टेरिफ वॉर आणि त्याचे परिणाम

Submitted by उदय on 1 February, 2025 - 23:56

कॅनडा, मेक्सिको, चीन या देशातून येणार्‍या मालावर अतिरिक्त आयात शुल्क लागू होणार असा मोठा निर्णय आज जाहिर झाला. तो निर्णय टाळण्यासाठी कॅनडा , मेक्सिकोने त्यांच्या परिने प्रयत्न केले पण यश आले नाही. कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयातीवर २५% अतिरिक्त शुल्क आणि चीनमधून आयातीवर १०% अतिरिक्त शुल्क लागू होणार आहे. कॅनडातील ऊर्जा आयातीवर १० % दर असेल.

ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा शपथविधी झाल्यावर पहिल्याच दिवशी टेरिफ संदर्भातला महत्वपूर्ण निर्णय जाहिर होणार होता पण काही कारणाने हा निर्णय १ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला. या जाहिर झालेल्या आयात शुल्काला उत्तर म्हणून कॅनडा, मेक्सिको या देशांनी अमेरिकेतून येणार्‍या वस्तूंवर पण आयात शुल्क ( counter tariff ) जाहिर केले आहे.

कॅनडा तसेच मेस्किकोमधून अमेरिकेमधे फळभाज्या पासून auto parts, गॅस, ऑईल, स्टिल, खनिजे ( ॲल्युमिनियम, स्टिल, युरेनियम), लाकूड -लंबर अशा अनेक वस्तू आयात होतात. आता या प्रत्येक वस्तूंच्या किंमती महागणार, मागणी घसरणार (?). अमेरिकेतल्या प्रत्येकालाच या २५ % शुल्काची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष झळ बसेल तसेच कॅनडा/ मेक्सिको मधे शेकडो जॉब धोक्यात येणार आहेत.

( आर्थिक , लष्करी) वाटाघाटी मधे अमेरिकेची बाजू बळकट करण्याचा किंवा चीनची कोंडी करण्याचा उद्देश असेल आणि त्यात काही प्रमाणांत यश येईल पण हा ट्रेड वॉर आहे आणि यात सर्वांचेच नुकसान होणार आहे. आधी कोलंबियाला नमविले, आता कॅनडा, मेक्सिको, चीन... मग ब्रिक्स देशांवर पण १०० % टेरिफची टांगती तलवार आहे. Happy

काही मागण्या, अटी पुढे करत अमेरिकेने टेरिफ जाहिर करणे, मग त्याला उत्तर म्हणून इतर देशांनी अमेरिकेतून येणार्‍या मालावर counter tariff जाहिर करणे आणि या सर्वांचे जगावर , अर्थ विश्वावर होणारे परिणाम यासाठी हा बाफ.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा चेक्स अ‍ॅंड बॅलन्स वर्क होतोय का कळेलच. टेरिफ बरोबर आहेत का? ते वर्क होतात का? ते अमेरिकन लोकांना त्रासदायक आहेत असं सबजेक्टिव्ह काही आलं नसुन मूळ ऑथॉरिटीवरच प्रश्नचिन्ह असल्याने सुकोला निर्णय सरळ सोपा असावा.
ज्युडिशिअल कूप पर्यंत स्टिफन मिलरची जीभ कालच घसरली आहे. सुकोनी काही दिलासा दिला नाही की मानणार आहेत का कुकूज नेस्ट उध्वस्थच करताहेत समजेलच.

अजूनही जनता भ्रमात आहे. आता मेडीकेडचे थोडे चटके बसायला लागलेत आणि स्मॉल बिझनेसवाल्यांना टॅरीफ म्हणजे एक प्रकारचा टॅक्स आणि तो आपल्या खिशातून जाणार हे कळायला लागलेय. मिडटर्म मधे कळेलच लोकांना कितपत शहाणपण आले आहे ते आणि लोकांना शहाणपण आलेच तर मिडटर्म नंतर जिओपीने इलेक्शन रिझल्ट खोटे म्हणून पुन्हा खोटेपणा करेलच.

Pages