राले गटग वृत्तान्त

Submitted by अस्मिता. on 6 May, 2025 - 14:55

मी चार मे ला अंजली व फा या माबोकरांना भेटले.
तेथे माबोकर तोषवीही आली होती, ती सध्या सक्रिय नसते. त्या भेटीच्या गप्पा मारण्यासाठी हा धागा. वृत्तांत -

फारएण्ड -
मस्त झाले गटग. दहा-साडेदहा तास गप्पा मारत होतो. आधी अंजलीकडे भेटलो. अतिशय चवदार पन्हे घेउन तिच्या बॅकयार्ड मधे बराच वेळ बसलो होतो. नुकताच पाऊस पडून गेल्याने बाहेर एकदम आल्हाददायक म्हणतात तसे वातावरण होते. तेथे अंजलीच्या बॅकयार्ड शेती पासून ते पूर्वी केलेले रेल्वेप्रवास, विविध लोकांची डोंबिवली कनेक्शन्स ई वर गप्पा झाल्या. या गप्पांत ट्रेन्सचा विषय कोठून आला (की मीच आणला) लक्षात नाही. तेथे लाँग आयलंडबद्दलही चर्चा झाली. माझी लॉग आयलंड बद्दलची माहिती इतकीच असल्याने मी ज्ञान पाजळले नाही.

अनेक माबोबाह्य व्यक्तिमत्त्वे उपस्थित असल्याने असेल, पण बराच काळ माबोचर्चा नव्हती. ती सगळी खूप नंतर झाली.

मुख्य मेन्यू तर मस्त होताच पण मला इव्हन त्या चटण्या, लोणचे सुद्धा खूप आवडले. जेवायला आत आलो पण नाहीतर मला बॅकयार्ड मधे अजून बराच वेळ बसायला आवडले असते. प्रत्यक्ष जेवताना कोणत्या विषयावर गप्पा झाल्या ते अजिबात लक्षात नाही.

आमच्याकडे आल्यावर आधी जनरल विषयांवर चर्चा सुरू होती. म्हणजे अगदी स्टॉक्स, रिअल इस्टेट, ट्रम्प/मोदी वगैरे नाही पण बरेचसे नॉन-माबो विषय. मग थोड्या वेळाने आम्ही माबोमधे शिरलो आणि मग सगळे निघेपर्यंत माबो गप्पाच सुरू होत्या. काही लोकप्रिय आयडी, काही चांगले लिहीणारे, आता नवीन आलेले आणि चांगले लिहीणारे, माबोवर जमलेली लग्ने, माबोवर तुटलेल्या मैत्र्या, काही खमंग इतिहास - बरेच काही.

मधे रार चा फोन आला. मग तिच्याशी १५-२० मिनिटे गप्पा झाल्या. ते उपगटगही धमाल होते.

नंतर संध्याकाळी मात्र फार खाणे-पिणे झाले नाही. एकतर दुपारचे खूप जड झाले होते किंवा मी पाहिजे तितका आग्रह केला नाही. तेवढ्यापुरता तरी नो बाप्तिस्मा.

अंजली-
तर - हा शास्त्राप्रमाणे वृत्तांत.
मागचा वृत्तांत लिहून बरोबर १४ वर्षे झाली. २०११ च्या मे मधे मेगा गटग झालं होतं. न्यूजर्सीतून एक बस आली होती, डी सी वरून एक बस आली होती. शार्लटवरून लोक आले होते. आणि इथलेच काही जण. त्यामुळे अस्मिताचा मी येतेय, तुला भेटायला आवडेल म्हणून मेसेज आल्यावर 'अरे! फक्त तिघंच असणार आपण??' असं वाटून बाकी लोक गोळा होतायत का चाचपणी केली. फा मला सांगायला विसरल्यामुळे मी एकटीच लोक गोळा करायला लागले. तोषवी मायबोलीकर आहे पण खूप अ‍ॅक्टीव नसते, तिला ये म्हणून सांगितलं. म्हाळसा देखिल आमच्याच गावात राहते, तिला निरोप पाठवला पण तिचं काही उत्तर आलं नाही (तिलाच निरोप पाठवला ना असही वाटून गेलं).
फा नं अमित आणि रमडलापण आमंत्रण दिलं होतं (असं मला नंतर कळलं). सध्या भरपूर काम असल्यानं मायबोलीवर फार बागडता येत नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांच्या वाड्यावरच्या गप्पा वाचल्या नव्हत्या. त्यामुळे इथे काय चाललं आहे कळत नव्हतं.

अस्मिताला काय जेवायला आवडेल अंदाज येत नव्हता. मग सरळ मराठवाडी बेत ठरवला. चुका भाजी, भरली वांगी, भोपळा भाजी, कोथिंबीर चटणी, क्रॅनबेरी चटणी होतीच घरात. फा च्या बायडीनं मसालेभात, गोडाचा पदार्थ करून आणला. मग मठठा केला. ढोकळा खावासा वाटला म्हणून ढोकळा केला. मग वाटलं तळण नाही तर कसं. मग सोहमच्या कुरडयांना न्याय दिला. पन्हं करून ठेवलं. त्यात बजी रंगीत पाणी घालायचा ऑप्शनपण दिला हे नमूद करून ठेवते. साडेबाराला सगळे जमायला सुरूवात झाली. अस्मिता आली तीच 'अंजली का?' असं म्हणून मस्त गळाभेट घेतली. मोठ्याला दोन बॅगाभरून घेऊन खाऊ घेऊन आली. तिचा फेमस पोह्यांचा चिवडा (आत्ता तोच खात वृत्तांत लिहीते आहे), नारळाची बर्फी, रवा बेसन लाडू, घरी केलेली दाण्याची चटणी, लिंबाचं लोणचं आणि - एक पिशवी भरून दोडक्याच्या बिया!

