Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
ह्म म्हणून झालं का सगळ्यांचं?
ह्म म्हणून झालं का सगळ्यांचं?
मुंज्या चांगला आहे.ककुडा चा
मुंज्या चांगला आहे.ककुडा चा ट्रेलर पाहिला, खूप स्त्री सारख्या व्हाईब आल्या. त्याच्या ऐवजी कठपुटली पाहिला(तो जरा कायच्याकाय होता.)
हपा
हपा
ह्मह्मद्या मटणवाल्यासाठी थांबलो होतो.
(No subject)
"इन्कार" -> fast आणि Crisp
"इन्कार" -> fast आणि Crisp आणि मुन्गळा गाण्यामुळे गाजला होता. अमजद खान पण मस्त.
महाराज आणि महाराजा दोन्ही
महाराज आणि महाराजा दोन्ही वेगवेगळे चित्रपट आहेत.
महाराज- जुनैद खान, जयदीप अहलावत
लैंगिक शोषण करणाऱ्या महंतावर. सत्यकथेवर आधारित.
https://www.maayboli.com/node/85328
महाराजा- सेतुपती, अनुराग कश्यप
महाराजा नावाच्या सलूनवाल्याचा हिंसक बदला
https://www.maayboli.com/node/85328?page=4
----------------

"इन्कार" -> fast आणि Crisp आणि मुन्गळा गाण्यामुळे गाजला होता.
हो.
इथे श्रीराम लागूच्या मुलाऐवजी नोकराचा मुलगा किडनॅप होतो तोच ना ? श्रीराम लागूचे मुलं किडनॅप होण्यासाठीच असतात. 'दो और दो पांच' मधे सगळी धमाल यांच्या रत्नापायी आहे. ऑटॉफे सिनेमा आहे. शशी कपूर, हेमामालिनी, अमिताभ बच्चन, परवीन बाबी. पुन्हा नॉस्टॅल्जिया सुरू करू का ?
मुंज्याला सगळे ज ला य का लावत
मुंज्याला सगळे 'ज्' ला 'य' का लावत आहेत. 'मुंजा' का नाही. हिंदीत असेल पण मराठीत गरज नाही. अजून बघायचा आहे.
काकुडा बघितला. Zee5 / IPTV
सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख.
नाव सुद्धा आवडलं नाही. पण माणसांचा कंटाळा आला होता मग भुताचा बघावा म्हणून लावला. साधारण आहे. ज्यांना कशाचीच भीती वाटत नाही, त्यांना स्कूबी डू लेव्हलचा हॉरर वाटेल. भूत चकी नावाच्या इंग्रजी चित्रपटातील भुतासारखं वाटलं. भूत नक्की काय भूत होऊन बसलं हा भूतैतिहासिक भाग ॲनिमेशन मधे दाखवल्याने आणि कथा फारच तकलादू असल्याने फारच बंडल वाटलं. सोनाक्षी सिन्हा घोडनवरी दिसतेय पण छान दिसली आहे, आसिफ खान - नवराही घोडनवराच आहे. तिचा मंजुलिका टाईप डबलरोल आहे. सत्यवान सावित्रीची व्रत कथा यमाऐवजी भुताची फोडणी देऊन सादर केली आहे. नाही बघितला तरी उत्तमच..!
ऑटॉफे सिनेमा आहे >>> मधे एकदा
ऑटॉफे सिनेमा आहे >>> मधे एकदा परत पाहिला होता. धमाल आहे
श्रीराम लागूचे मुलं किडनॅप होण्यासाठीच असतात >>>
मुंज्याला सगळे 'ज्' ला 'य' का लावत आहेत >>> मलाही प्रश्न पडला होता.
पण माणसांचा कंटाळा आला होता मग भुताचा बघावा म्हणून लावला >>>
काकुडा >> ह्यावरून आठवलं. इथे
काकुडा >> ह्यावरून आठवलं. इथे कुणी माइंड युवर लॅन्ग्वेज फॅन आहे का? एका प्रसंगी प्रो व्हाइट 'आय अॅम' ने सुरू होणारी वाक्यं शिकवत असतो, तिथे तो गिओव्हानी म्हणतो 'आय अॅम अ कुकुडा' (कुक म्हणायचं असतं). ते काकुडा नाव वाचल्यापासून सारखा तोच प्रसंग आठवतो आहे मला.
