
रवा नारळ लाडू...
दिवाळीत बेसनाच्या लाडवांचा मान वरचा आहे. सर्वांना ते लाडू जास्त आवडतात. पण मला पर्सनली बे ला तुपकट वाटतात . रवा लाडू जास्त आवडतात.
साहित्य
अर्धा किलो बारीक रवा ( चार वाट्या )
दोनशे ग्रॅम तूप ( एक वाटी )
दोन वाट्या नारळाचा चव
तीन वाट्या साखर
दीड वाटी पाणी
वेलची , बेदाणे, पिस्ते
रेसिपी
जाड बुडाच्या पातेल्यात तूप घालून ते थोडं गरम झालं की रवा घालून मंद गॅस वर पंधरा एक मिनिट भाजला. नंतर त्यात नारळाचा चव घालून पुन्हा दहा एक मिनिट बारीक गॅसवर भाजत राहिले.
नंतर साखरेत दीड वाटी पाणी घालून पाक करायला ठेवला. साखर विरघळल्या वर पाच एक मिनटानी पाक चेक करायला लागले . पाक ताटलीत घेऊन ती ताटली उभी केली की पाक खाली ओघळला नाही की झाला (आम्ही त्याला मधा इतपत म्हणतो ) ही माझी खूण. पण तार बघितली तर एक चांगली येते.
पाक झाल्यावर त्यात भाजलेला रवा नारळ घातला, वेलची पूड घातली, ढवळल आणि त्यावर झाकण ठेवलं घट्ट. हे मी पहिल्यांदा च केलं आणि बेस्ट result मिळालाय. मिश्रण गार व्हायला झाकण ठेवल्यामुळे वेळ लागला आणि त्यामुळे रवा पाकात चांगला मुरला. अगदी बारा तासांनी लाडू वळले तरी ही मिश्रण छान moist होत. लाडू ही मऊ आणि तरी ही खुसखुशीत झालेत. लहान मुलं खाणार आहेत म्हणून फोटोत कळत नसलं तरी आकाराने मुद्दामच लहान केले आहेत.
रवा बारीक च घ्यावा.
नारळ घातल्याने लाडू मऊ आणि moist व्हायला मदत होते त्यामुळे खोवायचा कंटाळा म्हणून स्किप करू नये.
झाकण नक्की ठेवा दीड एक तास तरी त्याने पाक पटकन सुखत नाही आणि रवा फुलायला मदत होते.
बेदाण्या पेक्षा पिस्ता लावा पांढऱ्या वर हिरवा उठून दिसतो. बेदाणे पाकात घालू शकता.
मी कालच लिहिलं होतं की
मी कालच लिहिलं होतं की अनावधानाने धागा काढला गेला, लक्षात आलं असत तर नक्कीच काढला नसता.
माबो काय किंवा इतर कोणती ही सो मी साईट , पहिल्या दिवसापासून मी ठरवलं आहे की मी वाद घालणार नाही. दिवाळीत तर नाहीच नाही. तुम्हाला हा धागा डिलीट करायला आहे काल माझ्या लक्षात आलं नाही ( आज स्पष्ट लिहिलं म्हणून समजलं ) मी admin ना विपू करून लिहिते हा धागा डिलीट करा असं ( हाकानाका
राहू द्या धागा. उडवू नका.
राहू द्या धागा. उडवू नका.
किमान काही दिवस तरी.
जोपर्यंत आमच्या घरचे रव्याचे लाडू बनत नाहीत तोपर्यंत मी जेवल्यावर इथे चक्कर मारून फोटो बघून जाईन म्हणतो
तरी मायबोली सर्वर वर लोड येत असल्यास मी देतो माझे काही जुने धागे शॉर्ट लिस्ट करून.. त्यातले दोन चार उडवा
अरे दोन चार उडवा कशाला..??
अरे दोन चार उडवा कशाला..??

दोन चारच ठेवा म्हण..
<<<कुचकट प्रतिसाद देणार्यांना
<<<कुचकट प्रतिसाद देणार्यांना कोणतेही धागे वर्ज नाहीत.
एकाच पदार्थाचे दोन धागे आले म्हणून पण आजकाल लोकांच्या भावना दुखावतात आणि चांगल्या धाग्याची वाट लागायला सुरुवात होते.
