काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नव्या कर प्रणाली बद्दल ची माहिती कोणत्या धाग्यावर चर्चा चालू आहे? सध्या सितारामन ने साध्या साध्या गोष्टींवर कर लाऊन गळचेपी केली आहे, सतत उठ सूठ बँकेत पासबुकं घेऊन जाणार्या माझ्या वडिलांना ही सांगितलेय की आता बॅलन्स चेक करायलाही पैसे पडतील. युपीआय वर ही..ई.

*पळवलेल्या एका मुलीची किंमत किती आणि भारतातील पोलीस किती जागृत आहेत ?*

तुम्हाला माहिती आहे का, शरीराचे अवयव (body parts) येतात कुठून…?

गरजेनुसार अवयवदान होत नाही, पण तुम्ही 40 लाख रुपये देऊन किडनी बदलवू शकता. पैसे दिल्यावर डॉक्टर 16–25 वयोगटातील मजबूत किडनीच बसवतात…

मग हे अवयव येतात कुठून…???

मृतदेहांमधून ? की अपघातात मृत्यू झालेल्यांकडून…??

हे पुरेसं नसतं, आणि 16–25 वयोगटातील अनेक मुलं नशेमुळे स्वतःचे अवयव खराब करून बसलेली असतात…

एक ठिकाण आहे…!!

आणि ते म्हणजे…

भारतामधील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुली…!!!

या मुली सिगारेट, गुटखा किंवा दारू वापरत नाहीत आणि शरीराची काळजी घेतात. त्यामुळे त्यांचे दात, हाडे, आतडी, त्वचा, कवटी, लिव्हर, किडनी, हृदय इत्यादी अवयव निरोगी आणि प्रत्यारोपणासाठी योग्य असतात…

या मुलींमध्ये “लव्हबग” टाकून त्यांना कुठेही नेणे सोपे होते…
“लव्हबग” म्हणजे डोक्यात प्रेमाचा कीडा घालणे…

म्हणूनच डिसेंबरमध्ये केदारनाथ, PK सारख्या प्रेम-जिहाद प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपट येतात…

डिसेंबरपासून फिल्मी हिरोसारखे राज, करण, राहुल, अब्दुल, सलीम, जावेद अशा नांवांचे आशिक फिरायला लागतात… हे खरे प्रेमी नसून व्यावसायिक गुन्हेगार असतात…

दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातील 2 ते 4 लाख मुली घरातून गायब होतात…

कारण दिलं जातं की —
“प्रेमात घरातून पळून गेली…”
ना केस होतो, ना कोणी शोध घेतो…

शेवटी त्यांचा एक केसही सापडत नाही… विचार करा, त्या मुली कुठे जातात…??

तुम्ही सहज समजू शकता…

जेंव्हा एखादा “लव्ह जिहादी” पकडला जातो, तेंव्हा नेते आणि मीडिया लगेच सक्रिय होतात…

प्रत्यक्षात, आधी या मुलींचे शारीरिक शोषण केले जाते, त्यानंतर त्यांची हत्या करून अवयव विक्रीतून पैसे कमावले जातात…

गूगलवर “Black market price of human body parts” सर्च करा आणि अवयवांचे दर बघा…
त्यानंतर “Organ Transplant Rate in India” सर्च करून प्रत्यारोपणाचा खर्च बघा…

एका मुलीच्या शरीरातील सर्व अवयव योग्य प्रकारे विकले, तर किमान 5 कोटी रुपये सहज मिळू शकतात…

म्हणूनच “लव्ह जिहाद” आणि मानव तस्करीवर ना कायदा बनतो, ना कोणी बनू देतो…

आणखी एक गोष्ट —
कधीही कोणत्या नेत्याची किंवा उद्योगपतीची मुलगी घरातून पळून जात नाही किंवा गायब होत नाही…
नेहमी त्या मुली गायब होतात ज्यांच्या कुटुंबाची राजकीय किंवा कायदेशीर ओळख नसते…

2015 मध्ये उत्तर प्रदेशमधून 4000 मुली गायब झाल्या होत्या.
मानव तस्करी रोखण्यासाठीच “Anti-Romeo Squad” तयार करण्यात आला होता, ज्याला नेते, मीडिया आणि काही लोकांनी विरोध केला…

आपल्या मुलींना खूप काही माहिती असते, पण गुन्हेगारी मार्केटिंग आणि अवयव कुठून येतात हे त्यांना माहिती नसते…

