कॅनडा, मेक्सिको, चीन या देशातून येणार्या मालावर अतिरिक्त आयात शुल्क लागू होणार असा मोठा निर्णय आज जाहिर झाला. तो निर्णय टाळण्यासाठी कॅनडा , मेक्सिकोने त्यांच्या परिने प्रयत्न केले पण यश आले नाही. कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयातीवर २५% अतिरिक्त शुल्क आणि चीनमधून आयातीवर १०% अतिरिक्त शुल्क लागू होणार आहे. कॅनडातील ऊर्जा आयातीवर १० % दर असेल.
ट्रम्प यांचा अध्यक्षपदाचा शपथविधी झाल्यावर पहिल्याच दिवशी टेरिफ संदर्भातला महत्वपूर्ण निर्णय जाहिर होणार होता पण काही कारणाने हा निर्णय १ फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आला. या जाहिर झालेल्या आयात शुल्काला उत्तर म्हणून कॅनडा, मेक्सिको या देशांनी अमेरिकेतून येणार्या वस्तूंवर पण आयात शुल्क ( counter tariff ) जाहिर केले आहे.
कॅनडा तसेच मेस्किकोमधून अमेरिकेमधे फळभाज्या पासून auto parts, गॅस, ऑईल, स्टिल, खनिजे ( ॲल्युमिनियम, स्टिल, युरेनियम), लाकूड -लंबर अशा अनेक वस्तू आयात होतात. आता या प्रत्येक वस्तूंच्या किंमती महागणार, मागणी घसरणार (?). अमेरिकेतल्या प्रत्येकालाच या २५ % शुल्काची प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष झळ बसेल तसेच कॅनडा/ मेक्सिको मधे शेकडो जॉब धोक्यात येणार आहेत.
( आर्थिक , लष्करी) वाटाघाटी मधे अमेरिकेची बाजू बळकट करण्याचा किंवा चीनची कोंडी करण्याचा उद्देश असेल आणि त्यात काही प्रमाणांत यश येईल पण हा ट्रेड वॉर आहे आणि यात सर्वांचेच नुकसान होणार आहे. आधी कोलंबियाला नमविले, आता कॅनडा, मेक्सिको, चीन... मग ब्रिक्स देशांवर पण १०० % टेरिफची टांगती तलवार आहे.
काही मागण्या, अटी पुढे करत अमेरिकेने टेरिफ जाहिर करणे, मग त्याला उत्तर म्हणून इतर देशांनी अमेरिकेतून येणार्या मालावर counter tariff जाहिर करणे आणि या सर्वांचे जगावर , अर्थ विश्वावर होणारे परिणाम यासाठी हा बाफ.
ट्रंप्या मुसक्या आवळुन,
ट्रंप्या मुसक्या आवळुन, इतरांकडुनच अदृष्य भिंत बांधवुन घेतोय. इतर बघे लोकच आता चटचट कामाला लागतील.
नागाला चावायची गरजच पडत नाही. फणा काढला तरी सगळे वठणीवर येतात.
अजुन किती हुकमी पत्ते बाहेर काढतो बघू यात.
आज ट्रम्पला नवीन काय आश्वासन
आज ट्रम्पला नवीन काय आश्वासन मिळाले ? सिमारेषेवर बॉर्डर/ फेंटॅनिल czar दोन आठवड्यापूर्वी चर्चेत होते. अमेरिका - कॅनडा सिमारेषे साठी १.३ बिलियन $ ची तरतूद डिसेंबरमधेच जाहिर झाली होती. १८ डिसेंबर २०२४ची बातमी आहे,
https://www.canada.ca/en/public-safety-canada/news/2024/12/the-governmen...
कॅनडा , मेक्सिको वरचे अमेरिकन टेरिफचे संकट तात्पुरते टळले आहे. चार आठवड्या नंतर पुन्हा डोकेवर काढेल किंवा सर्व काही विसरले जाईल हे बघायचे. आता पुढचे टारगेट युरोपियन युनियन असणार आहे. तसे सुतोवाच आज झाले.
