Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
असामी,
असामी,
बरेचदा सीन सुरू झाल्यावर कुठल्या टाईमलाईन वर आहे हे कळायला वेळ लागतो . >>>> मला तर काहीकाही कळलंच नाही, पण मी त्याकरिता पुन्हा बघणार नाही. लहान मुलांचे लैंगिक शोषण जरी सरळ न दाखवताही चपखलरीत्या आणि प्रभावीपणे सादर केले आहे, तरी जगातील सगळ्यात काळीकुट्टं गोष्ट वाटते. अंगावर येतेच..!
जरी सरळ न दाखवताही चपखलरीत्या
जरी सरळ न दाखवताही चपखलरीत्या आणि प्रभावीपणे सादर केले आहे, तरी जगातील सगळ्यात काळीकुट्टं गोष्ट वाटते. अंगावर येतेच..! >> +१००
प्रभास पूर्ण रोल आणि ते
प्रभास पूर्ण रोल आणि ते पंजाबी गाणं दोन्ही उगाचच आहे.>>>>+ ११
पण साऊथमधे फक्त प्रभास नाव ऐकून सिनेमा पाहणारे पब्लिक आहे...
कमल हसनचं जास्त काम बहुतेक पुढच्या सिक्वेल मधे असणार आहे, हा नुसता इन्ट्रो होता...
महाराजा आवडला मला.
महाराजा आवडला मला. सुरुवातीला १५-२० मिनिटे टिपिकल भडक साउथी मारधाड सिनेमा आहे की काय असे वाटले पण नंतर चांगली पकड घेतली. मुळात स्टोरी इंटरेस्टिंग आहे आणि त्या मागे- पुढे टेक्निक ने अजून एन्गेजिंग झाली आहे असे वाटले मला. थोडा साउथ फ्लेवर कमी असता तर चालले असते . अनुराग कश्यप ने अॅक्टिंग ओके केलेय पण अजून डायरेक्शन पण करायला हवं होतं. सेतुपतीचे कौतुक बर्याचदा ऐकलंय पण मर्डर मुबारक आणि फर्जी (काही भाग) इतकेच पाहिलेय मी त्याचे आणि फॅन वगैरे होण्याइतकी मला अजून त्याची पावर दिसलेली नाही. नेहमी सेमच बेअरिंग वाटतं मला त्याचं. .. हा रोल त्याला यात सूट झालाय एवढेच म्हणेन. बाकी पावर त्या स्टोरीची आहे.
एकूण मजा आली बघायला.
मैत्रेयी, बहुतेक 'मर्डर
मैत्रेयी, बहुतेक 'मर्डर मिस्ट्री' म्हणायचं आहे तुला. 'मर्डर मुबारक' दुसराच बंडल सिनेमा होता.
'क्रेझी रिच एशियन्स' नेटफ्लिक्सवर बघितला.
ऐकून वगैरे होते म्हणून बघितला. अजिबात आवडला नाही. अगदी टुकार हिंदी चित्रपटासारखा आहे. अती बेगडी श्रीमंती, चिनी पार्श्वभूमी, मोठे मोठे महाल, खवट सासवा, गोड आजेसासू (काय चाललंय), प्रेमळ बॉयफ्रेंड, मोठे कुटुंब वगैरे.
चिनी अतिश्रीमंत सिंडरेला स्टोरी आहे. टुकार आहे पण किमान धमाल असता तर बरा वाटला असता पण सासूची किरकिर , बारकी कारस्थानं, हे तर काहीच नाही माझ्यावर तर तुझ्यापेक्षा अन्याय झाला आहे हे रडगाणं ऐकायचा कंटाळा आला. नायिका न्यूयॉर्कमधील विद्यापीठात अर्थशास्त्राची प्राध्यापिका दाखवून/ सांगून तिला तेच मराठी मालिकेतल्या नायिकेचे गेम खेळायला लावलेत. शिवाय तेही बोथट वाटतात. 'रॉकी और राणी की लव्ह स्टोरी'च आहे, फक्त ह्या चिनी राणीची आई अगदीच गरीब आणि सिंगल मदर आहे.
