Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
EVM तारी त्याला कोण मारी?
EVM तारी त्याला कोण मारी?
>>> EVM तारी त्याला कोण मारी?
>>> EVM तारी त्याला कोण मारी?
महायुती जिंकण्याचे हे कारण खरंच असेल का? विचारतोय, कारण EVM hack होते हे अजून कोणी सिद्ध करून दाखवल्याचे वाचलेले नाही.
सगळ्यात सोप्प कारण तेच आहे.
सगळ्यात सोप्प कारण तेच आहे. स्वत च आपयश लपावयाच असेल तर काहीतरी कारण पाहिजेच
येथे अवांतर ठरेल, पण पुलवामा
येथे अवांतर ठरेल, पण पुलवामा मुद्दाम घडवून आणून निवडणूक जिंकली हेही सिद्ध झाले नाही. किंबहुना, इतरत्र त्यावर कोणी एक अक्षरही उच्चारत नाही. (जवानांना श्रद्धांजली!) (नाहीतर टर उडवतो म्हणतील). मात्र या संकेतस्थळावर आता जवळपास ते सिद्ध झाल्यासारखे प्रतिसाद येतात.
अवांतर समाप्त!
=====
पराभव स्वीकारण्यात काही अडचण येत आहे का महाविकास आघाडीला?
अवांतरावर अवांतर
अवांतरावर अवांतर
पुलवामाचा विषय निघाला की दहशतवाद्यांसोबत पकडल्या गेलेल्या पोलिस अधिकारी देविंदर सिंगची आठवण येते. पुलवामा स्फोटाच्या वेळी तोच त्या भागाचा इन चार्ज होता. कुठे आहे तो सध्या ?
अवांतर समाप्त.
बोलणारा महाराष्ट्रात नुकताच
बोलणारा महाराष्ट्रात नुकताच मंत्री झालाय.
https://x.com/LutyensMediaIN/status/1873603803775410362
राहुल आणि प्रियांका जिंकण्याचे खरे कारण हेच असेल का? हे सिद्ध झालंय का?
>>> अवांतरावर अवांतर
>>> अवांतरावर अवांतर
पुलवामाचा विषय निघाला की दहशतवाद्यांसोबत पकडल्या गेलेल्या पोलिस अधिकारी देविंदर सिंगची आठवण येते. पुलवामा स्फोटाच्या वेळी तोच त्या भागाचा इन चार्ज होता. कुठे आहे तो सध्या ?
अवांतर समाप्त.<<<
अवांतरावरील अवांतरावर या धाग्यावर लिहू शकत नाही.
'तो सध्या कुठे आहे' या एखाद्या मराठी मालिकेच्या शीर्षकासारख्या प्रश्नाचे उत्तर मला अजिबात माहीत नाही. मात्र, तो असायला नको तिथे आहे किंवा गायब आहे यावर व्हायला हवा तेवढा गदारोळ येथे झालेला वाचला नाही. न्यायाधीश आरोपींना प्रश्न विचारतात या प्रकारच्या लेखनशैलीतून बाहेर पडणे श्रेयस्कर! याचे कारण मायबोलीवरील दोन तीन सदस्य, विरोधी पक्ष नेते आणि भारताची बहुसंख्य जनता त्या प्रश्नांचे उत्तर देण्याची आवश्यकता आहे असे समजत नाहीत.
एक अख्खी बस उडेल एवढी स्फोटकं
एक अख्खी बस उडेल एवढी स्फोटकं काश्मीरसारख्या सुरक्षा यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या भागात कशी आली, त्या जवानांना नेण्यासाठी केलेली हेलिकॉप्टरची मागणी का धुडकावली, अतिरेक्यां सोबत पकडला गेलेला पोलिस अधिकारी कुठे आहे या प्रश्नांच्या उत्तरांची गरज वाटत नाही, म्हणजे उत्तरे माहीत आहेत. धन्यवाद.
गुरूदेव माझा डबा. घ्या ना.
गुरूदेव माझा डबा. घ्या ना.
मासे आणि भाकर तोंडाला पाणी सुटलंय जणू
लोकशाहीमधे शंका घेणे अजूनतरी
लोकशाहीमधे शंका घेणे अजूनतरी मान्य असायला हवे. कोट्यावधी जनतेच्या रास्त शंका आहेत. EVM बद्दल प्रश्न असतील, शंका असतील तर निवडणूक आयोगाने शंकांचे निरसन करावे. हे तर त्यांचे काम आहे. नाहीतर मारकवाडी सारखी परिस्थिती सगळीकडे दिसणे लोकशाहीला शोभा देत नाही.