राहिला विषय साहित्यचोरीचा तर ही रवा लाडूंची पारंपारीक कृती आहे त्यामुळे प्रमाण तेच असणार.
ममोंचं मायबोलीवरचं विपुल लेखन बघितलं तर त्यांना अशा चोर्या मार्या करायची काही गरज असायचे कारण नाही.
त्यामुळे ही रेसिपी बघुन ज्यांच्या ज्यांचा भावना दुखावल्या किंवा पोटात दुखलं त्या सगळ्यांना Get Well Soon
आणि बाकीच्यांना Happy Diwali Happy
नवीन Submitted by स्मिता श्रीपाद >>
अगदीच सहमत.
ममोनी हे वरचे उपरोधिक प्रतिसाद वाचून येथे लिखाण बंद करू नये म्हणजे झाले. त्यानी स्वतःच करून पाहिलेली कृती लिहिलीय तरी इतके टोमणे????
मग इथे फक्त स्वतःच " invent" केलेली पाकृ लिहिणे अपेक्षित आहे का?
इतरांच्या निरुपद्रवी लिखाणावर ताशेरे मारून काय आनंद मिळतो? "Politically correct " राहण्याचा किती तो हव्यास?
ममो, धागा उडवण्याची गरज नाही हो.
ममो, धागा उडवण्याची गरज नाही>
ममो, धागा उडवण्याची गरज नाही>>> सहमत. पारंपारीक
पदार्थ आहे. प्रमाण सारखेच असणार सर्बत्र.
माबो काय दस्तावेजीकरणाची साइट
माबो काय दस्तावेजीकरणाची साइट आहे का!!! माणसांनी गप्पा मारायला, माहितीची देवाणघेवाण करायला, कथा, कविता, लालिते इ. लिहायला साइट आहे ना? का आर्काइव्ह/ विश्वकोश आहे की रवा लाडू एक एन्ट्री आली आता परत नको! काही अर्थ तरी आहे का याला!
धागे काढून साइटवर लोड आलेला माझ्या ऐकिवात नाही. इथल्या admin/ वेमांची अशी पोस्ट असेल तर दाखवा. धागे काढायलाच तर साइट आहे. एका धाग्यावर प्रतिसाद वाढले की रियल टाईम दाखवायला लोड येईल समजू शकतो. स्टॅटिक धागे काढून लोड येणं शक्य नाही. स्पेस जाते वाटतं असेल तर आतापर्यंत वेमानी साइट बंद केली असती.
कंदिलाचे ही चार नाही चाळीस धागे येऊ द्या की. जे चांगलं आहे ते टिकेल बाकी जाईल गाळात. स्वतःचे धागे काढून प्रतिसाद वाचून मजा येते तर ती मजा घ्यायला साइट आहे, असं माझे तरी मत आहे. कंटेंट क्रिएशन इज की! उद्या टिक टॉक आणि इंस्टा वर एक कंदील आहे परत कशाला म्हणतं का कोणी! आजच्या काळात रहा.
आणि ममो नी धागा उडवा सांगितलंय तर लोक तुम्ही लिहिणं बंद करू नका वर पोहोचले. कशाला आयड्या देताय...
पंतांच्या उपासाची आठवण झाली. साखर सोडा भात सोडा बोलणं सोडा जगणं सोडा... आणि ममो काही इतक्या चक्रम नाहीत की काही झालं आणि चालले मी सोडून करायला.
बाकी उडवायचाच असेल तर दिनेश चा धागा उडवा. तो त्यांचा उडवायचा अनवधानाने राहून गेलेला दिसतोय.
निरू अमितव फटाके " फोडले"
निरू
अमितव
फटाके " फोडले" रे लोकांनी 
मस्त पाकृ...
मस्त पाकृ...
रव्याचे लाडू आवडतात, या रेसिपीने मदत होईल (बायकोला)

इतरांच्या निरुपद्रवी लिखाणावर ताशेरे मारून काय आनंद मिळतो? "Politically correct " राहण्याचा किती तो हव्यास?
ममो, धागा उडवण्याची गरज नाही हो.
>>>>>> +१११
ममो, रेसिपी छान आहे आणि वाचून
ममो, रेसिपी छान आहे आणि वाचून सोप्पी वाटतेय आणि जमेल असंही वाटतंय.
