय, तुला भेटायला आवडेल म्हणून मेसेज आल्यावर 'अरे! फक्त तिघंच असणार आपण??' असं वाटून बाकी लोक गोळा होतायत का चाचपणी केली. फा मला सांगायला विसरल्यामुळे मी एकटीच लोक गोळा करायला लागले. तोषवी मायबोलीकर आहे पण खूप अॅक्टीव नसते, तिला ये म्हणून सांगितलं. म्हाळसा देखिल आमच्याच गावात राहते, तिला निरोप पाठवला पण तिचं काही उत्तर आलं नाही (तिलाच निरोप पाठवला ना असही वाटून गेलं).
फा नं अमित आणि रमडलापण आमंत्रण दिलं होतं (असं मला नंतर कळलं). सध्या भरपूर काम असल्यानं मायबोलीवर फार बागडता येत नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांच्या वाड्यावरच्या गप्पा वाचल्या नव्हत्या. त्यामुळे इथे काय चाललं आहे कळत नव्हतं.
अस्मिताला काय जेवायला आवडेल अंदाज येत नव्हता. मग सरळ मराठवाडी बेत ठरवला. चुका भाजी, भरली वांगी, भोपळा भाजी, कोथिंबीर चटणी, क्रॅनबेरी चटणी होतीच घरात. फा च्या बायडीनं मसालेभात, गोडाचा पदार्थ करून आणला. मग मठठा केला. ढोकळा खावासा वाटला म्हणून ढोकळा केला. मग वाटलं तळण नाही तर कसं. मग सोहमच्या कुरडयांना न्याय दिला. पन्हं करून ठेवलं. त्यात बजी रंगीत पाणी घालायचा ऑप्शनपण दिला हे नमूद करून ठेवते. साडेबाराला सगळे जमायला सुरूवात झाली. अस्मिता आली तीच 'अंजली का?' असं म्हणून मस्त गळाभेट घेतली. मोठ्याला दोन बॅगाभरून घेऊन खाऊ घेऊन आली. तिचा फेमस पोह्यांचा चिवडा (आत्ता तोच खात वृत्तांत लिहीते आहे), नारळाची बर्फी, रवा बेसन लाडू, घरी केलेली दाण्याची चटणी, लिंबाचं लोणचं आणि - एक पिशवी भरून दोडक्याच्या बिया!
एवढा खाऊ, गिफ्ट घेऊन येऊन अस्सल मराठवाडी असल्याचं सिद्ध केलं. आल्याबबरोबर गप्पांना जी सुरूवात झाली ते रात्री साडेदहाला तिला सोडलं तेव्हाच गप्पा थांबल्या. जेवताना नॉन मायबोलीकर पण बरोबर असल्यानं मायबोलीवरच्या गप्पा मारता येत नव्हत्या. तरी अमांची आठवण निघाली. त्यांनी एका लेखावर "गुढगे असे बोलू लागले की शेंडेनक्षत्र" असं काहीसं लिहीलं होतं. ते आठवून आणि अमांची वन लायनर्स आठवून फार हसलो आणि तेव्हढेच हळहळलोही . तेव्हढ्यात फा ने शेंडेनक्षत्र आयडी उडाल्याची बातमी दिली. तरीच ट्रंप धागा मलूल पडलाय.
जेवणं झाल्यावर 'केसर मारके' चहाची ऑफर दिली पण फा ला घरी जाऊन ४० लोकांचा चहा करायचा होता. मग फा कडे सगळे गेलो. काही नॉन मायबोलीकर आले नाहीत. तोषवीही चहा घेऊन निघाली. मग खर्या गप्पा सुरू झाल्या. तेव्हढ्यात रारचा पण फोन आला. तिच्याशी बोलताना समीर. सुप्रिया, नंद्या, अनुदोन यांचा उल्लेख झाला. रमड आणि धनि या दोघांची पण आठवण निघाली. तो पर्यंत अनलिमिटेड चहा सुरूच होता. एकीकडे मायबोलीवर काय चाललं आहे हे फा आणि अस्मिता दोघंही बातम्या देत होते. काही जुन्या आयडींची आठवण निघाली. शेवटी दुसर्या दिवशीची फ्लाईट असल्यानं साडेदहाला अस्मिताला सोडायला निघाले.
