या चित्रात दोन स्टार्स ओळखा, एक डोळा बंद करून काय दिसले ते सांगा, गायीला गोठ्यात जायचा रस्ता कोणता असे प्रश्न सोमिवर येत असतील तर आपण एका नॉर्मल रिटे वातावरणात आहोत असे समजावे.
अशा प्रश्नांना काही वेळा तिरसट, तिरपागडी उत्तरे (त्या शहराचे नाव टाळले आहे. नोंद घ्यावी) दिलेली असतात कि लोळण फुगडी @ घातल्याशिवाय राहवत नाही.
@ Copyright मामी
या धाग्यावर असाच खेळ खेळायला या.
प्रश्न गहन / अवघड नको. तो रिटे वाटला पाहिजे.
त्याची उत्तरे जास्तीत जास्त ट्रोलिंग वाटेलशी असावीत.
प्रश्नांना क्रमांक देऊयात.
उदा.
0) घराचा छज्जा रस्त्यावर किती फूट असावा?
उत्तरे
प्रश्न 0) जितका जास्त काढता येईल तितका काढावा. एक ना एक दिवस हे सगळे इथेच सोडून जायचे आहे.
Submitted by Gangaram
प्रश्न 0) 50 फूटाला 40 फूट तरी असायलाच हवा.
Submitted by Dhondi Ram
प्रश्न 0) पापड, कुरडया वाळवता येईल इतके तरी असावे.
. Submitted by Thami
खेळ करायचा का सुरू मग?
विचारा प्रश्न..
भारी उत्तरं सांग्या >>
भारी उत्तरं सांग्या >> बैठ्या, बोल्या, ऐक्या सारखं वाटतंय हे
रच्याकने मला सांग्या =
रच्याकने मला सांग्या = informer वाटले.
स्नो चे इन्फॉमर गाणे आले होते त्याचे मी सांगाड्या केले होते.
किडनीत ब्रेन हॅमरेज होऊ नये
किडनीत ब्रेन हॅमरेज होऊ नये यासाठी काय करावे ?
>>>> किडनी बीन्सची चटणी करून खावी दररोज
प्रश्न 6. शेजाऱ्याचा कुत्रा
प्रश्न 6. शेजाऱ्याचा कुत्रा लई भुंकतो ..काय करावं ?
>>>>>>
शेजाऱ्याचा कुत्रा भो भो करतोय
खरूज येऊ दे त्याला
ग आई रोडगा वाहीन तुला
हे गाणे दररोज भसाड्या आवाजात म्हणावे
2 कानफटात दे, तू रडत असताना
2 कानफटात दे, तू रडत असताना मीही तेच करीत असे.
मला फक्त चार माणसांची चिकन दम
मला फक्त चार माणसांसाठी चिकन दम बिर्याणी बनवता येते..आठ-दहा माणसांसाठी कशी बनवू?
एकदा बनवायची. चौघांना वाढायची
एकदा बनवायची. चौघांना वाढायची (स्वत:सहित). इतरांना दम द्यायचा.
पुन्हा बनवायची. उरलेल्यांना वाढायची. जेवलेल्याना दम द्यायचा.
माणसाची
माणसांसाठी असे करा बघु.
बाभो...चार माणसं मारून आता
बाभो...चार माणसं मारून आता अजून काही मारायची म्हणताय?
बाभो...चार माणसं मारून आता
डपो
केली दुरुस्ती
केली दुरुस्ती
कौआ बिर्याणी किती माणसांसाठी
कौआ बिर्याणी किती माणसांसाठी येते?
कौआ बिर्याणी किती माणसांसाठी
कौआ बिर्याणी किती माणसांसाठी येते? >>>
चालत आली तर एका माणसासाठी
स्कुटरने २
रिक्षाने ३
कारने ४ (स्वतः ड्राईव्ह केलेन तर पाच )
बस किंवा ट्रेनने आली तर भरपूर
स्कूटरवरुन, म्हणजे
स्कूटरवरुन, म्हणजे ब्रह्म्यांची ऑर्डर असणार!
सरळ प्रश्न पण रिटेच आहे.
सरळ प्रश्न पण रिटेच आहे. लुनावाल्या ब्रह्मेंची गोष्ट नेमकी काय आहे? शहाणं करून सोडा. मी जुन्या माबोवर सक्रीय नव्हते.
ब्रह्मेपुराण श्रवण करण्यासाठी
ब्रह्मेपुराण श्रवण करण्यासाठी शुचिर्भूत होऊन येणे आवश्यक आहे.