एवढा खाऊ, गिफ्ट घेऊन येऊन अस्सल मराठवाडी असल्याचं सिद्ध केलं. आल्याबबरोबर गप्पांना जी सुरूवात झाली ते रात्री साडेदहाला तिला सोडलं तेव्हाच गप्पा थांबल्या. जेवताना नॉन मायबोलीकर पण बरोबर असल्यानं मायबोलीवरच्या गप्पा मारता येत नव्हत्या. तरी अमांची आठवण निघाली. त्यांनी एका लेखावर "गुढगे असे बोलू लागले की शेंडेनक्षत्र" असं काहीसं लिहीलं होतं. ते आठवून आणि अमांची वन लायनर्स आठवून फार हसलो आणि तेव्हढेच हळहळलोही . तेव्हढ्यात फा ने शेंडेनक्षत्र आयडी उडाल्याची बातमी दिली. तरीच ट्रंप धागा मलूल पडलाय.

जेवणं झाल्यावर 'केसर मारके' चहाची ऑफर दिली पण फा ला घरी जाऊन ४० लोकांचा चहा करायचा होता. मग फा कडे सगळे गेलो. काही नॉन मायबोलीकर आले नाहीत. तोषवीही चहा घेऊन निघाली. मग खर्‍या गप्पा सुरू झाल्या. तेव्हढ्यात रारचा पण फोन आला. तिच्याशी बोलताना समीर. सुप्रिया, नंद्या, अनुदोन यांचा उल्लेख झाला. रमड आणि धनि या दोघांची पण आठवण निघाली. तो पर्यंत अनलिमिटेड चहा सुरूच होता. एकीकडे मायबोलीवर काय चाललं आहे हे फा आणि अस्मिता दोघंही बातम्या देत होते. काही जुन्या आयडींची आठवण निघाली. शेवटी दुसर्‍या दिवशीची फ्लाईट असल्यानं साडेदहाला अस्मिताला सोडायला निघाले.

आता विचार करताना असं वाटतं खरंच कुठले हे ऋणानुबंध असतील हे? तोषवी आणि फा दोघही इकडे मूव्ह व्हायच्या आधी माझ्याशी बोलले होते. ती आठवण सांगताना तोषवी म्हणाली की अंजली मायबोलीवरची व्यक्ती आहे म्हणून काहीही ओळख नसताना अगदी विश्वासानं फोन केला होता. मला कॅनडाबद्दल माहिती हवी होती तेव्हा अमित आणि अस्मिताच आठवले. अगदी हक्कानं फोन करून दोघांना पिडलं होतं. पूर्वीची मायबोली राहिली नाही हो आता' हे कितीएही वेळा बोललो तरी वॉटसअ‍ॅपच्या काळातही मायबोलीवर आल्याशिवाय रहावत नाही.

अस्मिता -
अंजली, तू मी मराठवाड्यातली आहे म्हणून मला त्या पद्धतीचे जेवण आवडेल हा विचार करून स्वयंपाकाचा बेत आखला होता. त्याने I was really touched..! माझ्या ताईलाही खूप आवडलं सगळं. वर म्हणताही आले 'बघ माझे मायबोलीवरचे मित्रमंडळ किती अमेझिंग आहे.' आयुष्यात याआधी कधीही न भेटता सुद्धा किती जिव्हाळा निर्माण झाला आहे. ही माबोची जादू आहे.

दुसऱ्या बॅगमधे टेक्सासचे सुविनिअर म्हणून एक टेक्सासचा नकाशा रंगवलेला- त्याच आकाराचा कटिंग बोर्ड आहे आणि सॅन ॲन्टोनिओचे मॅग्नेटही आहेत पण ते एका पॅकमधे दोन आले आणि मला उघडावे वाटले नाही मग ते फा कडे गेले आहेत. फा तू अंजलीला नंतर देऊन टाक कधीतरी. टेक्सासचा आकार विचित्र आहे, मी चौकोनी स्टेटमधे राहिले असते तर तुम्हाला भाजी चिरायला सोपे गेले असते. Happy

अंजलीने जंगी बेत आखला होता. हे फोटो -
1. IMG-20250506-WA0004_0.jpg

2. IMG-20250506-WA0002_0.jpg
मिसेस फा ने मसाले भात आणि मॅन्गो मूस केले होते. तोषवीने मॅन्गो पाय आणला होता. अंजलीने भरली वांगी, दुधीची भाजी, चुक्याची पातळ भाजी, माबोवरची क्रॅनबेरीची चटणी, ठेचा, कोथिंबीरीची चटणी, ढोकळा, पन्हं, ताक, कुरडया - पापड्या , खोबऱ्याची चटणी मी बहुतेक काही तरी विसरले असेन पण भरपूर केलं होतं. अप्रतिम, रूचकर आणि चमचमीत झाले होते सगळेच. पूर्ण बेत मराठवाड्याचा होता. Happy

आणि हो, सर्वांना दोडक्याच्या बिया दिल्या आहेत. Happy
अंजलीचे बॅकयार्ड अतिशय सुंदर आणि रमणीय आहे. फा म्हणतोय तसं आम्ही पन्हं घेऊन सात आठ जणांचा ग्रुप गेट टू नो करत कमीत कमी ऑकवर्ड दिसण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या बॅकयार्डात टेबलवर चंदनाच्या लाकडात कोरीवकाम केलेले आहे असे डिझाईन असलेला कंदील होता व सुगंधी वासाचे धूप लावून ठेवले होते. अगदीच प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण. मागे गर्द हिरवीगार उंच झाडी बघत आम्ही पन्हं घेत बसलो.

