एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारले. मारल्यानंतर मृतदेहाचा अपमान होणारे कुठलेही कृत्य केले नाही. महाराजांच्या आदेशानुसार प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाची कबर बांधण्यात आली. महाराजांचे शत्रूत्व अफजल या व्यक्तीशी होते. शत्रू मारला गेला, वैरत्व संपले.
याच अफजलाने शिवाजी महाराजांचे मोठे बंधू ( संभाजी शहाजी राजे भोसले ) यांना कनकगिरी लढाईमधे कपटाने मारले होते. शिवाजी महाराजांनी शत्रू मारल्यावर त्याच्या प्रती सूडभाव दाखविला नाही तर सहिष्णुताच दाखविली.

पुढे कधी तरी सरकारी जागेवर अतिक्रमण केले गेले या कारणाने प्रतापगडाच्या कबरीच्या आसपास मोडतोड झाली आहे.

आज पुन्हा मोडतोड करण्याची भाषा करत आहोत. आता शहेनशाह औरंगजेब यांची कबर. मागणी महाराजांचे वंशज असणार्‍या उदयनराजे भोसले यांची आहे. मुख्यमंत्री ( हे गृहमंत्री पण आहेत - कायदा सुव्यावस्थेची जबाबदारी यांचीच असते ) म्हणतात प्रत्येकाला कबर हटविली जावी असेच वाटते.
https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-politics-aurangzeb-tomb-c...

festival of colours होळी, रंगपंचमी - वर्षातून एक वेळा येणारा हिंदूंचा सण.

शांतपणे साजरा करायला हवा असे वाटते. मशीदी समोर अगदी चेकाळल्यासारख्या जोरदार घोषणा, रंगांची उधळपटख्या, विकृत वाटेल असा नाच. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शांतता भंग पावेल असे कृत्य झाले आहे. रत्नागिरी मधे शिमगा साजरा करतांना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. उसकविण्यासाठी वाट्टेल ते चालले आहे. व्हिडिओ नेट वर उपलब्द आहे, बघवत नाही.

अनेक ठिकाणी हाणामार्‍या झाल्याचे चित्र आहे. हंसराज रंग खेळायचे सोडून वाचनालयांत स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाची तयारी करत होता . अशोक, बबलू, काळूराम यांनी त्याला रंग लावायला गेले. हंसराजने विरोध केला, झटापटी झाली आणि त्यात त्याचा अंत झाला Sad . किती वाईट घटना आहे.
https://indianexpress.com/article/india/rajasthan-man-strangled-death-st...

रंग तुम्हाला खेळायचा आहे तर खेळा, इतरांनी तो तुमच्यासोबत खेळायलाच हवा अशी जबरदस्ती कशाला ? मग त्यासाठी मारहाण अगदी थेट जीव घ्यायचा? वाचनालय पण सुरक्षित नाही ? सण हिंदूंचा, मारणारे हिंदू , मरणारा हिंदू ...

कमाल आहे.... Grok ट्रेंड होतोय इतका, बीजेपी आयटी सेल, भंगारात पण कुणी घेणार नाही अशी दारुण परिस्थिती उद्भवली आहे पण तरीही इथे काहीच हालचाल नाही?? Rofl

वाचलं ते.
विश्वगुरूंच्या नव्या मुलाखतीची - कॅनव्हास शूज - चिरफाडही पाहिलं. पण हे सगळं नेहमीचं झालं आहे. त्यांना वा त्यांच्या भक्तांना काही फरक पडत नाही.

टॉप २५ भक्त

मला हा भक्त खूप आवडला.
गुजरातमध्ये चांगली सरकारी कॉलेज नाहीत याला जबाबदार सरकार. सरकार म्हणजे भाजप सरकार ना? नाही. भाजप सरकारची बिल्कुल जबाबदारी नाही. आप सरकार जबाबदार.

नागपूरमधे उसळलेली दंगल पूर्वनियोजित होती असे फडणविस म्हणत आहेत. तेच राज्याचे गृहमंत्री असतांनाही त्यांना पूर्वनियोजित कटाची माहिती नव्हती आणि दंगल रोखण्यात अपयश आले?

