Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो सकाळ सकाळ शुभ संकष्टी,
हो सकाळ सकाळ शुभ संकष्टी, शुभ एकादशी वगैरे वाचून काय करायचं समजत नाही. त्याऐवजी किमान फराळाला तरी बोलवावं, ते नाही>>>>
हो नं… फराळ तर नाहीच वर मेले आमचे प्लॅन डगमगवतात.. आज मासे आणावे का असा विचार करावा तर हे शुभ संकष्टी, शुभ एकादशी वाचले की गेला प्लॅन बाराच्या भावात
वाचले सगळे कायच्या काय
वाचले सगळे कायच्या काय फॉरवर्ड आणि चर्चा.
हसून हसून पोट दुखायला लागले.....
*कसे घडले हे...*
*कसे घडले हे...*
*भारताच्या संयुक्त कुटुंब प्रणालीला तोडण्याची कटकारस्थानं*
*"कुटुंबं तुटली, की बाजार फुलतो" — हा केवळ एक विचार नाही, तर एक संपूर्ण नीती आहे.*
*आधुनिकतेकडे वाटचाल की लपवलेली गुलामी?*
*भारताची खरी ताकद काय होती?*
मुघल आले, ब्रिटिश आले, अनेक परकीय आक्रमणकर्ते आले — पण एक गोष्ट अखंड राहिली — *आपली संयुक्त कुटुंब प्रणाली*
हीच होती आपली खरी *"Social Security"*
ना पेन्शनची गरज, ना एकटेपणा, ना मानसिक आजारांचा कहर.
**मग पाश्चिमात्य जगाला ही व्यवस्था का नकोशी वाटू लागली?*
पश्चिमी देश म्हणजे वसाहतवादी — त्यांचा सर्वात मोठा धर्म म्हणजे बाजार.
पण भारतासारख्या देशात, जिथे लोक **सुख-दुःख सामायिक करतात, कमी खर्च करतात, आणि सामूहिक विचार करतात*— इथे त्यांचे उत्पादने विकली जाऊ शकत नव्हती.
मग एक हुशार योजना आखली गेली:
*"कुटुंबं फोडा, माणसं एकटी करा, आणि प्रत्येकजण ग्राहक होईल."*
**हा हल्ला कसा झाला?*
माध्यमांनी संयुक्त कुटुंबांना दाखवलं:
* "भांडखोर",
* "ओझं",
* "प्रगतीला अडथळा",
तर लहान कुटुंबं (nuclear families) दाखवली:
* "स्वातंत्र्य",
* "आधुनिकता",
* "स्वबळावर उभं राहिलेली".
**लक्षात ठेवा:* किती TV मालिकांमध्ये सासू-सुनांच्या भांडणांचा शेवट "वेगळं होणं" हाच उपाय म्हणून दाखवला जातो?
---
**ग्राहकवाद (Consumerism):*
जेव्हा प्रत्येक जोडपं वेगळं राहायला लागलं:
* 1 कुटुंब = 4 घरे
* 1 TV = 4 TV
* 1 स्वयंपाकघर = 4 स्वयंपाकघरे
* 1 कार = 4 स्कूटर + 2 कार
**बाजार तेजीत आला, पण समाज ढासळला.*
---
**या "सांघिक हल्ल्याचे" भारतात परिणाम काय झाले?*
**सामाजिक अधोगती:*
* ज्येष्ठ मंडळी आता "ओझं"
* मुले एकटी (आणि स्क्रीनमध्ये हरवलेली)
* नातेवाईक "उपलब्धच नाहीत"
* **संस्कारांचं स्थान आता "इन्फ्लुएन्सर्स" ने घेतलं आहे*
**मानसिक आरोग्याचा संकोच:*
* पूर्वी आजी-आजोबांशी जे बोललं जातं, ते आता "काउंसलर" कडे जातं
* जेव्हा प्रेमातून एकटेपणा सुटायचा, ते आता उपचारांनी कमी करावा लागतो
**बाजाराचे फायदे:*
* प्रत्येक समस्येसाठी एक प्रॉडक्ट
* प्रत्येक भावनेसाठी एक अॅप
* प्रत्येक सणासाठी "ऑनलाईन ऑर्डर"
*"सबस्क्रिप्शनने संस्कारांची जागा घेतली आहे."
---
**आजचा प्रश्न — आपण काय होत आहोत?*
"आधुनिकतेच्या" नादात आपण:
* संयुक्त कुटुंबं म्हणालो "जुनाट"
* आईवडील झाले "अडथळे"
* कुटुंबं झाली "नको असलेली भावना"
* नातेसंबंध झाले "अनफॉलो"
**पण विचार केलाय का?**
* **Amazon** ला फायदा होतो तेव्हा **तुम्ही दिवाळीत एकटे खरेदी करता**, कुटुंबासोबत बसत नाही.
