चित्रपटसंगीतातील खाद्यपदार्थ

Submitted by स्वाती_आंबोळे on 18 February, 2025 - 19:51

तुम्हाला आठवत असेल तर दोनतीन वर्षांमागे आपण या प्रकारचे हे खेळ खेळलो होतो:

१. चित्रपटसंगीत आणि बॉटनी
२. चित्रपटसंगीत आणि व्यवसाय
३. चित्रपटसंगीत आणि भूगोल
४. चित्रपटसंगीत आणि कालगणना

आज सहज या कॅटेगरीतला हा नवीन विषय सुचला. हिंदी/मराठी चित्रपटसंगीतात आलेले खाद्यपदार्थांचे उल्लेख.
फक्त पथ्य एकच - पदार्थात काहीतरी प्रक्रिया केलेली हवी, म्हणजे नुसतीच फळांची नावं किंवा विड्याबिड्याची पानं ऑलरेडी बॉटनीच्या धाग्यात येऊन गेली आहेत तर ती नकोत, नुसताच दुधाचा उल्लेख नको.

सुरुवात करून द्यायला ही मला आठवलेली गाणी:

मराठी
१. यमुनाजळासी जासी मुकुंदा, दध्योदन भक्षी... घनश्याम सुंदरा
२. डोइवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या, तांब्यात दुध हाये गायीचं, घेता का दाजीबा वाइच... काय गं सखू
३. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर... अरे संसार संसार
४. सण वर्षाचा आहे दिवाळी, आज राहू जाऊ उद्या सकाळी, जेवण करते पुरणाची पोळी, भात मी घातलाय रांधायला हो येऊ कशी तशी मी नांदायला
५. मिष्टान्ने कोठुन?! आणला कणीकोंडा रांधुन, सांगे आवर्जुन भाबडी विदुराची सुगरण... वानी रुचकरपणा, श्रीहरी विदुराघरी पाहुणा
६. अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला

हिंदी
१. चंदामामा दूर के पुए पकाए बूर के
२. क्यों न रोटियों का पेड हम लगा लें, आम तोडे, रोटी तोडे, रोटी आम खा लें, रोज रोज करती है क्यूँ ये झमेला... मुन्ना बडा प्यारा
३. आहें ना भर ठंडी ठंडी, खतरे की है ये ठंडी के गरम गरम चाय पी ले
४. दफ्तर को देर हो गयी, मुझे जल्दी से कॉफी पिलाना (यात तर रेसिपी पण आहे! Lol )
५. टॉफी, चूरण, खेलखिलौने, कुलचे, नान, पराठा, कर गये टाटा जब से बापू तूने डाँटा... बापू सेहत के लिये
६. जलेबीबाई!

तुम्हाला कुठली आठवतायत? Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा वेगळी भाषा आणि वेगळे पदार्थ. भाग्यदा लक्ष्मी बारम्मा या गाण्यात

सज्जन साधु पूजेय वेळगे । मज्जिगेयोळगिन बेण्णेयंते ॥ (सज्जन साधूंच्या पूजेच्या वेळी, जणू ताक घुसळून लोणी वर यावं त्याप्रमाणे (तशी तुझी भक्ती बाहेर पडते) ... देह देवाचे मंदिर गाण्यात - जसे दुधामध्ये लोणी अशी ओळ आहे)

सक्करे तुप्पद कालुवे हारिसि । शुक्रवारद पूजेय वेळेगे ॥ (शुक्रवारी पूजेच्या वेळेला साखर आणि तुपाचा कालवा (= पंचामृत) वाहतो)

दही दुध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी
बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरुन बाई
मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी

हा घे ना तिळगुळ
करू नको चुळबुळ
वेड लागलं मला कसं गं
ईया उवा ईया उवा तुळ तुळ तुळ तुळ

(गायक - सुरेश वाडकर आणि आशा भोसले)