आता विचार करताना असं वाटतं खरंच कुठले हे ऋणानुबंध असतील हे? तोषवी आणि फा दोघही इकडे मूव्ह व्हायच्या आधी माझ्याशी बोलले होते. ती आठवण सांगताना तोषवी म्हणाली की अंजली मायबोलीवरची व्यक्ती आहे म्हणून काहीही ओळख नसताना अगदी विश्वासानं फोन केला होता. मला कॅनडाबद्दल माहिती हवी होती तेव्हा अमित आणि अस्मिताच आठवले. अगदी हक्कानं फोन करून दोघांना पिडलं होतं. पूर्वीची मायबोली राहिली नाही हो आता' हे कितीएही वेळा बोललो तरी वॉटसअॅपच्या काळातही मायबोलीवर आल्याशिवाय रहावत नाही.
अस्मिता -
अंजली, तू मी मराठवाड्यातली आहे म्हणून मला त्या पद्धतीचे जेवण आवडेल हा विचार करून स्वयंपाकाचा बेत आखला होता. त्याने I was really touched..! माझ्या ताईलाही खूप आवडलं सगळं. वर म्हणताही आले 'बघ माझे मायबोलीवरचे मित्रमंडळ किती अमेझिंग आहे.' आयुष्यात याआधी कधीही न भेटता सुद्धा किती जिव्हाळा निर्माण झाला आहे. ही माबोची जादू आहे.
दुसऱ्या बॅगमधे टेक्सासचे सुविनिअर म्हणून एक टेक्सासचा नकाशा रंगवलेला- त्याच आकाराचा कटिंग बोर्ड आहे आणि सॅन ॲन्टोनिओचे मॅग्नेटही आहेत पण ते एका पॅकमधे दोन आले आणि मला उघडावे वाटले नाही मग ते फा कडे गेले आहेत. फा तू अंजलीला नंतर देऊन टाक कधीतरी. टेक्सासचा आकार विचित्र आहे, मी चौकोनी स्टेटमधे राहिले असते तर तुम्हाला भाजी चिरायला सोपे गेले असते.
अंजलीने जंगी बेत आखला होता. हे फोटो -
1.
2.
मिसेस फा ने मसाले भात आणि मॅन्गो मूस केले होते. तोषवीने मॅन्गो पाय आणला होता. अंजलीने भरली वांगी, दुधीची भाजी, चुक्याची पातळ भाजी, माबोवरची क्रॅनबेरीची चटणी, ठेचा, कोथिंबीरीची चटणी, ढोकळा, पन्हं, ताक, कुरडया - पापड्या , खोबऱ्याची चटणी मी बहुतेक काही तरी विसरले असेन पण भरपूर केलं होतं. अप्रतिम, रूचकर आणि चमचमीत झाले होते सगळेच. पूर्ण बेत मराठवाड्याचा होता.
आणि हो, सर्वांना दोडक्याच्या बिया दिल्या आहेत.
अंजलीचे बॅकयार्ड अतिशय सुंदर आणि रमणीय आहे. फा म्हणतोय तसं आम्ही पन्हं घेऊन सात आठ जणांचा ग्रुप गेट टू नो करत कमीत कमी ऑकवर्ड दिसण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या बॅकयार्डात टेबलवर चंदनाच्या लाकडात कोरीवकाम केलेले आहे असे डिझाईन असलेला कंदील होता व सुगंधी वासाचे धूप लावून ठेवले होते. अगदीच प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण. मागे गर्द हिरवीगार उंच झाडी बघत आम्ही पन्हं घेत बसलो.
