Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या बाई खर्या आहेत. म्हणजे
त्या बाई खर्या आहेत. म्हणजे त्या नावाच्या बाई आहेत.
https://drmaithilisavant.com/about/
त्यांची फेसबुक पोस्ट इथे आहे.
<मैत्रीणींनो,
आपण लहानपणापासून काय शिकलो? "अभ्यास कर, करिअर कर, पैसे कमवायला लाग. कोणावरही अवलंबून राहू नको, स्वतःच्या पायावर उभी राहा!"> असं खरंच होतं का?
त्यांचंच त्या पोस्टवर उत्तर
या पोस्टवरील कमेंट वाचून एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे वरील लेख मी स्त्रियांसाठी लिहिला असला तरी, आजच्या जगात पुरुषांनाही त्यांच्या मॅस्क्युलिन एनर्जीवर काम करण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
जर तुम्ही एक विवाहित पुरुष असाल तर तुम्ही तुमच्या गृहिणी पद सांभाळणाऱ्या पत्नीला कसं वागवता? तुमची पत्नी जर करियर करणारी असेल तर तिच्या यशात तुम्ही तिचं किती कौतुक करता? तुमच्या पत्नीला आर्थिक, शारीरिक व भावनिकदृष्टया किती Safety देता या गोष्टी या पोस्टवर कमेंट करणाऱ्या प्रत्येक पुरुषाने स्वतःशी प्रामाणिक राहून नक्की तपासून पाहाव्यात.
फेमिनीन एनर्जी मधे असणारी पत्नी हवी असेल तर पुरूषालाही मॅस्क्युलिन बनावंच लागतं.
That's how polarity works.
टाळी एका हाताने कधीच वाजत नसते.
विचार करूया.
त्यांच्या पोस्ट्सवर नजर टाकली. एकीत पुरुषांमध्ये मॅस्क्युलिन एनर्जी असेलच असं नाही असं म्हटलंय.
लाइफ कोच म्हणून पुरुषांना सुद्धा फेमिनाइन एनर्जी डेव्हलप करायला शिकीव की.
भंपकपणे "संतुलित"
भंपकपणे "संतुलित" दाखवण्यासाठी असेल असे वाटतेय. अशी नाटकंही नवीन नाहीत. वरून आधुनिक दाखवायचं, इंग्रजी शब्द वापरायचे पण दारू जुनीच पाजवायची.
ही बाई खरी आहे आणि डॉक्टर आहे>>> कपाळाला हात!
डॉक्टर नाही. फिजियोथेरपिस्ट
डॉक्टर नाही. फिजियोथेरपिस्ट आहे. हे लोक स्वतःला डॉक्टर म्हणवून घेतात.
ह्या काकूंची एनर्जी
ह्या काकूंची एनर्जी मस्कुलाईन किंवा फेमिनाईन किंवा balance नसून रॉटन आहे.
मुलींचे शिक्षण-करियर उत्तम असले की त्यांचे लग्न जमत नाही म्हणणे तर जुनेच आहे. आता लग्नासाठी मुलांना चांगल्या वाईट कुठल्याच मुली मिळत नाहीएत अशी रड असणारे काकाफॉ सुद्धा आहेत.
सध्या तरुण मुले-मुली कुणीच लग्नाला परमावश्यक बाब समजतच नाहीत, लग्नाचा विचार established traditional frame मधे करत नाहीत हे खरे दुखणे असते या काका-काकू लोकांचे.
आणि हे अजुन काकाकाकूंना
आणि हे अजुन काकाकाकूंना समजलेलेच नाही. जेनझी आणि या त्यांच्या काकाकाकू पालकांत काहीही संवाद नाही हेच सध्या आंदोलनात आणि प्रतिक्रियांत ही दिसतंय.
जरा थोडा अनपॉप्युलर ओपिनियन.
जरा थोडा अनपॉप्युलर ओपिनियन. या बाई कोण आहेत माहीत नाही पण डेटिंग कोच असतील तर "फक्त त्यापुरते" पोस्टच्या मूळ मुद्द्यात तथ्य आहे.
अशा फॉरवर्ड्समधून स्त्रियांना ट्रॅड वाइफ बनवण्याचे धंदे सतत चालू असतात. कोणताही सध्याचा सामाजिक इश्यू घेऊन त्याचा संबंध स्त्रियांनी शिक्षण घेतले, करीयर्स केली याच्याशी जोडणे हा प्रकार माहीत आहे. त्या सगळ्या प्रकाराला विरोधच आहे. आणि अशा प्रकारांची यथेच्छ खिल्ली उडवायलाच हवी.