नाचन लाग्यो रे बैरागी मन
अरे, भागन लाग्यो रे बैरागी बन
आज उनसे मिलना है हमें
आज उनसे कहना है हमें
चलो, उनके लिए कुछ लेते चलें
और उनको दुआएँ देते चलें
थोड़ी गुजिया-वुजिया लेते चलें
थोड़ी बर्फ़ी-वर्फ़ी लेते चलें
आज उनसे मिलना है हमें
आज उनसे मिलना है हमें
महलों की रानी है, सुंदर-सयानी है
वो खानदानी है, जाने दिल
क्या-क्या ख़रीदें हम, क्या ना ख़रीदें हम
क्या दें निशानी, ये है मुश्किल
महलों की रानी है, सुंदर-सयानी है
वो खानदानी है, जाने दिल
क्या-क्या ख़रीदें हम, क्या ना ख़रीदें हम
क्या दें निशानी, ये है मुश्किल
थोड़ी मठरी-वठरी लेते चलें
थोड़ी चकली-च्यूड़ा लेते चलें
कुछ तीखा-वीखा लेते चलें
हो, कुछ खट्टा-मीठा लेते चलें
आज उनसे मिलना है हमें
आज उनसे मिलना है हमें
उनसे मिलेंगे तो हम क्या कहेंगे
ये सोचा, ना समझा, ना जाना है
शायद कहें ऐसे, उनका हमेशा से
सर-आँखों पर ही ठिकाना है
उनसे मिलेंगे तो हम क्या कहेंगे
ये सोचा, ना समझा, ना जाना है
शायद कहें ऐसे, उनका हमेशा से
सर-आँखों पर ही ठिकाना है
थोड़े काजू-किशमिश लेते चलें
सब थोड़ा-थोड़ा लेते चलें
चलो, उनके लिए कुछ लेते चलें
और उनको दुआएँ देते चलें
आज उनसे मिलना है हमें
आज उनसे मिलना है हमें
नाचन लाग्यो रे बैरागी मन
अरे, भागन लाग्यो रे बैरागी बन
नाचन लाग्यो रे बैरागी मन

शाळा सुटली, पाटी फुटली
आई, मला भूक लागली

धम्मक लाडू चापट पोळी
नको देउ मज हवीच गोळी
किंवा दे ग, खमंग चकली
दे ना लवकर, भूक लागली

फा ची यादी पवित्र आहे, पण मी धाग्याचे लेव्हल वर जाऊ देणार नाही बहुतेक. >> Lol

तो गाणी कभी ‘उस नजर से’ बघत नाही वाटतं >>> Lol

भक्तीगीतापासून सुरूवात करून छबीदार छबीपर्यंत पोहोचलोच की Happy जरा वेगळे पदार्थ शोधू असा विचार करून लिहीली ती गाणी. पदार्थ सेण्ट्रिक अ‍ॅप्रोच होता. गाणे-लेव्हल सेण्ट्रिक नाही Happy (मभादिला वेळ आहे त्यामुळे हे मिंग्रजी चालावे). उलट त्या गाण्यात संध्या हे गाव फक्त वरकरणी साधं आहे - घरात पोळी अन् बाहेर नळी- म्हणते तसे काहीतरी म्हणा एकवेळ Happy

कोइ दिन लाडू ने कोइ दिन पेडा कोइ दिन फाकमफाका जी - करना फकिरी फिर क्या दिलगिरी (बडे घर की बेटी)

( हेमामालिनीच्या मिराबाई सिनेमातल्या गाण्यातले शब्द वेगळे आहेत. खर्‍या मिराबाईने काय लिहिले असेल ते तिचं तिलाच ठाऊक )

सहीच धागा
"सोनपापडी ओ मेरी सोनपापडी "गोविंदा चं गाणं आहे ना

श्री वेंकटेश्वर सुप्रभातम

उन्मील्यनेत्र युगमुत्तम पंजरस्थाः
पात्रावसिष्ट कदली फल पायसानि
भुक्त्वाः सलील मथकेलि शुकाः पठंति
शेषाद्रि शेखर विभो तव सुप्रभातम्

हलके हलके जोजवा, बाळाचा पाळणा
पाळण्याच्या मधोमध फिरतो खेळणा
कुर्रर्र करा कानात हळूच भेटा ग
बारशाचा सोहळा घुगऱ्या वाटा ग

हे लिहिताना मला माझेमन यांचे राजमा मीमस् आठवत आहे Lol

परीसस्पर्शाने धातूचे सोन्यात रुपांतर होतं पण जगदीश खेबुडकरांनी त्याहीपुढील टप्पा गाठून लोखंडाचे चणे ही पाककृती पेश केली आहे ते गाणं......