* **Zomato** कमावतो तेव्हा **तुम्ही आईच्या हातचं अन्न टाळता**.
* **Netflix** चालतो तेव्हा **तुम्ही आजीच्या गोष्टी टाळता**.
---
**उपाय: अजूनही वेळ गेलेली नाही**
* **संयुक्त कुटुंबं "ओझं" नाहीत, ती "मूल्यवान संपत्ती" आहेत.**
* मुलांना ग्राहक म्हणून नव्हे, तर **संस्कारित माणूस** म्हणून वाढवा.
* ज्येष्ठांना घराबाहेर काढू नका — **त्यांचा अनुभव Google पेक्षा श्रेष्ठ आहे.**
* सण "खरेदीसाठी" नव्हे, तर **उत्सवासाठी* साजरे करा.
* **अॅप्स नव्हे, प्रेम वाढवा* — म्हणजे एकटेपणा आपोआप कमी होईल.
---
**निष्कर्ष:**
"पश्चिम जगाने व्यापारासाठी कुटुंबं फोडली, आणि आपण 'आधुनिक' होण्यासाठी आपली ओळख विकली."
*आता थांबण्याची, विचार करण्याची आणि आपल्या संस्कारांकडे परतण्याची वेळ आली आहे — नाहीतर पुढची पिढी 'संयुक्त कुटुंब' म्हणजे काय, ते समजून घेण्यासाठी Google वापरेल.*
--- लेखक अज्ञात
ज्येष्ठांना घराबाहेर काढू नका
ज्येष्ठांना घराबाहेर काढू नका — त्यांचा अनुभव Google पेक्षा श्रेष्ठ आहे>>>>>
Netflix** चालतो तेव्हा **तुम्ही आजीच्या गोष्टी टाळता>>>>>> आजीच्या गोड गोड गोष्टी अशी सिरीज काढता येईल Netflix वर.
सासू सून शोज बंद होणार असतील,
सासू सून शोज बंद होणार असतील, पाहुण्याच्या काठीने का होईना... माझी तयारी आहे.
पूर्वी आजी-आजोबांशी जे बोललं
पूर्वी आजी-आजोबांशी जे बोललं जातं, ते आता "काउंसलर" कडे जातं
>>>> यासाठी एकत्र राहण्याची गरज नाही. आजी-आजोबा किंवा कुटुंबातील इतर सदस्य सेन्सिबल असले तर दूर राहूनही उत्तम संबंध राहू शकतात.
पाश्चात्य जगाला भारतातील कुटुंब मोडण्यात काय इंटरेस्ट? त्यांना त्यांचे उद्योगधंदे नव्हते काय? सगळे काकाफॉ लेखकाच्या मनाचे खेळ आहेत.
एवढी हौस असेल तर लेखकाने समविचारी लोकांचं कुटुंब स्थापन करून काय ते प्रुव्ह करावं.
बाकी मार्केट कंझम्प्शन आर्थिक स्थितीवर अवलंबून असतं. जेवढे पुरूष तेवढ्या दुचाकी/गाड्या हे संयुक्त कुटुंबातही व्हायचं/ आजही होतं.
@अमितव >>> संयुक्त कुटुंब आणि त्याची भलावण ही सर्व सासू-सुना सिरीअलची की रिक्वायरमेंट आहे. साप कसा मरेल?
आजीच्या गोड गोड गोष्टी अशी
आजीच्या गोड गोड गोष्टी अशी सिरीज काढता येईल Netflix वर. >>>>
सासू सून शोज बंद होणार असतील, पाहुण्याच्या काठीने का होईना... माझी तयारी आहे. >>>>
पाश्चात्य जगाला भारतातील कुटुंब मोडण्यात काय इंटरेस्ट? त्यांना त्यांचे उद्योगधंदे नव्हते काय? >>>>
नेटफ्लिक्सवरच्या गोष्टी आजी सांगू लागली तर मुले तिलाच काउन्सेलरकडे पाठवतील.
