चित्रपटसंगीतातील खाद्यपदार्थ

Submitted by स्वाती_आंबोळे on 18 February, 2025 - 19:51

तुम्हाला आठवत असेल तर दोनतीन वर्षांमागे आपण या प्रकारचे हे खेळ खेळलो होतो:

१. चित्रपटसंगीत आणि बॉटनी
२. चित्रपटसंगीत आणि व्यवसाय
३. चित्रपटसंगीत आणि भूगोल
४. चित्रपटसंगीत आणि कालगणना

आज सहज या कॅटेगरीतला हा नवीन विषय सुचला. हिंदी/मराठी चित्रपटसंगीतात आलेले खाद्यपदार्थांचे उल्लेख.
फक्त पथ्य एकच - पदार्थात काहीतरी प्रक्रिया केलेली हवी, म्हणजे नुसतीच फळांची नावं किंवा विड्याबिड्याची पानं ऑलरेडी बॉटनीच्या धाग्यात येऊन गेली आहेत तर ती नकोत, नुसताच दुधाचा उल्लेख नको.

सुरुवात करून द्यायला ही मला आठवलेली गाणी:

मराठी
१. यमुनाजळासी जासी मुकुंदा, दध्योदन भक्षी... घनश्याम सुंदरा
२. डोइवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या, तांब्यात दुध हाये गायीचं, घेता का दाजीबा वाइच... काय गं सखू
३. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर... अरे संसार संसार
४. सण वर्षाचा आहे दिवाळी, आज राहू जाऊ उद्या सकाळी, जेवण करते पुरणाची पोळी, भात मी घातलाय रांधायला हो येऊ कशी तशी मी नांदायला
५. मिष्टान्ने कोठुन?! आणला कणीकोंडा रांधुन, सांगे आवर्जुन भाबडी विदुराची सुगरण... वानी रुचकरपणा, श्रीहरी विदुराघरी पाहुणा
६. अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला

हिंदी
१. चंदामामा दूर के पुए पकाए बूर के
२. क्यों न रोटियों का पेड हम लगा लें, आम तोडे, रोटी तोडे, रोटी आम खा लें, रोज रोज करती है क्यूँ ये झमेला... मुन्ना बडा प्यारा
३. आहें ना भर ठंडी ठंडी, खतरे की है ये ठंडी के गरम गरम चाय पी ले
४. दफ्तर को देर हो गयी, मुझे जल्दी से कॉफी पिलाना (यात तर रेसिपी पण आहे! Lol )
५. टॉफी, चूरण, खेलखिलौने, कुलचे, नान, पराठा, कर गये टाटा जब से बापू तूने डाँटा... बापू सेहत के लिये
६. जलेबीबाई!

तुम्हाला कुठली आठवतायत? Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हम भी अगर बच्चे होते नाम हमारा होता डबलू बबलु, खाने को मिलते लड्डू

