मी चार मे ला अंजली व फा या माबोकरांना भेटले.
तेथे माबोकर तोषवीही आली होती, ती सध्या सक्रिय नसते. त्या भेटीच्या गप्पा मारण्यासाठी हा धागा. वृत्तांत -
फारएण्ड -
मस्त झाले गटग. दहा-साडेदहा तास गप्पा मारत होतो. आधी अंजलीकडे भेटलो. अतिशय चवदार पन्हे घेउन तिच्या बॅकयार्ड मधे बराच वेळ बसलो होतो. नुकताच पाऊस पडून गेल्याने बाहेर एकदम आल्हाददायक म्हणतात तसे वातावरण होते. तेथे अंजलीच्या बॅकयार्ड शेती पासून ते पूर्वी केलेले रेल्वेप्रवास, विविध लोकांची डोंबिवली कनेक्शन्स ई वर गप्पा झाल्या. या गप्पांत ट्रेन्सचा विषय कोठून आला (की मीच आणला) लक्षात नाही. तेथे लाँग आयलंडबद्दलही चर्चा झाली. माझी लॉग आयलंड बद्दलची माहिती इतकीच असल्याने मी ज्ञान पाजळले नाही.
अनेक माबोबाह्य व्यक्तिमत्त्वे उपस्थित असल्याने असेल, पण बराच काळ माबोचर्चा नव्हती. ती सगळी खूप नंतर झाली.
मुख्य मेन्यू तर मस्त होताच पण मला इव्हन त्या चटण्या, लोणचे सुद्धा खूप आवडले. जेवायला आत आलो पण नाहीतर मला बॅकयार्ड मधे अजून बराच वेळ बसायला आवडले असते. प्रत्यक्ष जेवताना कोणत्या विषयावर गप्पा झाल्या ते अजिबात लक्षात नाही.
आमच्याकडे आल्यावर आधी जनरल विषयांवर चर्चा सुरू होती. म्हणजे अगदी स्टॉक्स, रिअल इस्टेट, ट्रम्प/मोदी वगैरे नाही पण बरेचसे नॉन-माबो विषय. मग थोड्या वेळाने आम्ही माबोमधे शिरलो आणि मग सगळे निघेपर्यंत माबो गप्पाच सुरू होत्या. काही लोकप्रिय आयडी, काही चांगले लिहीणारे, आता नवीन आलेले आणि चांगले लिहीणारे, माबोवर जमलेली लग्ने, माबोवर तुटलेल्या मैत्र्या, काही खमंग इतिहास - बरेच काही.
मधे रार चा फोन आला. मग तिच्याशी १५-२० मिनिटे गप्पा झाल्या. ते उपगटगही धमाल होते.
नंतर संध्याकाळी मात्र फार खाणे-पिणे झाले नाही. एकतर दुपारचे खूप जड झाले होते किंवा मी पाहिजे तितका आग्रह केला नाही. तेवढ्यापुरता तरी नो बाप्तिस्मा.
अंजली-
तर - हा शास्त्राप्रमाणे वृत्तांत.
मागचा वृत्तांत लिहून बरोबर १४ वर्षे झाली. २०११ च्या मे मधे मेगा गटग झालं होतं. न्यूजर्सीतून एक बस आली होती, डी सी वरून एक बस आली होती. शार्लटवरून लोक आले होते. आणि इथलेच काही जण. त्यामुळे अस्मिताचा मी येतेय, तुला भेटायला आवडेल म्हणून मेसेज आल्यावर 'अरे! फक्त तिघंच असणार आपण??' असं वाटून बाकी लोक गोळा होतायत का चाचपणी केली. फा मला सांगायला विसरल्यामुळे मी एकटीच लोक गोळा करायला लागले. तोषवी मायबोलीकर आहे पण खूप अॅक्टीव नसते, तिला ये म्हणून सांगितलं. म्हाळसा देखिल आमच्याच गावात राहते, तिला निरोप पाठवला पण तिचं काही उत्तर आलं नाही (तिलाच निरोप पाठवला ना असही वाटून गेलं).