**लक्षात ठेवा:* किती TV मालिकांमध्ये सासू-सुनांच्या भांडणांचा शेवट "वेगळं होणं" हाच उपाय म्हणून दाखवला जातो? >>> मी पाहिलेल्या एकाही सिरीज मधे हे नाही
आणि आजकाल सासू सुनांची भांडणे फारशी नसतात. सासूला एक "चांगली" सून असते. सुरूवातीला सासू तिच्यावर खार खाउन असते पण पाच-सहाशे व्या एपिसोडपर्यंत ती तिचे "मन जिंकते". त्या घरात किमान अजून एक रिकामटेकडी स्त्री असते. ती सगळ्या कारवाया करत असते. कोणी वेगळे बिगळे होताना दाखवत नाहीत. तितकेही "आधुनिक" काहीही नसते त्यात.
पाच-सहाशे व्या एपिसोडपर्यंत
पाच-सहाशे व्या एपिसोडपर्यंत ती तिचे "मन जिंकते >>>> अगदी…
मला फेबु रिल्स दाखवते त्यात
मला फेबु रिल्स दाखवते त्यात गरिबावर घमेंडी ओरडतो आणि नंतर तो गरिब बॉस्/सासु/इतर गर्भश्रीमण्त कॅटेगरीतला निघतो. सेम असेच रिल्स परदेशी लोकांचेही दिसतात. हाय फाय स्टोरमध्ये आलेल्या काळ्या माणसाची यथेच्छ निंदानालस्ती करुन पोलिस बोलावण्यापर्यंत बात गेल्यावर तो काळा स्टोर ओनर निघतो.
या एका बाबतीत दोन्ही कडची जनता एकसारखी मानसिकता बाळगत असल्याचे पाहुन धन्य वाटले.
हो हे रिल्स मलाही खूप येतात..
हो हे रिल्स मलाही खूप येतात....
अगदी लांबण लावून आणि खूपच अतार्किक घमेंडी स्त्रिया दाखवतात.... असे कोण बोलते?
तसे थोडेफार बोलणारे आहेत. पण
तसे थोडेफार बोलणारे आहेत. पण मला काल आलेल्या एका रिलमधल्या घमेंडी बाईसारखे ऑफिसात साडी नेसुन आलेल्या अनोळखी वृद्ध स्त्रीला लगेच झाडुवाली समजुन तुच्छ लेखत जमिनीवर पडलेला कचरा उचलायला लावत नाही. पुढच्या भागात बहुतेक ती वृद्ध मॅनेजरची आई निघणार असे वाटले. मी शोधायचे कष्ट घेतले नाही
पाश्चात्य जगाला भारतातील
पाश्चात्य जगाला भारतातील कुटुंब मोडण्यात काय इंटरेस्ट? त्यांना त्यांचे उद्योगधंदे नव्हते काय? ….
True that 👍
काहीच्या काही फॉरवरर्ड्स
काहीच्या काही फॉरवरर्ड्स सारखे काहीच्या काही AI व्हिडिओ/ रिल्स येत असतात.
मी तर त्या "चुका शोधा" म्हणून बघतो आणि नंतर सोडून देतो. त्यातले संवाद, लगेच बदलणारे बदलणारे कपडे, वस्तू बघायला मजा येते.
Especially रेसिपी व्हिडिओ
सॉरी इथे अवांतर झाले
ए आय मधले ते लहान पोरांचे
ए आय मधले ते लहान पोरांचे जोडपे मला आवडते. बाकी ए आय मी अजिबात बघत नाही.
मी तर त्या "चुका शोधा" म्हणून
मी तर त्या "चुका शोधा" म्हणून बघतो आणि नंतर सोडून देतो. त्यातले संवाद, लगेच बदलणारे बदलणारे कपडे, वस्तू बघायला मजा येते. >>> मी पण. आता काही content creaters त्या एआय रील्स वर रील्स बनवतात
मोदी कौन है ?
मोदी कौन है ?
इसका जवाब एक जानकार राजनैतिक वैद्य ने बड़ा सुंदर समझाया।
आयुर्वेद और मेडिकल सांईस में शहद को अमृत के समान माना गया हैं।
लेकिन आश्चर्य इस बात का है कि शहद को अगर कुत्ता चाट ले तो वह मर जाता हैं।
यानी जो मनुष्यों के लिये अमृत हैं वह शहद कुत्तों के लिये जहर है।
शुद्ध देशी गाय के घी को आयुर्वेद और मेडिकल सांईस औषधीय गुणों का भंडार मानता हैं।
मगर आश्चर्य, गंदगी से प्रसन्न रहने वाली मक्खी कभी शुद्ध देशी घी को नहीं खा सकती।
गलती से अगर मक्खी देशी घी पर बैठ कर चख भी ले तो वो तुरंत तड़प तड़प कर वहीं मर जाती है।
आर्युवेद में मिश्री को भी औषधीय और श्रेष्ठ मिष्ठान्न माना गया हैं।
लेकिन आश्चर्य, अगर गधे को एक डली मिश्री खिला दी जाए, तो कुछ समय में उसके प्राण पखेरू उड़ जाएंगे।
यह अमृत समान श्रेष्ठ मिष्ठान, मिश्री गधा कभी नहीं खा सकता हैं।
नीम के पेड़ पर लगने वाली पकी हुई निम्बोली में कई रोगों को हरने वाले औषधीय गुण होते हैं।
आयुर्वेद उसे "उत्तम औषधि" कहता हैं।
लेकिन रात दिन नीम के पेड़ पर रहने वाला कौवा अगर निम्बोली खा ले तो उस कौवे की मृत्यु निश्चित है।
मतलब, इस धरती पर ऐसा बहुत कुछ हैं... जो हमारे लिये अमृत समान हैं, गुणकारी है, औषधीय है...