पण ती पोस्ट वाचून मला असे वाटले की डेटिंग, मॅचमेकिंग याच्या मर्यादित संदर्भात तो विचार चुकीचा नाही. तेथे आकर्षण जरूरी आहे. जेंडर डायव्हर्सिटीज सोडल्या तर बहुतांश केसेस मधे हे आकर्षण विरूद्धलिंगी असते. तेथे फेमिनाइन आणि मॅसक्युलिन क्वालिटीज जाणवणे आवश्यक असते.
आता यात करीयरचा संबंध कोठे आला? तर त्याचे कारण असे आहे की पुरूषांना करीयरमधे पुढे जाण्याकरता ज्या क्वालिटीज लागतात त्या, आणि स्त्रियांच्या दृष्टीने आकर्षक वाटण्याकरता ज्या लागतात त्या, दोन्हीत फारसा फरक नाही. बर्याच क्वालिटीज आहेत पण ढोबळपणे एखादी गोष्ट घडवून आणण्यात पुढाकार घेणे हे मुख्य. याउलट स्त्रियांना या दोन्ही क्वालिटीज मधे कसरत करावी लागते. करीयरमधे पुढे जायला जे लागेल ते डेटिंगमधे, मॅचमेकिंगमधे उपयोगी पडेल असे नाही. तेव्हा कोणी डेटिंग कोच असे म्हणत असेल की तुम्ही कंपनीत खूप यशस्वी असाल व धडाडीने काम करत असाल आणि संध्याकाळी जर डेटवर जाणार असाल किंवा कोणाला नव्याने भेटणार असाल तर ते ऑफिसमधले बेअरिंग ऑफिसमधेच ठेवा - तर ते चुकीचे वाटत नाही. बाकी समान स्वातंत्र्ये, समान हक्क वगैरे वर जाऊ लागले तर ते बकवासच आहे.
करीयर मधे पुढे जायला स्त्रियांना ऑफिसेस मधे एक प्रकारचे बेअरिंग घ्यावे लागत असावे (असा माझा अंदाज आहे), कारण ऑफिसेसमधल्या सिस्टीम्स या पहिल्यापासून पुरूषांनी पुरूषांकरता बनवलेल्या आहेत. तेथे आक्रमकपणा, इतरांवर सत्ता गाजवता येणे, बरोबरच्या लोकांकडून कामे करवून घेणे ई प्रकार अशा ऑफिसेसमधे पुरूषी पद्धतीने होत आलेले आहेत. त्या तुलनेत ऑफिसेसमधे स्त्रियांचे प्रमाण अजून इतके नाही. सीईओज, डिपार्टमेण्टल हेड्स वगैरे मधे स्त्रियांचे प्रमाण अजूनही कमी आहे - हा मी लावलेला शोध नव्हे, समानतेबद्दलचे बहुतांश पब्लिक रिपोर्ट्स हेच सांगतात. यामुळे पुरूषांनी बनवलेल्या पारंपारिक पद्धतींपेक्षा वेगळ्या पद्धतीने, स्त्रियांच्या नैसर्गिक वागण्यातून तयार होणार्या पद्धती जितक्या विकसित होत जातील तितका हा फरक कमी होईल. म्हणजे एखाद्या कंपनीत बोर्ड पासून ते कर्मचार्यांपर्यंत सगळ्याच महिला असतील व त्यांचे ग्राहकही महिलाच असतील, तर त्या बोर्ड मिटिंग्ज चालवणे, सेल्स आणि मार्केटिंग करणे, निगोशिएशन्स करणे हे कसे करतील हे पाहिले तर कळेल की स्त्रिया मुळात हे वेगळ्या पद्धतीने करतात की नाही. तसे झाले तर मग स्त्रियांना दोन्हीकडे काही वेगळे वागण्याची गरज पडणार नाही.
हे मुळात करावं लागत नाही ना?