फा नं अमित आणि रमडलापण आमंत्रण दिलं होतं (असं मला नंतर कळलं). सध्या भरपूर काम असल्यानं मायबोलीवर फार बागडता येत नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांच्या वाड्यावरच्या गप्पा वाचल्या नव्हत्या. त्यामुळे इथे काय चाललं आहे कळत नव्हतं.
अस्मिताला काय जेवायला आवडेल अंदाज येत नव्हता. मग सरळ मराठवाडी बेत ठरवला. चुका भाजी, भरली वांगी, भोपळा भाजी, कोथिंबीर चटणी, क्रॅनबेरी चटणी होतीच घरात. फा च्या बायडीनं मसालेभात, गोडाचा पदार्थ करून आणला. मग मठठा केला. ढोकळा खावासा वाटला म्हणून ढोकळा केला. मग वाटलं तळण नाही तर कसं. मग सोहमच्या कुरडयांना न्याय दिला. पन्हं करून ठेवलं. त्यात बजी रंगीत पाणी घालायचा ऑप्शनपण दिला हे नमूद करून ठेवते. साडेबाराला सगळे जमायला सुरूवात झाली. अस्मिता आली तीच 'अंजली का?' असं म्हणून मस्त गळाभेट घेतली. मोठ्याला दोन बॅगाभरून घेऊन खाऊ घेऊन आली. तिचा फेमस पोह्यांचा चिवडा (आत्ता तोच खात वृत्तांत लिहीते आहे), नारळाची बर्फी, रवा बेसन लाडू, घरी केलेली दाण्याची चटणी, लिंबाचं लोणचं आणि - एक पिशवी भरून दोडक्याच्या बिया!
एवढा खाऊ, गिफ्ट घेऊन येऊन अस्सल मराठवाडी असल्याचं सिद्ध केलं. आल्याबबरोबर गप्पांना जी सुरूवात झाली ते रात्री साडेदहाला तिला सोडलं तेव्हाच गप्पा थांबल्या. जेवताना नॉन मायबोलीकर पण बरोबर असल्यानं मायबोलीवरच्या गप्पा मारता येत नव्हत्या. तरी अमांची आठवण निघाली. त्यांनी एका लेखावर "गुढगे असे बोलू लागले की शेंडेनक्षत्र" असं काहीसं लिहीलं होतं. ते आठवून आणि अमांची वन लायनर्स आठवून फार हसलो आणि तेव्हढेच हळहळलोही . तेव्हढ्यात फा ने शेंडेनक्षत्र आयडी उडाल्याची बातमी दिली. तरीच ट्रंप धागा मलूल पडलाय.
जेवणं झाल्यावर 'केसर मारके' चहाची ऑफर दिली पण फा ला घरी जाऊन ४० लोकांचा चहा करायचा होता. मग फा कडे सगळे गेलो. काही नॉन मायबोलीकर आले नाहीत. तोषवीही चहा घेऊन निघाली. मग खर्या गप्पा सुरू झाल्या. तेव्हढ्यात रारचा पण फोन आला. तिच्याशी बोलताना समीर. सुप्रिया, नंद्या, अनुदोन यांचा उल्लेख झाला. रमड आणि धनि या दोघांची पण आठवण निघाली. तो पर्यंत अनलिमिटेड चहा सुरूच होता. एकीकडे मायबोलीवर काय चाललं आहे हे फा आणि अस्मिता दोघंही बातम्या देत होते. काही जुन्या आयडींची आठवण निघाली. शेवटी दुसर्या दिवशीची फ्लाईट असल्यानं साडेदहाला अस्मिताला सोडायला निघाले.
आता विचार करताना असं वाटतं खरंच कुठले हे ऋणानुबंध असतील हे? तोषवी आणि फा दोघही इकडे मूव्ह व्हायच्या आधी माझ्याशी बोलले होते. ती आठवण सांगताना तोषवी म्हणाली की अंजली मायबोलीवरची व्यक्ती आहे म्हणून काहीही ओळख नसताना अगदी विश्वासानं फोन केला होता. मला कॅनडाबद्दल माहिती हवी होती तेव्हा अमित आणि अस्मिताच आठवले. अगदी हक्कानं फोन करून दोघांना पिडलं होतं. पूर्वीची मायबोली राहिली नाही हो आता' हे कितीएही वेळा बोललो तरी वॉटसअॅपच्या काळातही मायबोलीवर आल्याशिवाय रहावत नाही.