पर इस धरती पर ऐसे कुछ जीव ऐसे भी हैं जिनके लिये वही अमृत... विष है।
मोदी वही गुणकारी अमृतमय औषधि है।
लेकिन कुत्तों (आतंकवादी-दंगाई),
मक्खियों (देशद्रोही-गंदगी),
गधों (वामपंथी सोच-राजनैतिक मूर्ख)
और
कौवों (स्वार्थी कपटी मीडिया) आदि के लिये... विष समान है।
इसलिये यह कुछ तत्व इतने भयभीत हैं।
*आपसे निवेदन करता हूं इस पोस्ट को सभी ग्रुप मे भेजिये |
सादर धन्यवाद
देश सर्वोपरि है । थोड़ा समय निकालकर पोस्ट जरूर पढ़ें।
मोदी है तो मुमकिन है।
योगी है तो हड़कंम्प है |
कम से कम पांच ग्रुप में जरूर भेजें
जय श्रीराम
A very realistic depiction of our best of the Prime Ministers, Shree Modiji.
हड़कंम्प म्हणजे?
हड़कंम्प म्हणजे?
हड़कंम्प म्हणजे >>>> ख़लबली है
हड़कंम्प म्हणजे >>>> ख़लबली है ख़लबली
एकदम मध, खडीसाखर आणि निंबोळी ??? एक पे कायम रहना. या तो गोडा या चतुर...
हड़कंम्प म्हणजे >>>> ख़लबली
हड़कंम्प म्हणजे >>>> ख़लबली है ख़लबली
हे असे फॉरवर्ड्स वाचून प्रतिक्रियेच्या दोन शक्यता माझ्यासाठी असतात, १. केस उपटत सैरावैरा धावणे २. निराशेच्या गर्तेत जाणे. मी शक्यतो पहिला पर्याय निवडून मग असे फॉरवर्ड ह्या ग्रुप मधे शेयर करते!
एकदम मध, खडीसाखर आणि निंबोळी ??? एक पे कायम रहना. या तो गोडा या चतुर... >>
(No subject)
जगभरात फक्त तीनच देशांना
जगभरात फक्त तीनच देशांना जमलेली ही कोणती गोष्ट भारताने करून दाखवली आहे?
विचार करा, लडाखच्या बर्फाच्छादित टेकड्यांवर किंवा राजस्थानच्या धगधगत्या वाळवंटात तयार झालेली वीज हजारो किलोमीटर दूर मुंबई, दिल्ली किंवा चेन्नईतल्या घरांपर्यंत पोहोचते कशी?
या शेकडो किलोमीटरच्या प्रवासात वीज मध्येच गायब का होत नाही आणि भारताने असा कोणता तांत्रिक चमत्कार केलाय ज्यामुळे आज संपूर्ण जग अवाक् झाले आहे?
आपल्या घरात फक्त एक बटन दाबले की लाईट लागते किंवा पंखा फिरू लागतो. पण ही वीज जिथे तयार होते तिथून आपल्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी तिला किती मोठा आणि कठीण प्रवास करावा लागतो, याचा आपण कधी विचार करतो का?
भारतात विजेची निर्मिती प्रामुख्याने एका ठिकाणी होते आणि तिची खरी गरज भलतीकडेच असते!
मग भारतात वीज नेमकी कुठे तयार होते आणि ती किती लांब न्यावी लागते?
आपल्या देशात कोळशावर चालणारे औष्णिक वीज प्रकल्प (Thermal Power Plants) प्रामुख्याने झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशा या कोळसा समृद्ध राज्यांत आहेत. तर मोठ्या सौर ऊर्जा पार्क (Solar Parks) आणि पवन ऊर्जा प्रकल्प राजस्थान, गुजरातचे वाळवंट, लडाख किंवा तामिळनाडूच्या किनारपट्टीवर आहेत.