हे मुळात करावं लागत नाही ना? कोणी आवडलं की आपण आपोआप मोल्ड होतो. 'जोडीदार निवडायचा आहे!' असं कोट अन कोट 'फॉर डमीज' सारखं कशाला करायला हवंय? म्हणजे असा जोडीदार मिळाला की हरदासाची कथा पूर्वपदावर येणार का? त्यापेक्षा आहे त्या स्वभावात जोडीदार मिळेल तर बघा. तसं की कोणी आवडलं की आपले हार्मोन्स मोल्ड व्हायला लागतातच. तशीच आपली जडणघडण झाली आहे ना?
ऑफिसमधले बेअरिंग ऑफिसमधेच
ऑफिसमधले बेअरिंग ऑफिसमधेच ठेवा >>>
पॉईंट असा आहे की ऑफिसमध्ये किंवा कुठेही लीड करताना बेअरिंग घेतले जात नाही. ते आपोआप होते, बरे वाईट अनुभव येऊन स्वभाव घडत जातो.
आणि समजा डेटवर जाताना फेमिनाईन एनर्जीचे बेअरिंग घेतले तरी प्रत्यक्ष आयुष्य जगताना ते गळून पडणारच ना?
+१
मला ही काकाफॉ पोस्ट pseudo- feminist वाटली. असा काही शब्द आहे की नाही माहीत नाही पण तयार झाला आताच. म्हणजे शिक्षण, नोकरी, करियर ठीक आहे पण खरं सुख मात्र पुरुषांना समजून घेऊन सुखी करण्यात आहे. "सबमिसिव्ह व्हा" असा सूर आहे. कुठेतरी तडजोड करा म्हणजे फेमिनिन एनर्जी अशी सांगितले आहे. सॉफ्ट साईड म्हणायचे असेल तर दोघांच्याही पर्सनॅलिटीत असतेच. पुरुषांनाही सॉफ्ट साईड असतेच, पण त्यांना माचोपणाचं बॅगेज दिलेलं असतं.
तडजोड कुठल्याही नात्याला कुणालाही करावी लागते असे म्हटले नाही. नातं दोघांचं आहे ना ? हे वपु सारखे एकानी पसारा केला की दुसऱ्यानी आवरायचं - प्रकार आहे. अजून तरी एक भंगार करंजी उपमा आठवली. दोघं मिळून पसारा करा आणि मग दोघं मिळून आवरा असं नाही. जेंडर सुद्धा न लिहिता समुपदेशन करता येत असेल ना! समुपदेशन नव्या नात्यासाठी आहे मग ते असे स्पेसिफिकली तडजोड करायला का सांगतेय?
कॉर्पोरेट बॉडी लँग्वेज पुरुष सुद्धा वागवत असतील, ऑथोरेटिव्ह बोलणं, मॅन्स्प्लेनिंग करणं हे त्यातूनच येते. माबोवरही ढिगाने करतात, ही कामाची जागा आहे का ? दिसली स्त्री की तिला समजावून सांगा हे कल्चरली आहे. मला हे त्याचंच रूप वाटलं. पुरुषांना स्त्रियांशी कम्युनिकेट करताना नॉर्मल राहता येत नाही सहसा. दोन माणसं बोलत आहेत एवढं नसतंच, काहीतरी पूर्वग्रह असतातच. अशा पोस्टींमधे सहसा पुरुषांना समजून घ्या, लहानाचं मोठं करा, चुका माफ करा तेच तुमचं खरं कर्तव्य आहे असा सूर असतो व तरच सुखी व्हाल हे गाजरही.
दोघांची प्रायॉरिटी करिअर असेल तर नातं असंही टिकणार नाही. दोघांची प्रायॉरिटी एकच असायला लागणार आहे. शिक्षण करिअर नोकरीशी जोडल्याने ते काकाफॉ झाले आहे. कुणाला काय आकर्षित करेल याची प्रत्येकाची जडणघडण वेगळी असेल. दोघांपैकी एकानीही कामाच्या ठिकाणचा स्ट्रेस डेटिंग करताना आणला की संपलंच, ते नातं बनणारच नाही. शेवटी सगळे मूळ स्वभाव कसा आहे याप्रमाणेच होणार आहे.
तू जर असं असं वागण्यापेक्षा तसं तसं वागलीस तर तुला चांगला नवरा नक्की मिळेल हे पथेटिक आहे. सोळा सोमवारचं व्रतच करा ना मग सगळे! उलट तू जशी आहेस तशीच वाग म्हणजे त्याला तुझं खरा स्वभाव कळेल आणि नातं आपोआपच प्रामाणिक आणि निरोगी राहील असं वाचायला आवडलं असतं.