मस्त आहेत हे रवा नारळ लाडू.
मस्त आहेत हे रवा नारळ लाडू.
फोटो एकदम तों पा सू आहे.
मस्त आहेत हे रवा नारळ लाडू.
मस्त आहेत हे रवा नारळ लाडू.
फोटो एकदम तों पा सू आहे. <<
मी चवीचा प्रत्यक्ष अभिप्राय देऊ शकतो..
ममो, धागा उडवू नका.
ममो, धागा उडवू नका.
पारंपारीक रेसीपी तुमच्या स्टाईलने सोपी करुन लिहिता, स्वतःच्या टिपा देता त्यामुळे करुन बघायला धीर होतो. फोटो तर कातील आहे!
ममोंचं मायबोलीवरचं विपुल आणि
ममोंचं मायबोलीवरचं विपुल आणि वाचनीय लेखन बघितलं तर त्यांना अशा चोर्या मार्या करायची काही गरज असायचे कारण नाही. >>>>>>
१०००+
धागा उडवू नका. लाडू गोंडस दिसताहेत. आणि तसंही रवा नारळाच्या पारंपारीक लाडूत प्रमाण ऑलमोस्ट सिमीलर व एन्ड प्रॉडक्ट दिसायलाही सिमीलरच असणार.
आह! क्या टायमिंग है... मी
आह! क्या टायमिंग है... मी कालच शोधत होते परफेक्ट रवा नारळ लाडू रेसिपी आणि आज ही दिसली.
बेला काल केले. आजे हे. थँक्यू ममो.
तुम्ही दिलेल्या रेसिपी बघून एकदम आजी-आत्या-काकू-मामी यांच्या कशा फुलप्रुफ रेसिपी असतात तसा फिल येतो. कसलीही शंका कुशंका न मनात न येता डायरेक्ट कामाला लागता येते.
फोटो भारी आहे! मला
फोटो भारी आहे! मला पिस्त्यापेक्षा बेदाणा आवडेल
आपल्या मराठी गोड पदार्थांमधे काजू व पिस्ते उपरे वाटतात पाकृ नीट वाचली नाही. अपनेको खानेसे मतलब
"नारळाचा चव" म्हणजे काय?
वरच्या चर्चेबद्दल - तो धागा खूप जुना आहे. ही पाकृही पारंपारिक आहे. कोणाला नवीन धागा काढायचा असेल तर काय हरकत आहे? लोकांना इंटरेस्ट वाटला तर लिहीतील लोक.
ममो - तुम्ही पाकृ तिथली वापरली असेल तर श्रेय द्या असे सुचवतो. ही तुमची स्वतंत्र असेल तर गरज नाही.
माझे सदस्यत्व > संपादन >
माझे सदस्यत्व > संपादन > वैयक्तिक > आवडीनिवडी
मध्ये
Maayboli.drop_duplicates(inplace=Ture);
असे लिहिल्यास एकाच विषयावर एकापेक्षा जास्त धागे दिसत नाहीत म्हणे. खखोदेजा.
फा, नारळाचा चव म्हणजे खवणलेलं
फा, नारळाचा चव म्हणजे खवणलेलं ओलं खोबरं. लाडू वगैरे निगुतीने करायच्या रेस्प्यांमधे हे खोबरं ताजंच हवं तर ते छान होतात.
ममोताई, धागा राहूदेत. तुमची पद्धत इतकं सोपी आणि बिनचूक असते की करून बघावीशी वाटते पाकृ.