अंजलीकडे थोडीफार ओळख व तुडुंब जेवण झाल्यावर हालचाल बंद झाली होती काही वेळ. पण फा ला दुसऱ्या इव्हेंटसाठी विनामूल्य अमृततुल्य चहाचे दुकान उघडावे लागणार होते, त्यामुळे आम्ही ते पहायला त्यांच्या घरी जायचे ठरवले. अगदी जवळ आहेत दोघांचीही घरं. पण एकदा घरी गेल्यावर त्याने आधान ठेवले की आम्ही त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
मग परत अंजलीने एकदा पुन्हा भोजनालयातले डबे भरून प्रत्येकीला दिले. माझे डबे तेथेच विसरले, आज देशील का पाठवून? काय कातील स्वयंपाक होता. ती वांग्याची भाजी आणि कोशिंबीरीची चटणी याची कृती लिहीच. मीही करते भरली वांगी पण ती इतकी लाल बुंद चटकदार दिसत नाही.
अंजलीच्या भूभूला बघून कोकोनटची आठवण आली. तिला व कोकोनटला चेरी सारखे खेळणं आणलं पण तिला द्यायला गेले तर ती घाबरत होती. खूप क्यूट आहे. मला तिला माया करायची होती पण ती पळून गेली.
तुम्हाला खेळणं कोणतं आहे हे कळावं म्हणून कोकोनटचा हललेला फोटो देते.
कोकोनट
कोको
भूभू धाग्याची आठवण काढून झाली अर्थात.
हे सगळे डबे व आम्ही सगळे ह्यांना गाडीत टाकून अंजलीने आम्हाला फा च्या घरी आणले. त्यानी त्याचे अमृततुल्य टाकले व आम्ही त्यांच्या हॉलमधे गप्पा मारत बसलो. नंतर काही वेळ बाहेर बसून त्यांचेही मागचे अंगण पाहिले. तेथे थुईथुई उडणारे कारंजे आहे. सगळे राले शहरच हिरवेगार आहे, त्यामुळे फा च्या अंगणातूनही उंच-उंच हिरवी झाडे दिसत होती.
कारंजे बघून फा च्या 'डेडली आत्या' मालिकेतील कारंजी आठवली. डेडली लेखनाची प्रेरणा कुणाला कुठून मिळेल काही सांगता येत नाही. तो कुठे उभे राहून, कुठली कामं करत बघू नयेत अशा मालिकाही आवर्जून बघतो हे त्याने आम्हाला दाखवले. घर छान प्रशस्त, मोकळे व वेलकमिंग आहे. फा आणि मिसेस फा दोघेही मोकळे आणि लाघवी आहेत. त्या सुद्धा इतक्या मोकळेपणाने बोलत होत्या की जुनी ओळख वाटू लागली.
मी चहा घेत नाही पण फा च्या हातचा चहा प्यायले व मला तो आवडलाही. तो सतत 'अजून घ्या, हे खाता का- ते खाता का , किमान कूकीज तरी घ्या' म्हणत होता. पण आम्हाला अजिबात भूक नव्हती. मला मिसेस फा- शलाकाने जवळ बोलावून हळदीकुंकू लावून गिफ्ट कार्डने ओटी भरली. मी फक्त एकदाच 'कशाला- कशाला' म्हणून फार आढेवेढे न घेता सरळ कौतुक करवून घेतले. मला एकदम नांदेडचीच आठवण आली. फा च्या समोरच्या अंगणात अतिशय सुगंधी वासाचे वेगवेगळ्या जातीचे गुलाबाचे ताटवे आहेत. त्यांना पावसाने बहर आलेला होता. त्याचा सुगंध- दरवळ अगदी दुरूनही येत होता.
१.
२.
जनरल गप्पांमधे खूप वेळ गेला व मला वृत्तांत मट्रेयल नसल्याने अस्वस्थ वाटू लागले. कोणत्या तोंडाने परत येऊ वाटू लागले. मग अचानक रारचे फोन गटग केले. ही एक अतिशय धमाल मुलगी आहे. भयंकर हाय एनर्जी व chirpy आहे. तिने पुन्हा लिहायला सुरुवात करायला हवी. ती म्हणाली 'मला तुला तुझ्या स्पिरिच्युअल लेखांबद्दल बोलायचे आहे', हा मला धक्काच होता. कारण आम्ही जे काही बेकरी वर बोलतो ते सहसा चित्रपटांबद्दलच असते. मग तिने ती लवकरच रमडशी, अनुदोनशी भेट घेणार असल्याचे सांगितले. अजून एक गटग.