अशा पोस्टींमधे सहसा पुरुषांना
अशा पोस्टींमधे सहसा पुरुषांना समजून घ्या, लहानाचं मोठं करा, चुका माफ करा तेच तुमचं खरं कर्तव्य आहे असा सूर असतो व तरच सुखी व्हाल हे गाजरही. >>> हो "लाइफ" बद्दल असे कोणी सांगत असेल तर ते बकवास आहे. मी फक्त डेटिंग/मॅचमेकिंग/स्थळ शोधणे संदर्भात बोलतोय.
बेअरिंग बद्दल - शब्द कदाचित चपखल नसेल. भूमिकेत शिरताना आवर्जून घेतात तसे बेअरिंग म्हणायचे नव्हते. समोरची परिस्थिती पाहून तिथे यशस्वी व्हायला जे करावे लागते तेच म्हणायचे होते.
मलाही तुझ्या पोस्टचा आशय
मलाही तुझ्या पोस्टचा आशय खटकला नाही पण मूळ काकाफॉ का खटकले या नादात ते लांबलचक लिहिलेय.
डॉक्टर नाही. फिजियोथेरपिस्ट
डॉक्टर नाही. फिजियोथेरपिस्ट आहे. हे लोक स्वतःला डॉक्टर म्हणवून घेतात.>>>> OMG... That's personal
मोहना यांची निरभ्र कथा
मोहना यांची निरभ्र कथा वाचताना बॅकग्राउंडमध्ये (डॉ ) मैथिली सावंत यांची इथे आलेली पोस्ट डोक्यात वाजत राहिली.
वाचून आले, आवडली.
वाचून आले, आवडली.
कथा म्हणून आवडली. पण विचार
कथा म्हणून आवडली. पण विचार आवडले नाहीत.
मूळ विषयाकडे परत जाऊ या ....
मूळ विषयाकडे परत जाऊ या .......
एका शेतकऱ्याला एक सुंदर मुलगी होती. एक तरुण तिच्याशी लग्न करण्याच्या इच्छेने शेतकऱ्याकडे गेला.
तो म्हणाला, "मला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे."
शेतकरी हसून म्हणाला, "तू शेतात जा. मी एकामागोमाग तीन बैल सोडणार आहे. त्या तिन्हीपैकी कोणत्याही एका बैलाची शेपटी तू पकडलीस, तर मी माझ्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावून देईन."
ही अट ऐकून तरुण आनंदाने शेतात जाऊन उभा राहिला.
गोठ्याचा दरवाजा उघडला आणि एक प्रचंड, रौद्र दिसणारा बैल बाहेर आला. तरुणाने आयुष्यात इतका भला मोठा बैल कधीच पाहिला नव्हता. तो घाबरला आणि मनात म्हणाला, "हा नको... पुढचा बघू." तो बाजूला झाला आणि बैल निघून गेला.
थोड्याच वेळात दुसऱ्यांदा दरवाजा उघडला. यावेळी पहिल्यापेक्षाही अधिक विशाल आणि भयंकर बैल बाहेर आला. तरुणाच्या मनात आलं, "अरे, पहिलाच बरा होता." पण यावेळीही त्याने संधी सोडली.
तिसऱ्यांदा दरवाजा उघडला. आता मात्र तरुणाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. यावेळी एक लहान, बारीक आणि अशक्त दिसणारा बैल बाहेर आला.
बैल जवळ येताच त्याने झटकन शेपटी पकडण्यासाठी हात पुढे केला...
पण आश्चर्य! त्या बैलाला शेपटीच नव्हती.
बोध
जीवनात प्रत्येकाला संधी मिळते. काही संधी सोप्या असतात, तर काही कठीण आणि आव्हानात्मक. अनेकदा आपण अधिक चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत असताना हातातली संधी गमावतो. आणि एकदा निसटलेली संधी पुन्हा तशीच परत येईल याची खात्री नसते.
म्हणून योग्य वेळ ओळखा, धैर्याने निर्णय घ्या आणि मिळालेल्या पहिल्या योग्य संधीचा सदुपयोग करा. योग्य वेळी घेतलेला निर्णयच अनेकदा आयुष्याची दिशा बदलतो.
--- अरे प्रश्न काय नि पण काय लावलाय नि उत्तर काय ?