र.आ. ओके, मला तुंबाड तुफान
र.आ. ओके, मला तुंबाड तुफान आवडला पण स्त्री पण आवडीत होता. असं पण भूत - भूत कॉमेडी चांगले & जास्त बनत नाहीत. बघणार मुंजा
रुही फाल्तू होता. भेडिया ठिक ठाक.
मुंज्याला सगळे 'ज्' ला 'य' का
मुंज्याला सगळे 'ज्' ला 'य' का लावत आहेत. >> त्याने तसे नाव ठेवले आहे सिनेमाचे. मुंझ्या, मांझा, मुंजा काहीही ठेवले असते तर तसेच लिहावे लागणार. उद्या मुंजा नावाचा वेगळा सिनेमा आला तर तसे लिहूयात.
भूतैतिहासिक >>>
चक्क टाईम्स आणि अन्य काही वृत्तपत्रात चांगले रिव्ह्यू आल्याने भीत भीत पाहू नका म्हटले. पण समविचारी कुणीतरी निघाल्याने अगदीच एकटे नाही म्हणून हायसे वाटले.
दो और दो पांच >> काय आठवण काढली. किती तरी वेळा बघून झालाय. सत्ते पे सत्ता , दो और दो पांच यात आकडे आहेत आणि धमाल विनोदी आहेत हा योगायोग.
तुम्ही नको म्हटल्यानेच बघितला
तुम्ही नको म्हटल्यानेच बघितला आचार्य
“सत्ते पे सत्ता , दो और दो
“सत्ते पे सत्ता , दो और दो पांच यात आकडे आहेत आणि धमाल विनोदी आहेत हा योगायोग.” - ‘इक दूजे कें लिए’ हा अपवाद म्हणावा लागेल.
'द आउटफिट' नेफ्लि बघितला.
'द आउटफिट' नेफ्लि बघितला.
मला वाटतं इथे लंपनने लिहिलं होतं पूर्वी.
सगळा सिनेमा एका टेलरच्या दुकानात घडतो. इंग्लंड मधली लोकं जीन्स घालायला लागली म्हणून शिकागोला आलेला हा एक टेलर... न्हवे 'कटर' आहे. त्या व्यवसायात टेलर म्हणजे दिलेलं शिवणारा. पण कटर म्हणजे एक पायरी वर असं असतं, हे ही तो परत परत सांगतो. तर शिकागोला यायचं हे कारण तो मजेत सांगतो खरं, पण खरं काही वेगळंच असू शकतं. पण ते तिकतं महत्त्वाचं आहे का?
तर त्याच्या दुकानात एका रात्री काही रहस्यमय घडतं. आणि क्षणाक्षणाला आपल्याला नवी माहिती समजते आणि डोक्यातलं पूर्वीचं समिकरण पुसुन आपणं नवं मांडतोय तो आणखी तिरपाकडं काही वास्तव समजतं. एका संथ लयीत डोक्याला हळूहळू कुरतडत सिनेमा बघायला मजा येते.
आवडला मला.
तुम्ही नको म्हटल्यानेच बघितला
तुम्ही नको म्हटल्यानेच बघितला आचार्य >>>
इक दूजे कें लिए’ हा अपवाद म्हणावा लागेल >> खरंच की. यातही आकडे आहेत. पण अमिताभ नाही.
नौ दो ग्यारह बघायला हवा आता.
यात आकडे आहेत आणि धमाल विनोदी
यात आकडे आहेत आणि धमाल विनोदी आहेत >> भारी निरीक्षण! आकडा दोनपेक्षा मोठा असला तर विनोदी - असं काही आहे का? ढाई अक्षर प्रेम के विनोदीच आहे म्हणा!