पण या विजेचे मुख्य ग्राहक कोण आहेत? शेकडो आणि हजारो किलोमीटर दूर असलेली मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबादसारखी प्रचंड मोठी शहरे आणि औद्योगिक पट्टे!
म्हणजेच, वीज निर्मिती केंद्रापासून ती वापरणाऱ्या शहरांपर्यंतचे अंतर हे सहज १,००० ते २,००० किलोमीटर किंवा त्याहूनही अधिक असते.
पण इतक्या लांब अंतरावर वीज वाहून नेण्यात सर्वात मोठी अडचण कोणती?
जेव्हा वीज तारेतून वाहते, तेव्हा तारेच्या स्वतःच्या रोधामुळे (Resistance) विजेचे रूपांतर उष्णतेमध्ये होते आणि ती हवेत वाया जाते. यालाच तांत्रिक भाषेत विजेची गळती किंवा 'ट्रान्समिशन लॉस' म्हणतात.
अंतर जितके जास्त, तितकी विजेची गळती जास्त! जर आपण सामान्य दाबाने ही वीज इतक्या लांब पाठवली, तर वाटेतच बहुतांश वीज वाया जाईल आणि शहरांपर्यंत काहीच पोहोचणार नाही.
मग ही हजारो मेगावॉट वाया जाणारी वीज वाचवायची कशी? इथेच एन्ट्री होते विजेच्या 'सुपरमॅन'ची, म्हणजेच ट्रान्सफॉर्मरची!
ट्रान्सफॉर्मर म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर विजेचा दाब म्हणजेच व्होल्टेज गरजेनुसार प्रचंड वाढवणारे किंवा कमी करणारे यंत्र.
हे नक्की कसे काम करते? एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ.
समजा आपल्याला एका गावातून दुसऱ्या गावी खूप मोठे पाणी वाहून नेायचे आहे. जर आपण बारीक नळाने किंवा बादल्यांनी पाणी नेले, तर वाटेत खूप पाणी सांडेल आणि वेळही लागेल. पण तेच पाणी जर अत्यंत उच्च दाबाने (High Pressure) एका मोठ्या पाईपलाईनमधून सोडले, तर पाणी न सांडता वेगाने दुसऱ्या टोकाला पोहोचेल.
ट्रान्सफॉर्मर विजेच्या बाबतीत हुबेहूब हेच काम करतो! वीज निर्मिती केंद्रावर ट्रान्सफॉर्मर विजेचा दाब (Voltage) प्रचंड वाढवतो. व्होल्टेज जितके जास्त, तितका विजेचा प्रवाह (Current) कमी होतो आणि परिणामी तारेतील गळती जवळजवळ शून्य होते!
नंतर ती वीज शहरात पोहोचली की तिथले ट्रान्सफॉर्मर पुन्हा तो दाब कमी करून आपल्या घरासाठी सुरक्षित (२३० व्होल्ट) बनवतात.
पण मग यात भारताने असा काय ऐतिहासिक पराक्रम केला आहे?
भारतातील बीएचईएल (BHEL) या सरकारी कंपनीच्या अभियंत्यांनी तब्बल १२ लाख व्होल्ट म्हणजेच १२०० केव्ही क्षमतेचा पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा अल्ट्रा हाय व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर यशस्वीपणे तयार आणि तैनात केला आहे!
हा भारतातील आजवरचा सर्वात शक्तिशाली ट्रान्सफॉर्मर आहे. इतक्या प्रचंड व्होल्टेजवर काम करताना आतमध्ये अफाट उष्णता आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक दाब निर्माण होतो, ज्याला सुरक्षितपणे पचवणारे यंत्र बनवणे म्हणजे इंजिनिअरिंगचा एक अद्भुत आणि कठीण नमुनाच आहे.
तुम्हाला माहिती आहे का, हे अथांग तंत्रज्ञान जगातील किती देशांकडे आहे?
संपूर्ण जगात भारत, चीन, जपान आणि रशिया या फक्त चारच देशांकडे ही किमया साधण्याचे सामर्थ्य आहे!
अमेरिका, दक्षिण कोरिया किंवा युरोपमधील मोठे प्रगत देशही अजून हे प्रत्यक्ष तैनात करू शकलेले नाहीत.
२००९ मध्ये सुरू झालेला हा संशोधन प्रकल्प २०११ मध्ये डिझाईन झाला. तब्बल १५ वर्षे अत्यंत कडक चाचण्या घेतल्यानंतर, मध्य प्रदेशातील बिना येथील पॉवर ग्रिडच्या राष्ट्रीय चाचणी केंद्रात हा ट्रान्सफॉर्मर आता काम करू लागला आहे.