अस्मिता -
अंजली, तू मी मराठवाड्यातली आहे म्हणून मला त्या पद्धतीचे जेवण आवडेल हा विचार करून स्वयंपाकाचा बेत आखला होता. त्याने I was really touched..! माझ्या ताईलाही खूप आवडलं सगळं. वर म्हणताही आले 'बघ माझे मायबोलीवरचे मित्रमंडळ किती अमेझिंग आहे.' आयुष्यात याआधी कधीही न भेटता सुद्धा किती जिव्हाळा निर्माण झाला आहे. ही माबोची जादू आहे.
दुसऱ्या बॅगमधे टेक्सासचे सुविनिअर म्हणून एक टेक्सासचा नकाशा रंगवलेला- त्याच आकाराचा कटिंग बोर्ड आहे आणि सॅन ॲन्टोनिओचे मॅग्नेटही आहेत पण ते एका पॅकमधे दोन आले आणि मला उघडावे वाटले नाही मग ते फा कडे गेले आहेत. फा तू अंजलीला नंतर देऊन टाक कधीतरी. टेक्सासचा आकार विचित्र आहे, मी चौकोनी स्टेटमधे राहिले असते तर तुम्हाला भाजी चिरायला सोपे गेले असते. 
अंजलीने जंगी बेत आखला होता. हे फोटो -
1. 
2. 
मिसेस फा ने मसाले भात आणि मॅन्गो मूस केले होते. तोषवीने मॅन्गो पाय आणला होता. अंजलीने भरली वांगी, दुधीची भाजी, चुक्याची पातळ भाजी, माबोवरची क्रॅनबेरीची चटणी, ठेचा, कोथिंबीरीची चटणी, ढोकळा, पन्हं, ताक, कुरडया - पापड्या , खोबऱ्याची चटणी मी बहुतेक काही तरी विसरले असेन पण भरपूर केलं होतं. अप्रतिम, रूचकर आणि चमचमीत झाले होते सगळेच. पूर्ण बेत मराठवाड्याचा होता. 
आणि हो, सर्वांना दोडक्याच्या बिया दिल्या आहेत. 
अंजलीचे बॅकयार्ड अतिशय सुंदर आणि रमणीय आहे. फा म्हणतोय तसं आम्ही पन्हं घेऊन सात आठ जणांचा ग्रुप गेट टू नो करत कमीत कमी ऑकवर्ड दिसण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या बॅकयार्डात टेबलवर चंदनाच्या लाकडात कोरीवकाम केलेले आहे असे डिझाईन असलेला कंदील होता व सुगंधी वासाचे धूप लावून ठेवले होते. अगदीच प्रसन्न आणि आल्हाददायक वातावरण. मागे गर्द हिरवीगार उंच झाडी बघत आम्ही पन्हं घेत बसलो.
अंजलीकडे थोडीफार ओळख व तुडुंब जेवण झाल्यावर हालचाल बंद झाली होती काही वेळ. पण फा ला दुसऱ्या इव्हेंटसाठी विनामूल्य अमृततुल्य चहाचे दुकान उघडावे लागणार होते, त्यामुळे आम्ही ते पहायला त्यांच्या घरी जायचे ठरवले. अगदी जवळ आहेत दोघांचीही घरं. पण एकदा घरी गेल्यावर त्याने आधान ठेवले की आम्ही त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले.
मग परत अंजलीने एकदा पुन्हा भोजनालयातले डबे भरून प्रत्येकीला दिले. माझे डबे तेथेच विसरले, आज देशील का पाठवून? काय कातील स्वयंपाक होता. ती वांग्याची भाजी आणि कोशिंबीरीची चटणी याची कृती लिहीच. मीही करते भरली वांगी पण ती इतकी लाल बुंद चटकदार दिसत नाही.