लेऊ लेणं गरीबीचं
चनं खाऊ लोखंडाचं

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

ले लो भई चिवडा ले लो

सांग सांग भोलानाथ मधे
लाडू हळूच घेताना
आवाज होईल काय

वसाड गावाचा धनगरराजा, रानावनातून मेंढरं पाणी
त्याच्यापायी तो रानीवनीच्या, काटेरी कुटेरी बाभळी ढाळी
वसाड गावाच्या धनगरराजाचा, काळा कुत्रा त्याचा सेना रे पती
खायाला लागतील पन्नास भाकरी, ईळभर तो मेंढ्या भवती
धनगरराजा वसाड गावाचा

पूर्ण गाणं : https://www.jiosaavn.com/lyrics/dhangar-raja-lyrics/CRAHACtiZ1A

यातला 'सेना रे पती' हा शब्दप्रयोग मजेशीर आहे. गाण्याच्या मीटरमधे बसायला असा योजला आहे. मायबोलीवरच्या धन्यचवाद सारखा वाटतोय. Happy

मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी..

याची पहिली ओळ आठवत नाहीये

हम भी अगर बच्चे होते..नाम हमारा होता गबलू बबलू खाने को मिलते लड्डू

इश्क की चाशनी

काकडीचा बांधा तुझा, मिरचीचा तोरा
मुळ्यावानी कडू तरी, रंग गोरा गोरा
लीम्बावानी कांती तुझी, बीटावानी ओठ
टंब्याटाचे गाल तुझे, भेन्डीवानी बोटं
काळजात मंडई तू मांडशील काय
आगं रानी माझ्या मळ्यामंदी घुसशील काय

ढिपाडी ढिपांग ढिचीपाडी ढिपांग
इडीबाडी ढिचीबाडी ढिपांग

सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून, सुटटी मिळेल काय ?

भोलानाथ दुपारी आई झोपेल काय ?
लाडू हळूच घेताना आवाज होईल काय ?

शीर्षकात चित्रपट संगीत लिहिलं आहे पण स्वातीने लिहिलेलं चॉकलेट चा बंगला गाणं चित्रपटातील नाहीये. त्यामुळे माझ्यासकट अनेक जणानी चित्रपटात नसलेली गाणी लिहिली आहेत. हपा यांनी कन्नड गाण ही लिहिलं आहे . म्हणून शीर्षक भारतीय संगीतातील खाद्यपदार्थ असे केले तर जास्त उचित होईल असं मला वाटतंय. असो.

आज से तेरी सारी गलींया मेरी हो गई...

तेरे मांथे के कुमकुम को
मैं तिलक लगा के घूमूँगा
तेरी बाली की छुन छुन को
मैं दिल से लगा के झुमुँगा

मेरी छोटी सी भूलों को
तू नदिया में बहा देना
तेरे जुड़े के फूलों को
मैं अपनी शर्ट में पहनूँगा
बस मेरे लिए तु माल पुए
कभी कभी बना देना

कभी नीम नीम कभी शहद शहद
कभी नरम नरम कभी सख्त सख्त
कभी नीम नीम कभी शहद शहद
कभी नरम नरम कभी सख्त सख्त
मोरा पिया मोरा पिया मोरा पिया

युवी
पदार्थात काहीतरी प्रक्रिया केलेली हवी.

दहिंभाताचीं उंडी लाविन तुजे तोंडी ॥
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगीं

पैल तो गे काऊ कोकताहे ।
शकून गे माये सांगतसे

Pages