सात शेपट्यांच्या उंदराची
सात शेपट्यांच्या उंदराची गोष्ट आठवली
पण आश्चर्य! त्या बैलाला
पण आश्चर्य! त्या बैलाला शेपटीच नव्हती.
>>>

उलट तू जशी आहेस तशीच वाग
उलट तू जशी आहेस तशीच वाग म्हणजे त्याला तुझं खरा स्वभाव कळेल आणि नातं आपोआपच प्रामाणिक आणि निरोगी राहील असं वाचायला आवडलं असतं.>> अनुमोदन
आई…
आई…
आज मुलाने नेमकी कोणती खोडी काढली असेल कोण जाणे!
मुख्याध्यापकांनी एका आईला अचानक शाळेत बोलावलं आणि म्हणाले,
"तुमच्या मुलाने आज 'जर माझ्या आईला एक दिवसाची सुट्टी मिळाली तर…' या विषयावर असा निबंध लिहिला आहे की संपूर्ण स्टाफरूममध्ये आधी सगळे हसत होते... आणि नंतर सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आलं."
आई घाबरतच खुर्चीवर बसली.
तिला वाटलं, मुलाने काहीतरी मोठी खोडी केली असणार.
मुख्याध्यापकांनी हसत तिच्या हातात वही दिली आणि म्हणाले,
"ही घरी जाऊन वाचू नका... इथेच वाचा."
वहीच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं—
"जर माझ्या आईला एक दिवसाची सुट्टी मिळाली तर..."
पूर्वी मला वाटायचं की माझी आई जगातली सर्वात रागीट बाई आहे.
ती सकाळी पाच वाजता उठवते. अभ्यास करायला लावते. डबा पूर्ण संपवला नाही तर ओरडते. उशिरापर्यंत मोबाईल वापरला तर काढून घेते. सुट्टीच्या दिवशीही म्हणते— "खोली आवर."
मला वाटायचं... काश! माझी आई एक दिवस कुठेतरी निघून जावी.
पण गेल्या सोमवारी आई आजारी पडली. डॉक्टरांनी तिला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली.
त्या दिवशी पहिल्यांदाच आई खरोखरच अंथरुणातून उठली नाही.
सकाळी गजर वाजला... पण माझे केस कुरवाळत "बाळा, शाळेला जायचं नाही का?" असं म्हणायला कोणीच आलं नाही.
मी उशिरा उठलो. युनिफॉर्म इस्त्री केलेला नव्हता. मोजे एका खोलीत, बूट दुसऱ्या खोलीत होते. डबा रिकामाच होता.
बाबा स्वयंपाकघरात उभे होते. त्यांनी पहिल्यांदाच पोळी करण्याचा प्रयत्न केला. पण पोळी गोल न होता भारताचा नकाशाच झाला.
तेव्हा मला पहिल्यांदा जाणवलं की आई एकाच वेळी किती कामं करते.
शाळेतून घरी आलो, तर दारात कोणी वाट पाहत नव्हतं.
आई अंथरुणात होती. तरीही हसत म्हणाली,
"आलास का माझ्या राजाला?"
मी म्हणालो, "आई, भूक लागली आहे."
ती उठण्याचा प्रयत्न करू लागली... पण वेदनेने पुन्हा झोपली.
त्या दिवशी पहिल्यांदाच मी स्वतःसाठी जेवण वाढून घेतलं.
जेवण थंड होतं... पण त्याहून जास्त थंड घर वाटत होतं.
रात्री मी पाहिलं, आईला खूप ताप होता. तरीही ती बाबांना विचारत होती—
"मुलाने दूध पिलं का?"
"गृहपाठ केला का?"
"उद्या त्याची ड्रॉईंगची वही ठेवायला विसरू नका."
तिला स्वतःच्या औषधांपेक्षा माझी जास्त काळजी होती.
दुसऱ्या दिवशी मी आईचा मोबाईल घेतला.
मला वाटलं त्यात गेम्स असतील.
पण त्यात सर्वात जास्त फोटो माझेच होते.
मी पहिल्यांदा शाळेत गेलो तो फोटो...
मी पहिल्यांदा सायकल चालवली तो फोटो...
मला ताप आला होता तो फोटो...
आईच्या मोबाईलमध्ये तिचा स्वतःचा एकही चांगला फोटो नव्हता.