या शोधामुळे आता लडाख किंवा राजस्थानच्या दूरवरच्या भागातून तयार झालेली हरित ऊर्जा कोणतीही गळती न होता थेट आपल्या घरापर्यंत पोहोचेल. आपल्या भारतीय वैज्ञानिकांची ही जिद्द प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचवणारी आहे.
भारतीय अभियंत्यांच्या या अभूतपूर्व कामगिरीबद्दल आणि देशाच्या या महाझेपेबद्दल तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा!
अमेरिका, दक्षिण कोरिया किंवा
अमेरिका, दक्षिण कोरिया किंवा युरोपमधील मोठे प्रगत देशही अजून हे प्रत्यक्ष तैनात करू शकलेले नाहीत.>>>
.. तद्दन व्हॅट्सऍप अंकल/ आंटीजसाठी लावलेला ट्रॅप.. माहिती खरी असली तरी 'अर्धसत्य'. पाश्चत्य देशांत आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी नगर रचना नसते. त्यांचे सर्व मोठे पॉवर प्लांट्स हे शहरांच्या नजीकच असतात, मग गरज नसताना इतके मोठे ट्रान्सफॉर्मर्स काय सरते शेवटी उरावर ( उद्योगपती मित्रांच्या? ) घालायला तैनात करायचेत?
ट्रान्सफॉर्मर ला सुपरमॅन
ट्रान्सफॉर्मर ला सुपरमॅन म्हणून दोन मूव्ही फ्रॅन्चायझी मिक्स अप केल्या आहेत.
बाकी पोस्ट राजकीय नसावी. २०१४ च्या आधी काहीतरी चांगले घडल्याचा अस्पष्ट उल्लेख आहे.
हा फॉर्वर्ड आदित्य धर स्कूल
हा फॉर्वर्ड आदित्य धर स्कूल ऑफ प्रपोगंडामध्ये शिकलेल्या देशभक्ताने लिहिला असावा. म्हणजे २०१४ पूर्वी घड लेल्या चांगल्या गोष्टी २०१४ नंतर झाल्या असे दाखवणे
https://www.bhel.com/bhel-developed-indias-first-ultra-high-voltage-ac-1...
इथे तारीख ६ .२.२०१२ अशी दिली आहे
https://www.psuconnect.in/psu-news/bhel-clarifie-1200-kv-transformer-new...
आणि हा आजही एक्स्प्रिमेंटल
आणि हा आजही एक्स्प्रिमेंटल नेटवर्कच आहे. लडाखची उर्जा अजुन या १२००केव्ही मधुन मुंबईला आलेली नाही.
०१४ च्या आधी काहीतरी चांगले घडल्याचा अस्पष्ट उल्लेख आहे. >>
बाकी अमेरिकेला नावं ठेवायची असतील तर विजेच्या बाबत अगदी चपखल गोष्टी काल परवाच घडल्या. इंडीयाना मध्ये एआय डेटा सेंटरने चुकून टॉर्नेडो वॉर्निंग देणार्या सायरनचा विद्युत पुरवठा खंडित केला. हे झालं ही टॉर्नेडो यायच्या काहीच तास आधी.
एआय डेटा सेंटर अचानक इतकी वीज खेचुन घेत आहेत की अशीच घटना २२ जुलैला व्हर्जिनिया मध्ये घडली. इक्विपमेंट माल फंग्शन मुळे पॉवरसर्ज आला आणि शिकागो ते मायामी पूर्ण इस्टर्न ग्रिड मध्ये काही सेकंदाचा ग्लिच आला.
त्यातही तो सिंगल फेज
त्यातही तो सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आहे. इंडस्ट्री साठी तसा कामाचा नाही.
AC पेक्षा DC ट्रान्समिशन मध्ये लॉसेस कमी होतात, लांब पल्ल्यासाठी ते अधिक योग्य. आणि आपण High Voltage DC transmission केव्हाच सुरू केले आणि UHVDC सुद्धा एक दशकापूर्वी.
बाकी पोस्ट राजकीय नसावी. २०१४
बाकी पोस्ट राजकीय नसावी. २०१४ च्या आधी काहीतरी चांगले घडल्याचा अस्पष्ट उल्लेख आहे.>> Rule of thumb - Always take nationalism with a pinch of salt
हा नियम एकूणच ( not only about Nationalism) स्वतः न केलेल्या पण 'प्राउड फिल' व्हायला लावणाऱ्या प्रत्येक बाबतीत लागू.