अंजलीकडे थोडीफार ओळख व तुडुंब जेवण झाल्यावर हालचाल बंद झाली होती काही वेळ. पण फा ला दुसऱ्या इव्हेंटसाठी विनामूल्य अमृततुल्य चहाचे दुकान उघडावे लागणार होते, त्यामुळे आम्ही ते पहायला त्यांच्या घरी जायचे ठरवले. अगदी जवळ आहेत दोघांचीही घरं. पण एकदा घरी गेल्यावर त्याने आधान ठेवले की आम्ही त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.

मग परत अंजलीने एकदा पुन्हा भोजनालयातले डबे भरून प्रत्येकीला दिले. माझे डबे तेथेच विसरले, आज देशील का पाठवून? काय कातील स्वयंपाक होता. ती वांग्याची भाजी आणि कोशिंबीरीची चटणी याची कृती लिहीच. मीही करते भरली वांगी पण ती इतकी लाल बुंद चटकदार दिसत नाही.

अंजलीच्या भूभूला बघून कोकोनटची आठवण आली. तिला व कोकोनटला चेरी सारखे खेळणं आणलं पण तिला द्यायला गेले तर ती घाबरत होती. खूप क्यूट आहे. मला तिला माया करायची होती पण ती पळून गेली.

तुम्हाला खेळणं कोणतं आहे हे कळावं म्हणून कोकोनटचा हललेला फोटो देते.
कोकोनट
IMG-20250505-WA0006_0.jpg

कोकोIMG-20250506-WA0003_1.jpg

भूभू धाग्याची आठवण काढून झाली अर्थात. Happy

हे सगळे डबे व आम्ही सगळे ह्यांना गाडीत टाकून अंजलीने आम्हाला फा च्या घरी आणले. त्यानी त्याचे अमृततुल्य टाकले व आम्ही त्यांच्या हॉलमधे गप्पा मारत बसलो. नंतर काही वेळ बाहेर बसून त्यांचेही मागचे अंगण पाहिले. तेथे थुईथुई उडणारे कारंजे आहे. सगळे राले शहरच हिरवेगार आहे, त्यामुळे फा च्या अंगणातूनही उंच-उंच हिरवी झाडे दिसत होती.

कारंजे बघून फा च्या 'डेडली आत्या' मालिकेतील कारंजी आठवली. डेडली लेखनाची प्रेरणा कुणाला कुठून मिळेल काही सांगता येत नाही. Happy तो कुठे उभे राहून, कुठली कामं करत बघू नयेत अशा मालिकाही आवर्जून बघतो हे त्याने आम्हाला दाखवले. घर छान प्रशस्त, मोकळे व वेलकमिंग आहे. फा आणि मिसेस फा दोघेही मोकळे आणि लाघवी आहेत. त्या सुद्धा इतक्या मोकळेपणाने बोलत होत्या की जुनी ओळख वाटू लागली. Happy

मी चहा घेत नाही पण फा च्या हातचा चहा प्यायले व मला तो आवडलाही. तो सतत 'अजून घ्या, हे खाता का- ते खाता का , किमान कूकीज तरी घ्या' म्हणत होता. पण आम्हाला अजिबात भूक नव्हती. मला मिसेस फा- शलाकाने जवळ बोलावून हळदीकुंकू लावून गिफ्ट कार्डने ओटी भरली. मी फक्त एकदाच 'कशाला- कशाला' म्हणून फार आढेवेढे न घेता सरळ कौतुक करवून घेतले. मला एकदम नांदेडचीच आठवण आली. Happy फा च्या समोरच्या अंगणात अतिशय सुगंधी वासाचे वेगवेगळ्या जातीचे गुलाबाचे ताटवे आहेत. त्यांना पावसाने बहर आलेला होता. त्याचा सुगंध- दरवळ अगदी दुरूनही येत होता.
१.
IMG-20250507-WA0001_1.jpg

२. IMG-20250507-WA0000_0.jpg

जनरल गप्पांमधे खूप वेळ गेला व मला वृत्तांत मट्रेयल नसल्याने अस्वस्थ वाटू लागले. कोणत्या तोंडाने परत येऊ वाटू लागले. मग अचानक रारचे फोन गटग केले. ही एक अतिशय धमाल मुलगी आहे. भयंकर हाय एनर्जी व chirpy आहे. तिने पुन्हा लिहायला सुरुवात करायला हवी. ती म्हणाली 'मला तुला तुझ्या स्पिरिच्युअल लेखांबद्दल बोलायचे आहे', हा मला धक्काच होता. कारण आम्ही जे काही बेकरी वर बोलतो ते सहसा चित्रपटांबद्दलच असते. मग तिने ती लवकरच रमडशी, अनुदोनशी भेट घेणार असल्याचे सांगितले. अजून एक गटग. Happy

फा म्हणाला, 'मी तुझे सुरवातीचे लेखन वाचले नाही.' मी म्हटलं 'तुझ्या इंटरेस्टचे नाही ते, मी तरी तुझे झुकझुकगाडी व बॅटबॉलवरचं कुठं वाचलं आहे.' हे असे बोलल्याने 'तू माबोइतकीच 'डिरेक्ट' आहेस म्हणाला.' Happy