भारत आणि इंडोनेशिया अखेरीस
भारत आणि इंडोनेशिया अखेरीस डॉलरचा त्याग करून एकमेकांच्या चलनात व्यवहार चालू करणार आहेत. वाजवा रे पुंगी, वाजवा रे ढोलकी, पुसा रे पाने... ट्रेड वॉर शिवाय आहे का काही. १००% कर लादणार आता. घाबरा आता. होल सेल मध्ये घाबरा. दोन चार तुकडे फेका प्रेसिडेंट मस्क आणि फर्स्ट लेडी डॉनी कडे.
बगबग बग सखे कसं गुबुगुबु वाजतय...
https://watcher.guru/news/brics-2-countries-officially-agree-to-ditch-th...
https://www.mea.gov.in/bilateral-documents.htm?dtl/38944/IndiaIndonesia+...
अमितव- इंडोनेशियाची बातमी
अमितव- इंडोनेशियाची बातमी बघितली. रशिया तसेच इराण सोबतचा व्यापार करतांना रुपया - रुबल , रुपया - रिआल मधे व्यावहार करण्याचा प्रयत्न होत आहे.
रशियाला व्यापार हवा आहे. भारताचा रुपया, चायनीज युआन मधे व्यावहार चालतात.
https://www.financialexpress.com/policy/economy/india-and-russia-seek-to...
रशिया - भारत व्यापारांत स्थानिक चलनाच्या वापरावर भर देण्याकडे भारताचा कल आहे. यासंदर्भात जयशंकर यांची भुमिका,
https://www.newindianexpress.com/nation/2024/Nov/11/settlement-of-india-...
पुढे काही दिवसांनी अमेरिकन डॉलरला डावलण्यात भारताला स्वारस्य नाही अशी भुमिकापण घेतली. ट्रम्प महाशय समोर असतांना शब्दांच्या कसरती कराव्या लागतात. १०० % टेरिफ लावण्याची धमकी किती प्रत्यक्षांत उतरते हे बघायचे.
अजय, १०० टक्के सहमत.
अजय, १०० टक्के सहमत.
कशाला राजकारण्यांच्या नादी लागतात लोक?
कुठल्याहि देशातल्या कुठल्याहि राजकारण्यांच्या बोलण्यात काहीहि अर्थ नसतो.
त्यापेक्षा -
१. गीता वाचा
२. आपण प्रत्यक्षात काय होते ते पहावे नि आपापले पैसे सांभाळून ठेवावे!!
शेवटी पैसेच कामाला येतील.
म्हणजे इहलोकी कल्याण व परलोकी गति प्राप्त होईल.
(No subject)
अमित, हे थोडं लोजिकल होईल,
अमित, हे थोडं लोजिकल होईल, त्यामूळे तात्यांचे स्लो लर्नर समर्थक ह्या कडे दुर्लक्ष करतीलच. पण तात्या ज्या सगळ्या ट्रेड डिल्स ला टेरीबल म्हणून नावं ठेवून कॅनडा आणि मेक्सिको वरती टेरीफ लावत होता, त्या सगळ्या डिल्स त्यानीच मागच्या टर्म मधे नाफ्टा बंद करून केलेल्या होत्या ना?
असो, आपल्याला काय, तात्यांनी आर्ट ऑफ द डिल लिहिलंय, त्यामुळे आपणही त्याच्या समर्थकांसारखं बिनडोक व्हावं आणि सुपर बॉल च्या तयारीला लागावं. ग्रॉसरी प्राईसेस अश्याही कमीच होणार आहेत, त्यामुळे अर्धा डझन अंडी अजून आणून मस्त अंडाकरी करावी....कसे?
अमेरिकेत येणार्या सर्व
अमेरिकेत येणार्या सर्व प्राकरच्या स्टील आणि ॲल्युमिनियमवर २५ % आयात कर ( नव्याने ) लावण्यात येणार आहे, बहुधा सोमवारपासूनच. म्हणजे पुन्हा एकदा कॅनडावर संकट येणार आहे. आयात कर लावणार्या इतर सर्व देशांवर reciprocal टेरिफ संबंधी निर्णय पण या आठवड्यात . "If they charge us, we charge them" .
https://www.bbc.com/news/articles/c98yv3e1yyqo
आधीच्या वेळी हे सर्व उपाय झालेले आहेत. नंतर मागे घ्यावे लागले होते. आता काय वेगळे होणार आहे हे कळायला थोडा वेळ लागेल.