म्हणून आपल्या बहिणी-मुलींची काळजी घ्या…
कारण जे बाहेर घडत आहे, ते आपल्या घरातही कधीही घडू शकते…

कृपया हा संदेश वाचून सर्वांना शेअर करा, जेणेकरून कोणतीही मुलगी अशा षडयंत्राची शिकार होऊ नये…

माझा अर्थ तुम्हाला समजला असेल…

घरात, मित्रांमध्ये यावर चर्चा करा… लाजू नका…
आपली ही “बेशर्मी” एखाद्या कुटुंबाची इज्जत आणि मुलीचे प्राण वाचवू शकते…

चला, आपण आपले नैतिक कर्तव्य पार पाडूया…

प्रत्येक मराठी बांधवांनी तसेच प्रत्येक भारतीय पर्यंत हा संदेश पोहोचवा. सर्वांना फॉरवर्ड करा आपल्या परिचयातील सर्वांना जागरूक करा.
ज्ञानपीठ द्वारे Stitching प्रसारित.

Human trafficking ही वस्तुस्थिती आहे, पण हे फॉरवर्ड काहीच्या काही आहे.

हे फॉरवर्ड काहीच्या काही आहे यात वाद नाही.
मध्यमवर्गातल्या केसेसबद्दल कल्पना नाही पण व्हल्नरेबल गटातल्या म्हणजे गरीब घरातल्या, कमी शिकलेल्या, वडील वगैरे नसलेल्या मुलीच काय विधवा/परीत्यक्ता महीलांना किंवा एकट्या पुरुषांनाही ह्युमन ट्रॅफिकिंग/कन्वर्शनसाठी टार्गेट केलं जातं ही वस्तुस्थिती आहे.
युपीमध्ये नुकतीच छांगुरबाबाची केस उघडकीस आली आहे.

कपडे वाळत घालताना… आयुष्याची शांत कहाणी

कपडे वाळत घालणं…दिसायला किती साधं काम! रोजच्या जगण्यातलं, सहज केलं जाणारं. पण कधी बारकाईने पाहिलंय का—बाई कपडे कसे वाळत घालते, यावरून तिच्या स्वभावाचीही थोडीशी झलक दिसते.

कुणी कपडे एकसारखे ताणून, अगदी सरळ रेषेत वाळत घालते. कुठे सुरकुती नको, एक कपडा दुसऱ्यावर नको. रंगांचीही एक वेगळीच मांडणी असते. तिच्या जगण्यातही कदाचित प्रत्येक गोष्टीला एक जागा असते… प्रत्येक कामाला एक क्रम असतो. विस्कटलेपण तिला फारसं रुचत नसावं.

कुणी मात्र हातात येईल तो कपडा घेते आणि वाऱ्यावर सोपवून देते.“वाळला म्हणजे झालं!”तिच्यासाठी नीटनेटकेपणापेक्षा काम पूर्ण होणं महत्त्वाचं असतं. आयुष्याकडेही ती कदाचित तसंच पाहत असावी—सगळं मनासारखं, आखीव-रेखीव असण्याची गरज नाही; प्रवास पुढे सुरू राहिला पाहिजे.

कुणी कपडे वाळत घालताना आधी ऊन कुठे आहे, वारा कुठून येतोय, पाऊस येण्याची शक्यता आहे का, हे पाहते.तिच्या या छोट्याशा कृतीतही आयुष्याचा मोठा धडा असतो—परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे बदलत नाही; आपण परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यायचं असतं.

कुणी कपडे इतक्या जपून पसरते, जणू त्या प्रत्येक कपड्यात एखादी आठवण गुंडाळलेली असते. मुलाचा छोटासा शर्ट, नवऱ्याचा आवडता कुर्ता, स्वतःची एखादी साडी… कपडे तिच्यासाठी फक्त कपडे नसतात; त्यांना स्पर्श करताना तिच्या आयुष्यातले कितीतरी क्षण हाताला लागून जातात.

आणि काही स्त्रिया असतात…ज्या स्वतःचे कपडे शेवटी वाळत घालतात.

आधी मुलांचे, मग नवऱ्याचे, मग घरच्यांचे…सगळ्यांचे कपडे उन्हात व्यवस्थित पसरले की शेवटी स्वतःची एखादी साडी किंवा ओढणी त्या दोरीवर जागा शोधत असते.

कदाचित हीच तर तिच्या आयुष्याची गोष्ट असते—सगळ्यांसाठी जागा करून देताना स्वतःसाठी जागा थोडी उशिरा उरते.

