चित्रपटसंगीतातील खाद्यपदार्थ

Submitted by स्वाती_आंबोळे on 18 February, 2025 - 19:51

तुम्हाला आठवत असेल तर दोनतीन वर्षांमागे आपण या प्रकारचे हे खेळ खेळलो होतो:

१. चित्रपटसंगीत आणि बॉटनी
२. चित्रपटसंगीत आणि व्यवसाय
३. चित्रपटसंगीत आणि भूगोल
४. चित्रपटसंगीत आणि कालगणना

आज सहज या कॅटेगरीतला हा नवीन विषय सुचला. हिंदी/मराठी चित्रपटसंगीतात आलेले खाद्यपदार्थांचे उल्लेख.
फक्त पथ्य एकच - पदार्थात काहीतरी प्रक्रिया केलेली हवी, म्हणजे नुसतीच फळांची नावं किंवा विड्याबिड्याची पानं ऑलरेडी बॉटनीच्या धाग्यात येऊन गेली आहेत तर ती नकोत, नुसताच दुधाचा उल्लेख नको.

सुरुवात करून द्यायला ही मला आठवलेली गाणी:

मराठी
१. यमुनाजळासी जासी मुकुंदा, दध्योदन भक्षी... घनश्याम सुंदरा
२. डोइवर पाटी, पाटीत भाकरी, भाकरीवर तांब्या, तांब्यात दुध हाये गायीचं, घेता का दाजीबा वाइच... काय गं सखू
३. आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर... अरे संसार संसार
४. सण वर्षाचा आहे दिवाळी, आज राहू जाऊ उद्या सकाळी, जेवण करते पुरणाची पोळी, भात मी घातलाय रांधायला हो येऊ कशी तशी मी नांदायला
५. मिष्टान्ने कोठुन?! आणला कणीकोंडा रांधुन, सांगे आवर्जुन भाबडी विदुराची सुगरण... वानी रुचकरपणा, श्रीहरी विदुराघरी पाहुणा
६. अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला

हिंदी
१. चंदामामा दूर के पुए पकाए बूर के
२. क्यों न रोटियों का पेड हम लगा लें, आम तोडे, रोटी तोडे, रोटी आम खा लें, रोज रोज करती है क्यूँ ये झमेला... मुन्ना बडा प्यारा
३. आहें ना भर ठंडी ठंडी, खतरे की है ये ठंडी के गरम गरम चाय पी ले
४. दफ्तर को देर हो गयी, मुझे जल्दी से कॉफी पिलाना (यात तर रेसिपी पण आहे! Lol )
५. टॉफी, चूरण, खेलखिलौने, कुलचे, नान, पराठा, कर गये टाटा जब से बापू तूने डाँटा... बापू सेहत के लिये
६. जलेबीबाई!

तुम्हाला कुठली आठवतायत? Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्लोक

बासुंदीपुरी लागते बरी
खीर त्यापरी नाही दुसरी
आवड बहु मला लाडूची असे
भूक लागली वाढा हो कसे

हरीच्या घरी केशरी तूप पोळ्या
हरी वाढतो ब्राह्मणां वेळोवेळा
असे ब्राह्मण जेवूनी तृप्त झाले
विडा, दक्षिणा देऊनी बोळविलें

ए गणपत चल दारू ला
पानी कम सोडा जरा ज्यादा मिला

या रे या खावया
पिझ्झा सामोसा शेवया

भोंडल्याचे गाणे

हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं पीठ त्याचं केलं थालीपीठ
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं दही त्याचं केलं श्रीखंड बाई
नेऊनी वाढलं पानात, जिलबी बिघडली
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातला उरला थोडा पाक त्याचा केला साखरभात
नेऊनी वाढला पानात, जिलबी बिघडली.
हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली
त्यातलं उरलं थोडं तूप त्याच्या केल्या पु-या छान
नेऊनी वाढल्या पानात, जिलबी बिघडली

भोंडल्याचे गाणे

नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं

चांगला मुद्दा मनीमोहोर. भाग्यदा लक्ष्मी हे गाणं एका चित्रपटात पण आहे. त्यात अनंत नाग आहे एवढं आठवतंय.

एक अभंग आहे, नीटसा आठवत नाही पण...

नाम्याने नैवेद्य कुंचीखाली झाकिला
नेवोनी ठेवीला, देवापुढे..

दगडाचा देव, तो काय जेवणार, पण ह्याचा शेवट ...

वीटेवरचे देव कापे थराथरा
जेवे भराभरा, नाम्या संगे...

असा होता बहुतेक...

हर्पा काहीही हा Lol
चांगला भुक्कड मूड सेट झालेला त्यात कचरा टाकलात.
.
फोडणीची पोळी - ह्या पदार्थावर गाणं का नाही
.
गाणं नाही पण शाळेतला दमडी धडा आठवतोच मला.
शेव
खोबरे
भजी सगळं आहे त्यात

शाळेत ही कविता होती

कारभारनी आन माझं न्ह्यारीचं पान
भाकरीला पटनी, मजेदार चटनी
संग हिरवा कांदा अन मिरचीचा चेंदा.... इ इ

बरजात्या खादाड आहेत एकंदरीत
व्हनिला स्काय ते व्हनिला आइस्क्रीम!
पवित्र यादी
>>> Lol

राजसा जवळी जरा बसा
त्या दिशी करून दिला विडा
पिचला माझा चुडा, कहर भलताच
भलताच रंगला काथ ओठात