अंजली हल्ली अधूनमधून वाचत असते म्हणून तिच्याकडे बऱ्याच ताज्या बातम्या नसतात. मी नवीन आहे म्हणून माझ्याकडे खमंग इतिहासाची माहिती नव्हती. फा स्थितप्रज्ञ आहे, तो गनपॉईन्टवरही गॉसिप करत नाही. मग मला अंजलीचाच आधार राहिला होता. मी तिला करंट इव्हेंट्स सांगून तर तिने मला माबोचा जाज्वल्य इतिहास सांगून दोघींनीही एकमेकींना 'अपग्रेड' केले आहे. आता तुमचं काही खरं नाही..! Proud

त्यात बरेचशे वाद, तमाशे, उडालेले आयडी, निघून गेलेले आयडी, कुजकट आयडी, वरून गोड -आतून धोरणी आयडी यांची माहिती मिळाली. मी एकदम योग्य कॅन्डिडेट आहे, कारण मी या जन्मात विसरणार नाही आता. Wink

अमांची आठवण निघाली म्हणून मग शेंडेनक्षत्रंचीही काढावी लागली. Some people need tranquilizer, some people need therapy and a few need exorcism. असं मी थोडं स्पष्ट व बाकीचं मनात गमतीने म्हटले. Happy

सकारात्मक आणि धमाल गप्पा जास्त झाल्या पण. त्यात सगळे वाडेकर आठवले. वाड्यावर किती लोक जमतात तो कसा हिट झाला आहे असे अंजलीने म्हटल्यावर, 'माझ्यामुळे कशे चारचे चाळीस जमायला लागले' असे मीच 'राकु-मोड' मधे जाऊन म्हटले. आता माझ्यासकट सगळे आपापल्या वेळेनुसार येऊन हलक्याफुलक्या गप्पा मारून जातात. दिवसपाळीतील भारतीय माबोकर असो व अमेरिकन माबोकर असतो वाडा कायम नांदताजागता- हसताखेळता आहे. नियम लाख बनवून धागा काढला तरी एखादी जागा सातत्याने सकारात्मक व प्रसन्न ठेवणे ही सगळ्यांचीच जबाबदारी असते. त्यामुळे माबोकरांनाच त्याचं श्रेय जातं. Happy

माबोवर जमलेल्या लग्नांपैकी मला फक्त रमड आणि धनिचेच माहिती होते. पण आपले ॲडमिन, अनुदोन- आश्चिग आणि मिल्या (?) ह्यांचीही आहेत असे कळले.

मराठी माणूस उद्योगात मागे का ? या विषयावर फा आणि अंजली बोलले. दोघांचेही बरेच मुद्दे रिअलिस्टीक वाटले. शिवाय इथल्या प्रमाणे मधेच तेथेही गांधी - नेहरू -सावरकर येऊन गेले. मी तेथेही इथल्यासारखेच वाचनमात्र राहिले.

माबोवरच्या अनेक गमतीजमती व आठवणी आणि काही गटग बद्दलही कळाले. माझे हे पहिले गटग आहे किंवा मी ह्यांना आधी भेटले नाही हे लक्षातही आले नाही. अगदीच जुनी ओळख वाटली. अजूनही गटगला आलेल्या मजेचा ताजेपणा मनावर आहे. पुढच्या वेळीही मी आनंदाने जाईन. छान आठवणी गोळा झाल्या. Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलांनो, सब्र का फल आंबटगोड होता है..! लिहितेय. Happy

मी सहा महिन्यांपूर्वी येथेच सहज गप्पा मारताना सांगितले होते की माझ्या भाचीचे ग्रॅज्युएशन रालेत आहे व मला आतेबहिणीने आग्रहाने बोलावले आहे. तेव्हा अंजलीने आवर्जून 'मीही रालेतच आहे अस्मिता, माझ्या घरी ये' असे म्हटले होते. फा तेथे राहतो हे माहीत होतेच. अजून कोणी असेल तर त्यांनाही कळवू व छोटेखानी गटग करून घेऊ असे वाटले. पण माझं काही ठरलं नव्हतं. महिनाभरापूर्वी फा ने पुन्हा 'काय झाले येणार होतीस ना, ठरतंय का काही' विचारून एकदम अगत्य वगैरे दाखवले. 'अगत्य' शब्द पुढे अनेकवेळा येणार आहे. त्याला फा ने वेगवेगळे आयाम दिले आहेत.

मग माझ्या ताईनेही त्याच दिवशी पुन्हा 'चल ना' म्हणून फोन केला. मला असाही फार आग्रह लागत नाही, मी त्याच विकांताला तिकीट काढून टाकले व फा ला कळवले. तो म्हणाला 'मी अंजलीला सांगतो' पण विसरून गेला. येथे वाड्यावर गप्पा मारायला विसरला नाही मात्र. मी विचारलं तर 'अंजलीला कळवायचे राहून गेले' म्हणाला. मी याच्या भरोशावर न राहता ताबडतोब अंजलीला मेसेज केला. एकदोन दिवसांत करणार होतेच पण ताबडतोब केला. तिला खूप आनंद झाला, ह्याचा मलाही आनंद झाला. फा ला नुसताच आनंद झाला. Happy मी कसा टोमणा आवरला माझं मलाच माहीत..!

