शब्दवेध व शब्दरंग (४)

Submitted by कुमार१ on 2 October, 2024 - 02:13

भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *

तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !

विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :

१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )

२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.

सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळाला 'म' हे व्यंजन उच्चारण्यास सर्वात सोपे असावे. याचा काहीतरी संबंध असावा.

अगदी बरोबर ! ते पण दिले आहे त्या वरील इंग्लिश संदर्भात :
(Probably a natural sound in baby-talk, perhaps imitative of sound made while sucking.)

. . . .

. . . .
परंतु एक गंमत बहुतेक महाराष्ट्रीय कुटुंबांनी अनुभवली असेलच.
मूल बाबा म्हणायला बऱ्यापैकी लवकर शिकते पण आई म्हणायला त्यानंतरचे काही महिने जावे लागतात
बिच्चारी आई Happy

… Probably a natural sound in baby-talk, perhaps imitative of sound made while sucking…..

No wonder for most kids food is मंमं

अवांतर:
दंडी लिखित दशकुमारचरीतम् मध्ये दहा कुमारांच्या गोष्टी आहेत. त्यातल्या एका कुमाराला एका प्रसंगात खालच्या ओठाला बाण लागतो त्यामुळे तो ओष्ठ उच्चार करू शकत नाही. त्यामुळे त्याला त्या प्रसंगानंतर प वर्गातील एकही अक्षर असलेले वाक्य दिले नाही.

… त्याला त्या प्रसंगानंतर प वर्गातील एकही अक्षर असलेले वाक्य नाही.…

हाऊ ब्रिलियंट ❗संहिता लिहितांना इतका सूक्ष्म विचार ❗

चित्तंगम

हृदयंगम वाचले होते. आज रामायणाच्या मराठी अनुवादात “अर्पिते फुले चित्तंगम” असे वाचले.

माझ्यासाठी नवीन शब्द:

छानच !

चित्तंगम = . हृदयंगम; मनोवेधक; हृदयस्पर्शी. (दाते शब्दकोश)

त्यावरून 'विहंगम' (पक्षी) शब्दही आठवला. आणखी असे कुठले '-अंगम' प्रत्यय लागलेले शब्द आठवत नाहीत.

चित्तंगम >>> च्युईंगम सारखे वाटत आहे. Happy
इतर 'गम' नवीन नाहीत.
छान चर्चा.

आज रामायणाच्या मराठी अनुवादात “अर्पिते फुले चित्तंगम” असे वाचले.>>> सुंदर वर्णन. Happy

… Dear, darling, beloved;… this is so close !

कारण संवाद सीतेच्या तोंडी आहे, स्वयंवरापूर्वी पुष्पवाटिकेत फुले वेचतांना अचानक साक्षात रूपवान राम सामोरा येतो त्या प्रसंगात हा शब्द आलाय.

.. पाठभेद आहेत….

होय.. पण हिंदीत हा प्रसंग तुलसीदास असा काही खुलवतात की वा रे वा. निमिषमाया प्रसंग.

हे त्याचेच मराठी भाषांतर असावे, चेकवतो.

Happy चालेल. भाषा व काव्यसौंदर्यापुढे सत्यासत्याचे विश्लेषणही रूक्ष वाटते.

>>>>>स्वयंवरापूर्वी पुष्पवाटिकेत फुले वेचतांना अचानक साक्षात रूपवान राम सामोरा येतो
वाह!

संस्कृतमध्ये हाताच्या पाच बोटांची नावे
कनिष्ठिका (करंगळी), अनामिका (करंगळीच्या शेजारचं बोट, ring finger) मध्यमा ( मधलं बोट) तर्जनी (index finger) आणि अंगुष्ठ.
पैकी तर्जनी नाव तर्ज् धातू पासून आलेले आहे. म्हणजे भीति दाखवणे, चूप बसायला सांगणे.
अनामिका नाव कसे पडले असावे?
पुरा कवीनां गणनाप्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासा!
अद्यापि तत्तुल्यकवेरभावादनामिका सार्थवती बभूव!!
कवींची नावं मोजताना करंगळी वर सगळ्यात आधी कालिदासाचे नाव घेतलं आणि पुढे गणनाच थांबली. त्यामुळे अनामिका हे पुढच्या बोटांचं नाव सार्थ ( अर्थसहित, योग्य अर्थ असलेलं) ठरलं. अनामिका म्हणजे जिला नाव नाही अशी. कालिदासाच्या तोडीचा कवी न झाल्यामुळे अनामिकेवर कुणाचंच नाव घेतलं गेलं नाही, ती अनामच राहिली.
अर्थात हे दंडी, भास, भारवी आदी कविवरांवर अन्यायकारक आहे यात संशय नाही. So take it as a joke!
यातील अंगुष्ठ ने मात्र फार्सी पर्यंत प्रवास केला. फार्सीत अंगुस्त आणि मराठीत आंगठा असे रुपांतर झाले.

चित्तंगम >>> च्युईंगम सारखे वाटत आहे >> Lol Lol

केकू, तो श्लोक मलाही आवडतो. पण अनामिका हे नाव त्यापूर्वीपासून असावं. कालिदासानंतर तुल्यवान कुणाचं नाव न मिळाल्याने त्या बोटाला जे (आधीपासून) अनामिका नाव आहे, ते सार्थ झालं, म्हणजे अर्थासह सिद्ध झालं असं तो श्लोक सांगतो. त्या गोष्टीत बोटांना नावं पडली असती तर करंगळीला "कालिदास" म्हणायला पाहिजे होतं.

So take it as a joke! हे बरोबर.

अंगुष्ठ >> माहिती आणि शब्दाचा प्रवास रोचक

हरचंद पालव Happy
अंगुस्तान हा शब्द तिथूनच आला आहे.
हा श्लोक जास्त यथार्थ आहे,
उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम् ।
दण्डिनः पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणाः ॥

* पुरा कवीनां गणनाप्रसंगे>>> उत्तम चर्चा.
पूरक माहिती :
अनंत शास्त्री यांचे संस्कृत साहित्यावर व्याख्यान चालले होते त्यात ते म्हणाले,

" वाल्मिकी हा आद्य कवी व त्यानंतर व्यास.
या दोघांनी रामायण व महाभारत ही आर्ष काव्ये रचली.

कालिदास हा पहिला विदग्ध महाकाव्य रचणारा. म्हणून विदग्ध साहित्यात त्याचाच पहिला क्रमांक लागतो !"

( विदग्ध = अभिजात )

चांगली चर्चा!
आर्ष आणि विदग्ध साहित्यात काय फरक असतो? हे वर्गीकरण कशानुसार ठरतं?

आर्ष = . ऋषिसंबंधीं; ऋषिप्रणीत (ग्रंथ, आचार, प्रयोग इ॰)
आर्षप्रयोग = ऋषींनीं दृष्ट अशा वेदग्रंथांत पाणिनीय व्याकरणाच्या नियमांना सोडून असणारे प्रयोग.
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7

......
विदग्ध वाड्मय =
न. अभिजात वाड्मय; ललित व उच्च दर्जाचें वाड्मय [सं.]
दाते शब्दकोश

धन्यवाद, पण मी निराळं विचारत होते - आपण वाचतो आहोत ते साहित्य आर्ष आहे की अभिजात हे कसं ठरवावं?
लेखकाच्या नावावरून, की पाणिनीचे नियम पाळलेत की नाही त्यावरून की इतर कोणता निकष?

Pages