जबतक रहेगा समोसे मे आलू, तेर रहुंगा ओ मेरी शालू

गदिमांच्या कवितेची लगेच आठवण झाली : नियमात बसत नसेल तर क्षमस्व
काय वाढले पानावरती,
ऐकून घ्यावा थाट संप्रती,
धवल लवण हे पुढे वाढले,
मेतकूट मग पिवळे सजले
आले लोणचे बहु मुरलेले,
आणि लिंबू रसरसलेले,
किसून आवळे मधुर केले,
कृष्णा काठचे वांगे आणले,
खमंग त्याचे भरित केले,
निरनिराळे चटके नटले,
चटण्यांचे बहु नवे मासले,
संमेलनची त्यांचे भरले,
मिरची खोबरे ती सह ओले,
तीळ भाजूनी त्यात वाटले,
कवठ गुळाचे मिलन झाले,
पंचामृत त्या जवळी आले,
वास तयांचे हवेत भरले,
अंतरी अण्णा अधीर जाहले!
भिजल्या डाळी नंतर आल्या,
काही वाटल्या काही मोकळ्या,
काही वाटुन सुरेख तळल्या,
कोशिंबिरी च्या ओळी जमल्या,
शुभ्र काकड्या होत्या किसल्या,
मुळा कोवळा मिरच्या ओल्या,
केळी कापून चकल्या केल्या,
चिरुन पेरुच्या फोडी सजल्या,
एकरूप त्या दह्यात झाल्या,
भाज्या आल्या आळू-घोसाळी,
रान कारली वांगी काळी,
सुरण तोंडली आणि पडवळी,
चुका चाकवत मेथी कवळी,
चंदन बटवा भेंडी कवळी,
फणस कोवळा हिरवी केळी,
काजुगरांची गोडी निराळी,
दुधी भोपळा आणि रताळी,
किती प्रकारे वेगवेगळी,
फेण्या, पापड्या आणि सांडगे,
कुणी आणुनी वाढी वेगे,
गव्हल्या नकुल्या धवल मालत्या,
खिरी तयांच्या शोभत होत्या,
शेवयांच्या खिरी वाटल्या,
आमट्यांनी मग वाट्या भरल्या,
सार गोडसे रातंब्याचे,
भरले प्याले मधुर कढीचे,
कणीदार बहू तूप सुगंधी,
भात वाढण्या थोडा अवधी.........

*-ग दि माडगुळकर.*

धम्माल सुरु आहे की इथे.
बलिदान सिनेमातले हे गाणे कसे कुणाला आठवले नाही अजुन? Lol

उई माँ उई माँ
उई माँ उई उई उई उई छुई मुई छुई मुई
ओ मोरे साजन तोहे भूख लगे तो
पूरी कचौरी रसगुल्ला बन जाउंगी
ओ मोरे साजन तोहे भूख लगे तो
पूरी कचौरी रसगुल्ला बन जाउंगी
मोरे सजन तुहे प्यास लगे तो
कॉफ़ी हो लस्सी फालूदा बन जाउंगी

आमच्या गावी धुळ्याकडे होळी/ धुळवडला हे गाणे आणी कैदी सिनेमातले 'बांगो, बांगो, बांगो ' हे गाणे लाउडस्पिकरला लावुन नाचणे मस्ट आहे. Proud

आंखे मधील
गोविंदा आणि शिल्पा शिरोडकर ह्यांच्यावर चित्रित झालेले गाणे त्यात शब्द आहेत

घर मां जो अइवें तो हमैं क्या खिलइवे
गरम गरम हलवा और पूरी पकइवे
नरम नरम हाथों से खा जा बालमा
अंगना में बाबा ...
हलवा पूरी खइवे तो निंदिया न सतइवे

या भय्या लोकांसाठी हलवा पुरी म्हणजे (आपल्या मटार उसळ आणि शिक्रणीसारखी) चैनीची परमावधी असावी असं वाटतंय.

बरं हे गाणं चालतंय का..
फ़िज़ा भी है जवाँ जवाँ
हवा भी है रवा रवा

खालचे गाणे बॉटनी आणि खाद्यप्रकार दोन्हीकडे चालेल, ज्याला जे आवडते त्याने ते उचला..

Strawberry आँखें, सोचती क्या हैं
लड़की तुम हो महलों में हो पली
वो ice cream हो जो है फ़्रिज् में रखी
तुमने जो भी कहा, वो हमेशा हुआ
तुम्हें हर चीज़ मिली, mercedes मिली
फिर भी आँखों में है, कोई ग़म छुपा हुआ
फिर भी तुम खुश नहीं, बोलो है बात क्या

&&&&&

चंदामामा दुर के पुये पकाये बुर के… आप खाये थालीमे,
मुन्नेको दे प्याली मे.

पुये म्हणजे गव्हाचे गोड तळलेले गोळे, गुलगुले. बुरा साखर घालुन केलेले. बहुतेक मामा जास्त पुये खातोय.

Pages