सगळे फोटो माझेच होते.
त्या दिवशी मला समजलं...
आई स्वतःचं आयुष्य जगत नाही... ती आपलं आयुष्य जगत असते.
तिसऱ्या दिवशी मी आईचे पाय दाबले.
ती हसून म्हणाली,
"आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?"
मीही हसलो... पण डोळ्यात पाणी होतं.
मला आठवलं...
मी कितीतरी वेळा तिला म्हटलं होतं—
"तुला काहीच येत नाही... तू फक्त ओरडत राहतेस."
पण खरं तर मला काहीच येत नव्हतं.
माझा शाळेचा शर्ट कपाटात आपोआप येत नाही...
डबा आपोआप भरला जात नाही...
अंथरूण आपोआप आवरत नाही...
माझ्या आवडीचं जेवण आपोआप बनत नाही...
या सगळ्यामागे माझ्या आईची झोप, तिचा वेळ आणि तिचं संपूर्ण आयुष्य असतं.
आता जर देवाने मला विचारलं की जगातलं सर्वात कठीण काम कोणतं?
तर मी म्हणेन— "आई होणं."
कारण आईला कधीच सुट्टी नसते.
तिला ताप असो... तरी घर चालतंच.
तिला वेदना असोत... तरी मुलांचीच काळजी असते.
तिला रडावंसं वाटत असलं... तरी ती हसत जेवण वाढते.
आता मी देवाला कधीच म्हणणार नाही की माझी आई एक दिवसासाठी कुठेतरी जाऊ दे.
मी फक्त एवढंच म्हणेन—
"देवा... माझं उरलेलं आयुष्यही माझ्या आईला दे."
"कारण आई घरात असेल... तर छोटंसं घरही स्वर्गासारखं वाटतं."
निबंध इथेच संपला.
वही हातात धरताना आईचे हात थरथर कापू लागले.
तिच्या डोळ्यातले अश्रू वहीच्या पानांवर पडू लागले.
तिला आठवलं...
गेल्या महिन्यात रागाच्या भरात मुलाने म्हटलं होतं—
"तुला फक्त ओरडताच येतं."
त्या दिवशी ती रात्रभर रडली होती.
पण आज त्याच मुलाने, कुणीही न सांगता, तिचं संपूर्ण आयुष्य शब्दांत मांडलं होतं.
मुख्याध्यापक हळूच म्हणाले—
"मुलं आपले शब्द ऐकत नाहीत... पण आपला त्याग मात्र नक्की ओळखतात. फक्त त्यांना समजायला थोडा वेळ लागतो."
आई घरी आली.
मुलगा धावत दारात आला.
यावेळी त्याने काहीच बोललं नाही.
फक्त आईला घट्ट मिठी मारली.
आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
दोघेही शांत होते...
पण त्या शांततेत हजारो शब्द दडले होते.
त्या दिवशी पहिल्यांदाच मुलाने स्वतःच आपली ताटली उचलली...
स्वतःचे बूट स्वच्छ केले...
आणि रात्री झोपण्यापूर्वी आईजवळ जाऊन म्हणाला—
"आई... आजपासून तुला सुट्टी देणार नाही... पण तुला कामात कधीच एकटंही सोडणार नाही."
आई हसली.
तिला वाटलं, तिचा सगळा थकवा त्या एका वाक्यात विरघळून गेला.
लक्षात ठेवा...
मुलांना आई-वडिलांची किंमत ते त्यांच्या साठी सर्व काही करत असताना कळत नाही. ती तेव्हा कळते, जेव्हा तेच हात थकायला लागतात. म्हणून वाट पाहू नका. आजच आपल्या आई-वडिलांजवळ बसा, त्यांचा हात हातात घ्या आणि एवढंच नक्की सांगा—
"तुम्ही आहात म्हणून माझं जग सुंदर आहे."
