चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आयाळ शेमिंगोद्भव>>> अर्रे देवा Lol Rofl
अगं मी त्याच्या तरूणपणातला राणी मुखर्जी सोबत चा दगडी अभिनय (बिच्छू नावाचा अति भयाण सिनेमा आहे तू/र्‍म्ड ने बघायलाच हवास इतका भयाण & दगडी अभिनय, त्याच्या वाटचा अभिनय राणी मुखर्जीने ओव्हर अ‍ॅक्ट करून भरून काढलाय) आश्रम अभिनया शी कंपेअर केला, त्यात त्याने खाऊनच टाकलेसे वाटले.. कारण त्याच्या वर चिड येत होती म्हणजे अभिनय अस्सल झाला.

बॉबी देओल शौकीया तौर पर मराठी शिकत असेल आणि या धाग्यावर आला तर त्याला वाईट वाटेल.
बाकी काही म्हणा, त्याला, त्याच्या बॉडीला आता खलनायक म्हणून चांगले दिवस आलेत.तो कंगवा(हे 'कंगवा' नाहीये असं मला मुलगी दरवेळी कळवळून सांगते.) नावाच्या साऊथ चित्रपटात पण व्हिलन आहे.

गुप्त : स्टोरी, बॉलिवूड मसाला, गाणी, लोकेशन्स/सेट्स, व्हिलन कोण याचे अंदाज चुकणे
सोल्जर : अब्बास-मस्तान, बॉलिवूड मसाला, प्रीति झिंटा

दोन्हींत बॉबी देओल होता ही निव्वळ योगायोगाची गोष्ट !!

मी पाहिलाय बिच्छू. कारण स्टोरी इंटरेस्टींग होती. थांबा लगेच बघायला जाऊ नका.
तो Lèon The Professional या पिक्चरवरून घेतला आहे (अर्थात हे मला नंतर Lèon पाहताना समजले.) आणि त्यात ज्यॉं रेनो (पिंक पॅंथरमधला सिनीअर) व नताली पोर्टमनने उत्तम अभिनय केला आहे. बघायचा असेल तर Lèon बघा.

गाणी मस्त होती बिच्छू मधली
>>
- टोटे टोटे हो गया (परवाच पाहिलं हे)
- जीवन में जाने जाना
- आणि मलाईका वालं गाणं

ही तीन आठवली
पहिल्या गाण्यात बॉबी बद्धकोष्ठ झाल्यासारखा चेहेरा करून फ्लाय ओव्हर वरून चालत असतो
(तसाही जवळ जवळ पूर्ण पिक्चर भर त्याचा तसाच चेहेरा आहे)

पहिल्या गाण्यात बॉबी बद्धकोष्ठ झाल्यासारखा चेहेरा करून फ्लाय ओव्हर वरून चालत असतो>>> लॉल दगड्/बद्धकोष्ठ सेम Wink त्याला खरंच पाईल्स असावेत तेंव्हा. आता मोकळा झालाय चेहरा Lol

Happy मागे चिकवा तुषार कपूरच्या फॅन क्लबला जवळजवळ जन्मच देणार होता. आता सरकत-सरकत बॉबी देओलच्या फॅन क्लबकडे गेला तरी आश्चर्य वाटणार नाही. तेव्हापासून कश्शाकश्शाचं आश्चर्य वाटत नाही. Wink

'दिल टोटे टोटे होगया' म्हणजे हेच असावे कदाचित... Lol

बॉबी देओल आहे तसाच आहे. अभिनयात कसलीही प्रगती झालेली नाही पण आता अचानक त्याच्या मख्खपणात लोकांना स्वॅग वगैरे दिसू लागलेला आहे. अ‍ॅनिमल ची इतकी महाप्रचंड हवा झाली की मला वाटले काहीतरी भन्नाट रोल केलाय त्याने. (ढकलत ढकलत) सिनेमा बघितला तर डोक्याला हात लावला, काहीही सब्स्टन्स नाहीये त्या रोल मधे आणि बॉबी तो च तो जुना बॉबी आहे Happy सो बेसिकली लोकांची अभिरुची बदलली आहे हीच बॉटमलाइन मला वाटते.