कपडे वाळत घालताना कधी एखादा कपडा वाऱ्याने खाली पडतो. पुन्हा उचलावा लागतो. धूळ लागली असेल तर पुन्हा धुवावा लागतो.

आयुष्यही असंच नाही का?

कितीही जपून ठेवलेली नाती कधी वाऱ्याने हलतात…कितीही नीट आखलेले दिवस अचानक विस्कटतात…काही माणसं हातातून निसटून जातात…काही स्वप्नांना धूळ लागते…

पण आपण पुन्हा ते उचलतो. झटकतो. गरज पडली तर पुन्हा धुतो… आणि पुन्हा उन्हात टांगतो.

कारण जगणं थांबवता येत नाही.

कपडे वाळत घालताना आणखी एक गंमत असते. ओले कपडे जड असतात. पण तेच कपडे उन्हात काही वेळ राहिले की हलके होतात.

मनाचंही तसंच असावं कदाचित.

मनात साठवलेल्या काळज्या, दुःखं, अपेक्षा, नाराजी… सगळं ओलं असताना खूप जड वाटतं. पण ते थोडं वेळेच्या उन्हात, अनुभवाच्या वाऱ्यात आणि स्वीकाराच्या मोकळ्या आकाशाखाली ठेवलं की त्याचं ओझं कमी होत जातं.

म्हणूनच कदाचित कपडे वाळत घालणं ही फक्त घरकामाची कृती नसावी.

ती एका स्त्रीची रोजची छोटीशी जीवनशाळा असते.

कपडे सरळ करताना ती कदाचित स्वतःलाही सावरत असते.सुरकुत्या काढताना आयुष्यातल्या सुरकुत्यांनाही हात फिरवत असते.वाऱ्यावर कपडे सोडताना काही गोष्टी नशिबावर सोडायला शिकत असते.आणि संध्याकाळी कोरडे कपडे गोळा करताना दिवसभरात स्वतःमध्ये साठलेलं काहीतरी पुन्हा घडी करून ठेवत असते.

म्हणून पुढच्या वेळी एखादी बाई कपडे वाळत घालताना दिसली, तर फक्त एवढंच पाहू नका की ती कपडे कसे टाकतेय…

कदाचित त्या कपड्यांच्या मांडणीततिची शिस्त असेल,तिचा स्वभाव असेल,तिचं प्रेम असेल,तिचा थकवा असेल,तिची स्वप्नं असतील…

आणि सगळ्यात महत्त्वाचं—तिचं आयुष्याकडे पाहण्याचं एक शांत, अबोल तत्त्वज्ञान दडलेलं असेल.

कारण बाई कपडे फक्त वाळत घालत नसते…

*ती रोजच्या रोज आपल्या* *आयुष्याची घडी घालत असते.*

पण यात कामवाली बाई गृहीत धरलेली नाही !!!
त्यामुळे हे फॉरवर्ड निदान ५०% गैरलागू आहे !
शिवाय, ड्रायर मधून काढलेले कपडे वाळत घालताना कोण इतका विचार करतं.........?

आणि हा जो कुणी रिकामटेकडा बसून, त्या कपडे वाळत घालणारीला न्याहाळत इतके लिहितो आहे, त्यापेक्षा स्वतः उठून दोनचार कपडे वाळत घालायला मदत केली असती तर....!

आधी फॅमिली ग्रुप वर अशा मेसेजना इग्नोर करायचो, पण हल्ली त्यासंदर्भातील डेटा घेऊन चढून बसतो.

हे काकाफॉ जवळजवळ अर्धे वाचून झाले तरीही 'आयुष्यही असंच नाही का?' हे वाक्य आले नव्हते, मी अस्वस्थ झालो, पण ते आले , मग सुखावलो

हो ना! उगा आपलं दिसली कपडे वाळत घालणारी बाई. बघ. करत बसलं तर कठिण होईल.
जीवनाचं असं असतं तर निव्वळ माबोकरांना उचकवायला जागोजाग पेरलेलं आहे अशी मला दाट शंका आहे.

भारताने इस्रायलचा आदर्श ठेवला पाहिजे. इस्रायल आपल्या तुरुंगांत डांबून ठेवलेल्या पॅलेस्टिनींचे अवयव काढून देशात तर वापरतंच, वर निर्यातही करतो.
https://www.un.org/unispal/document/auto-insert-178236/
भारतानेही काही ना काही कारणाने मुस्लिम स्त्रीपुरु षांना तुरुंगात टाकून किंवा असंच गायब करून संपवून त्यांचे अवयव वापरावेत. फक्त हिंदूंना मुस्लिमांचे अवयव मिळतील, ही लहानशी अडचण आहे. त्यासाठी योग्य ते धार्मिक विधी करून त्यांचं शुद्धीकरण करावं.