काकाफॉ @ राजनैतिक वैद्य =
काकाफॉ @ राजनैतिक वैद्य = typical hate monger. Calling ppl who don’t like your idol कुत्ता, गधा, गंदगी-गू खानेवाली मक्खी, कौआ etc.
Sick.
@ ट्रान्सफॉर्मर काकाफॉ = धमाल
अतिशय महामूर्ख काकाफॉ
अतिशय महामूर्ख काकाफॉ माझ्याकडे आलेय आणि ते सगळ्यांनी छिन्नविछिन्न करावे म्हणून देतेय येथे. मी मुलींच्या शाळेत शिकलेय, त्यामुळे हा शाळेचा फक्त मुलींचा व्हाट्सॲप ग्रूप आहे. तेथे अधूनमधून रिग्रेसिव्ह पोस्टी येत असतात.
-------------
कालच कोचिंग निमित्ताने एका मुलीशी मी बोलले.
वय वर्ष ३१, एका टॉप MNC मध्ये सिनियर मॅनेजर, पॅकेज ४० लाखांच्या वर, दिसायला सुंदर आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी स्वतंत्र मुलगी.
पण तिच्या डोळ्यात पाणी होतं. ती मला म्हणाली, "मॅम, कॉर्पोरेट जगतात मी ज्या ज्या टार्गेटला हात लावला, ते मी अचीव्ह केलं. पण मग माझ्या आयुष्याचा जोडीदार शोधण्यात मी का अपयशी ठरतेय? मुलं भेटतात, पण १-२ डेट्सनंतर विषय तिथेच संपतो. मुलं घोस्टींग करतात. कळविण्याची तसदी सुद्धा घेत नाहीत. नक्की काय चुकतंय माझं?"
आजच्या जगात जिथे मुली शिकल्या व प्रगती करत आहेत, तिथे हा प्रश्न तिचा एकटीचा नाहीये.
आजकालच्या अनेक उच्चशिक्षित आणि कमावत्या मुलींची हिच कथा आहे. लग्नाच्या एरियात त्या struggle करताना दिसतात.
म्हणूनच अशा मुलींसाठी हि पोस्ट आहे.
मैत्रीणींनो,
आपण लहानपणापासून काय शिकलो? "अभ्यास कर, करिअर कर, पैसे कमवायला लाग. कोणावरही अवलंबून राहू नको, स्वतःच्या पायावर उभी राहा!"
बरोबर?
मी सुद्धा एका वर्कींग माॅमची मुलगी आहे आणि लहानपणी हेच शिकलेय.
परंतु या विचारांमुळे नक्की काय घडतंय माहितीये?
हे सगळं शिकून बहुतांश कमावत्या स्त्रिया नकळतपणे आपल्या 'मॅस्क्युलाईन एनर्जी' (Masculine Energy) मध्ये जास्त वावरायला लागल्या आहेत.
आता प्लीज लक्षात घ्या.
आपल्यातील मॅस्क्युलिन एनर्जी वाईट आहे असं माझं अजिबात म्हणणं नाही. हि ऊर्जा आपल्याला लक्ष्य गाठणे (Goal orientation), लढाऊ वृत्ती (Logic & Fighting mode), संरक्षण आणि नियंत्रण (Control & Protection) या सगळ्यात मदतच करत असते. ऑफिसमध्ये यश मिळवण्यासाठी ही ऊर्जा खूप गरजेची आहे. पण अडचण कुठे येते माहितीये?
जेव्हा आपण हीच 'कंट्रोलिंग आणि लढाऊ' वृत्ती आपल्या पर्सनल आयुष्यात किंवा डेटिंगमध्ये घेऊन येतो.
नात्यांमध्ये 'मॅस्क्युलाईन विरुद्ध मॅस्क्युलाईन' ऊर्जेचा सामना होतो, तेव्हा आकर्षण निर्माण होण्याऐवजी टक्कर होते.
एका टेरिटरीत दोन वाघ राहू शकतात का? नाही ना? तसच हे आहे.
पुरुषाला तुमच्यासोबत असताना 'रिलॅक्स' वाटण्याऐवजी तो तुमच्याकडे कॉम्पिटिशन म्हणून पाहू लागतो.
आता तुमचा मला प्रश्न असेल की "मैथिली, मग यावर उपाय काय?"
सांगते.
काल माझ्या त्या कोचीने सुद्धा मला हेच विचारलं की "मग मी माझी स्वप्नं, माझं करिअर सोडून देऊ का?"