फा म्हणाला, 'मी तुझे सुरवातीचे लेखन वाचले नाही.' मी म्हटलं 'तुझ्या इंटरेस्टचे नाही ते, मी तरी तुझे झुकझुकगाडी व बॅटबॉलवरचं कुठं वाचलं आहे.' हे असे बोलल्याने 'तू माबोइतकीच 'डिरेक्ट' आहेस म्हणाला.'
अंजली हल्ली अधूनमधून वाचत असते म्हणून तिच्याकडे बऱ्याच ताज्या बातम्या नसतात. मी नवीन आहे म्हणून माझ्याकडे खमंग इतिहासाची माहिती नव्हती. फा स्थितप्रज्ञ आहे, तो गनपॉईन्टवरही गॉसिप करत नाही. मग मला अंजलीचाच आधार राहिला होता. मी तिला करंट इव्हेंट्स सांगून तर तिने मला माबोचा जाज्वल्य इतिहास सांगून दोघींनीही एकमेकींना 'अपग्रेड' केले आहे. आता तुमचं काही खरं नाही..!
त्यात बरेचशे वाद, तमाशे, उडालेले आयडी, निघून गेलेले आयडी, कुजकट आयडी, वरून गोड -आतून धोरणी आयडी यांची माहिती मिळाली. मी एकदम योग्य कॅन्डिडेट आहे, कारण मी या जन्मात विसरणार नाही आता.
अमांची आठवण निघाली म्हणून मग शेंडेनक्षत्रंचीही काढावी लागली. Some people need tranquilizer, some people need therapy and a few need exorcism. असं मी थोडं स्पष्ट व बाकीचं मनात गमतीने म्हटले.
सकारात्मक आणि धमाल गप्पा जास्त झाल्या पण. त्यात सगळे वाडेकर आठवले. वाड्यावर किती लोक जमतात तो कसा हिट झाला आहे असे अंजलीने म्हटल्यावर, 'माझ्यामुळे कशे चारचे चाळीस जमायला लागले' असे मीच 'राकु-मोड' मधे जाऊन म्हटले. आता माझ्यासकट सगळे आपापल्या वेळेनुसार येऊन हलक्याफुलक्या गप्पा मारून जातात. दिवसपाळीतील भारतीय माबोकर असो व अमेरिकन माबोकर असतो वाडा कायम नांदताजागता- हसताखेळता आहे. नियम लाख बनवून धागा काढला तरी एखादी जागा सातत्याने सकारात्मक व प्रसन्न ठेवणे ही सगळ्यांचीच जबाबदारी असते. त्यामुळे माबोकरांनाच त्याचं श्रेय जातं.
माबोवर जमलेल्या लग्नांपैकी मला फक्त रमड आणि धनिचेच माहिती होते. पण आपले ॲडमिन, अनुदोन- आश्चिग आणि मिल्या (?) ह्यांचीही आहेत असे कळले.
मराठी माणूस उद्योगात मागे का ? या विषयावर फा आणि अंजली बोलले. दोघांचेही बरेच मुद्दे रिअलिस्टीक वाटले. शिवाय इथल्या प्रमाणे मधेच तेथेही गांधी - नेहरू -सावरकर येऊन गेले. मी तेथेही इथल्यासारखेच वाचनमात्र राहिले.
माबोवरच्या अनेक गमतीजमती व आठवणी आणि काही गटग बद्दलही कळाले. माझे हे पहिले गटग आहे किंवा मी ह्यांना आधी भेटले नाही हे लक्षातही आले नाही. अगदीच जुनी ओळख वाटली. अजूनही गटगला आलेल्या मजेचा ताजेपणा मनावर आहे. पुढच्या वेळीही मी आनंदाने जाईन. छान आठवणी गोळा झाल्या.
मजा येतेय गटग वृत्तांत
मजा येतेय गटग वृत्तांत वाचायला...
