वाड्यातल्या गप्पा

Submitted by अस्मिता. on 24 June, 2021 - 11:18

वाड्यातल्या गप्पा
IMG-20240909-WA0003_1.jpgहा धागा एक माणसांनी भरलेला वाडा आहे , कोणीही या, कधीही या, अंगणात कोणीतरी बाज टाकून बसलेले असेलच. तुमचे हसूनच स्वागत होईल.  मायबोलीवरचे इतर लेखन इथे कॉपी करून आणू नका. त्या विषयीचे गॉसिपही नकोच. राजकारण नकोच. कसलेही चित्र द्या , कसल्याही शुभेच्छा द्या. रोज द्या / कधीतरी द्या. लिंक्स द्या.

धाग्याचे नियम-
कुणालाही हेटाळणीजनक प्रतिसाद देऊ नका. प्रत्येकजण (अमेरिकेतले/ भारतातले/ किंवा अजून कुठलेही) आपापल्या अनुभवविश्वातील गप्पा मारायला येथे येणं साहजिकच आहे. हा धागा फनहितार्थ आहे, जनहितार्थ नव्हे. त्यामुळे अपेक्षा नकोत आणि दबाव आणण्याचे प्रयत्नही नकोत. त्यांना आपापल्या समविचारी लोकांसोबत आनंदाने गप्पा मारायचा अधिकार आहे. सर्वांशीच सौजन्याने वागा आणि गोड बोला. Happy
धन्यवाद.


Happy करा सुरू.. !

***दवंडी***
वाडा निवडक हा धागा वाडा, मग, अग वरील निवडक पोस्ट्ससाठी काढला आहे. तो पहाण्यास पश्चिम महाराष्ट्र ग्रूपचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
वाड्याची तिजोरी गप्पांचाच ठेवा.
ही तिची किल्ली-उघड दार वाडेकरा
प्रताधिकारमुक्त चित्र सौजन्य - अनिरुद्ध

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅल्लो वाडा! लॉट टू कॅच अप!! Happy

अमित आता ब्राउजर च्या इन्कॉग्निटो/प्रायव्हेट मोड मधे धार्मिक पाने बघणार >>> ये क्या माजरा हय? Proud

@अल्पना, ब्लड टेस्ट का करतेय? काय झालं?

@ममो, फ्रॉक अगदी गोड आहे.

@अनया, सध्या इथे यायला जमत नसल्याने तुझ्या रांगोळ्या मिस होतायत बघ! ही रांगोळी छान आल्ये.

आज बाबा, बुवा आणि कंपनी असा विषय आहे का? Happy

@स्वाती ताई, हिअरिंग मधे काय झालं नक्की सांग. उत्सुकता आहे Happy

वय झालं >>> Lol
ओके, रूटिन चेकप होतं तर. मग हरकत नाही.
टेस्ट नॉर्मल आहेत सगळ्या >>> बेस्ट!

नागराणी योगिनी व योगिराज जिम्मी !>>>>>>>> मुंबईत पाहिले आहेत यांचे भक्त. ते खिशाला बिल्ला लावतात आणि मरून वेलवेटची टोपी घालतात. मला त्यांच्याबद्दल बरंच कुतूहल होतं लहानपणी.

मरून वेलवेटची टोपी घालतात. >> बन्सल मर्डर मध्ये दिप्ती नवल आणि अनुयायी घालतात तशी का? ते अर्थात जिवंतपणी घालतात! मरुन नाही Lol

अर्थात जिवंतपणी घालतात! मरुन नाही>> Lol
हॅलो वाडेकर्स! टाइमझोन प्रमाणे सुसांज, सुप्रभात.