निष्पक्ष आणि भयरहित वातावरणांत निवडणूका पार पडल्या असत्या तर निकाल वेगळे दिसले असते.
अजित दादा पवार, नारायण राणे, निलेश राणे, एकनाथ शिंदे, भुजबळ, अशोक चव्हाण आणि सर्वात महत्वाचे जरांगे पाटील या सर्वांच्या सहकारार्याने फडणवीसांनी विजयश्री अक्षरश: खेचून आणली आहे. नसेल दिसत अपेक्षित असलेली आत्मनिर्भरता, घेतला असेल पैसे वाटपाचा आधार ( चक्क व्हिडिओ मधे कैद आहे ) , वाटली असेल दारु/ मटन पण हवे असणारे मताधिक्य तर मिळाले.
बहुमत मिळविल्यावरही विजय स्वीकारण्यास अडचण का येत आहे?
हे सगळे सुप्रीम कोर्टात जाऊन
हे सगळे सुप्रीम कोर्टात जाऊन सिद्ध करून टाकावेत ही विनंती! म्हणजे प्रश्नच मिटला.
कोर्टावरही भाजपची पकड आहे हे नरेटिव्ह माहीत आहे.
बरेचदा जनता बहुमताने आपल्याला नाकारते हे काही नेत्यांना स्वीकारता आलेले दिसत नाही
निवडणूक आयोगाचे काम आहे,
निवडणूक आयोगाचे काम आहे, सुप्रीम कोर्टाचे नव्हे. पारदर्शकतेचा आव आणायचा आणि सीसीटीव्ही, व्हिडिओ फुटेज दाखवायचे नाही. VVPAT १००% मोजण्यास नकार. कशाला मग VVPAT आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचा खर्च करतेय निवडणूक आयोग?
निवडणूक आयोग आव आणतो म्हणून
निवडणूक आयोग आव आणतो म्हणून म्हणालो की सुप्रीम कोर्टात सिद्ध करून टाकावेत, एकदाचा प्रश्न मिटेल
नरेटिव्ह : कोर्टवर भाजपाची
नरेटिव्ह : कोर्टवर भाजपाची पकड आहे.....

Le Fact : घालिन लोटांगण, वंदीन चरणं.....
इस दुनिया में सुकून से जीना कौन नही चाहता भला??
ह्यात काय सिद्ध करायचे?
ह्यात काय सिद्ध करायचे? निवडणूक आयोगाने आयत्यावेळी नियम बदलले, १००% VVPAT मतमोजणीची गरज नाही, अशाने शंकांचे निरसन कसे होणार? सुप्रीम कोर्ट चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात टोलनार. महाराष्ट्रातील पक्षफुटीच्यावेळी सुप्रीम कोर्टाने आमदार अपत्रातेचा असाच निर्णय दिला .
हो ना. पक्षफूट वैध की अवैध.
हो ना. पक्षफूट वैध की अवैध. शिंदे सरकार वैध की अवैध याचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अजून घेतलेले नाहीत.
अवैध असलं तरी आता काय फरक
अवैध असलं तरी आता काय फरक पडतोय?
भाताचा परत तांदूळ होत नाही.
हो. म्हणूनच तो निर्णय वेळेत
हो. म्हणूनच तो निर्णय वेळेत न येणं खुपतं. अर्थात भाजपने चक्की पिसिंग फेम अजित पवारांना आपल्यात घेऊन आधीच सोय केली होती.
भाताचा परत तांदूळ होत नाही.
भाताचा परत तांदूळ होत नाही.
परंतु निकाल वेळेवर लागला तर , पुन्हा अशाच प्रकारची केस आल्यास निकालाचा संदर्भ, दाखला देत येऊ शकतो. मुळात पक्ष अशा पद्धतीने बळकावता येतो का हे स्पष्ट झाले असते.
जा वाढा पंगती बसवा.
जा वाढा पंगती बसवा.
आणि जसं वाढलं तसं वाढत गेलं.