अंजलीच्या भूभूला बघून कोकोनटची आठवण आली. तिला व कोकोनटला चेरी सारखे खेळणं आणलं पण तिला द्यायला गेले तर ती घाबरत होती. खूप क्यूट आहे. मला तिला माया करायची होती पण ती पळून गेली.
तुम्हाला खेळणं कोणतं आहे हे कळावं म्हणून कोकोनटचा हललेला फोटो देते.
कोकोनट
कोको
भूभू धाग्याची आठवण काढून झाली अर्थात. 
हे सगळे डबे व आम्ही सगळे ह्यांना गाडीत टाकून अंजलीने आम्हाला फा च्या घरी आणले. त्यानी त्याचे अमृततुल्य टाकले व आम्ही त्यांच्या हॉलमधे गप्पा मारत बसलो. नंतर काही वेळ बाहेर बसून त्यांचेही मागचे अंगण पाहिले. तेथे थुईथुई उडणारे कारंजे आहे. सगळे राले शहरच हिरवेगार आहे, त्यामुळे फा च्या अंगणातूनही उंच-उंच हिरवी झाडे दिसत होती.
कारंजे बघून फा च्या 'डेडली आत्या' मालिकेतील कारंजी आठवली. डेडली लेखनाची प्रेरणा कुणाला कुठून मिळेल काही सांगता येत नाही.
तो कुठे उभे राहून, कुठली कामं करत बघू नयेत अशा मालिकाही आवर्जून बघतो हे त्याने आम्हाला दाखवले. घर छान प्रशस्त, मोकळे व वेलकमिंग आहे. फा आणि मिसेस फा दोघेही मोकळे आणि लाघवी आहेत. त्या सुद्धा इतक्या मोकळेपणाने बोलत होत्या की जुनी ओळख वाटू लागली. 
मी चहा घेत नाही पण फा च्या हातचा चहा प्यायले व मला तो आवडलाही. तो सतत 'अजून घ्या, हे खाता का- ते खाता का , किमान कूकीज तरी घ्या' म्हणत होता. पण आम्हाला अजिबात भूक नव्हती. मला मिसेस फा- शलाकाने जवळ बोलावून हळदीकुंकू लावून गिफ्ट कार्डने ओटी भरली. मी फक्त एकदाच 'कशाला- कशाला' म्हणून फार आढेवेढे न घेता सरळ कौतुक करवून घेतले. मला एकदम नांदेडचीच आठवण आली.
फा च्या समोरच्या अंगणात अतिशय सुगंधी वासाचे वेगवेगळ्या जातीचे गुलाबाचे ताटवे आहेत. त्यांना पावसाने बहर आलेला होता. त्याचा सुगंध- दरवळ अगदी दुरूनही येत होता.
१.
२. 
जनरल गप्पांमधे खूप वेळ गेला व मला वृत्तांत मट्रेयल नसल्याने अस्वस्थ वाटू लागले. कोणत्या तोंडाने परत येऊ वाटू लागले. मग अचानक रारचे फोन गटग केले. ही एक अतिशय धमाल मुलगी आहे. भयंकर हाय एनर्जी व chirpy आहे. तिने पुन्हा लिहायला सुरुवात करायला हवी. ती म्हणाली 'मला तुला तुझ्या स्पिरिच्युअल लेखांबद्दल बोलायचे आहे', हा मला धक्काच होता. कारण आम्ही जे काही बेकरी वर बोलतो ते सहसा चित्रपटांबद्दलच असते. मग तिने ती लवकरच रमडशी, अनुदोनशी भेट घेणार असल्याचे सांगितले. अजून एक गटग. 
फा म्हणाला, 'मी तुझे सुरवातीचे लेखन वाचले नाही.' मी म्हटलं 'तुझ्या इंटरेस्टचे नाही ते, मी तरी तुझे झुकझुकगाडी व बॅटबॉलवरचं कुठं वाचलं आहे.' हे असे बोलल्याने 'तू माबोइतकीच 'डिरेक्ट' आहेस म्हणाला.' 
