रवा नारळ लाडू

Submitted by मनीमोहोर on 27 October, 2024 - 03:44
Rava ladu
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रवा नारळ लाडू...

दिवाळीत बेसनाच्या लाडवांचा मान वरचा आहे. सर्वांना ते लाडू जास्त आवडतात. पण मला पर्सनली बे ला तुपकट वाटतात . रवा लाडू जास्त आवडतात.

साहित्य
अर्धा किलो बारीक रवा ( चार वाट्या )
दोनशे ग्रॅम तूप ( एक वाटी )
दोन वाट्या नारळाचा चव
तीन वाट्या साखर
दीड वाटी पाणी
वेलची , बेदाणे, पिस्ते

क्रमवार पाककृती: 

रेसिपी

जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून ते थोडं गरम झालं की रवा घालून मंद गॅस वर पंधरा एक मिनिट भाजला. नंतर त्यात नारळाचा चव घालून पुन्हा दहा एक मिनिट बारीक गॅसवर भाजत राहिले.

नंतर साखरेत दीड वाटी पाणी घालून पाक करायला ठेवला. साखर विरघळल्या वर पाच एक मिनटानी पाक चेक करायला लागले . पाक ताटलीत घेऊन ती ताटली उभी केली की पाक खाली ओघळला नाही की झाला (आम्ही त्याला मधा इतपत म्हणतो ) ही माझी खूण. पण तार बघितली तर एक चांगली येते.

पाक झाल्यावर त्यात भाजलेला रवा नारळ घातला, वेलची पूड घातली, ढवळल आणि त्यावर झाकण ठेवलं घट्ट. हे मी पहिल्यांदा च केलं आणि बेस्ट result मिळालाय. मिश्रण गार व्हायला झाकण ठेवल्यामुळे वेळ लागला आणि त्यामुळे रवा पाकात चांगला मुरला. अगदी बारा तासांनी लाडू वळले तरी ही मिश्रण छान moist होत. लाडू ही मऊ आणि तरी ही खुसखुशीत झालेत. लहान मुलं खाणार आहेत म्हणून फोटोत कळत नसलं तरी आकाराने मुद्दामच लहान केले आहेत.

वाढणी/प्रमाण: 
काय सांगू ?
अधिक टिपा: 

रवा बारीक च घ्यावा.
नारळ घातल्याने लाडू मऊ आणि moist व्हायला मदत होते त्यामुळे खोवायचा कंटाळा म्हणून स्किप करू नये.
झाकण नक्की ठेवा दीड एक तास तरी त्याने पाक पटकन सुखत नाही आणि रवा फुलायला मदत होते.
बेदाण्या पेक्षा पिस्ता लावा पांढऱ्या वर हिरवा उठून दिसतो. बेदाणे पाकात घालू शकता.

माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ममो, तुम्ही सांगितलेली युक्ती कामी आली. उकळलेले साखरेचे पाणी घातले हळूहळू, ते मुरू दिले. आता छान वळत आहेत लाडू.

चैत्रगंधा, लाडू शेवट छान झाले वाचून छान वाटलं.
मान गये ममो.. काय स्मरणशक्ती आहे. >> अनेकांच्या नावं लक्षात रहात नाहीत पण माझ्या नावं खूप लक्षात राहतात. कधी कधी मी खूप वर्षांनी कोणी भेटलं तर " हिच्या माझ्याबद्दलच्या किती बारीक सारीक गोष्टी लक्षात आहेत असा समोरचा विचार करेल म्हणून " मुलगा काय म्हणतोय" असं विचारते , नाव लक्षात असतं तरी.. Happy

आता छान वळत आहेत लाडू. >>> ज्याचा शेवट गोड ते सगळेच गोड. पण यात जरी शेवट गोड झाला नसता तरी जे काही झाले असते ते गोडच असते Wink

थोडावेळ झाकण ठेवले होते. मग तो गोळा मिक्सर मधून बारीक केला तो. आता लाडू वळलेच जात नाहीयेत. त्याला गरम करून तूप घालून बघितले, दुधाचा हात लावला पण काही उपयोग होत नाही. रवाच येत आहे हातात. >>>>>

माझ्या बाबतीत हा प्रकार दोन तिनदा झाल्यावर मी पाक करायचा नाद सोडला Happy त्या दोन तिन वेळी ते मिश्रण सासुबाईनी नंतरचे काही दिवस प्रि-मिक्स शीरा म्हणुन खाऊन संपवले. मीही त्यांना अधुन मधुन मदत केली Happy

सगळे व्यवस्थित सुरु असताना अचानक डोळ्यासमोर सगळे मिश्रण फळफळीत होण्याचा शॉक भयंकर असतोमः)

रवा नारळ लाडू आंब्याचा रस घालून.
आंब्याच्या धाग्यावर ही लिहिले होते पण तिथे मिळणार नाही एखाद वेळेस म्हणून इथे पण लिहून ठेवते आहे. आंब्यामुळे रंग आणि स्वाद दोन्ही छान आलं. साखर आणि पाणी दोन्ही कमी घातलं थोडं पाक करताना. बाकी सगळं नेहमी प्रमाणेच. 20260501_223641.jpg

मस्त आयडीया !
नारळ वडी मधे आई आमरस घालायची ते आठवलं

Pages