मी गेल्या १५ वर्षांत कॅनडात
मी गेल्या १५ वर्षांत कॅनडात इतकी एकी झालेली कधी बघितलेली नाही. इथल्या इतर दीर्घकालीन रहिवाशांकडूनही तेच ऐकलं आहे.
मेड इन कॅनडा, का प्रॉडक्ट ऑफ कॅनडा यात नक्की काय फरक ते लोक समजुन घेत आहेत. प्रॉडक्ट ऑफ युएसए वर अघोषित बंदी घालत आहेत. युएस मध्ये फिरायला जाणार नाही, शॉपिंगला जाणार नाही हे बोलून तर दाखवत आहेतच. पण बॉर्डर क्रॉसिंग वरची वर्दळ कमी झाली आहे अशा बातम्या आहेत. सुपरबोल संडेला व्हँकूअर क्रॉसिंगला फक्त ५ मिनिटे रांग होती. नाएग्रा जवळच्या सीमेवरील पॅसेंजर कार्सचे नंबर कमी झालेत.
केंटकीचा गव्हर्नर आणि दोन्ही सिनेटर्स बर्बनचा खप कमी झाल्यावर/ होऊ नये म्हणून ट्रेड वॉर कशी वाईट हे बोलत आहेत.
सध्याचा मूड बघितला तर डॅमेज इज डन.
सतत ५१ वे राज्य, तुमची गरज नाही, ट्रेड डेफिसिञ आहे म्हणजे तुम्हाला सबसिडाईज करतोय अशा बुलिंगला लोक वैतागले आहेत. ट्रंपला इथलं पाणी, मिनरल्स, गॅस आणि नॉर्दन पॅसेज हे चढत्या भाजणीत हवंय.
ह्या अचानक आलेल्या देशप्रेमाने मात्र इथल्या कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचे धाबे दणालले आहेत. ट्रिड्यूने राजिनामा देऊ केला आणि तात्याने ट्रेडवॉर चालू केली त्यामुळे कार्बन टॅक्स आणि ट्रिड्यू दोन्ही मुद्दे बासनात गुंडाळले गेले. उजव्या पार्टीजचा जो रड्या सूर असतो त्याला कुणी भीक घालेनासे झाले. त्यात पीअर पॉलियाव्ह, डॅनिअल स्मिथ यांना प्रेसिडंट मस्कने एंडॉर्स करायचेच बाकी ठेवले होते. शत्रूचा मित्र न्याय लोक लावू लागले.
त्यात मार्क कार्नी पंत्रप्रधानाच्या शर्यतीत उतरला. दीर्घकाळ बॅंक ऑफ कॅनडाचा गव्हर्नर, तो ही कॉन्झर्वेटिव्ह काळात आणि तेव्हाच्या कॉन्झर्वेटिव्ह पंतप्रधानाने ही स्तुती केलेला, २००८ च्या पडझडीपासून कॅनडाला वाचवलेला, नंतर बॅंक ऑफ इंग्लंडचा पहिलाच नॉन ब्रिटिश गव्हर्नर झालेला, उत्तम इंग्रजी आणि फ्रेंच बोलणारा, चांगला सेन्स ऑफ ह्युम असलेला आणि हार्वर्ड आणि केब्रिज शिकलेला आहे. या सगळ्यात काहीच महिन्यांपूर्वी जवळजवळ ३० अंकाचा लीड असलेल्या पीअरची कॉन्झर्वेटिव्ह पार्टी दीड महिन्यांत बरोबरीत, किंवा स्टॅटिस्टिकली पराभवाच्या छायेत गेली.
अचानक आलेल्या देशभक्तीच्या वार्याला काऊंटर कसं करायचं? याचं उत्तर अजुनतरी त्यांच्याकडे नाही.
कॅनडा बर्यापैकी अजुन तरी एकत्र आहे. झळ बसू लागली, की त्यापासून सेफ गार्डवर किती लवकर काम करतील, डिप्लोमसी कशी वापरत आहेत त्यावर अवलंबुन असेल सारं.
अमितव - छान पोस्ट.
अमितव - छान पोस्ट.
trade deficit आहे म्हणजे subsidy होत नाही. खोटेपणा किती करायचा.
फेंटॅनीलचे (हे कारण नाहीच आहे पण) जे आकडे सांगितले आहेत ते देखिल खोटेपणा करत फुगविलेले आहेत. नॉर्थकडून दाखविलेल्या ४३ lb पैकी १/३ साठ्याशी कॅनडाचा संबंधच नाही.