XYZ रचिला पाया,तुका माका (a
XYZ रचिला पाया,

तुकामाका (a narcissist) झालासे कळस ( येथे किळस ही चालेल )ह्या पानावर किंवा मागच्या
ह्या पानावर किंवा मागच्या पानावर पुलवामाचा कोणताही उल्लेख अन्य कोणी केला नसताना अचानक अवांतर म्हणून पुलवामाची पोस्ट येते हे म्हणजे खाई त्याला खवखवे की काय..?
हे सगळे सुप्रीम कोर्टात जाऊन
हे सगळे सुप्रीम कोर्टात जाऊन सिद्ध करून टाकावेत ही विनंती! म्हणजे प्रश्नच मिटला.>>
शंका दर्शवणाऱ्यानीच का करावे सिध्द. निवडणूक आयोग जनतेचे नोकर आहेत. त्यांनी का करू नये मालकाचे शंका निरसन.
हे सगळे सुप्रीम कोर्टात जाऊन
हे सगळे सुप्रीम कोर्टात जाऊन सिद्ध करून टाकावेत ही विनंती! म्हणजे प्रश्नच मिटला.>>
शंका दर्शवणाऱ्यानीच का करावे सिध्द. निवडणूक आयोग जनतेचे नोकर आहेत. त्यांनी का करू नये मालकाचे शंका निरसन.
हे सगळे सुप्रीम कोर्टात जाऊन
हे सगळे सुप्रीम कोर्टात जाऊन सिद्ध करून टाकावेत ही विनंती! म्हणजे प्रश्नच मिटला.>>
शंका दर्शवणाऱ्यानीच का करावे सिध्द. निवडणूक आयोग जनतेचे नोकर आहेत. त्यांनी का करू नये मालकाचे शंका निरसन.
हात दाखवून...
सरपंच हत्या झाली. राजकीय नेत्याचे नाव पुढे येत आहे. परभणीमधे दंगल घडविणार्यांवर कारवाई झाली ?
गृहमंत्री पद किती महत्वाचे आहे आणि ते आपल्याकडेच ठेवण्यासाठी फडणवीसांनी किती हट्ट केला होता. आता म्हणतात गुंडाराज चालू देणार नाही.
फडणवीसांच्या बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृती मधे किती अंतर असते ? ७०, ००० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला म्हणून अजित पवारांना चक्की पिसायला पाठवणार होते हे बोलणे झाले. EVM कडून हवा असलेला कौल मिळविल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होण्याची शिक्षा देण्याची कृती केली.
माननीय उद्धव ठाकरे यांच्या
माननीय उद्धव ठाकरे यांच्या बोलण्यात व कृतीत मात्र अंतर नसते, हे अनुकरणीय आहे.
"एक तर तू राहशील किंवा मी राहीन"
आमच्या इमारतीतील सिक्युरिटी
आमच्या इमारतीतील सिक्युरिटी चोर्या करत होते. काही मोठ्या चोरींचेही आरोप होते त्यांच्यावर. कंपनीच्या मॅनेजमेंटकडे तक्रार केल्यावर त्यांनी तक्रार नोंदवून घेतली आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले. दोघा तिघा सिक्युरिटींना निलंबीत केले, कुणाला ताब्यात घेउन खटला सुरु केला, पण नव्या चोरीच्या बातम्याही येत होत्या. आम्ही त्रस्त होतो.
तशात दुसर्या एका सिक्युरिटी कंपनीचे मालक आपल्या इतर लोकांसोबत आले. त्यांनी आमच्या सिकुरिटी कंपनीच्या कितीतरी वाईट गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि पुढचे कंत्रात आम्हाला द्या, बघा कसे सगळे गैरप्रकार चुटकीसरशी थांबतात म्हणाले. आमच्या इमरतील अनेकजणांनी या नव्या सिक्युरीटी कंपनीचे अमाप कौतुक केले.
मग आधीच्या कंपनीचे कंत्राट संप्ल्यावर मिटिंग झाली त्यात आम्ही या नविन कंपनीलाच कंत्राट देण्यास बहुमताने सांगितले.
आणि नविन कंपनीला कंत्राट देण्यात आले. आमच्या इमारतीतील काही लोक मग फेर धरुन नाचु लागले गाउ लागले "दुख भरे दिन बीते रे भैया, अब सुख आयो रेऽ, रंग जीवन मे नया लायो रे ऽ" .