तो वृत्तांत वर मुख्य खिडकीत
तो वृत्तांत वर मुख्य खिडकीत टाका आता - नवीन वाचणाऱ्यांना शोधत बसायला नको.
>>>>>सामो, फोटो - साऊथ इंडियन
>>>>>सामो, फोटो - साऊथ इंडियन हिरो सारखी एन्ट्री घेण्यासाठी तुमची उत्सुकता ताणवतो आहोत. Happy
टाक गं लवकर 
अर्रे मस्त
मी लिहिलेला मोठा का ?
-
वर सगळा वृत्तांत एकत्रित करून चिकटवला आहे.
>>>>आता विचार करताना असं
>>>>आता विचार करताना असं वाटतं खरंच कुठले हे ऋणानुबंध असतील हे?
छान वाक्य. आवडले. खरे आहे ऋणानुबंधच असतात.
वर सगळा वृत्तांत एकत्रित करून
वर सगळा वृत्तांत एकत्रित करून चिकटवला आहे >>> बेश्ट!
>>>बेश्ट! +१०१
>>>बेश्ट!
+१०१
हा २०११मध्ये अंजलीकडे
हा २०११मध्ये अंजलीकडे झालेल्या जीटीजीचा वृतांत.
गेल्या २-३ दिवसांत इथे
गेल्या २-३ दिवसांत इथे लिहायला फोकस मिळत नव्हता.
आता विचार करताना असं वाटतं खरंच कुठले हे ऋणानुबंध असतील हे? >>> अंजलीच्या या वाक्याबद्दल टोटल अनुमोदन द्यायचे होते. आम्हाला सुरूवातीला सेटल होण्याकरता अनेक प्रकारे तिने जी प्रचंड मदत केली ते आठवले.
पूर्वीची माबो राहिली नाही हे खरे आहे. पण मी अजूनही रोज व्हॉटसअॅपवर जायच्या आधी माबोवर येतो.
>>> पूर्वीची माबो राहिली नाही
>>> पूर्वीची माबो राहिली नाही हे खरे आहे
पण मला तर हे वाक्य पूर्वीच्या माबोवरही वाचल्याचं आठवतं.
मी चौकोनी स्टेटमधे राहिले
मी चौकोनी स्टेटमधे राहिले असते तर तुम्हाला भाजी चिरायला सोपे गेले असते. >>>
जंगी बेत वाले फोटो मस्त आहेत. (मी काढलेले नाहीत. नाहीतर ही राकु तारीफ होईल). अंजलीच्या "कोको" ने वेळेवर भुंकून एक काम सोपे केले. ते चेरी-खेळणे तिच्याकरता आहे हे तेथील सीनवरून मला समजले. नाहीतर अस्मिता हे नक्की कोणाकरता भेट घेउन आली आहे हा प्रश्न पडला असता
"जंगी बेत" तर भारी होताच पण त्याच्या भारीपणाचे एक प्रूफही आहे - पहिल्या फोटोत तो मठ्ठा घ्यायला फोटो काढेपर्यंत सुद्धा धीर न धरू शकलेली व्यक्ती कोण आहे याचा शोध लावायला हवा
विनामूल्य अमृततुल्य >>>
कोकोनटची पोज इन्फ्लुएंन्सर्/डिजिटल क्रिएटर मुली तिरक्या साइड अँगलने फोटो काढतात तशी आहे. तो ही पेट-इन्फ्लुएंसर आहे का? कोकोचा एकदम शालीन आहे पण खालचे कार्पेट जरा मोठे असते तर मेट-गाला मधला वाटला असता, काळा ड्रेस ई.
हे सगळे डबे व आम्ही सगळे ह्यांना गाडीत टाकून अंजलीने आम्हाला फा च्या घरी आणले >>> हे वाचून सर्वांना ट्रंकमधे टाकून ढोसून ट्रंक बंद करून अंजलीने आणले असे इमॅजिन केले.
डेडली लेखनाची प्रेरणा कुणाला कुठून मिळेल काही सांगता येत नाही >>>
फा आणि मिसेस फा दोघेही मोकळे आणि लाघवी आहेत >>> यातल्या माझ्याबद्दल खुलासा ऑलरेडी केला आहे.