अंजली हल्ली अधूनमधून वाचत असते म्हणून तिच्याकडे बऱ्याच ताज्या बातम्या नसतात. मी नवीन आहे म्हणून माझ्याकडे खमंग इतिहासाची माहिती नव्हती. फा स्थितप्रज्ञ आहे, तो गनपॉईन्टवरही गॉसिप करत नाही. मग मला अंजलीचाच आधार राहिला होता. मी तिला करंट इव्हेंट्स सांगून तर तिने मला माबोचा जाज्वल्य इतिहास सांगून दोघींनीही एकमेकींना 'अपग्रेड' केले आहे. आता तुमचं काही खरं नाही..! 
त्यात बरेचशे वाद, तमाशे, उडालेले आयडी, निघून गेलेले आयडी, कुजकट आयडी, वरून गोड -आतून धोरणी आयडी यांची माहिती मिळाली. मी एकदम योग्य कॅन्डिडेट आहे, कारण मी या जन्मात विसरणार नाही आता. 
अमांची आठवण निघाली म्हणून मग शेंडेनक्षत्रंचीही काढावी लागली. Some people need tranquilizer, some people need therapy and a few need exorcism. असं मी थोडं स्पष्ट व बाकीचं मनात गमतीने म्हटले. 
सकारात्मक आणि धमाल गप्पा जास्त झाल्या पण. त्यात सगळे वाडेकर आठवले. वाड्यावर किती लोक जमतात तो कसा हिट झाला आहे असे अंजलीने म्हटल्यावर, 'माझ्यामुळे कशे चारचे चाळीस जमायला लागले' असे मीच 'राकु-मोड' मधे जाऊन म्हटले. आता माझ्यासकट सगळे आपापल्या वेळेनुसार येऊन हलक्याफुलक्या गप्पा मारून जातात. दिवसपाळीतील भारतीय माबोकर असो व अमेरिकन माबोकर असतो वाडा कायम नांदताजागता- हसताखेळता आहे. नियम लाख बनवून धागा काढला तरी एखादी जागा सातत्याने सकारात्मक व प्रसन्न ठेवणे ही सगळ्यांचीच जबाबदारी असते. त्यामुळे माबोकरांनाच त्याचं श्रेय जातं. 
माबोवर जमलेल्या लग्नांपैकी मला फक्त रमड आणि धनिचेच माहिती होते. पण आपले ॲडमिन, अनुदोन- आश्चिग आणि मिल्या (?) ह्यांचीही आहेत असे कळले.
मराठी माणूस उद्योगात मागे का ? या विषयावर फा आणि अंजली बोलले. दोघांचेही बरेच मुद्दे रिअलिस्टीक वाटले. शिवाय इथल्या प्रमाणे मधेच तेथेही गांधी - नेहरू -सावरकर येऊन गेले. मी तेथेही इथल्यासारखेच वाचनमात्र राहिले.
माबोवरच्या अनेक गमतीजमती व आठवणी आणि काही गटग बद्दलही कळाले. माझे हे पहिले गटग आहे किंवा मी ह्यांना आधी भेटले नाही हे लक्षातही आले नाही. अगदीच जुनी ओळख वाटली. अजूनही गटगला आलेल्या मजेचा ताजेपणा मनावर आहे. पुढच्या वेळीही मी आनंदाने जाईन. छान आठवणी गोळा झाल्या. 
मस्त वृत्तान्त ! मजा आली
मस्त वृत्तान्त ! मजा आली वाचायला.
धम्माल . . .
आता हेही सुधारा.
आता हेही सुधारा.
आमच्या गटगचा वृत्तान्त आपली मायबोली ग्रुपात आहे. तुमचा विरंगुळा ग्रुपात. आम्हीच खरे मायबोलीकर. तुम्ही टाइमपास.
तुमच्यापेक्षा फास्ट आहे मी,
तुमच्यापेक्षा फास्ट आहे मी, तिकडे तुम्हाला टोमणा मारला व बदललेही.

दोन्ही ग्रूपमधे द्यायचे होते पण तो सापडला नाही. वर एरर येत होती. वेमा कृपया बदलणार का, धन्यवाद.
कुरडई दिसल्यावर सगळं लक्ष
कुरडई दिसल्यावर सगळं लक्ष विचलित झालं
आतेबहिण - आतेबहिण सेम पिंच. 