<<मला समहाऊ हे गुरू करणं, त्यांची प्रवचनं/शिकवण, त्यांचे मठ/आश्रम, तिथे करायची सेवा हे काही फारसं पटत नाही. अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे कोणाची श्रद्धा असेल तर त्याने ते जरूर करावं.>>
माझं यावरील निरीक्षण:
यात श्रदा + ज्यांना वेगळं असं काही करण्याची संधी मिळत नाही त्यांचा पण समावेश आहे. त्यांच्या दृष्टीकोनातून पाहिले तर त्यांना हे दोन्ही करण्याची संधी मिळते तिथे. त्याच त्या लोकांपेक्षा (हे वाईट अर्थाने नव्हे) नविन लोक भेटणे, नविन सहकार्याने करण्याच्या ऍक्टिव्हिटीज, प्रत्येकाला आपण काहीतरी वेगळे क्रिएटीव्ह अथवा चांगल्या कॉज साठी काहीतरी करत असण्याची भावना, मरगळ दूर होणे वगैरे.
बरेच लोक प्रवचन, कीर्तन कानी पडणे म्हणजे पुण्य या भावनेने जातात त्यातले कळो न कळों. काहींना या बदलाने प्रचंड चांगला फरक पडला असतो. अजुन बरेच काही पाहायला मिळते. आणि अर्थात ज्यांना वरील गोष्टींचे अप्रूप नसलेले पण श्रद्धा असलेले.

मानव +१. वय वाढलं आणि निवृत्ती घेतली की काय करायचं यावर आई बाबांनी बरीच काय काय सोल्युशन काढली आहेत. बाबा अंध मुलांचे परिक्षेचे पेपर वगैरे लिहायला जातात. अंध मुलांना जमेल ते शिकवतात, आयपीएचचं कॉल सेंटर/ हॉट लाईन आहे, स्ट्रेस मध्ये, आत्महत्येचे विचार वगैरे साठी तिकडे काऊंसेलिंग/ व्हॉलेंटिअरिंग करतात. परवा म्हणाले एक संस्था पदवी/ पदव्योत्तर शिक्षण आर्थिक/ सामाजिक दुर्बल मुलांना मिळावं यासाठी आर्थिक आणि मेंटरिंग असं काम करते. तिकडे आर्थिक आणि एकेका असाईन झालेल्या मुलाचं मेंटरिंग या अर्थी पालकत्त्व घ्यायचं तिकडे दोघेही जॉईन झाले आहेत.
अध्यात्माच्या फार नादी न लागता सुखाने/ परिवारात आनंदात जगायला मिळायचे रिसोर्सेस आपल्या सगळ्यांनाच मिळावे/ आपण शोधावे असं परवाच त्यांच्याशी बोलणं झाल्यावर वाटलं.

अध्यात्माच्या फार नादी न लागता सुखाने/ परिवारात जगायला मिळायचे रिसोर्सेस आपल्या सगळ्यांनाच मिळावे >>> करेक्ट!

मानवमामांनी सांगितलेला अँगल बरोबर वाटतोय थोडाफार. मला वाटतं केवळ 'आता आपलं सगळं छान होणार' यावर अभंग विश्वास ठेवल्याने पुष्कळांचं भलं होत असावं. म्हणजे मॅनिफेस्टेशन सारखं. काही लोक 'आपल्याला काही मदत करायला मिळते आहे' या भावनेनेही हे प्रकार करत असतील. पण बरीच माणसं त्या उपचारांत्/कर्मकांडांत अडकलेलीच दिसतात. म्हणजे हे केलं पाहिजे, अस्संच केलं पाहिजे, अमूक वाजता उठून तमूक पूजा/पारायणं/साधना वगैरे. याला माझा माझ्यापुरता आक्षेप आहे. कर्मकांडांना नक्कीच. माझ्यामते कर्मकांडं काटेकोरपणे पाळत राहून त्यामुळे भलं होण्यापेक्षा कधी काही उन्नीस-बीस झालं तर चूक झाली अशी भीती वाटून नुकसान होण्याची शक्यता जास्तय.

अमितव, आईबाबांची सोल्युशन्स आवडली. ही खर्‍या अर्थाने गरजूंची सेवा.

मरून टोपी Lol
योगीराज जिम्मी आणि नागराणीमाहीत नव्हते गुगल करून बघतो
विकू Lol
अल्पना, नॉर्मल आहे सर्व हे बेस्ट
ममो फ्रॉक पाहिला होता
फार सुरेख
अनया, रांगोळी सोबर सिम्पल आणि सुबक

ममोंनी केलेला फ्रॉक गोड आहे एकदम.
बाबा बुवांच्या पोस्ट्स पटतात.