येथे अगत्यावरून अनेक गप्पा झाल्या. मी सांगितले नाही तर कुणालाही कळणार नाही की मी मराठवाड्यातील आहे हे फा, अतरंगी व रमड ह्या तिघांनीही आळीपाळीने म्हटले होते. मला पुणेकरांचे खरोखरच कौतुक वाटते आणि ही मी कॉम्प्लिमेंटच समजते. त्यावरून पुण्याच्या गप्पा निघाल्या की मी आता पुणेरी पुणेकर होण्याचा बाप्तिस्मा घेऊन टाकावा असे ठरले. Wink ऑफिशयल करून टाकू एकदाचे, असे या गरीब मराठवाड्यातील मुलीला वाटले. पण ह्यात माझा काय फायदा ? झाला तर रमड आणि फा या दोन पुपुकरांचा. रोज दुपारी टिवल्याबावल्या करणारी दुसरी बिघडलेली मैत्रीण मिळणं सोपं नाही. फा अतीच पुणे-पुणे करतो तर तात्या विंचू व ओम फट स्वाहा करून त्याचाही बाप्तिस्मा करून टाकून द्यावे असेही वाटले. विमानाची तिकिटे काय स्वस्त राहिली आहेत का ? कदाचित या बाप्तिस्मा नंतर न आणि ण चुकले तरी फा सर्वांची तोंडभरून स्तुती करेल, अगत्यशील होईल या आशेवर तिकीट काढले. Proud

अंजलीला भेटायची जाम उत्सुकता होती. ती एक भलतीच स्ट्रॉन्ग मुलगी व लेखिका आहे. तिचं माझं मैत्रीणवरही इंटरॅक्शन झालं आहे. ती जे काही राजकारणावर लिहिते, ते अगदी मुद्देसूद व मॅटर ऑफ फॅक्ट असते. तिने माझ्या या धाग्यावर (नीना गुप्ताच्या पुस्तक परिचयावर) जे लिहिले होते तो स्टँडही वैचारिक स्पष्टता, फेमिनिझम व ओपन माईन्डसेट मधून येणारा वाटतो. माझ्या धाग्यावरच्या व माझ्यासोबत घडलेल्या सगळ्या चांगल्या- खणखणीत चर्चा लक्षात राहतात, गटगमुळे लिहितेय असं काही नाही.

अंजली, हा वृत्तांत फजिती सदृश वाटणार आहे काही ठिकाणी. पण माझी बाजू सत्याची आहे. Lol

अमित आणि रमडला मात्र कळवले होते. आम्ही चौघे रोज दुपारी वाड्यावर/ चिकवावर अतीच गप्पा मारतो म्हणून त्यांनी जमले तर यायला हवे असे दोघांनाही वाटत होते.

मला पुणेकरांचे खरोखरच कौतुक वाटते >>> भयंकर गदगदून आल्याने बाष्पीभवनाचा इफेक्ट झाला आहे जवळपास Lol

रोज दुपारी टिवल्याबावल्या करणारी दुसरी बिघडलेली मैत्रीण मिळणं सोपं नाही >>> हे बाकी खरं Happy

अमित आणि रमडला मात्र कळवले होते. आम्ही चौघे रोज दुपारी वाड्यावर/ चिकवावर अतीच गप्पा मारतो म्हणून त्यांनी जमले तर यायला हवे असे दोघांनाही वाटत होते >>> _/\_ मला खूप आवडलंही असतं यायला. पण राले म्हणजे अगदीच दुसरं टोक ( आणि येणं जाणं महाग Wink ). शिवाय गेला वीकांत जरासा बिझी होता. पण तुम्ही लोकांनी आठवण काढली असेलच अशी मनाची समजूत घालते.

पण डीटेल्ड लिहा की मुलांनो. म्हणजे आम्हालाही मजा येईल.

अरे गटग वृत्तांतात वैचारिक डूब शोधायची का काय! फा पुपु आहेच तर अजुन काय बाप्तिस्मा करायचा?
>>तात्या विंचू व ओम फट स्वाहा करून त्याचाही बाप्तिस्मा करून टाकून द्यावे >> बाप्तिस्मा करुन काय टाकून द्यायचं? बाप्तिस्मा हा कसला कोडवर्ड आहे का?
कोणाला पुपु बनवुन हाडाच्या पुपु कराचा काय फायदा होतो? आणि फायदा झाला तर बिघडलेली मैत्रिण का गमावली जाईल? दुसर्‍याला अगत्यशील बनवण्यासाठी विमानाची तिकिटं काढून ही ट्रिप आहे इतकं सांगितल्यावर आता वेगळय बाप्तिस्माची गरज का पडते आहे?
फजिती सदृष म्हणजे कोणाची फजिती? पामर वाचकांची का काय?
आयेम फुल्ली कन्फ्युज्ड!

फा ला मराठवाड्याचे करायचे होते, फ्रीकी फ्रायडे सारखं स्विच. फारच प्रश्न पडावेत असं काही फिलॉसॉफीकल नाही यात. गटगच्या अनुषंगाने झालेल्या टाईमपास गप्पाच आहेत. सखोल अर्थ शोधू नका. Lol अजून झाले नाही, लिहितेय हळूहळू. वाचकांची फजिती नाही होणार..! आला असता तर केली असती. Wink

बाष्पीभवन इफेक्ट झाला असेल पण खरं आहे कौतुक. आठवण काढलीच अर्थात. Happy

फा ला मराठवाड्याचे करायचे होते >> पुणेकरांचे असे transformation शक्य नाही !! पुढच्या जन्मात वगैरे कदाचित बाबा चमत्कारला जमेल Lol

Lol बाफ उघडलेला बघून मी चहा करून घेउन आलो तर आधी दोनच ओळी दिसल्या. मला वाटले आज इतकेच की काय Happy

ध - यस! अनलिमिटेड चहाला कधीही आमंत्रण आहे.