महाराजा वर कुणी तरी स्वतंत्र
महाराजा वर कुणी तरी स्वतंत्र धागा काढेल याची वाट बघितली. ओटीटीवर आल्यावरच पाहीन.
या क्षेत्रातल्या किडा असणार्या एकाचा रिव्ह्यू वाचला. पटकथेबद्दल भरभरून लिहीले आहे म्हणून उत्सुकता.
स्क्रीनप्ले लिहीणे हे शिकायचे आहे आयुष्यात.
हा आणखी एक रिव्ह्यू
https://www.caseymoviemania.com/maharaja-2024-review/
महाराजा नेफ्लिवरच आहे. तिथेच
महाराजा नेफ्लिवरच आहे. तिथेच पाहिला मी.
बहुतेक 'मर्डर मिस्ट्री' म्हणायचं आहे तुला >>> ओह राइट!
महाराजा नेफ्लिवरच आहे. तिथेच
डबल
सेतुपतीचे कौतुक बर्याचदा
सेतुपतीचे कौतुक बर्याचदा ऐकलंय पण मर्डर मुबारक आणि फर्जी (काही भाग) इतकेच पाहिलेय मी त्याचे आणि फॅन वगैरे होण्याइतकी मला अजून त्याची पावर दिसलेली नाही. नेहमी सेमच बेअरिंग वाटतं मला त्याचं. .>>>> सेम, मलाही तो फारसा अपिल झालेला नाही, फर्जी मधे तर शाहिद पुढे तो अगदी प्रभावशुन्य वाटतो.
इतक्यात रौतू का राझ आणि
इतक्यात रौतू का राझ आणि महाराजा (विजय सेतुपती) चित्रपट बघितले
मंडळी, महाराजा आवर्जून बघा... (Netflix वर आहे)
महाराजा नक्की बघण्यासारखा आहे
महाराजा नक्की बघण्यासारखा आहे. कथेचा बदललेला सांधा अप्रतिम आहे. पण ठळक चुका पण आहेत काही.
*** स्पॉयलर अलर्ट ***
१. 'लक्ष्मी' हरवली हे निव्वळ प्रेक्षकांची दिशाभूल करण्याकरता बोललेलं असत्य आहे. बाकी काही लॉजीक नाही त्यामागे. पुढे बसणारा धक्का या खोट्या गोष्टीवर आधारीत आहे त्यामुळे तो धक्क्याची तीव्रताच कमी होते.
२. मुलगी येण्याआधी डब्बा मिळायला हवा हे आणखी एक असत्य. ज्या टाइमलाइनवर मुलगी घरी फोन करून बाबाला डब्ब्याबद्दल विचारते त्या वेळेस तिचा कॉल कट करायची आणि पुढचे २ कॉल्स टाळायची काहीच गरज नव्हती. टाइमलाईनचा खेळ चालू रहावा म्हणून ते ओढून ताणून आणलय असं वाटलं.
फॅन वगैरे होण्याइतकी मला अजून त्याची पावर दिसलेली नाही. >>> मी आधी होतो पंखा त्याचा पण फर्जी आणि आता महाराजा बघून तो पंखेपणा गेला माझा. या सिनेमात तर अगदीच पटला नाही त्याचा अंडरप्ले. आधीचा त्याचा मुखदुर्बळ, घाबरट / आत्मविश्वास कमी असलेला (हे तो सगळ्याच सिनेमात करतो
) माणूस पटतो पण नंतर तो ज्या पातळीचा हिंसाचार करतो तेंव्हाही चेहर्यावर तसेच भाव दाखवणे काही झेपलं नाही. ना खदखदणारा राग आहे ना खूनशी थंडपणा. त्याच्यापुढे अनुराग कश्यप उजवा वाटला. राग येण्याइतका खलनायकीपणा नक्कीच दाखवला आहे त्याने. शेवटच्या प्रसंगात कोसळून पडणे (वरच्या मजल्यावरून नाही तर मनातून) खूप सुंदर दाखवलय त्याने.