टेरिफ वॉरमधे नुकसान दोघांचेही होणार आहे. कॅनडाचे जास्त. ठिक आहे. २०१८ मधे, काहीच कारण नसतांना ट्रम्प सरकारच्या सांगण्यावरुन मेंग वान झोऊ ला ( स्वत: Huawei CFO आहे आणि सर्वेसर्वा ची मुलगी आहे), व्हँकुव्हर विमानतळावर अटक केली होती. चीनचा संताप झाला आणि त्यांनी अनेक व्यापारी करार रद्द केले, दोन मायकेलना ३ वर्षे तुरुंगांत ठेवले. त्यावेळी कॅनडाने फार मोठी आर्थिक किंमत मोजली होती आणि अमेरिकेने कुठलिही मदत केली नाही. अमेरिकेसाठीच केले होते आणि नंतर अक्षरश : वार्यावर सोडले होते.
अमेरिका तयार करत असलेला vacuum - चीनसाठी संधी ठरली तर आश्चर्य वाटायला नको.
अमित - इंटरेस्टिंग माहिती!
अमित - इंटरेस्टिंग माहिती! मला टॅरिफ वॉर बद्दल फारशी माहिती नाही. वाचतोय.
<< ट्रंपला इथलं पाणी, मिनरल्स
<< ट्रंपला इथलं पाणी, मिनरल्स, गॅस आणि नॉर्दन पॅसेज हे चढत्या भाजणीत हवंय. >>
---- बाळाने नाफ्टा (आता USMCA) नूतनीकरण कराराच्या ( २०२६ ?) वेळी कॅनडीयन पाण्यासाठी हट्ट धरला तर? आता पर्यंत पाण्याला दूर ठेवले आहे.
काही मनासारखे झाले नाही काढले टेरिफचे हत्यार. ३० दिवसांच्या पॉजलाही काही अर्थ नाही, अत्यंत बेभरवशाचे आहे.
अमित, चांगली पोस्ट. काही
अमित, चांगली पोस्ट. काही गोष्टी माहिती होत्या पण नवे अपडेट्स मिळाले. 2008 मधे असलेला स्टिफन हार्पर हा पंतप्रधान म्हणून ट्रुडोपेक्षा कितीतरी पट चांगला, कॉन्फिडन्ट व निर्णयक्षम वाटायचा.
अमितव, let us agree to
अमितव, let us agree to disagree एवढे बोलून खाली बसतो
Trump complains about Canada
Trump complains about Canada — but new data shows spike in U.S. drugs and guns coming north.
टफ निगिशिएटर"I told Prime
टफ निगिशिएटर
"I told Prime Minister (Narendra) Modi yesterday - he was here - I said, 'Here's what we're going to do: reciprocal. Whatever you charge, I'm charging,'" President Trump said, recounting his conversation with the PM. "He (PM Modi) goes, 'No, no, I don't like that.' 'No, no, whatever you charge, I'm going to charge.' I'm doing that with every country."
"Nobody can argue with me," President Trump insisted. "If I said 25 per cent, they'd say, 'Oh, that's terrible.' I don't say that anymore... because I say, 'Whatever they charge, we'll charge.' And you know what? They stop."
This is not the first time
बातमीचा उर्वरित भाग
This is not the first time President Trump has clashed with India over tariffs. During his first term, he often referred to India as the "tariff king", citing high import duties on US goods. Following Prime Minister Modi's recent visit to Washington, both countries committed to doubling bilateral trade to $500 billion by 2030 and negotiating a bilateral trade agreement (BTA) by Autumn 2025.
जगातल्या विविध देशांत
जगातल्या विविध देशांत ठिकठिकाणी अंतर्गत ज्या लढाया चालू आहेत त्यांना आधुनिक शस्त्रे आणि बारुदं कशी मिळतात? ते देश काही आयात करत नाहीत. तरी पैसे पोहोचतात, शस्त्रे पोहचतात.
Huawei आइफोन ॲपलला मारत होता
Huawei आइफोन ॲपलला मारत होता हा राग होता. आइफोनसाठी ब्लॅकबेरी बंद करायला लावला. भारतात आइफोन बनवला तर चालतो कारण तीस टक्के अधिक किंमत लावतात. सगळाच घोळ आहे. खरं आहे का?