हम 7 7 है
हम 7 7 है
सिनेमातल्या पात्रांची संख्या बघता ते 7 गुणिले 7 असं असावं अशी एक शंका
यात आकडे आहेत आणि धमाल विनोदी
यात आकडे आहेत आणि धमाल विनोदी आहेत >> भारी निरीक्षण! आकडा दोनपेक्षा मोठा असला तर विनोदी - असं काही आहे का?
>>
नक्कीच नाही
--
हीरो नं.१, कुली नं.१, जोडी नं.१, बीवी नं.१ आणि समस्त नं.१ परिवार, सोबत एक और एक ग्यारा, अव्वल नंबर, शेरास सव्वाशेर आणि इतर
अँकी _/\_
अँकी _/\_
इथे श्रीराम लागूच्या मुलाऐवजी
इथे श्रीराम लागूच्या मुलाऐवजी नोकराचा मुलगा किडनॅप होतो तोच ना ?-> हो तोच हा. इथे पाहिल्यान्दाच पैश्याची बैग ट्रैक होउ नये म्हणुन बदलयला लावणे, ती ट्रेन मधुन फेकुन द्यायला सान्गणे असे भारी प्रसन्ग होते. त्यावेळे साठि एवढे चतुर किडनॅपर नव्हते.
भई महाराजा ..... खरंच महाराजा
भई महाराजा ..... खरंच महाराजा आहे .
तो सेतुपती मला बघवत नाही
तो सेतुपती मला बघवत नाही डार्क आणि ब्रुडिंग.
महाराजाबद्दल अस्मिताच्या
महाराजाबद्दल अस्मिताच्या "कामं अतिशय उत्तम झाली आहेत, चित्रपट वेगवान, विचित्र, चमत्कारिक, unpredictable आणि कुठं कुठं किळसवाणा आहे. तरीही सिनेमा प्रभावी आणि एन्गेजिंग आहे. " ह्याला एकदम अनुमोदन. तो सगळा विचित्रपणा एडीटींग च्या डुलक्यांचा भाग असावा असे वाटले - बरेचदा सीन सुरू झाल्यावर कुठल्या टाईमलाईन वर आहे हे कळायला वेळ लागतो . ते सगळे सॉर्ट आउट झाले कि युरेका मोमेंट येते दर वेळी. दाक्षिणात्य सिनेमांचा बटबटीतपणा वैतागवाणा आहे - ज्याची काडीचीही गरज नव्हती एव्हढी स्ट्राँग कथा नि अॅ़टींग आहे.
बरेचदा सीन सुरू झाल्यावर
बरेचदा सीन सुरू झाल्यावर कुठल्या टाईमलाईन वर आहे हे कळायला वेळ लागतो->+१११११
दाक्षिणात्य सिनेमांचा बटबटीतपणा -> खरय...
असामी पोस्ट आवडली.
असामी पोस्ट आवडली.
अँकी नं १, आयडी मुळे सिनेमे पटापट आठवले
अरे वा
आशुचँप,आणि हपा
आकड्यांचा खेळ रंजक होत चालला आहे.
आधी अमिताभचे आकडे लावलेले सिनेमे शोधत होतो.
पण दोन अन्जाने आठवला.
दोन तीन दिवसांपूवी "चक्रव्हूम्म - द ट्रॅप" पाहिला.
अजीर्ण होईपर्यंत धक्के देऊन खूनी सापडला तरी सिनेमा काय संपत नाही.
मोदीजींचा माटरस्ट्रोक असावा तसा ज्याने खून केला तो तसं करणारच आहे हे कुणी तरी जाणून असतं आणि त्याच्या त्या कृतीची वाट बघत असतं. त्याच्याकडून खून झाल्यावर मग आपला मास्टरस्ट्रोक खेळतं. एकदम सेफ..
पण इथेही सिनेमा संपत नाही. दिग्दर्शकाला आणखी धक्का द्यायचा असतो.
मग मोदीजींच्या मास्टरस्ट्रोकवर राहुलजींचा मास्टरस्ट्रोक म्हणत..
खूनी खून करणार आहे हे या चालाक व्यक्तीला माहिती होतं हे आणखी कुणालातरी माहिती असतं...