छान लिहिले आहे माधव, विचार
बात बन जाए नामक चित्रपट
बात बन जाए नामक चित्रपट सापडला.
सब कुछ उत्पल दत्त आहे. अमोल पालेकरचा कॅमिओ रोल आहे. राज बब्बर, झीनत अमान, जलाल आगा , अरूणा इराणी इतर कलाकार.
गोलमालचं यश एन्कॅश करण्याचा प्रयत्न आहे असे वाटते. अजून तरी मनोरंजकच आहे. उत्पल दत्त गोलमालचा रोल पुढे चालू या मूड मधे आहे. फक्त मिशीच्या ऐवजी गरीब आहे इथे. पुतणीसाठी एखादा गरीब मुलगा शोधतोय. त्यातून उडणारा गोंधळ ही थीम. दिग्दर्शक बासुदा, ऋषिदा नाहीत.
सेतुपती फर्जीत मला नाही फार
माधव छान पोस्ट. मी बघितला नाहीये.
सेतुपती फर्जीत मला नाही फार आवडला, त्याचं नाव काढलं की मला फक्त, तो फुकतो आणि पितो हेच डोळ्यासमोर येतं. बाप म्हणून एक हळवा सीन होता तिथे फक्त आवडला होता. आता सिझन टू आल्यावर जर त्याचं काम आवडलं तर मी जरूर लिहीन. त्याच्या हाताखालच्या माणसाने काही सीन्स छान केले, एकात तर एका वाक्यात गार केलं सेतूपतीला.
त्याचं इतर काम मी बघितलं नाहीये.
मला तो फार मख्ख वाटतो.(म्हणजे
मला तो फार मख्ख वाटतो.(म्हणजे साऊथ चा आहे म्हणून नव्हे, हिंदीत पण भरपूर मख्ख माणसं आहेत.)
माधव +१.
माधव +१.
********स्पॉयलर********
महाराजा जास्त अपेक्षा ठेवून बघितला. पण जरा निराशाच झाली. फसवल्यासारखं ही वाटलं. माधव च्या यादीत आणखी एक..
त्या लक्ष्मीच्या मागे पोलिसांना लावून तो खबरी जाळ्यात येईल इतका द्राविडी प्राणायाम कशाला केला? आणि नसता आला तर?
आणि जर पोलीस इन्स्पेक्टरला सगळं माहीत होतं तर आमचा तासभर वाचला असता की!
फार इंजिनीअर्ड स्टोरी वाटली. सहज काही वाटलं नाही. सेतुपती ही मेहह..
मी दोन वेळा पाहायचा प्रयत्न
मी दोन वेळा पाहायचा प्रयत्न केला. अजून खिळलो नाही. पोलिस स्टेशनमधे तो नाग घेऊन बाहेर येतो त्या सीनपर्यंत आलो आहे.
सोनाक्षी आणि रितेश चा काकुडा
सोनाक्षी आणि रितेश चा काकुडा हा टाईमपास म्हणूनही बघण्याच्या लायकीचा नाहीये
सुरवात जरा वाटली इंटरेस्टींग ते नंतर इतकं वाहवत गेलं सगळं की बस करो बस करो म्हणणारे नितीश कुमार चे मिम् आहे ती फिलिंग आली
********स्पॉयलर********
********स्पॉयलर********
त्या लक्ष्मीच्या मागे पोलिसांना लावून तो खबरी जाळ्यात येईल इतका द्राविडी प्राणायाम कशाला केला? आणि नसता आला तर?