अमेरिकेच्या शेजारी देशांनी
अमेरिकेच्या शेजारी देशांनी सीमेबाबत बरेच काही केले आहे. राजा सहानुभूतीने विचार करत आहेत. - लुटनिक
त्यापूर्वी, कॅनडा मेक्सिकोवरील टेरिफ - ४ मार्च (
किंवा २ एप्रिल) पासून सुरू होईल.२५% (किंवा कमी...) राजा निर्णय घेतील.
Additionally, reciprocal tarrifs are coming - 2 april
परिणाम- अनेक कंपन्या अमेरिकेत स्थलांतरित होत आहेत... त्या अमेरिकेत लाखो नोकऱ्या निर्माण करतील. कुठे आहेत कामगार, काम करणारे हात?
भाषांतर करायचं तर 'राजा परत
भाषांतर करायचं तर 'राजा परत शेपुट घालणार आहे' .
गर्जेल तो पडेल काय!
आजपासून कॅनडा आणि मेक्सिको
आजपासून कॅनडा आणि मेक्सिको साठी २५ % तर चीन साठी (१० + १० =) २० % टेरिफ लागू करण्यात आले आहे. जशास तसे उत्तर म्हणून कॅनडा तसेच चीन यांनी अमेरिकेतून येणार्या वस्तूंवर टेरिफ लावल्या जाणार आहे. काय आणि कसे उत्तर द्यायचे याबाबत मेक्सिको रविवार पर्यंत निर्णय घेणार आहे.
"a very dumb thing to do " अशी प्रतिक्रिया कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी दिली आहे.
काय आणि कुठल्या गोष्टी मग महाग होतील हे कळायला थोडा वेळ लागेल पण आजची शेअर मार्केटची पहिली रिअॅक्शन फार वाईट होती. नजिकच्या काळांत महागाई, वस्तूंची टंचाई आणि ( बाहेर कमी मागणी असल्यामुळे) लोकल गोष्टी स्वस्त होतील.
बेकारी आणि महागाई हातात हात
बेकारी आणि महागाई हातात हात घालून योग्य ठिकाणी चावायला येणार आहेत.
एकाच दिवशी कॅनडा आणि
एकाच दिवशी कॅनडा आणि मेक्सिकोवर मनमानी कर लावले आणि रशियावरचे निर्बंध काढायला सुरुवात केली. स्टेप इन राईट डिरेक्शन. टेस्ला कोणी घेत नाही तर रशियाला पाठवा. आणि सो मेनी गुड रशियन पीपलना ५ मिलियन मध्ये नागरिकत्व द्या. विन विन!
बाकी मका, गहू आणि मुख्यत्त्वे सोयाबीन एकदम स्वस्त होईल अमेरिकेत. अमेरिकेतील ४५% सोयाबीन एकटा चीन घेतो. चीनने ते घेणं बंद केलं की नजिकच्या काळात ते स्वस्तात विकायला बाजारपेठ मिळत नाही तोवर शेतकरी बोंबलतील.
जामनगर- भारत मार्गे रशिअन ऑईल युक्रेन युद्ध चालू झाल्यापासून अमेरिकेत येत होते आता डायरेक्टच आणा की विषय संपला.
तर ट्रेड वॉर मधला एक दिवस
तर ट्रेड वॉर मधला एक दिवस पूर्ण व्हायच्या आतच डॉनाल्डची सपशेल माघार. One day into tariff war, U.S. says de-escalation now possible एका दिवसांत फेटेनल आणि इमिग्रेशन सॉल्व्ह झालं बहुतेक.
ल्युटनिकने आमच्या प्रिमिअरला (डग फोर्ड) फोन केलेला म्हणे. फोर्डने मिशिगन, मिनिसोटा, न्यूयॉर्कचे इलेक्ट्रिसिटी रेट २५% वाढवले, डॉनाल्ड टॅक्स २५% + ओंटारिओ २५% का कसं माहित नाही. थोडक्यात कॅनडाची टफ पॉलिसी काम करते आहे दिसतंय. अमेरिकन लिकर अनेक प्रोव्हिएंसेसने शेल्फवरुन काढून टाकली आहे. कॅनडात दारूची विक्री बर्यापैकी प्रोव्हिएंसच्या हातात असते त्यामुळे अमेरिकन दारू बंद आणि जिकडे आहे तिकडून लोकच घेईनासे झाले आहेत.