Msg चांगलाय पण सेंटी केलंय
Msg चांगलाय पण सेंटी केलंय उगाच
त्यागाला glorify करण्यापेक्षा आधीपासून सर्वांनी आपापल्या कामांची जबाबदारी उचलवी घरात असेल नाहीतर बाहेर
कुणीही घरातल्या एकावर भार टाकू नये
इतकं सोपं आहे बोलायला
<<त्यागाला glorify
<<त्यागाला glorify करण्यापेक्षा आधीपासून सर्वांनी आपापल्या कामांची जबाबदारी उचलवी घरात असेल नाहीतर बाहेर
कुणीही घरातल्या एकावर भार टाकू नये>> +१००
स्टाफ रूम मधे आधी सगळे हसत का
स्टाफ रूम मधे आधी सगळे हसत का होते पण ? ( कु का त कु का)
त्यागाला glorify करण्यापेक्षा
त्यागाला glorify करण्यापेक्षा आधीपासून सर्वांनी आपापल्या कामांची जबाबदारी उचलवी >>> १००+
स्टाफ रूम मधे आधी सगळे हसत का होते पण ( कु का त कु का) >>> हसत होते ना? हसत होत्या असं लिहिलं असतं तर आश्चर्य वाटलं असते.
लग्नांनंतर सुद्धा प्रेम होते.
लग्नांनंतर सुद्धा प्रेम होते...
आजच्या युगात बहुतेकांना प्रियकर किंवा प्रेयसी असते. काही व्यक्तींना तर अरेंज मॅरेज ची भीती वाटते. त्यांचे मत असे असते की ज्या व्यक्तीला आपण भेटलो नाही, ओळखत नाही त्या व्यक्तीसोबत आयुष्य कसे काढायचे. पण असा विचार करणे चुकीचे आहे. लग्न हे एक असे बंधन आहे जे दोन व्यक्तींना नाही तर दोन कुटुंबाना जोडते.
राहुल हा एका बँकेत मॅनेजर आहे. त्याचे लग्नाचे वय झाले होते म्हणून त्याची आई त्याच्यासाठी स्थळ पाहत होती. तिच्या ओळखीच्या व्यक्तीने तिला एका सरिता नावाच्या मुलीचा फोटो दिला आणि असे सांगितले की ही मुलगी तुमच्या राहुल साठी योग्य आहे. आईला सरिता चा फोटो खूप आवडला. जेव्हा राहुल घरी आला तेव्हा आईने त्याला सरिताचा फोटो दाखवला. त्याने आयुष्यात कधीच प्रेम केले नव्हते. पण सरिताचा फोटो बघून त्याच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. कदाचित त्याला तिचा फोटो बघून तिच्यावर प्रेम झाले होते. तिचा फोटो पाहिल्यावर त्याला तिला पहायची घाई झाली होती. त्याच्या आईने सरिताच्या आई-वडिलांनकडून बघायच्या कार्यक्रमाची वेळ निश्चित करून घेतली. शेवटी तो दिवस आला त्याचे आईवडील आणि त्याचा लहान भाऊ हे चौघेजण तिच्या घरी जायला निघाले. जस जसे तिचे घर जवळ येत होते तस तसे राहुलचे हृदय खूप धडधडत होते. जेव्हा तो घरात शिरला तेव्हा सरिताच्या आईने त्याचे स्वागत केले. पण त्याचे मन तिलाच शोधत होते. दोघांच्या आई-वडिलांचे सवांद चालू होते. पण राहुल चे मन फक्त सरितालाच शोधत होते. जेव्हा सरीताची आई म्हणाली की, मी सरिताला आणते.
तेव्हा तो एकदम कासावीस झाला. सरिताची आई सरिताला घेऊन आली. राहुलने जेव्हा तिला समोर पहिले. तेव्हा तो तिला बघतच राहिला. पण सरिता खाली मान घालून होती. ती कोणाकडे बघत नव्हती. कदाचित तिला भीती वाटत असेल. तिने राहुलकडे सुद्धा बघितले नाही. राहुलला वाटले हे सगळं तिच्या मनाविरूद्ध तर नाही. दोघांच्या आई-वडिलांनी एकमेकांना आवडी निवडी विचारण्यासाठी बाहेर पाठवले. दोन मिनिट तर शांततेने गेला.
शेवटी राहुल ने तिला विचारले की हे लग्न तुझ्या मनाविरूद्ध आहे का?
सरिता मान खाली घालूनच नाही बोलली. बाकीचा वेळ शांततेत गेला. त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाची तारीख ठरवली.