आणि जर पोलीस इन्स्पेक्टरला सगळं माहीत होतं तर आमचा तासभर वाचला असता की! >>> तो खबरीच कल्प्रिट आहे हे माहित नसते ना त्याला. त्या धनाने पोलिस स्टेशन चा रेफरन्स दिला असतो फक्त. म्हणून तो लक्श्मी ची तक्रार देऊन मग रोज पोलिस स्टेशन मधे येऊन बसत असतो. तिथे २-३ वेळा इतर पोलिसांच्या पाठीला हात लावून पण पहातो तो "ती डिफॉर्मिटी" शोधायला. आणि पोलिस इन्स्पेक्टर ला आधी माहित नसतं. त्याच्याकडचे पैसे लाटण्यासाठी खोटा डबा बनवायचा म्हणून त्यातला एक पोलिस त्या मेटल फॅक्टरी मधे पोहोचतो आणि त्याच वेळी बेपत्ता धना चा तपास करायला दुसरा पोलिस पण तिथेच पोहोचतो तेव्हा त्यांना कनेक्शन लागते असे मला वाटले. मग त्या धना च्या फोन वर त्या खबरीचा कॉल दिसतो मग पुढे तपास करतात असे आपल्याला अगदीच ब्रीफ मधे दिसते.
डोक्याला त्रास करून घ्यायची
डोक्याला त्रास करून घ्यायची अटळ हौस म्हणून महाराजा पाहिला.सेतुपती मख्ख आहे हे मागच्या प्रतिसादातलं वाक्य मागे घेते.त्याने डोळ्याने प्रचंड अभिनय केलाय.अनुराग कश्यपने पण.
सेतुपतीच्या मुलीची वाक्यं सोडून पिक्चर मध्ये बाकी काहीच पटलं नाही.(स्पॉयलर देत नाहीये.)लोक भलती एक्झाम्पल घेतील त्यामुळे असे पिक्चर बनू नये असं वाटलं.त्यातली मारधाड बघून डोकं मागच्या बाजूला दुखायला लागलं.
There was a discussion on
There was a discussion on kishen kumar here. He lost his 21 year old daughter to Cancer this week. Prayers. Go hug your kids . I don't know what type of cancer it was.
ओह
ओह
ही बातमी वाचण्यात आली नाही.श्रद्धांजली.
फार वाईट झालं
फार वाईट झालं
मुंजा बघितला. मला १ टाईम वॉच
मुंजा बघितला. मला १ टाईम वॉच आवडला. ते भूत फारच येडं होतं मात्रं
काठीने मारून पण सरळ होतय..
ककुदा बघायला घेतलाय पण सो सो आहे. रितेश ला बघून आनंद झालाय, चांगला कलाकार आहे तो. जोक्स पुचाट आहेत. बघताना मला सैफ खान चा १ हॉरर कॉमेडी होता त्याची आठवण आली, त्यात यामी गौतम होती. सामो सारखं होतंय माझं कलाकार आठवत आहेत, मुव्ही नाम विसरले
स्त्री २ ची वाट बघेन म्हणते आता.
भूतपोलीस
भूतपोलीस
लोक भलती एक्झाम्पल घेतील
लोक भलती एक्झाम्पल घेतील त्यामुळे असे पिक्चर बनू नये असं वाटलं.त्यातली मारधाड बघून डोकं मागच्या बाजूला दुखायला लागलं.>>>>
तुफान हिंसाचार आणि लैगिक अत्याचार असलेले चित्रपट हल्ली येताहेत आणि ते लोकप्रिय होताहेत हे बघुन लोकांना खरेच इतका हिंसाचार आवडतो का व का आवडतो हा प्रश्न पडतो. असे चित्रपट बनु नयेत असे वाटते पण हॉलिवुडमध्येही असे चित्रपट बनतात, आवडतात, बक्षिसे मिळवतात. चित्रपट मनोरंजनासाठी असतो हे मानले तर हिंसाचारही मनोरंजन करवतो हे मला पटवुन घेणे कठिण जाते. असो. मला बघवणार नाही एवढेच.
द बर्निंग ट्रेन पाहतोय थोडा
द बर्निंग ट्रेन पाहतोय थोडा थोडा करून.