माझे फार आवडते लाडु..मी यात
माझे फार आवडते लाडु..मी यात थोडा बदाम मिल्क मिक्स येत एमटीआरच ते पण घालते. (एव्हरेस्टच्या दुध मसाल्यात जायवित्री/जवित्री का कायतरी आहे त्याने तो बहुधा कडसर लागला .. तेव्हापासुन हे मिक्स कोजागिरीसाठी आणून ठेवते..मग ते पुढे बदामाच्या वड्या, रिकोटाचे पेढे आणी रवा लाडु यातही वापरता येते)
माझा पाक थोडा जास्त घट्ट झाला
माझा पाक थोडा जास्त घट्ट झाला असावा कारण लाडू फारच कोरडे पडले आहेत, यावर काही करता येईल का? दुधाचा हबका देऊन लाडू वळावे ही टीप माहीत आहे पण तसे केल्यास लाडू जास्त टिकणार नाहीत ना? दोन-तीन घरी द्यायचे आहेत आणि विकेंड शिवाय देणे होणार नाही म्हणून विचारले.>>> फ्रिज मधे ठेवु शकतेस पण कोरडे झालेल्या लाडूत दुधाचा हबका दिल्याशिवाय ते ओलसर होणार नाहित...एक दोन लाडू थोडे मावेत गरम करुन अगदी थोड थोड गरम तुप घालुन वळुन बघ...तसे जमल तर टिकतिल बाहेर पण
नारळाचा चव म्हणजे खवणलेलं ओलं
नारळाचा चव म्हणजे खवणलेलं ओलं खोबरं. >> थँक्स प्रज्ञा
सर्वांना धन्यवाद...
सर्वांना धन्यवाद...
ही एकदमच पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे ती साधारण सेमच असणार. [ तुम्ही पाकृ तिथली वापरली असेल तर श्रेय द्या असे सुचवतो. ही तुमची स्वतंत्र असेल तर गरज नाही. ] >> फा , मी अजिबातच ती रेसिपी फॉलो केलेली नाही त्यामुळे श्रेय देण्याचा सवाल नाही.
फक्त टिप मध्ये स्वनुभावाप्रमाणे फरक पडणार. पण मी पुन्हा पुन्हा सांगतेय की झाकण ठेवायची आयडिया मला अलीकडेच समजली. मी इतके दिवस झाकण ठेवत नव्हते. उलट जाता येता ढवळत राहत होते. पण झाकण ठेवण्यामुळे लाडू खूपच सुन्दर होतायत म्हणून धागा काढून लिहिले . मूळ रेसिपित पाक ठेवून द्या थोडा आणि लागेल तसा घाला हे लिहिलंय, ही त्यांची टिप झाली. असो. करत करत अनुभवातूनच सुधारणा होऊन नो फेल रेसिपी तयार होते. त्यासाठी आपापले अनुभव शेअर मात्र करायला हवेत.
मी मा बो वर फक्त माझे मन रमवण्यासाठी येते. मी कोणत्याही चर्चेत, वादात कधी भाग घेत नाही. हे मी डे वन पासून स्वत:वर घालून घेतलेले पथ्य आहे. मी कधी ही कूठे ही टीकेचा सुर लावत नाही. इथे ही मी तेच धोरण स्वीकारले आहे. Admin ना धागा डिलीट करायला सांगितले आहे. मला धागा डिलीट झाला तरी झिरो फरक पडणार आहे. आणि मा बो ला ही एवढ्या धाग्यात एक डिलीट झाला तरी फरक पडणार नाही. ज्यांची धागा डिलीट करा अशी मागणी आहे त्यांना मात्र जिंकल्याचा आनंद मिळणार
आहे. तो त्यांना खचितच मिळू दे...
ही माझी ह्या विषया वरची शेवटची पोस्ट.
सर्वांना धन्यवाद...
आणि ममो नी धागा उडवा सांगितलंय तर लोक तुम्ही लिहिणं बंद करू नका वर पोहोचले. कशाला आयड्या देताय... Lol पंतांच्या उपासाची आठवण झाली. साखर सोडा भात सोडा बोलणं सोडा जगणं सोडा... आणि ममो काही इतक्या चक्रम नाहीत की काही झालं आणि चालले मी सोडून करायला. >>> करेक्ट आहे अमितव
ममो, वरची सगळी चर्चा वाचली.
ममो, वरची सगळी चर्चा वाचली. रेसिपी इतकी पारंपारिक आहे की माझी आई पण ह्याच पद्धतीने रवा लाडू करायची. ती तिच्या आईकडून शिकली होती. म्हणजे आजीने रेसिपी लिहीली असती तर तिने चोरली असं म्हणणारे म्हटले असते.
ममोंचं मायबोलीवरचं विपुल आणि वाचनीय लेखन बघितलं तर त्यांना अशा चोर्या मार्या करायची काही गरज असायचे कारण नाही. >>>>>>
१०००+
कुचकट प्रतिसाद देणार्यांना कोणतेही धागे वर्ज नाहीत.