>>>
धनवन्ती, हो. वचपा काढायलाच हवा.

अन्जूताई, तिला कळवते हे कौतुक.
ऋतुराज, सुंदर आहे तिचं घर. सजावटीसाठी ठिकठिकाणी मूर्ती व फ्रेम्स ठेवल्या आहेत. भारतीय पारंपरिक पद्धतीने सजवले आहे. मोठमोठ्या पितळी समयाही आहेत.
वृत्तान्त आवडल्याचे कळविणाऱ्या सर्वांना धन्यवाद. असाच लोभ असू द्या.
छान वृत्तान्त आणि फोटो
छान वृत्तान्त आणि फोटो
Great hospitality
अरे वाह इथे फोटो आला. हेडर
अरे वाह इथे फोटो आला. हेडर मध्ये टाका.
अस्मिताला फोटोत पाहिले होते पण फारेंडच्या अमिताभप्रेमामुळे त्याला न पाहता डोळ्यासमोर जी प्रतिमा यायची तिला फोटोतील शर्टने फसवले
दुपारी झोप झाली आणि या
दुपारी झोप झाली आणि या धाग्यात खाण्याचे पदार्थ ओझरते दिसल्याने चटकन बंद केला.
कारण दुपारी जेवण भरपूर झालेलं. इतके चमचमीत गावरान पदार्थ बघून लगेच भूक लागू शकते
जाणूनबुजून असे फोटो टाकलेत ना ? आताही ते वांगं पाहून तोंपासु !
त्यात कुरड्या. मठ्ठा आहे म्हणजे जिलेबी पण असणारच. ती लपवली का ? का ?
अय्यो, ढोकळा पण ! चटण्या पण मस्तंच..
इतकं सगळं केलं म्हणजे सा. दं !
आता सर्वांचे फोटो पाहिले.
फारएण्ड त्यांच्या संयत विनोदाइतकाच संयत दिसतात. अस्मिताला पाहिलेले नाही, त्यामुळं कोणती अस्मिता हे कळलं नाही.
पण ते जे म्हणताहेत तीच मी पण म्हणत असेल तर तीच ती
बाकिच्या पोस्ट्स वाचेन आता हळू हळू.
रात्रीच्या वाचल्यात तर भूक लागेल. आता किचन मधे जाऊन काहीतरी शोधावं लागणार.
राभु - वरच्या एका माझ्याच
पण ते जे म्हणताहेत तीच मी पण म्हणत असेल तर तीच ती >>>


राभु - वरच्या एका माझ्याच पोस्टीत कोण कुठे बसलेय ते लिहिलेय बघ.
ऋ- अमिताभनेही कधीतरी फुलाफुलांचा शर्ट घातला असेलच की, कुठे कधी ते मात्र फा लाच सांगावे लागेल.
अस्मिता, माझा गेस बरोबर आहे
अस्मिता, माझा गेस बरोबर आहे मग.
)
(आता कोण विश्वास ठेवणार पण ? आधीच सांगायला हवं होतं
अस्मिता, माझा गेस बरोबर आहे
अस्मिता, माझा गेस बरोबर आहे मग.
)
(आता कोण विश्वास ठेवणार पण ? आधीच सांगायला हवं होतं
अमिताभनेही कधीतरी फुलाफुलांचा
अमिताभनेही कधीतरी फुलाफुलांचा शर्ट घातला असेलच >>> बॉम्बे टू गोवा बहुतेक,
खरंच, अमिताभच्या त्यातल्या
हो, पण मुंबई टू गोवा अमिताभचा
अस्मिता, हो, पण मुंबई टू गोवा अमिताभचा नाही तर मेहमूदचा पिक्चर आहे यातच काय ते आले
अरे मी अमिताभचा चाहता आहे
अरे मी अमिताभचा चाहता आहे म्हणून माझे गटग किंवा अशा इव्हेंटमधे कपडे त्याबद्दल काहीतरी स्टेटमेण्ट करणारे असतात असा समज करून घेतलात की काय?
आपण कपडे असे ठरवून कधी घालतो? मी तर त्या त्या दिवशी समोर दिसतील ते घालतो. फक्त थंडी आहे की उन्हाळा व फॉर्मल हवेत की कॅज्युअल इतकाच चॉईस.