धर्मेंद्र, विनोद खन्ना असे दोन दोन देमार, दणकट, दणदणीत हिरोज असताना जितेंद्र त्या वेळी पानी कम चाय वाटायचा. आता खानावळीच्या जमान्यात जितेंद्रच दोघांपेक्षा चिकणा हिरो वाटतो.
परदेशी आपत्तीपटांना भारताचं हे उत्तर होतं.
हिंसाचार, शिवाय एका गंभीर
हिंसाचार, शिवाय एका गंभीर विषयाचा फक्त सूडकथेसाठी वापर, इतकी सुपरमॅन शक्ती असलेल्या माणसाला हे का करावे लागावे असे बरेच प्रश्न आले.म्हणजे सेतुपती निश्चित सोनं करतोय भूमिकेचं.पण इंटरनेटवर ज्या प्रकारे 'अभूतपूर्व पिक्चर, ऑस्कर ला जायला हवा, अशी कथा अनेक वर्षात आली नाही इत्यादी कौतुक होतेय त्या तोडीचा अजिबात नाही.
लापता लेडीज सारखे हलकेफुलके पण काही निश्चित संदेश देणारे पिक्चर्स बरेच बनण्याची गरज आहे.20 पॉझिटिव्ह, हलक्या चित्रपटानंतर एखादा महाराजा त्यातल्या त्यात पचवता येईल.या निमित्ताने अश्या भडक पिक्चरचं परत पेव फुटू नये.
कथेतही नाविन्य नाहीय खरेतर.
कथेतही नाविन्य नाहीय खरेतर. एक गुजराती लोककथा वाचलीय, त्यावर चित्रपटही आलेला. इथे जास्त लिहिले तर स्पोइलर होइल.
इथे बहुतेकांनी पाहिलाच असेल..
इथे बहुतेकांनी पाहिलाच असेल..
ट्रेन मधे आग लागते तेव्हां ऑल इंडीया रेडीयो द्वारा प्रवाशांशी संभाषण करण्याचा निर्णय विनोद खन्ना (चीफ इंजिनीयर) घेतो. जो मेन हिरोंपैकी असेल त्याचं पद काही का असेना, तोच अशी कामे करणार हा चित्रपटीय नियम इथेही लागू पडतो. तो सुपर एक्सप्रेसच्या प्रवाशांना आवाहन करतो कि जर तुम्हाला आमचे हे निवेदन ऐकू येत असेल तर तुम्ही पुढच्या रेल्वे स्टेशनवर लाल कपडा फेका म्हणजे तुम्हाला आमचे म्हणणे ऐकू जातेय याची खात्री आम्हाला पटेल. ( मगच आम्ही पते कि बात सांगू ).
म्हणजे हा अशा प्रसंगात सुद्धा खात्री पटली तरच महत्वाचे सांगणार. जे सांगायचंय ते सांगून टाकून, तुम्हाला हे समजले असेल तर... असे आवाहन का करत नाही याचे उत्तर पुढच्या प्रसंगात मिळते.
लाल कापड शोधायला धर्मेंद्र आणि सहकारी फिरत असतात. एका नवविवाहित जोडप्याच्या बॅगेत वधूचा लाल जोडा असतो. पण सुहाग कि निशाणी म्हणून ती द्यायला नकार देते. मग लाल साडी, लाल ब्लाऊज नेसलेली आशा सचदेव जोशात येऊन म्हणते कि " मेरा कोई सुहाग नही है, और ना ही आगे होगा , ये लीजिए " ... असं म्हणत ती साडी फेडते.
तर यासाठी विनोद खन्नाने सगळी "बात" एकदम न सांगण्याचा निर्णय घेतलेला असतो.
साडीचा पदर फाडून दिला असता तरी चाललं असतं, पगडी पण लाल असते, प्रवाशात कुणाकडे लाल शर्ट असेलच. पण छे !
नशीब यांचं आपत्ती व्यवस्थापनाचं राष्ट्रकार्य साडीवरच भागतं.
एकूणच बचावकार्यावर स्वतंत्र धागा निघू शकतो.
Pages