तो दिवस आला त्यांच्या लग्नाची वेळ आली. दोघेही अंतरपाटावर जन्मोजन्मीची साथ देण्याचे वचन घेत होते. लग्न होऊन जेव्हा ती माहेरचा निरोप घेत होती तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू त्याने पहिले होते. त्याने तिचा हात धरला आणि तिला धीर दिला. त्याच वेळी पहिल्यांदाच वरती मान करून त्याच्या डोळ्यात पहिले आणि त्याच्या डोळ्यात थांबलेले अश्रू बघून तिच्या मनात त्याच्या विषयी आदर वाढला.
लग्नाच्या रात्री जेव्हा तो रूम मध्ये गेला तेव्हा सरिता त्याचा रूम मध्ये होती. त्याला वाटले ती घाबरली असेल म्हणून तो रूम मधून बाहेर जात होता तेव्हा तिने अहो म्हणून हाक मारली.
राहुलने खरतर पाहिलांदाच तिचा आवाज ऐकला होता.
तो तिच्या जवळ गेला आणि बसला.
ती म्हणाली की, "मला तुमच्याशी काही तरी बोलायचे आहे”.
तो म्हणला, "हा बोल ना”,
ती म्हणाली, “माझे स्वप्न होते की माझे कोणावर तरी प्रेम असावे आणि मी त्याचाशीच लग्न करावे."
त्यामुळेच जेव्हा तुम्ही मला बघायला आला होतात,
तेव्हा मी तुमच्याशी काही बोलले नाही.
पण आज मी जेव्हा माझ्या माहेरच्यांचा निरोप घेताना रडत होती.
तेव्हा तुमच्या डोळ्यातील माझ्यासाठी थांबलेले अश्रू पाहून तुमच्या विषयी माझ्या मनात आदर वाढला आणि कदाचित तुम्ही मला आवडायला लागले आहात.
मी माझ्या साथीदारा बद्दल जे देवाकडे मागितले त्याच्या पेक्षा जास्त देवाने मला दिले आहे आणि मला आता कळाले की लग्नानंतर सुद्धा प्रेम होते....
~अनामिक
स्टाफ रूम मधे आधी सगळे हसत का
स्टाफ रूम मधे आधी सगळे हसत का होते पण ?
>>> ते रागीट बाई वाल्या पहिल्या वाक्याला हसत असावेत.
घरात बेसिक काम करायला
घरात बेसिक काम करायला शिकण्यासाठी आई आजारी पडण्याची अट असू नये. This mom needs to review and improve on her parenting skills
@ maitreyee
स्टाफ रूम मधे आधी सगळे हसत का होते हा प्रश्न मलाही पडलाय. निबंध वाचून डोळ्यात टचकन पाणी वगैरे येणे अपेक्षित असेल ना काकाफॉकर्त्याला ?
बाकी त्या राहुलचं आणि सरिताचं काही खरं नाही. २ मिनट बघून आणि तिने शब्दही न बोलता घरचे लग्नाची तारीख फायनल करताहेत. Blind play. 😀
कुठल्या जगात आहेत हे लोक ? आमच्या गावखेड्यातल्या मुलीसुद्धा नीट बोलून-समजून होकार नकार देतात लग्नाला आता.
वरच्या गोष्टीत राहुल इतक्या
वरच्या गोष्टीत राहुल इतक्या वेळा कासावीस झाला आहे कि त्याला withdrawal symptoms येत असावेत अशी मला दाट शंका आहे.
लग्नाच्या रात्री जेव्हा तो रूम मध्ये गेला तेव्हा सरिता त्याचा रूम मध्ये होती. त्याला वाटले ती घाबरली असेल म्हणून तो रूम मधून बाहेर जात होता
>> याचं काय लॉजिक कळलं नाही. तो काय राक्षस होता का तो निघून गेल्यावर भीती जायला? तिच्याशी बोलुन काय ती भीती घालवता आली नसती का?
पियु
पियु
कैच्या कै आहे हा राहुल!
कैच्या कै आहे हा राहुल!
सांगून आलेल्या पहिल्याच चि सौ कां च्या गळ्यात माळ घालून वरून तिच्या प्रेमात अगदी कासावीस होणारा....
या काच्या का फॉरवर्ड वाल्यांना निदान भाषा तरी सुसंगत, चांगली वापरावी अशी विनंती.आहे! अगदीच धेडगुजरी, भिकार अनुवादित वाटते.
तो दिवस आला त्यांच्या लग्नाची वेळ आली...
पण त्याचे मन तिलाच शोधत होते...
कोण लिहितं अशी कृत्रिम वाक्यं?
Pages