औरंगजेबची दौलताबाद येथे असलेली कबर खणून काढण्यासाठी कारस्थान रचले जात आहे असे वरकरणी वाटत आहे. पण खरा उद्देश काय असेल?

अफजल खान ( तसेच सिद्दी मसुद, शाहिस्तेखान, मिर्झाराजे जयसिंग, दिलेरखान ) औरंगजेब यांना छोटे / खुजे दाखवून, त्यांच्या स्मारकांची / कबरीची मोडतोड करुन आपण कुणाचे महत्व कमी करत आहोत ? औरंगजेब शेवटची २५ वर्षे महाराष्ट्रात ठाण मांडून बसला होता. भला मोठा फौजफाटा, युद्ध सामग्री सोबत असतांनाही त्याला यश आले नाही.

शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि मावळे अत्यंत प्रतिकूल परिस्थिति लढले ते या बलाढ्य सेनानींसोबत. औरंगजेब, अफजल हे किरकोळ छाप योद्धे दाखविणे म्हणजे अप्रत्यक्षपणे शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराजांचा पराक्रम कमी करण्याच्या कटाचा भाग आहे.

प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलची कबर शिवाजी महाराजांच्याच आदेशाने बांधली होती. थोर सेनानीची कबर बांधण्यात त्यांना काही गैर वाटले नाही तर त्या योद्ध्याचे थोरपण / कबर नाकारणारे आपण कोण आहोत ? मरणानंतर वैर संपते मग हे २०२५ मधे का उगाचच लोकांच्या भावना भडकावण्याचे काम करत आहेत?

पूर्वनियोजित दंगलही रोखता आली नाही. आपलेच दात आणि आपलेच ओठ होते. कारवाई कुणाविरुद्ध करणार?

गुन्हा घडल्यावर तरी तत्परतेने कारवाई होते का? सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यावर तिन महिने होतात मंत्र्याचा राजिनामा घेण्यासाठी. अजूनही सर्व आरोपी पकडल्या गेले नाहीत.

बेरोजगारी, महिला सुरक्षा, भ्रष्टाचार, कर्जबाजारी पणा, शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नांवरुन EVM सरकार लोकांचे लक्ष इतरत्र वळवत आहे. खोदा जुन्या कबरी, भडकवा माथी.

ही आयकिडो या मार्शल आर्ट्स प्रकारातली युकीमी रोलींग टेक्निक (डिफेन्सीव्ह) आहे जेणेकरुन प्रतिस्पर्ध्याच्या ॲटॅकींग मुव्ह मधला जास्तीत जास्त फोर्स आपल्या शरीराला ईजा न होता निष्फळ जावा... आता सोमी वर काहीही लिहायला तर कुणाचे काही जात नाही. सोमी वर मजा घेण्यापर्यंत हे मर्यादित ठेवलं तर काही हल्रकत नाही पण कुणा माहितगार व्यक्ति समोर प्रत्यक्षात आपल्या अज्ञानाची लक्तरे स्वतःच लोंबवून घेणारे व तरी देखील न सुधारणारे कित्येकजण मला स्वतःला माहीत आहेत. जेंव्हा सत्ताधारी आधी फ्री आणि नंतर स्वस्ताल्या इंटरनेटची खिरापत आपल्या मित्रांकरवी वाटत होते तेव्हा त्यांना हे पक्के माहीत होते की या देशात बहुसंख्य जनता शिक्षण घेउन देखील
स्वतःची बुद्धी वापरण्यात माकडांपेक्षा अधिक नाही आहे....त्यांच्या हातात इंटरनेटरुपी बाटली सोपवली की काम फत्ते. आलु से सोना वर विश्वास ठेवणारी आणि पसरवणारी हीच ती समाजात बहूसंख्येने 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला' या बौद्धिक पतळीतली सुशिक्षित माकडे होती.