खरे म्हणजे अनलिमिटेड फूडही होते अंजलीकडे, आणि फार मस्त होते. पण नंतर मला दुसर्‍या एका इव्हेण्टकरता ३०-४० कप चहा करायचा होता म्हणून आम्ही गटग आमच्याकडे हलवले. अर्थात त्यातले फूड घेउनच Happy

मस्त झाले गटग. दहा-साडेदहा तास गप्पा मारत होतो. आधी अंजलीकडे भेटलो. अतिशय चवदार पन्हे घेउन तिच्या बॅकयार्ड मधे बराच वेळ बसलो होतो. नुकताच पाऊस पडून गेल्याने बाहेर एकदम आल्हाददायक म्हणतात तसे वातावरण होते. तेथे अंजलीच्या बॅकयार्ड शेती पासून ते पूर्वी केलेले रेल्वेप्रवास, विविध लोकांची डोंबिवली कनेक्शन्स ई वर गप्पा झाल्या. या गप्पांत ट्रेन्सचा विषय कोठून आला (की मीच आणला) लक्षात नाही. तेथे लाँग आयलंडबद्दलही चर्चा झाली. माझी लॉग आयलंड बद्दलची माहिती इतकीच असल्याने मी ज्ञान पाजळले नाही.

अनेक माबोबाह्य व्यक्तिमत्त्वे उपस्थित असल्याने असेल, पण बराच काळ माबोचर्चा नव्हती. ती सगळी खूप नंतर झाली Happy

Happy मी पाल्हाळ लावतेय कारण मला मजा येतेय. 'आजीबाईच्या गोष्टी' टाईप गुपचूप ऐका आता.

धनि, हो. पण मी बाप्तिस्माला बॅक अप प्लॅन म्हणून सेलमच्या चेटकीणीकडून ऑनलाईन जादूटोणाही शिकला होता. आता मी शिकवतही आहे. विपूतून संपर्क करा, आमच्या सर्वत्र शाखा असूनही आम्हाला कुणी विचारत नाही. Proud

माझी लॉग आयलंड बद्दलची माहिती इतकीच असल्याने मी ज्ञान पाजळले नाही. >>>> Lol माझी आतेबहिण अनेक वर्षांपासून लॉन्ग आयलंडला रहात असल्याने 'काय कुठे' करत हे सुरू झाले होते. मी पण 'असा सुळका नाही का खाली' वगैरे मोघम बोलत यथाशक्ती ज्ञानदान केले. गप्पा मारताना लक्षात आले की फा ला लोकलचा टाईम टेबल पाठ आहे. अगदी मिनिटांच्या हिशोबाने.

अंजलीने जंगी बेत आखला होता. हे फोटो -
१. IMG-20250506-WA0000.jpg

२.IMG-20250506-WA0004.jpg
३.IMG-20250506-WA0002.jpg
मिसेस फा ने मसाले भात आणि मॅन्गो मूस केले होते. तोषवीने मॅन्गो पाय आणला होता. अंजलीने भरली वांगी, दुधीची भाजी, चुक्याची पातळ भाजी, माबोवरची क्रॅनबेरीची चटणी, ठेचा, कोथिंबीरीची चटणी, ढोकळा, पन्हं, ताक, कुरडया - पापड्या , खोबऱ्याची चटणी मी बहुतेक काही तरी विसरले असेन पण भरपूर केलं होतं. अप्रतिम, रूचकर आणि चमचमीत झाले होते सगळेच. पूर्ण बेत मराठवाड्याचा होता. Happy

आणि हो, सर्वांना दोडक्याच्या बिया दिल्या आहेत. Happy

वा वा . चमचमीत मेनू विथ आंबामहोत्सव. तोंपासु Happy फोटो भारीच! Happy

सर्वांना दोडक्याच्या बिया दिल्या आहेत >>> आता काही खरं नाही. आता चारी दिशांनी फक्त दोडक्याचे वेल येणार आणि पुढचं गटग दोडका गटग होणार Lol

फा च्या अ‍ॅडीशन्स छान . अजून येऊदे.

मला दुसर्‍या एका इव्हेण्टकरता ३०-४० कप चहा >>> मगाशीच वाड्यात तुझ्या चहाच्या अग्निहोत्राबद्दल लिहून आले. तू असलास की गटगला चहाची वानवा नसते हे बाकी खरं Happy

आमच्या सर्वत्र शाखा असूनही आम्हाला कुणी विचारत नाही >>> Lol

अंजलीचे बॅकयार्ड अतिशय सुंदर आणि रमणीय आहे. फा म्हणतोय तसं आम्ही पन्हं घेऊन सात आठ जणांचा ग्रुप गेट टू नो करत कमीत कमी ऑकवर्ड दिसण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या बॅकयार्डात टेबलवर चंदनाच्या लाकडात कोरीवकाम केलेले आहे असे डिझाईन असलेला कंदील होता व सुगंधी वासाचे धूप लावून ठेवले होते. अगदीच प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण. मागे गर्द हिरवीगार उंच झाडी बघत आम्ही पन्हं घेत बसलो.

आत्ता पहाटे पावणेचारला असले सुग्रास जेवणाचे फोटो बघून भूक लागली.

आमची डोंबिवली आली का गप्पात. मला माहितेय फारएन्ड 1980 च्या आसपास दुपारी 3 वाजता डोंबिवलीतून पास होणारी दिवा वसई लाईनवरची डबलडेकर गाडी शोधून काढल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, मलाही उत्सुकता आहेच त्याची (ह्या गप्पा वाड्यावर झालेल्या पण डोंबिवली आणि रेल्वे वाचून मी लिंक लावली इथे) .