हा जो कुणी रिकामटेकडा बसून, त्या कपडे वाळत घालणारीला न्याहाळत इतके लिहितो आहे, त्यापेक्षा स्वतः उठून दोनचार कपडे वाळत घालायला मदत केली असती तर. >>> १००+++

तो वृद्धत्वामुळे वा आजारपणा मुळे गलितगात्र झालेला तिचा सासरा असेल. त्याला सुनेचं इतकं कौतुक आहे, त्याचं काहीच नाही.

… अर्धे वाचून झाले तरीही 'आयुष्यही असंच नाही का?' हे वाक्य आले नव्हते, मी अस्वस्थ झालो, पण ते आले ….. 😂

बाकी बाई नसलो आणि असे फुकाचे तात्विक चिंतन वगैरे करत नसलो तरी कपडे धुणे- वाळवणे- इस्तरी करणे आणि नीट जिथल्या तिथे ठेवणे आवडीचे काम आहे. अगदी वॉशिंग मशीनच्या स्वच्छते, देखभालीसकट. Very therapeutic activity for me.

जोक बाजुला... आजी असे कपडे वाळत घालायची, ते तिचंच काम होतं. अगदी शेवट जमेनासं होईपर्यंत काठी टेकत, वॉकर घेऊन का होईना मशिन मध्ये कपडे दिसले की ते दोरीवर गेले पाहिजेत हा शिरस्ता होता, आणि कोणाच्याही घरातल्या मशिनमध्ये. Happy आत्तेभावंड सकाळी आंघोळी झाल्यावर म्हणायची, 'आज आजी आलेली आहे कळतंय, सगळे कपडे व्यवस्थित आहे दांडीवर' Proud
तेच कपडे काढण्याचं पण ... म्हणजे दोरी वरुन... Lol .. हे असले जोक ही तिचीच लेगसी असावी.. Proud सकाळी उठून अंथरुण आवरुन प्रत्येकाच्या कपड्याची चळत तयार. लहानपणी काठीने दांडीवरुन ती कपडे पाडायची आणि आम्ही झेलायचो हा खेळ कायम खेळलेला आठवतो. तिला मदत करताना मी स्टुलावर चढून जागा मिळेल तिथे कपडे घालत असे, तेव्हा मला कधी एखाददा सांगितलं तर, पण उगा भरीला पाडून असंच कर प्रकारही केलेले आठवत नाहीत.
हे असं मागे न लागता पोरांना शिकवण्याची मला गरज आहे.
मला पण काकाफॉ होणारे आता! Lol

Lol अगदी, माझे आजोबा पण अगदी टोकाला टोक लागेल असे वाळत घालायचे, घड्या सुद्धा व्यवस्थित असायच्या. इस्त्री सुद्धा लागू नये इतकी सफाई कामात. आमच्यात कुणातही हा गुण आला नाही. वर आम्ही काकाफॉला हसतो. मी आता वॉशरचे बोळे ड्रायर मधे बोलिंगचा बॉल फेकतो तसे असेच फेकते, नो दया माया! यावरून बाईचा स्वभाव काढायचा असेल तर मी निळू फुले लेव्हल. Lol

घरातील बाईने सगळ्यात शेवटी आपले कपडे वाळू घालून त्याग करायचा आहे की काय? सगळ्यात शेवटी जेवल्यासारखे!

कपड्यांचा काकाफॉ “पीळ” आहे >>>> गुड वन! Lol

म्हणून पुढच्या वेळी एखादी बाई कपडे वाळत घालताना दिसली, तर फक्त एवढंच पाहू नका की ती कपडे कसे टाकतेय… >>> Lol आंबटशौकीन व्हा, अजूनही काही बाही पाहा - हा संदेश जातोय यातून!

कपडे धुवून किंवा वाळत घालून बायकांच्या (किंवा कुणाच्याही) आयुष्याची घडी बसते म्हणणाऱ्या माणसांना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली अटक करता येईल का?

अगदी झटकून, शक्यतो कडेला कड जुळवून, एकही चुणी न पाडता, कसलाही त्याग बिग न करता कपडे वाळत घालण्याचा घरात शिरस्ता असला तरी It's just a chore that needs to be done.