ओरीजनल व्हिडीओ, या आयकिडोचे अनेक व्हिडिओज युट्यूबवर उपलब्ध आहेत आणि बहुतेक सर्वच टेक्निक्स मधे विविध प्रकारच्या बॉडी रोलिंग्ज चा वापर प्रामुख्याने दिसतो.
https://youtube.com/shorts/6tTBKJHTIWI?feature=shared

अरे मी मोदीजींचा व्हिडिओ टाकला होता अचानक रागाचा कसा झाला? असं कसं होऊ शकतं बरं. अमानवीय. चिमितकारच झाला म्हणायचा. कमेंट पण काय काय आहेत एक. शे काय माणसं आहेत मंद एकेक. आमच्या गुणी राहुलजीना कायपण बोलतात. हे लोकं आहेत म्हणून इंटरनेट बदनाम आहे. राहुलजीनी कसलीच गिरकी मारले त्यात. मी पण आमच्या बॉसला तशी गिरकी मारायचा विचार करतोय.

आलु से सोना वर विश्वास ठेवणारी आणि पसरवणारी हीच ती समाजात बहूसंख्येने 'आधीच मर्कट त्यात मद्य प्याला' या बौद्धिक पतळीतली सुशिक्षित माकडे होती
मोदींनी १५ लाख देण्याचं आश्वासन दिलं होत. ह्यावरही बऱ्याच माकडांनी विश्वास ठेवला आहे.

बरं. मोदींनी १५ लाख देण्याचं आश्वासन दिलं नव्हतं. अमित शहा वो तो जुमला है, असं म्हणाले नव्हते.

पण परदेशी बँकांत भारतीयांचा इतका काळा पैसा आहे की तो परत आणला तर प्रत्येक भारतीयाला १५ लाख देता येतील असं तर मोदी म्हणाले होते ना? आणला का तो परत?
नोटाबंदीतून किती काळा पैसा निघाला?

विदेश से जो काला धन वापस लाएंगे उसमें से कुछ पर सेंट जो सॅलरी वाले लोग रेग्युलर टॅक्स भरते हैं ना उनको इनाम के रूप में वापिस देंगे - असं पण मोदी म्हणाले नव्हते का?

या सगळ्याचं काय झालं?

कोण काय करतं हे थोडीच बघायचं असतं. काय बोलतं ते बघावं.
आमच्या सोसायटीत एक जण कुठेही कचरा टाकायचा, थुंकायचा. एकदा मिटिंग मध्ये त्याला याबद्दल जाब विचारला असता तो म्हणाला "मी असं करणं शक्यच नाही. आमची परंपरा स्वच्छतेची आहे. आमच्या पूर्वजांनी स्वच्छतेचे महत्व हजार वर्षांपूर्वी लिहिले होते. आमचे घराणे स्वच्छतेचे प्रतीक आहे, स्वछता आमच्या जनुकांमध्ये आहे."
आम्ही टाळ्या वाजवून त्याचा सत्कार केला. तो आधी सारखाच वागतो पण तो सम्पूर्ण स्वछता पाळणारा आहे हे त्याने बोलण्यातून सिद्ध केलेले आहे. कुणाचीही पारख करायची असेल तर वागण्यावर जाऊ नये, ते फसवे असते, नेहमी बोलण्यावरून पारख करावी.

आलू से सोना आणि १५ लाखावर विश्वास ठेवणारे ह्यांची कॅटेगरी सेमच आहे. बाकी मोदींना प्रश्न विचारलेच पाहिजे.

तसं तर मोदी अजूनही भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा करणार असं म्हणत असतातच. त्यांनी अजित पवारांना भ्रष्टाचारी म्हटलं आणि दोनदा उपमुख्यमंत्री करून चांगली शिक्षा केली.

ग्रोकच्या पोस्ट्सची भारतातील रीच ( पोच) कमी करण्यात आली, असं ते स्वतःच सांगतंय.
# मदर ऑफ डेमोक्रसी.

तिकडे त्या ह्यांच्यासाठी एक प्रश्न पडलाय. तात्यांनी कॅनडा अमेरिकेचं एकावन्नावं राज्य असं म्हटलंय. हे कॅनडात राहणार्‍यांसाठी अमेरिकेच्या राजकार णावर बोलायला आमंत्रणच नाही का? तसंच भारतावर टॅरिफ लावणार, कसलीतरी विमाने भारताच्या गळ्यात घालणार, असं काय काय चाललंय. पण ते जाऊ दे.

व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे त्यांनी १५ लाख देण्याचे कबूल केले. १ एप्रिलला भारतीय नागरिकांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार.

Pages