त्यामुळे माबोकरांनाच त्याचं श्रेय जातं >>> वाड्यावरची दिवसपाळी-रात्रपाळी, गप्पांचे विषय वगैरेवरही चर्चा झाली. एकाच बाफवर रोज दोन ऑल्मोस्ट स्वतंत्र विषय वेगवेगळ्या वेळेला चालू राहणे आणि पुन्हा सकाळी/संध्याकाळी सर्वांच्या एकमेकांशीही गप्पा होणे हे वाड्यात युनिक असेल. इतर धावत्या धाग्यांवर विविध ठिकाणचे व टाइमझोन मधले लोक येत असले, तरी त्याची "धावण्याची वेळ" साधारण एका देशातलीच असते.
एकूण या गटगमधे गब्बरच्या भाषेत "दो पुणेकर और एक मराठवाडाकर शामील है. देखे किसे बाप्तिस्मा मिलता है" असे गटगपूर्व वातावरण होते. पण अंजली अर्धी मराठवाडाकर निघाली. आणि ती गटगमधे मराठवाडाकर की हैसियतसे आली होती. तरीही सर्वांचा आपापला "कर"पणा अबाधित राहिला.
कल्लोळाच्या लिंकसाठी धन्यवाद,
मराठवाडा कर
मराठवाडा कर
नांदेड
मेनू
हे सगळं वाचून फारच मस्त वाटतंय
गुदगुल्या types
किल्ली, तुझी आठवण काढली बरं.
किल्ली, तुझी आठवण काढली बरं. 'किल्ली किती सकारात्मक आणि हसरी मुलगी आहे असं आम्ही आपसात म्हटलं.'
प्रज्ञा, तुला फोन करायचे लक्षात होते पण ह्या सगळ्यात भारतातले तीन वाजून गेले होते, मग करता नाही आला. पण आठवण होती आणि बोललोही त्याबद्दल.
केया, तुझी बहिण जुजा -
केया, तुझी बहिण जुजा - वाचनमात्र आहे आणि रालेत आहे, तिलाही बोलावले असते की गं. Happy >>हो ना...पुढच्या वेळी नक्की ग..
वृत्तान्त वाचायला मज्जा येतेय..लिहा भरपूर .
chopping board फार आवडला आहे..idea आवडली gift ची
सहीच आहे गटग वृतांत. मस्त.
सहीच आहे गटग वृतांत. मस्त.
)
मला आठवले पूर्वी चे वृतांत वाचलेले. एविएठि असं लिहीलेले असायचं जाम काही पत्ता लागायचा नाही. काय चाललंय नक्की कोण कुठे राहतात? पार्ल्यातल्या धाग्यावर वेगळ्या किनाऱ्यावरील मंडळी काय करतात ? मला टोटल लागायची नाही. पण वाचायला आवडायचं. गटग च्या आधी आणि नंतर खूप दिवस हे चालायचं.
झक्की- रॉबिन हूड भेट वगैरे पुण्याला झालेल्या गटग चे वृ. आणि अंजली कडे २०११ च्या गटग चा वृ मी वाचलाय. मायबोलीची मोहिनी त्या आधीपासूनच आहे. पण मी बिनदिक्कतपणे लिहायला वाड्यावर आल्यापासूनच लागले. ( लिहायला म्हणजे प्रतिक्रिया
तुमचं गटगं पण भारीच झालंय अस्मे.
अरे हे सगळीकडे "वाड्यावर येणे
अरे हे सगळीकडे "वाड्यावर येणे" काय आहे?
मला या गटग पेक्षा ते माहित नाही याचा फोमो जास्त आलाय... खूप जास्त...
एक चीप डायलॉग मारायची इच्छा
एक चीप डायलॉग मारायची इच्छा आवरून वाड्याची लिंक देतेय ...
https://www.maayboli.com/node/79374
माझे मन..
माझे मन..
एका थोर अभिनेत्यांची आठवण करुन दिलीत..