आता टेरिफ वगैरे जाऊन युएसएमसीए रिव्ह्यू करू थोडक्यात निगोशिएटिंग टेबलवर बसू. बोलून प्रश्न सोडवू असा जमिनीवरचा सूर तात्याचे पित्ते आऴवू लागले आहेत. पायाखालची जमिन सरकण्याची आवश्यक्ता होतीच.
Trump will 'probably' cut US and Canada tariffs - US commerce chief
तर ट्रेड वॉर मधला एक दिवस
तर ट्रेड वॉर मधला एक दिवस पूर्ण व्हायच्या आतच डॉनाल्डची सपशेल माघार. One day into tariff war, U.S. says de-escalation now possible एका दिवसांत फेटेनल आणि इमिग्रेशन सॉल्व्ह झालं बहुतेक.
ल्युटनिकने आमच्या प्रिमिअरला (डग फोर्ड) फोन केलेला म्हणे. फोर्डने मिशिगन, मिनिसोटा, न्यूयॉर्कचे इलेक्ट्रिसिटी रेट २५% वाढवले, डॉनाल्ड टॅक्स २५% + ओंटारिओ २५% का कसं माहित नाही. थोडक्यात कॅनडाची टफ पॉलिसी काम करते आहे दिसतंय. अमेरिकन लिकर अनेक प्रोव्हिएंसेसने शेल्फवरुन काढून टाकली आहे. कॅनडात दारूची विक्री बर्यापैकी प्रोव्हिएंसच्या हातात असते त्यामुळे अमेरिकन दारू बंद आणि जिकडे आहे तिकडून लोकच घेईनासे झाले आहेत.
आता टेरिफ वगैरे जाऊन युएसएमसीए रिव्ह्यू करू थोडक्यात निगोशिएटिंग टेबलवर बसू. बोलून प्रश्न सोडवू असा जमिनीवरचा सूर तात्याचे पित्ते आऴवू लागले आहेत. पायाखालची जमिन सरकण्याची आवश्यक्ता होतीच.
Trump will 'probably' cut US and Canada tariffs - US commerce chief
China targets US soybeans,
China targets US soybeans, lumber in stepped-up response to Trump tariffs
अमितव - फेंटॅनील हे कारण
अमितव - फेंटॅनील हे कारण कॅनडा - अमेरिका सिमेच्या बाबतीत अगदीच बोगस आहे. अनेक कॅनडीयन्सना निराश केले आहे , विश्वासघात केला आहे अशी भावनीक प्रतिक्रिया आहे. टेरिफ साठी दिलेले कारण ही बोगस आहे , स्वस्तात सर्व काही घेत आहे आणि वर सबसिडी म्हणायचे, ५१ वे राज्य हा सर्व ट्रम्पचा पोरकट पणा आहे.
मेलेनी जॉलीच्या मते अमेरिकेची strategy आहे. कुठलाही संवाद नाही. आता बाहेर कसे पडायचे ( face saving) यासाठी कारणे शोधत आहेत.
https://youtu.be/DWLTV5utMRg?t=136
मॅन्युफॅक्चरिंग देशांत आलं
मॅन्युफॅक्चरिंग देशांत आलं.
फक्त अमेरिकेत नाही तर अमेरिकेतून जाऊन युरोप मध्ये.
लिंड्ट्स कॅनडात मिळणारी सगळी चॉकलेट्स अमेरिकेत बनवत असे. आता टेरिफच्या तडाख्यातून वाचण्यासाठी कॅनडात युरोप मध्ये बनलेली करमुक्त चॉकलेट्स मिळणार आहेत.
प्रत्याघाती (रिटॅलेटरी) कर काम करू लागले.
आणि ही समिकरणे एकदा बदलली की पूर्वपदावर येणे कठिण असते. एकदा कनेडिअन लोकांना युरोप मधली चॉकलेट्स मिळू लागली की परत मेड इन युएसए कशाला कोण घेईल?
ओन्ली द बेस्ट अँड ब्राईटेस्ट…
ओन्ली द बेस्ट अँड ब्राईटेस्ट… नो डीईआय
Pages