मी तिला हसून म्हणाले "नाही. मुळीच नाही! तुला तुझं करिअर सोडायचं नाहीये, फक्त तुझ्यातील आंतरिक 'फेमिनाईन एनर्जी'ला कनेक्ट करायचं आहे."
आता त्यासाठी काही सोप्या टिप्स शेअर करते.
१.ऑफिसमधील लेडी 'बॉस' एनर्जी घरी आणू नका.
ऑफिसचे निर्णय, डेडलाईन्स आणि टार्गेट्स संध्याकाळी ऑफिसमधून निघाल्यावर तिथेच सोडून द्या. डेटवर किंवा घरी आल्यावर 'करिअर वुमन' ऐवजी एक 'कोमल, शांत आणि आनंददायी स्त्री' म्हणून जगा. छान फेमिनीन कपडे घालून डेटवर जा. चेहऱ्यावर रूक्ष भाव न ठेवता चेहऱ्यावर हास्य ठेवा. स्वतःबद्दल भरपूर बोलण्याऐवजी समोरच्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल जाणून घ्या. त्यांचं बोलणं शांतपणे ऐका.
२.'रिसीव्ह' करायला शिका. (Receiving Mode)
उच्चशिक्षित मुलींना 'सगळं स्वतःच करण्याची' सवय असते. पण या सवयीला बदला. नात्यात जेव्हा एखादा पुरुष तुमच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो, बिल देतो किंवा मदत करतो... तेव्हा "मी सुद्धा हे करू शकते" असं न म्हणता, गोड हसून थॅंक्यु म्हणत ती मदत स्वीकारायला शिका. यामुळे पुरुषाला त्याच्या 'प्रोव्हाईडर' असण्याचा आदर वाटतो.
३. लॉजिक सोडून 'फीलिंग्स' व्यक्त करा.
डेटवर असताना तुमची अचिव्हमेंट्सची लिस्ट किंवा लॉजिकल चर्चा करण्याऐवजी, तुम्हाला काय वाटतंय (Emotions & Feelings) ते व्यक्त करा.
उदाहरणार्थ- "या रेस्टॉरंटमधे जेवढा स्टाफ आहे तितकी लोकं आॅफिसमधे मी मॅनेज करते. म्हणूनच मला या वर्षी बेस्ट एम्प्लाॅई अवाॅर्ड मिळालं." हे नको. त्याऐवजी "मला या जागेचा एम्बियन्स आवडला. इथलं वातावरण खूप सुंदर आणि रिलॅक्सिंग वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय?"हे छान वाटेल.
४.सरेंडर होणे म्हणजे कमकुवतपणा नाही हे लक्षात ठेवा.
योग्य पुरुषासमोर स्वतःचे गार्ड्स थोडे खाली ठेवा. रूक्ष कोरडं न वागता मोकळं सहज वागा. नात्यात नियंत्रण ठेवण्यापेक्षा विश्वासाला आणि प्रेमाला जागा द्या.
मैत्रीणींनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.
हेल्थी मॅस्क्युलिन पुरुष तुमच्या बँक बॅलन्समधे नाही, तर तुमच्यासोबत असताना त्याला स्वतःबद्दल कसं वाटतं याच्यामधे जास्त इंटरेस्टेड असतो. ज्या मुलीची एनर्जी त्याला रिलॅक्स व मॅस्क्युलीन फिल देते तिच्यात तो आपला वेळ व एनर्जी इन्व्हेस्ट करतो. जेव्हा तुम्ही तुमच्या साॅफ्ट, आनंदी आणि स्त्रीसुलभ फेमिनीन ऊर्जेत असता, तेव्हा योग्य पुरुष आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतो!
म्हणूनच स्वतःच्या फेमिनीन एनर्जीशी कनेक्ट व्हा आणि आयुष्यात एका हेल्दी मॅस्क्युलिन पुरुषाला आकर्षित करा.
विचार करूया.
Dr. Maithili Savant
फेमिनीन एनर्जी कोच
एका टेरिटरीत दोन वाघ राहू शकत
मेरे पास आपापला बंगला है, गाडी है नोकर चाकर है तुम्हारे पास क्या है - तर मेरे पास फेमिनन एनर्जी है!
हा सारांश.
एका टेरिटरीत दोन वाघ राहू शकत नाहीत>>>>
एक वाघ आणि एक वाघीण? काय झू आहे का?
कोमल, शांत आणि आनंददायी स्त्री >>>>

तेव्हा योग्य पुरुष आपोआप तुमच्याकडे आकर्षित होतो!
>>> आपोआपच आकर्षित होत असेल ठीक आहे , नसेल होत तर पीडा गेली!
Pages