बाय द वे हे राले कुठे आलं अमेरिकेत.

दोडक्याच्या बिया Lol

अन्जूताई, राले हे शहर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना ह्या राज्यात आहे. साधारण पूर्वेकडे आहे.

फार मस्त मेनु..अन्जलीच्या बॅकयार्डाचा फोटो मस्ट आहे आता..
अन्जलीच्या टेबल सेटिन्ग,प्रेझेटेशन बद्दल काय बोलणार!! नेहमिच भारी असत ते.
व्रुतातचे तिघाचे तिन आणी मिळुन एक असे ४ तरी व्हर्जन अपेक्षित आहेत..

धन्यवाद अस्मिता, नॉर्थ कॅरोलिनावरून मूळ मराठवाड्यातलीच एकजण छोटे छोटे vlogs टाकते, ती तिथे कुठे रहाते नक्की, ते माहिती नाही पण बघितलेत काही vlogs.

अप्रतिम, रूचकर आणि चमचमीत झाले होते सगळेच >>> हो एकदम सही होते सगळे. मुख्य मेन्यू तर मस्त होताच पण मला इव्हन त्या चटण्या, लोणचे सुद्धा खूप आवडले. जेवायला आत आलो पण नाहीतर मला बॅकयार्ड मधे अजून बराच वेळ बसायला आवडले असते. प्रत्यक्ष जेवताना कोणत्या विषयावर गप्पा झाल्या ते अजिबात लक्षात नाही.

आमच्याकडे आल्यावर आधी जनरल विषयांवर चर्चा सुरू होती. म्हणजे अगदी स्टॉक्स, रिअल इस्टेट, ट्रम्प/मोदी वगैरे नाही पण बरेचसे नॉन-माबो विषय. मग थोड्या वेळाने आम्ही माबोमधे शिरलो आणि मग सगळे निघेपर्यंत माबो गप्पाच सुरू होत्या. काही लोकप्रिय आयडी, काही चांगले लिहीणारे, आता नवीन आलेले आणि चांगले लिहीणारे, माबोवर जमलेली लग्ने, माबोवर तुटलेल्या मैत्र्या, काही खमंग इतिहास - बरेच काही.

मधे रार चा फोन आला. मग तिच्याशी १५-२० मिनिटे गप्पा झाल्या. ते उपगटगही धमाल होते.

नंतर संध्याकाळी मात्र फार खाणे-पिणे झाले नाही. एकतर दुपारचे खूप जड झाले होते किंवा मी पाहिजे तितका आग्रह केला नाही. तेवढ्यापुरता तरी नो बाप्तिस्मा.

डबलडेकर गाडी >>> Happy हो तो ही विषय निघालाच होता Happy

तर - हा शास्त्राप्रमाणे वृत्तांत.
मागचा वृत्तांत लिहून बरोबर १४ वर्षे झाली. २०११ च्या मे मधे मेगा गटग झालं होतं. न्यूजर्सीतून एक बस आली होती, डी सी वरून एक बस आली होती. शार्लटवरून लोक आले होते. आणि इथलेच काही जण. त्यामुळे अस्मिताचा मी येतेय, तुला भेटायला आवडेल म्हणून मेसेज आल्यावर 'अरे! फक्त तिघंच असणार आपण??' असं वाटून बाकी लोक गोळा होतायत का चाचपणी केली. फा मला सांगायला विसरल्यामुळे मी एकटीच लोक गोळा करायला लागले. तोषवी मायबोलीकर आहे पण खूप अ‍ॅक्टीव नसते, तिला ये म्हणून सांगितलं. म्हाळसा देखिल आमच्याच गावात राहते, तिला निरोप पाठवला पण तिचं काही उत्तर आलं नाही (तिलाच निरोप पाठवला ना असही वाटून गेलं).
फा नं अमित आणि रमडलापण आमंत्रण दिलं होतं (असं मला नंतर कळलं). सध्या भरपूर काम असल्यानं मायबोलीवर फार बागडता येत नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांच्या वाड्यावरच्या गप्पा वाचल्या नव्हत्या. त्यामुळे इथे काय चाललं आहे कळत नव्हतं.

अस्मिताला काय जेवायला आवडेल अंदाज येत नव्हता. मग सरळ मराठवाडी बेत ठरवला. चुका भाजी, भरली वांगी, भोपळा भाजी, कोथिंबीर चटणी, क्रॅनबेरी चटणी होतीच घरात. फा च्या बायडीनं मसालेभात, गोडाचा पदार्थ करून आणला. मग मठठा केला. ढोकळा खावासा वाटला म्हणून ढोकळा केला. मग वाटलं तळण नाही तर कसं. मग सोहमच्या कुरडयांना न्याय दिला. पन्हं करून ठेवलं. त्यात बजी रंगीत पाणी घालायचा ऑप्शनपण दिला हे नमूद करून ठेवते. साडेबाराला सगळे जमायला सुरूवात झाली. अस्मिता आली तीच 'अंजली का?' असं म्हणून मस्त गळाभेट घेतली. मोठ्याला दोन बॅगाभरून घेऊन खाऊ घेऊन आली. तिचा फेमस पोह्यांचा चिवडा (आत्ता तोच खात वृत्तांत लिहीते आहे), नारळाची बर्फी, रवा बेसन लाडू, घरी केलेली दाण्याची चटणी, लिंबाचं लोणचं आणि - एक पिशवी भरून दोडक्याच्या बिया! Proud