माझेमन
माझेमन
अस्मिता, तुला तो शब्द कळेल
अस्मिता, तुला तो शब्द कळेल याची खात्री असल्यानेच तसा योजला होता.
कटिंग बोर्ड जबरी आहे! त्यावर ऑक्टोपस किंवा अमीबासुद्धा नीट चिरता येईल.
छान वृत्तान्त. अस्मिता,
छान वृत्तान्त. अस्मिता, गटगचा हँगओव्हर वृत्तान्तात उतरूनही शिल्लक राहिलाय असं दिसतं.
<फा ला दुसऱ्या इव्हेंटसाठी विनामूल्य अमृततुल्य चहाचे दुकान उघडावे लागणार होते - ४० लोकांचा चहा ,> हे काहीतरी रहस्यमय वाटते आहे.
हे ४० कोण? नेमके चाळीसच का? एवढा चहा एकदाच केला की बॅचेसमध्ये? त्यासाठी किती मोठी भांडी लागली असे प्रश्न पडले.
रहस्याचा उलगडा प्रतिसादांत झाला असेल तर कल्पना नाही ; कारण सगळे प्रतिसाद वाचले नाहीत.
अस्मिता
अस्मिता
आठवण काढलीत
So sweet of you
.
हर्पा काहीही काय
प्राणी चिरताय
त्यापेक्षा अस्मिता एखादा सिनेमा घ्या चिर'फा'ड करायला
४० लोकांचा चहा ,> हे काहीतरी
४० लोकांचा चहा ,> हे काहीतरी रहस्यमय वाटते आहे. >>
खुल जा सिम सिम म्हटल्याशिवाय रहस्य उलगडणार नाही..
चिर'फा'ड >> जियो किल्ली!!!
चिर'फा'ड >> जियो किल्ली!!!
चिर'फा'ड >> किल्ली एकच नंबर
चिर'फा'ड >> किल्ली एकच नंबर
चिर'फा'ड >> किल्ली एकच नंबर
चिर'फा'ड >> किल्ली एकच नंबर
कटिंग बोर्ड जबरी आहे! त्यावर
कटिंग बोर्ड जबरी आहे! त्यावर ऑक्टोपस किंवा अमीबासुद्धा नीट चिरता येईल.>>>>> ऑक्टोपस ठीक आहे पण अमिबाची चिरफाड करणारे जगात तुम्हीच पहिले. दंडवत.
चिर'फा'ड >> किल्ली. ज ब र द स्त
हेहेहेहेहे सगळेच सुटलेत .
हेहेहेहेहे सगळेच सुटलेत .
चिर'फा'ड >> जियो किल्ली
चिर'फा'ड >> किल्ली. ज ब र द
चिर'फा'ड >> किल्ली. ज ब र द स्त +१
अंजली त्याचीही चवदार चटणी/ पातळ भाजी करेल. तिला उरकही आहे आणि हाताला चवही आहे आणि हात मोठा आहे. देताना, वाढताना, करताना. 
अमिबा आणि ऑक्टोपस>>>
करू आम्ही चिर'फा'ड
. मराठी माणूस यामुळेच उद्योगात मागे असेल. आम्ही चिरफाड करत बसतो तोवर 'गुजराती पाऊल पडते पुढे.' 
धनुडी- माबोची मोहिनी, जादू, मैत्री, सखोल चर्चा, ऋणानुबंध आणि टाईमपास या कशालाच तोड नाही.
भरत, फा ला आमच्यासाठी नाही दुसऱ्या एका गेट टुगेदर साठी तीस-चाळीस कप चहा करायचा होता. तो हा यज्ञ नेहमीच चालवतो. त्यातला आम्हीही घेतलाच अर्थात. मोठीमोठी भांडी आहेत त्यांच्या घरी. दुकान म्हटले की सगळे लागणारच ना! त्यामुळेच 'विनामूल्य अमृततुल्य' चहाचे दुकान. तुमची पण आठवण काढली होती आम्ही, 'चालू घडामोडींची' निघाली की आपोआपच आली.
हो, गटगच काय पण वृत्तांतही संपू नये वाटतंय. 
Pages