एकाच पदार्थाचे दोन धागे आले म्हणून पण आजकाल लोकांच्या भावना दुखावतात आणि चांगल्या धाग्याची वाट लागायला सुरुवात होते. >
शंभर टक्के बरोबर
आई पण पाकात रवा घातला की झाकण
आई पण पाकात रवा घातला की झाकण ठेवून मुरू देते असं आठवतं. रात्री झोपायच्या आधी पाकात टाकून सकाळी ही लाडू वळलेले आठवतात. आणि पाकाचं प्रमाण चुकलं की टणटणीत गोळा झाल्यावर जरा गरम करुन सारखे केलेले ही.
माबोवरच मध्यंतरी समजलेलं की राघवदास मिठाईवाला मुंबईला होता त्याच्याकडे असे लाडू मिळत म्हणून त्यावरुन हे नाव पडलं.
असा पाकात टाकलेला गरम गरम रवा-नारळ .. लाडू वळायच्या आधीच थोडे सैलसर असताना वाटीत घेऊन चमच्याने खायला त्या लाडवांपेक्षा अप्रतिम लागतो. यालाच आमच्याकडे राघवदास लाडू ही म्हणतात.
यंदा दिवाळीच्या तोंडावर
यंदा दिवाळीच्या तोंडावर मायबोलीवर फटाके वाजवावे / उडवावे / फोडावे की ... नये हा वाद झाला नाही, ते फटाके इथे फुटले.
माझ्यासाठी मायबोली फेसबुक रील्स किंवा इन्स्टाग्राम नाही. अर्थात त्यापेक्षा बरंच जवळचं काही आहे. इथे आपसूक तयार झालेली एक सिस्टिम आहे, असं वाटतं. त्याला अनुसरूनच तो प्रतिसाद होता. आता मायबोली इन्स्टाग्राम होत असेल तर त्याची सवय करून घेईन म्हणतो.
रवा नारळ लाडू पारंपरिक खरे. पण ' त्या' धाग्यावरची कृती वाचून अनेकांनी पहिल्यांदाच केलेले दिसतात.
हा धागा कुण्या नव्या किंवा अपरिचित सदस्याच्या नावाने असता , तर असे आणि इतके प्रतिसाद आले असते का?
मायबोलीवर आधीच असलेल्या पाककृतीची आपली पद्धत लिहिताना एकदा लिहिणार्याने आधीच्या धाग्यांचीही नोंद घेतल्याचं आठवतं. इथेही तसं झालं असतं तर ते उचित झालं असतं. पण मनीमोहोर म्हणताहेत की तो धागा, तिथे त्यांनी दिलेला प्रतिसाद हे त्यांच्या लक्षात नव्हते. हे घडूच शकते.
मनोमोहोर, तुमचं लिखाण /पाककृती आवडल्याचं त्या त्या धाग्यावर मी अनेकदा लिहिलं आहे. इथे मी लिहिलेल्या प्रतिसादांत वैयक्तिक काही नव्हतं. प्रतिसादाचा सूर जास्त कठोर झालाबद्दल मी तुमची क्षमा मागतो.
सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा!
प्रतिसादाचा सूर जास्त कठोर
प्रतिसादाचा सूर जास्त कठोर झालाबद्दल मी तुमची क्षमा मागतो. >> भरत, प्रत्येक जण आपापल्या विचारा नुसार व्यक्त होत असतो आणि त्यात हे बरोबर हे चूक असं ही काही नसत, त्यामुळे क्षमा वगैरे नको.
केले.. मस्त झाले चवीला पण..
केले.. मस्त झाले चवीला पण.. थोडे जास्त गोड वाटत आहेत पण ठिके चलता है दिवाळी है!
तुमच्याएवढे सुबक नाही वळता आलेत
अंजली_१२, पुढच्या वेळी साखर
अंजली_१२, पुढच्या वेळी साखर अडीच वाट्या आणि त्याच्या निम्मे पाणी घेऊन बघा. आमच्या घरात कमी गोड आवडतात म्हणून मी तेवढीच साखर घालते.
मस्त पाककृती ..!
मस्त पाककृती ..!
फोटोही छान ..!
वा ! मी अगदी याच पद्धतीने
वा ! मी अगदी याच पद्धतीने करते लाडू. झाकण ठेवायची टीप नवीन आहे. करून बघते!
Pages