एवढा खाऊ, गिफ्ट घेऊन येऊन अस्सल मराठवाडी असल्याचं सिद्ध केलं. आल्याबबरोबर गप्पांना जी सुरूवात झाली ते रात्री साडेदहाला तिला सोडलं तेव्हाच गप्पा थांबल्या. जेवताना नॉन मायबोलीकर पण बरोबर असल्यानं मायबोलीवरच्या गप्पा मारता येत नव्हत्या. तरी अमांची आठवण निघाली. त्यांनी एका लेखावर "गुढगे असे बोलू लागले की शेंडेनक्षत्र" असं काहीसं लिहीलं होतं. ते आठवून आणि अमांची वन लायनर्स आठवून फार हसलो आणि तेव्हढेच हळहळलोही . तेव्हढ्यात फा ने शेंडेनक्षत्र आयडी उडाल्याची बातमी दिली. तरीच ट्रंप धागा मलूल पडलाय.

जेवणं झाल्यावर 'केसर मारके' चहाची ऑफर दिली पण फा ला घरी जाऊन ४० लोकांचा चहा करायचा होता. मग फा कडे सगळे गेलो. काही नॉन मायबोलीकर आले नाहीत. तोषवीही चहा घेऊन निघाली. मग खर्‍या गप्पा सुरू झाल्या. तेव्हढ्यात रारचा पण फोन आला. तिच्याशी बोलताना समीर. सुप्रिया, नंद्या, अनुदोन यांचा उल्लेख झाला. रमड आणि धनि या दोघांची पण आठवण निघाली. तो पर्यंत अनलिमिटेड चहा सुरूच होता. एकीकडे मायबोलीवर काय चाललं आहे हे फा आणि अस्मिता दोघंही बातम्या देत होते. काही जुन्या आयडींची आठवण निघाली. शेवटी दुसर्‍या दिवशीची फ्लाईट असल्यानं साडेदहाला अस्मिताला सोडायला निघाले.

आता विचार करताना असं वाटतं खरंच कुठले हे ऋणानुबंध असतील हे? तोषवी आणि फा दोघही इकडे मूव्ह व्हायच्या आधी माझ्याशी बोलले होते. ती आठवण सांगताना तोषवी म्हणाली की अंजली मायबोलीवरची व्यक्ती आहे म्हणून काहीही ओळख नसताना अगदी विश्वासानं फोन केला होता. मला कॅनडाबद्दल माहिती हवी होती तेव्हा अमित आणि अस्मिताच आठवले. अगदी हक्कानं फोन करून दोघांना पिडलं होतं. पूर्वीची मायबोली राहिली नाही हो आता' हे कितीएही वेळा बोललो तरी वॉटसअ‍ॅपच्या काळातही मायबोलीवर आल्याशिवाय रहावत नाही.

अंजली, तू मी मराठवाड्यातली आहे म्हणून मला त्या पद्धतीचे जेवण आवडेल हा विचार करून स्वयंपाकाचा बेत आखला होता. त्याने I was really touched..! Happy माझ्या ताईलाही खूप आवडलं सगळं. वर म्हणताही आले 'बघ माझे मायबोलीवरचे मित्रमंडळ किती अमेझिंग आहे.' आयुष्यात याआधी कधीही न भेटता सुद्धा किती जिव्हाळा निर्माण झाला आहे. ही माबोची जादू आहे. Happy

दुसऱ्या बॅगमधे टेक्सासचे सुविनिअर म्हणून एक टेक्सासचा नकाशा रंगवलेला- त्याच आकाराचा कटिंग बोर्ड आहे आणि सॅन ॲन्टोनिओचे मॅग्नेटही आहेत पण ते एका पॅकमधे दोन आले आणि मला उघडावे वाटले नाही मग ते फा कडे गेले आहेत. फा तू अंजलीला नंतर देऊन टाक कधीतरी. टेक्सासचा आकार विचित्र आहे, मी चौकोनी स्टेटमधे राहिले असते तर तुम्हाला भाजी चिरायला सोपे गेले असते. Happy

बाकीचे उद्या लिहेन.

मस्त मस्त वृ, अंजली! आठवणीने आठवण काढल्याबद्दल खूप खूप थँक्यू सगळ्यांना. Happy

अस्मिताकडचा खाऊ खायला तरी आता टेक्सासला जायला हवं असं वाटायला लागलं आहे ( मात्र मी पुण्याची असल्याने दोन बॅगा भरून खाऊ नेणार नाही Proud ). अर्थात तिकडे गेल्यावर अस्मिता दोडक्याच्या बियांची माळ गळ्यात घालेल अशी एक सूक्ष्म भीती पण असल्याने अजून असा काही बेत केला नाही Lol

केसर मारके चहा कसा करतात हे मला प्लीज कोणीतरी सांगा . मला येत नाही.

अंजली मायबोलीवरची व्यक्ती आहे म्हणून काहीही ओळख नसताना अगदी विश्वासानं फोन केला होता >>> हा खास माबो विश्वास आहे. मी इकडे येणार होते तेव्हा आश्चिग आणि अनुदोनने मला कॉन्टॅक्ट केला होता आणि काहीही लागलं तरी हक्काने सांग असं सांगितलं होतं. मी यूएस मधे आल्यावर मला घेऊन इकडेतिकडे फिरले पण होते दोघं. इतकं छान वाटलं होतं. त्यांना मी आधी कधीही भेटले नव्हते असं वाटलंच नाही. असो.

Pages