मी ज्वार, नवतीचा भर
अंग जरतार, ऐन हुरड्यात
तुम्ही नका जाऊ साजणा
हिवाळी रात

अस्सावा सुंदर चॉकलेटचा बंगला
चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार
गोल गोल लेमनच्या खिडक्या दोन
बिस्किटांच्या गच्चीवर मोर छानदार
पेपरमिंटच्या अंगणात फुलं लाल लाल

मी नाही अभ्यास केला
घड्याळात वाजला एक
आईने केला केक
घड्याळात वाजले सहा
आईने केला चहा
घड्याळात वाजले सात
आईने केला भात

धूप दीप नैवेद्य असा सदूपचार चालला
स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाळा

संधीप्रकाशात - थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे

फारएण्ड खई के पान बनारसवाला कसं विसरलं?
त्यात भांग पण आहे.

मामी Biggrin

मला फक्त चिवडा ले लो एवढं एकच गाणं आठवलं होतं. बरीच आहेत की.

प्रतिसाद वाचताना राधा गवळण करिते मंथन - राधेविण ते मंथन चाले - नवल बघाया नवनित आले- इथे नुसतं प्रोसेस्ड फूड नाही, प्रोसेसही आहे.

बोरकरांची एक कविता - दीपका मांडिले तुला सोनियाचे ताट यात दह्यात हा कालविला जिरेसाळ भात आणि मुखी तुमच्याही घालू दुधातली पोळी .

आई आणखी बाबा यातिल कोण आवडे अधिक तुला यात
घरात करते खाऊ आई घरातल्याला किंमत नाही
चिंगम् अन् चॉकलेट तर बाबा घेती रस्त्याला

कारभारनी आन माझं न्ह्यारीचं पान >> ह्यात कारभारनी आणि कारभारी संगंच न्याहरीला बसताहेत हे पाहून छान वाटले. कारण नेहमी कारभारीन न्याहारी आननार आणि हा खाणार असेच असते!!
बाकी मेनू ही मस्तच आहे न्याहारीचा! Happy
मला तर नाही आठवत शाळेतील ही कविता...!?

माझेमन.. हुरडा आणि काठ काही प्रोसेस्ड नाही!! Lol

चित्रपटसंगीतातील खाद्यपदार्थ : रॉ, व्हिगन, सामिष, कोशर असे उपधागे काढायला पाहीजेत!

विहीणबाई विहीणबाई उठा आता उठा
भातुकलीचा सार्‍या तुम्ही केला चट्टामट्टा

पसाभर शेंगदाणे पसाभर गूळ
एकटीने फस्त केलं लागलं का खूळ?

काथ प्रोसेस्ड असतो ना? सरळ साल नाही वापरत. हुरडा आपण भाजलेला समजू Wink

शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली

तू बिन बताएं
मीठी लगे, चख के देखी अभी
मिश्री की डली जिंदगी हो चली

नमक इश्क़ का

मुंगळा मुंगळा मैं गुड़ की डली

मराठी

ससा म्हणाला चहा हवा - कोणास ठाऊक कसा
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी - आमचा राजू का रुसला
लग्नात बुंदीचे लाडू आता वळू - नको ताई रुसू कोपर्‍यात बसू
धम्मक लाडू चापट पोळी नको देऊ मज हवीच गोळी किंवा दे गं खमंग चकली - शाळा सुटली पाटी फुटली
करी दह्या दुधाचा रबडा - असा कसा देवांचा देव बाई ठकडा (दही प्रोसेस्ड आहे Wink )
दही दूध लोणी मागू नको रे - अनंता अंत नको पाहू
नाव काढू नको तांदुळाचे केले मोदक लाल गव्हाचे - बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवितो माथा
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार - विठ्ठला तू वेडा कुंभार

चक् चक् चकली
काट्याने माखली
तुकडा मोडताच
खमंग लागली

हे चालेल ना?

शाळेतील कविता - जिऊ
कवी - चंद्रशेखर

गोधूम वर्ण तिचा, हरणाच्या पाडसापरी डोळे
स्नेहाळ वदन नामी, प्रसन्न विधुबिंब जेंवि वाटोळे (यातील जेवि शब्दाचा धाग्याच्या विषयाशी काही संबंध नाही)
.
.
.
.
कातीव सूत ऐशा येत शेवया तिला वळावाया
या फेण्या म्हणूनी तिच्या लोकभ्रम कुरडयांवरी झाला

लावोनी गुळवणी वा पुरण करी सार ती मजेदार
ऐसे की ते सेवुनी हुषार व्हावा मनुष्य बेजार

गुलगुलीत मखमलीपरी करी झरझर कशा पुरणपोळ्या
काढून सुंदर कशिदा तिने शिवाव्याही रेसिप्या चोळ्या

संपूर्ण कविता येथे वाचायला मिळेल : https://balbharatikavita.blogspot.com/2013/01/blog-post.html?m=1

कुत्‍ना थमाल ले थमाल आपुल्या गाई ।
आम्ही आपुल्या घलासि जातो भाई ॥१॥
.
.
.
.
.

काल बलाचि ले बलाचि खलवस केला ।
तुम्ही सल्वांनी फाल फाल घेतला ।
मी गलीब ले म्हणूनी थोलका दिला ।
तू म्हनसिल ले याला कलतीच नाही ॥४॥

संपूर्ण गाणं : https://www.aathavanitli-gani.com/Song/Kutna_Thamal_Le_Thamal

Pages