मग तो आपल्या परीने गेम फिनिश करतो...
एकंदर सिनेमा असा आहे. एक प्लेट पाणीपुरी, मग कालची खिचडी, त्यावर साबुदाणा खिचडी, मग पुलाव, नंतर लगेच मसालेभात, व्हेज दालचा, इडली हे सगळे आयटेम सरप्राईस म्हणून येत राहतात आणि अजीर्ण झाल्यावर चिकन गुणगुणा आणि नंतर बॉइल्ड लेगपीस विथ चिली एन सॉल्ट !
सगळे सॉर्ट आउट झाले कि युरेका
सगळे सॉर्ट आउट झाले कि युरेका मोमेंट येते दर वेळी
>>
येस
ॲक्टिंग मुळे बरा वाटला महाराजा
बटबटीत पणा खूपच जास्त एक्स्पेक्ट केला होता, त्या तुलनेत मापात होता.
अँकी नं १, आयडी मुळे सिनेमे
अँकी नं १, आयडी मुळे सिनेमे पटापट आठवले

>>
कल्की मधे प्रभास किती फूटेज
कल्की मधे प्रभास किती फूटेज खातो राव. ते सगळे स्टार वॉर्स, मॅड मॅक्स, वंडर वूमन, ड्यून्स चे महाभारताबरोबर केलेली मिसळ पुरेशी नव्हती का कि टीपीकल साऊदी सिनेमांमधला अक्कडबाक स्टाईलभाई असलेला हिरो हवाच ? चांगले पोटेंशियल असलेले सकस कथाबीज आहे नि स्पेशल ईफेक्ट्स पण सुसह्य आहेत पण अर्ध्याहून अधिक वेळ प्रभासच्या तापदायक स्टाईलभाईगिरी मधे घालवलाय. तुमच्या कडे अमिताभ नि कमल हसन असे दोन लखलखते हिरे आहेत नि तुम्ही प्रभास सारख्य पितळावर वेळ खर्ची करताय ? गेल्या काही वर्षांमधला मला आवडलेला हा अमिताभ चा पहिला रोल आहे. ह्यात तो अमिताभ म्हणून न येता कॅरॅक्टर म्हणून येतो. ह्यातही यंग अमिताभच्या काळातली लार्जर दॅन लाईफ फाईट आहेच पण ती कॅरॅक्टरचा भाग म्हणून येतेय म्हणून अजिबात खटकत नाही. एव्हढा म्हातारा अमिताभ ती करू शकतो हे पटवून देणे हे त्याच्या देहबोलीचे यश आहे. अमिताभ काय चीज आहे हे बघायचे असेल तर तो एका सीन मधे झाडाला टेकून उभा राहून बोलतो तो बघा. फाईट नि लांबचा प्रवास ह्यामूळे फिजिकली नि फायनली आयुष्याचे अखेरचे ध्येय समोर आलेय म्हणून मेंटली थकलेले 'कॅरॅक्टर' (हा शब्द मुद्दामहून वापरतोय - स्पॉयलर नको) जसे रेलून उभे राहील तसा उभा आहे पण त्याच वेळी तो रक्षक आहे म्हणून सावधान असायला हवा म्हणून एक पाय नि हात असा ठेवलाय कि कधीही उठून दे दणादण सुरू करू शकेल. वाह काय अमेझिंग समज आहे ह्या माणसाची ! अशा गोष्टींमूळे चेहर्यावरची काडी ही न हलणारा प्रभास फारच डोक्यात जातो.
प्रभासचा पहीला फाइट सीन
प्रभासचा पहीला फाइट सीन उगाचच आहे.
प्रभास पूर्ण रोल आणि ते
प्रभास पूर्ण रोल आणि ते पंजाबी गाणं दोन्ही उगाचच आहे.दीपिका ला पण काही काम नाहीये.अमिताभ नामक पाय रोवून उभ्या असलेल्या पर्वताला 'उगीच आपले असावे म्हणून' लावलेले दीपिका आणि प्रभास हे दोन टेकू आहेत.
कमल हसन चा रोल अजून चालला असता.
Pages