वरती कोणीतरी मॅचिंग बद्दलही विचारले होते ते आठवले. असे काही ठरवून केले नाही.
फारएण्ड त्यांच्या संयत विनोदाइतकाच संयत दिसतात >>> धन्यवाद
फोटो टाकताना नोटिस केले होते पण लिहायचे राहिले - अस्मिताचा फोन बघून जिंनामिदो मधे फरहान हृतिक रोशनला जो फोन विकत घेउन देतो तो फोन आठवला
मी अमिताभचा चाहता आहे म्हणून
मी अमिताभचा चाहता आहे म्हणून माझे गटग किंवा अशा इव्हेंटमधे कपडे त्याबद्दल काहीतरी स्टेटमेण्ट करणारे >>>
पण एकूण तुझ्याकडे फुलांचे शर्ट्स असावेत बरेच. मी पण तुला बेकरी गटगला (वेगळ्या
) फुलांच्या शर्ट मधे पाहिलंय असं अंधुक स्मरतंय.
त्या फुलांच्या गंधकोशी.. सांग
त्या फुलांच्या गंधकोषी.. सांग फा..
जिंनामिदो मधे फरहान हृतिक
जिंनामिदो मधे फरहान हृतिक रोशनला जो फोन विकत घेउन देतो तो फोन आठवला >>>
I am a trader, not a Japanese school girl.
मस्त गटग.. फोटोही छान..!
मस्त गटग.. फोटोही छान..!
आयडी मागच्या चेहऱ्यांची कल्पना मनात केलेली असते..
फारएण्ड आधी मला त्यांच्या प्रतिसादावरून प्रौढ असावेत असं वाटायचं ..
थॅंक्यू रूपाली.
थॅंक्यू रूपाली.
वेमा, हा धागा कृपया 'आपली मायबोली' गटात टाकणार का. धन्यवाद. सगळी गटग एकीकडे आणि हा चुकीच्या गटात गेला आहे.
अरे आत्ता बघितला हा धागा! ते
अरे आत्ता बघितला हा धागा! ते अस्मिताने वर काढल्याने असेल कदाचित. फा ला अर्थातच, आणि अंजलीला एकदा भेटलोय. बाकी इल्ला
काय वृ! काय ते नव्हेच.
माबोवर जुळणाऱ्या आणि जुळलेल्या जोड्यांचा विषय प्राचीन आहे. राष्ट्र सेवा दलाला एकेकाळी वधुवरसूचक केंद्र म्हणायचे ते आठवते का कुणाला? (मी इतका जुना नाही, अनेक ठिकाणी वाचून विचारलं
)
त्या फुलांच्या गंधकोषी.. सांग
त्या फुलांच्या गंधकोषी.. सांग फा.. >> हे भारी होतं, पण तुम्ही अर्धच लिहिलंय. त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस फा.
हर्पा
हर्पा
त्या फुलांच्या गंधकोशी सांग
त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस फा
>>>>
(No subject)
(No subject)
त्या फुलांच्या गंधकोषी.. सांग
त्या फुलांच्या गंधकोषी.. सांग फा.. >> हे भारी होतं, पण तुम्ही अर्धच लिहिलंय. <<
मुद्दामच अर्ध लिहिलेलं..
कोणीतरी पूर्ण करावं ह्या इच्छेने..
आणि पूर्ण नाही केलं कुणी, तरीही मनात तेच वाचलं जाणार.. जे अभिप्रेत आहे.
(No subject)
फा हा थोडा थोडा दिग्दर्शक
फा हा थोडा थोडा दिग्दर्शक सौमित्र पोटे यांच्यासारखा दिसतो.

फा, इकडे पाहा. तुझ्या मागे
फा, इकडे पाहा. तुझ्या मागे लागलेत सगळे.
शर्ट काय, लूक अलाईक काय. सेलेब्रिटी स्टेटस. 
फा, इकडे पाहा. तुझ्या मागे
फा, इकडे पाहा. तुझ्या मागे लागलेत सगळे >>>
Pages