हमराज ( अक्षय खन्ना, अमिषा पटेल) मध्ये बॉबी देओल सुसह्य होता. मी त्याचा हा एवढा एकच पिक्चर बघितलाय बहुतेक.

हमराज ( अक्षय खन्ना, अमिषा पटेल) मध्ये बॉबी देओल सुसह्य होता. >>>
पण अक्षय खन्ना असताना बॉबी देओलला बघायचेच का मुळात?

इतका पण वाईट नाहीये तो.मी आश्रम पासून फॅन क्लब मध्ये आहेच.तुम्ही जियाला मधला हिरो,मराठी खिचडी मधला हिरो,विकास भल्ला हे जन पाहिले नाहीयेत का?त्यांच्यापुढे हा अभिनयसम्राट वाटतो की नाही?

जियाला मधला हिरो
>>
अकरावीत माझ्या वर्गात एक चिंचवड ला रहाणारा पोरगा होता. त्याला जियाला फर्स्ट डे बघायचा होता (त्यावरून मी त्याला मेजर जज केलं होतं)
एक वो दिन है और आज का दिन है की कुणीतरी जियालाचा उल्लेख केला...

मी आश्रम पासून फॅन क्लब मध्ये आहेच
>>
आश्रम पर्यंत बॉबी ला चेहेऱ्यावर मधूनच पवित्र पापी ड्यांबीस भाव दाखवायला जमायला लागलं आहे
बहुतेक मधल्या अज्ञातवासाच्या काळात डन धनोआ, तेज सप्रू, महेश आनंद वगैरे मंडळींकडे प्रायव्हेट ट्युशन लावली असावी

मैत्रेयी तू आश्रम बघितली नसावीस सीरीज.. अगं तो तितकाच दगडी राहिला नाहिये, पीपल चेंज यू नो Wink

१ किशन कुमार म्हणुन ठोकळा होता, अच्छा सिला दिया, अनू तो राहिलाय तुझ्या नामावलीत.

काल मी महाराज बघितला.. जयदिप ने नेहमीप्रमाणेच मस्त काम केलेय, देहबोली, माज पण तो प्रमुख भूमिकेत असून पण काहीतरी मिसींग वाटलं..
दर सीन प्रेडीक्टेबल च होता, सीन घडतय तसं तसं अर्रे हे तर होणारच होतं.. वगैरे येत होतं मनात. आश्रम नंतर हा पाहिल्याने ईफेक्ट डोक्यात आधीच होता. हीरोईन डोक्यात गेली.. जुनेद खान अगदीच सामान्य आहे. अस्मिता रिव्ह्यु ला+१
दक्षिणा रेव्यु ला पण +१.
संवाद फेक आणि जिवणी या दोन गोष्टी सो सो वाटल्या>>> अगदीच. कुठे त्याचा बाप काय जादू केली होती. नकळत मन तुलना करतेच. पण हा ठोंब्या किंवा मख्ख नाहिये. खूप प्रयत्न केलाय, संस्कृत डायलॉग पण चांगले बोललाय पण हिरो वाली जादू नाही.

आशु, या सर्व बाबांचा पॅटर्न एकच असतो.त्यामुळे देजावू येणं साहजिक आहे.
बाय द वे मुख्य नायिकेला जोवर जेजे 'मेरी लाडली है ना तू' असं आपल्याला एकटीलाच स्पेशल न म्हणता सर्वाना म्हणतोय हे कळल्यावरच जेजे चुकीचं करतोय असं वाटतं का?प्रत्यक्ष चुकीचं करताना वाटत नाहीच?(बहुतेक ते आवडून घ्यायचं त्याकाळी पीअर प्रेशर असेल.)