आंबटशौकीन व्हा, अजूनही काही बाही पाहा - हा संदेश जातोय यातून! >>> Lol

पुढच्या वेळी एखादी बाई कपडे वाळत घालताना दिसली >>>> आणि ती तुमच्या घरातली व्यक्ती नसेल, तर तुम्ही त्या वेळेला तिथे काय करत आहात याचा व आपल्या लाइफ चॉईसेसचा विचार करा Happy किंवा हे मोबाईलमधे असेल तर हे रील आपल्याला आपल्या कोणत्या पूर्व-रील-पुण्याईमुळे आले याचा विचार करा Wink

Lol
सगळेच !
अस्मिता.....:-)
फारेंड, पूर्व रील पुण्याई हा शब्द खूप आवडलेला आहे !
पूर्व रील संचित ही म्हणू शकतो !!!

>>>>>>Very therapeutic activity for me.
+१ काय सुगंधी असतो साबण आणि नवीन धुवुन वाळावलेल्या कपड्यांनाही फ्रेश लाँडरीचा वास काय मस्त येतो. बाकी मी 'डाउनी' वगैरे गार्मेन्टस सॉफ्टनर वापरत नाही पण ते सुगंधी शीटस घालते ड्रायरमध्ये.
वेडी होते त्या सुगंधाने.
मला तर ते मळलेले कपडे व नंतर त्यांचे झालेले रुपांतरित रुपडे हे ट्रान्सफॉर्मेशन, फार आवडते.
-----------------
>>>>कपड्यांचा काकाफॉ “पीळ” आहे
Lol Lol Lol खतरनाक जमलाय हा जोक.
------------------
>>>>मला पण काकाफॉ होणारे आता! Lol
हाहाहा होउन जाउ देत डिलीव्हरी.

कपड्यांचा काकाफॉ “पीळ” आहे <<<<< Lol

किंवा हे मोबाईलमधे असेल तर हे रील आपल्याला आपल्या कोणत्या पूर्व-रील-पुण्याईमुळे आले याचा विचार करा
<<<< Lol

६०ज किंवा ७०ज मधल्या चित्रपटांच्या नायिका सुद्धा कपडे नेटके वाळत घालणं या प्रकारात तरबेज असत. वादळात सापडून, पुरते भिजून, एखादे निर्जन घर गाठले की आधी ओलेकच्च कपडे व्यवस्थित वाळत घालून उरका पाडत. 'रूप तेरा मस्ताना' वगैरे कामे त्यानंतर.

आणि फोकस बाईने तिच्याच कुटुंबाचे कपडे वाळत घालणं यावर जास्त असल्याने कपडे जनरलच वाळत घालण्याचे बाकी फायदे झाकोळले गेले आहेत. डॉनमध्ये धोबी घाटावरच्या लोकांनी कपडे इंच इंच जागा लढवून शिस्तीत वाळत घातलेले नसते तर त्या बांधलेल्या दोऱ्यांमधून पळणारा विजय सहज पोलिसांच्या हाती सापडला असता.

वादळात सापडून, पुरते भिजून, एखादे निर्जन घर गाठले की आधी ओलेकच्च कपडे व्यवस्थित वाळत घालून उरका पाडत.
>>>>
छे कुठला व्यवस्थितपणा!! फक्त साडी वाळत घातलेली दिसायची. परकर पोलक्याचं काय? ते कोण वाळत घालणार? बोळे करून ठेवले तर त्याला वास येईल वगैरे चिंताच नाही. नुसती टॉवेल/चादर गुंडाळायची घाई झालेली असायची.

आधी मुलांचे, मग नवऱ्याचे, मग घरच्यांचे…सगळ्यांचे कपडे उन्हात व्यवस्थित पसरले की शेवटी स्वतःची एखादी साडी किंवा ओढणी त्या दोरीवर जागा शोधत असते....
हे तर खूपच झाले! अस्मिता म्हणतेय तसे
घरातील बाईने सगळ्यात शेवटी आपले कपडे वाळू घालून त्याग करायचा आहे की काय? सगळ्यात शेवटी जेवल्यासारखे! Uhoh कैच्या कै लॉजिक.
खरेतर, बाईचेच कपडे मोठे असतात, आणि ते आधी वाळत घातल्या जातात.
हे फॉरवर्ड लिहिणारे इतके वहावत जातात ना......
स्वतः चं धुणं धुवा म्हणा आधी नीट!

वादळात सापडून, पुरते भिजून, एखादे निर्जन घर गाठले की आधी ओलेकच्च कपडे व्यवस्थित वाळत घालून उरका पाडत.>>>>>> Lol
हळदी कुंकू सिनेमा चर्चा आठवली

Pages