तो उत्साह, हुरुप पाहुन आम्ही सुध्दा साद दिली " बीते रे भैयाऽ, बीते रे भैयाऽ!"
पण लौकरच लक्षात आले नविन सिक्यूरिटी सुद्धा चोर्या करत आहे. आम्ही सिक्युरीटी कंपनीच्या मॅनेजमेंट कडे तक्रार केली. तर आमच्या इमारतीतील त्या काही जणांनी आम्हाला येड्यात काढले. म्हणाले "अरे या कंपनीचा मालक खरा इमारत भक्त आहे, किती साधा रहातो, त्याचे कुटुंबीय किती साधे रहतात. चोरी होणे शक्यच नाही!"
आम्ही सिक्युरिटी कंपनीच्या मॅनेजमेंटच्या उत्तराची वाट बघितली. तर कमनीच्या मालकानेच येऊन टेरेसवरुन घोषणा केली "सगळे आरोप खोटे आहेत. आपल्या इमारतीचे चांगले बाजुच्या इमारतवाल्यांना बघवत नाही, आणि आपल्या इमारतीतील काही लोक त्यांना सामिल आहेत आणि आमच्या विरुद्ध कटकारस्थाने रचत आहेत. विश्वास ठेवा मी आपल्या इमारतीची मान खाली जाईल असे करणार नाही आणि कोणी केले तर खपवूनही घेणार नाही!"
मग त्या सिक्युरीटी कंपनीचे समर्थक आम्हाला म्हणु लागले "तुम्हाला चोर्यांचा त्रास होत आहे, तर दुसर्या इमारतीत जावा की रहायला!".
चोर्या सुरुच राहिल्या. आधीच्या सिक्युरिटी कंपनीतील काहींवर डाका टाकण्याचे आरोप होते त्यांना या कंपनीने नोकरी देउन कोषाध्यक्ष वगैरे मोठी पदे दिली. पुढे या नव्या सिक्युरिटी कंपनीनेही डाका घातल्या असल्याचे उघडकीस आले. सिक्युरिटी कंपनीने सगळे आरोप धुडकावुन लावले.
पण त्या कंपनी समर्थकांना आता चोर्या नाकारणे शक्य नव्हते. पण त्यांनी तीन खूप सुंदर युक्तीवाद केले ज्यामुळे आमचे डोळे उघडले.
एक: "सुरक्षा कंत्राट म्हटले की चोर्या मार्या, अधुन मधुन डाका वगैरे करावेच लागते."
दोन: "आधीची कंपनी नव्हती चोर्या करत? तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म राधासुतांनो?"
तीन: "इमारत धोक्यात आहे. चोरी, डाके, दमदाटी, अन्याय, गुंडागर्दी अशा क्षुल्लक बाबींवरुन मतभेद करु नका, एकजुटीने रहा. लक्ष्यात घ्या, इमारत धोक्यात आहे! जरा कळ काढली की इमारतीचा सुवर्णकाळ आता हाकेच्या अंतरावर."
अशा रीतीने आमचे डोळे उघडल्याने आम्ही आता इमारतीच्या सुवर्णकाळाची आतुरतेने वाट पहात आहोत.
आला की कळवुच!
उबाठा गटाच्या शिवसैनिकांची
उबाठा गटाच्या शिवसैनिकांची मुंबई महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात मीटिंग सुरू असताना उबाठा गटाचे शिवसैनिक संतप्त झाले व म्हणाले की केवळ एका माणसामुळे आज शिवसेनेची ही अवस्था आहे. 'त्या माणसाने बोलणेच बंद करावे' ही त्यांची प्रमुख मागणी होती. तेवढ्यात ते सद्गृहस्थ त्या मीटिंगमध्ये आले व नेहमीच्या शैलीत बोलू लागले. परिणामतः, चार संतप्त
शिवसैनिकांनी त्यांना मातोश्रीच्या एका खोलीत नेले व तुडव तुडव तुडवले. अशी बातमी फेसबुक, यू ट्यूब येथे बघायला मिळत आहे .
यावेळी माननीय शांतपणे मीटिंगमध्ये बसून होते असे कळते
याची शहानिशा व्हायला हवी
निवडणूक आयोग बरखास्त करावे का
निवडणूक आयोग बरखास्त करावे का ? निवडणुकांचे खासगीकरण करून सरकारचा खर्च वाचवता येईल.
Pages