किशन कुमार चे भारतीय चित्रपट सृष्टीतील महत्व यावर पीएचडी करता येऊ शकेल.
त्याच्या मुळे अनेक दगड अभिनेते वाटू लागले.

प्रत्यक्ष चुकीचं करताना वाटत नाहीच?(बहुतेक ते आवडून घ्यायचं त्याकाळी पीअर प्रेशर असेल.)>>>>

हीच तर खरी सेवा हे डोक्यावर बिम्बवले असते, आपल्याला निवडले म्हणजे आपल्यावर खुप मोठी कृपा आहे हे आईवडील स्वतःला समजवतात आणि ही कृपा मुलीमुळे मिळाली त्यामुळे मुलीला गुरुची सेवा करायची संधी जास्तीत जास्त मिळेल हे पाहतात.

अशा उपकृत लोकांना प्रत्यक्ष पाहिलेले आहे. Sad

अशा उपकृत लोकांना प्रत्यक्ष पाहिलेले आहे
>>>>
रिअली? आजच्या काळात मुलींच्या एक्स्प्लॉयटेशनला सेवा मानणारे आई वडील आहेत? मला वाटायचं की मजबुरी/मुलीचं पुढचं आयुष्य बरबाद होऊ नये म्हणून गप्प राहतात लोक.

जियाला >>> कल चौदहवी की रात थीचं फ्युजन करणारा ना? त्या नरपुंगवाचं नाव सिरीज खान आहे. (हे का आठवतंय मला? गाणं पण चालीसकट आठवतंय)
पिकनिकच्या बसमधे अंताक्षरी खेळत असताना मध्येच ‘जियाला’ म्हणून ओरडायची फॅशन आली होती असं अंधुकसं आठवतंय. का ते मला विचारू नका. त्यावेळी माहित करून घेण्याची इच्छा नव्हती, आत्ताही नाही.

Since I liked Vikas Bhalla for his looks, I give you leave to remain in Bobby Deol fan club Wink

मागच्या पानावर अस्मिताने लिहीलेला महाराजचा रिव्ह्यू खरंच छान आहे. मिस झाला होता.
चित्रपट पाहणे होत नाही, पुढे मागे ओटीटीवर आला आणि गडबड गोंधळ थांबून वेळ मिळाला तर पाहीन.
जुनैद खान बद्दल एव्हढं आकर्षण वाटत नाही.
(आमीर खान जेव्हां कयामत द्वारा आला होता तेव्हां ही असला कसला मार खाणारा हिरो ? हा तर शाळेतला मुलगा, मुलींचा हिरो अशा प्रतिक्रिया होत्या).

यामुळेच पुरूष श्रेष्ठ म्हणावे लागतील.
पुरूष भेदभाव करत नाहीत.
ते एकाच वेळी ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, सोनाली बेंद्रे, बिपाशा बासू, मल्लिका शेरावत आणि शेजारीण या सर्वांना सारख्याच ममत्वाने पाहू शकतात. अत्यंत विशाल अंतःकरण !

प्रत्यक्ष चुकीचं करताना वाटत नाहीच?>>> चुकीचा स्पर्श १० वर्षाच्या मुलीला ही कळतो पण गुरू काही चुकीचं करणारच नाही, आई बाबांनी टाकलेला विश्वास ह्याच्य कन्फ्युजन मधे ती जाते पण बुद्धी कमीच तिला तशी..म्हणुन मारून टाकलं..जरा चंट हिरोईन आणली. Wink
अनू तू किकु ला इग्नोर केलस ..

अक्षय खन्ना असताना बॉबी देओलला बघायचेच का मुळात?>> Uhoh काय तरी प्रश्न.. पानात तोंडल्याची भाजी असताना दुसर्या दोडक्याच्या भाजी कडे कसं बघता... असं वाटलं Lol

Pages