बाकी सगळ्या मज्जेच्या पोस्ट्स ना हसून घेते Lol

आमच्याकडे संकष्टीचा उपास मी तरी खिचडीसाठी सुरू केला. बाबांची श्रद्धा एकदम लॉजिकल आणि त्यांच्यापुरती ठेवली होती त्यांनी. एक गंमत. ताई ने चुकून एकदा बहुतेक एकादशीचा उपास विसरून बिस्किट किंवा असंच काहीतरी खाल्लं नि एकदम ट्यूब पेटली आणि डोक्यावर हात मारला.
"डोक्यास हात कशाला लावत्येस... त्यापेक्षा एक तुळशीचं पान खा नि देवासमोर हात जोडून पुन्हा कर तो उपास. पूर्ण करणार असशील तर लक्षात ठेव दिवसभर. "
साधं सोपं अध्यात्म. अवडंबर नाही नि बोजडपणा नाही.

अरे वा अमित.
माणसाने एक तर अध्यात्माच्या* मागे लागावं अथवा हो ते असतं एक असं म्हणुन सोडुन आपल्या सुखाच्या, आनंदी जीवनाच्या मानसिक समाधानाच्या दृष्टीने काय करायला हवे ते बघावे असे माझे मत. यात तुमच्या आई बाबांनी ज्या ऍक्टिव्हिटीज निवडल्यात त्या उत्तम वाटतात. + मनोस्वास्थ्यासाठी ज्यांना जे आवशक्य वाटतं ते. मेडीटेशन वगैरे.
नाहीतर अध्यात्मही अर्धवट आणि जीवन सुखही या दोन्हीत मधल्या मध्ये कुठेतरी अडकुन एक ना धड असे व्हायचे.

*अध्यात्म म्हणजे देव देवाचे वगैरे नव्हे तर स्वतःचा शोध या अर्थाने. विपश्यना - शिबिर आणि त्याचा नंतर पूर्ण फॉलोअप अथवा तत्सम. ते तडीस नेले तर जीवनसुखही असेलच.

ते खिशाला बिल्ला लावतात
>>>> किंवा पेनाच्या टोपणावर असतं त्यांचं चित्र. पवईला म्हणे त्यांचं देऊळ आहे.

श्रद्धेमुळे काही जणांना मानसिक आधार मिळत असेल आणि ते लोक त्याचं अवडंबर माजवत नसतील, कुठेही चार लोक एकत्र जमून इतरांना त्रास न देता स्वतःचं काही करणार असतील, कुणाचं काही ऐकणार असतील तर माझी हरकत नसते.
पण बरेचदा अमुकच केलं पाहिजे/याच वेळेला केलं पाहिजे/अस्संच केलं पाहिजे नाहीतर काहीतरी वाईट होईल/तुम्ही वाईट वगैरे सुरू झालं की माझ्या डोक्यात जातं.

अध्यात्म म्हणजे देव देवाचे वगैरे नव्हे तर स्वतःचा शोध या अर्थाने >>> या अर्थाने किती लोक अध्यात्माकडे बघतात मला शंका आहे.

प्र९, बाबा ग्रेट आहेत Happy

माझ्या माहेरी आणि सासरी सुद्धा प्रत्येकाची आपापली विचारसरणी आहे अध्यात्माबद्दल. महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःपुरतीच ठेवलेली आहे, दुसर्‍यावर लादलेली नाही. हे फार बरं पडतं. पटत नसतानाही अश्या गोष्टी करायला लागणं हे त्रासदायक आहे.

अमुकच केलं पाहिजे/याच वेळेला केलं पाहिजे/अस्संच केलं पाहिजे नाहीतर काहीतरी वाईट होईल/तुम्ही वाईट वगैरे सुरू झालं की माझ्या डोक्यात जातं >>> अगदी अगदी!