श्रवणभक्ती आधी ही आरती मोठ्या आवाजात म्हणायची आहे.
कोमेजून गंजलेली एक लुना राणी,
उतरलेली ब्याटरी, त्यात सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नवे नाही,
सुरु कशी होऊ ब्रम्ह्या, मला स्पार्कच नाही
सांगायाचे आहे, या कवितेतून मला, दमलेल्या लुनाची कहाणी तुला,
आटपाट पुणेनगरी गर्दी होती भारी,
घामाघूम ब्रम्हे करी रोजचीच वारी,
रोज सकाळीच ब्रम्हे निघताना बोले,
लिफ्ट द्यायची काल राहूनीया गेले,
जमलेचं नाही काल मला जरी,
आज परी देणार मी बळेच-जोरी,
विद्यापिठ्मार्ग मध्ये मारू मग फेरी,
ख-या खु-या पोरीसाठी ४००० जरी,
विकेन मी जुन्याबाजारात मला,
दमलेल्या लुनाची कहाणी तुला,
असा कसा मालक देव लुनाला देतो,
हा लिफ्ट तर देतो वर ४००० देतो,
सर्विसिंग गेल्या माझ्या सगळ्या निसटून,
पळवे मला नुसता हा विद्यापीठातून,
जरी येते ओठी तुमच्या माझ्यासाठी हसे,
नजरेत तुमच्या काही अनोळखी दिसे,
मुक्तापिठातून लुना हरवेल का हो,
नंतर हा ब्रम्हे तुम्हा आठवेल का हो,
दाखविली मी या कवितेतून कला,
दमलेल्या लुनाची ही कहाणी तुला... ला ला ला...
( फॉर्वर्ड)
ती बहुतेक एक गोष्ट त्याकाळात
ती बहुतेक एक गोष्ट त्याकाळात सकाळ मुक्तपीठ पुरवणी होती त्यात आली होती का? त्याचे ट्रोलींग झालेले. तेंव्हा मांजरावर सुद्धा एक लेख आला होता. त्याचीही पुढे अनेक वर्षे आठवण निघत होती.
सकाळ मुक्तपीठ वर लोक
सकाळ मुक्तपीठ वर लोक अमेरिकेल्या सेंट्रल पार्कात गेले किंवा जंगली महाराजवर संभाजी पार्कात गेले की लेख लिहीत. मग ऑनलाईन साईटवर रिटे लोक प्रतिक्रिया लिहीत. त्यात ब्रह्मे, स्वाती जठार फ्रॉम इझराईल आणि मग इतर इमिटेशन आर्टिस्ट हहपुवा करुन सोडत. मराठी संस्थळावर प्रतिक्रिया वाचनाची मुहुर्तमेढ रोवण्याचं श्रेय नि:संषय मुक्तपीठाला आहे.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/junior.brahme/posts/pfbid0k3Fi4UVe5jMrfhNi7k4nT...
धन्यवाद तिघांचेही.
धन्यवाद तिघांनाही.


फेसबुक पोस्टही वाचली आचार्य.
'मुक्तपीठे रचला पाया, अवांतर झालासे कळस' आठवतंय. ब्रह्मेंचे तर मंदिर बांधायला हवं आपण.... रजनीकांत सारखं. आरती तयार आहेच.
सकाळ ने ते सगळे डिजिटल अंक
सकाळ ने ते सगळे डिजिटल अंक जपून ठेवायला हवे होते
मूळ लेख सापडला ब्लोग वर एका:
https://michkashala.blogspot.com/2013/04/blog-post.html
'अजि म्या ब्रह्मे पाहिले'
'अजि म्या ब्रह्मे पाहिले' वाचला आणि प्रतिक्रियाही.
अगदी हेच हवे होते. आभारच..!
धमाल आहे धागा
धमाल आहे धागा
शेजाऱ्याचा कुत्रा लई भुंकतो .
शेजाऱ्याचा कुत्रा लई भुंकतो ..काय करावं ?
कुत्र्याचे लग्न कोल्हिणी सोबत लावावे म्हणजे
कोल्हेकुई भुंकेलत्याआधी भुंकणारा तो कुत्राच
त्याआधी भुंकणारा तो कुत्राच आहे ह्याची खात्री करा
हो ना नाहीतर ते मांजर
हो ना
नाहीतर ते मांजर असलेल्या कुत्री सारखं गणित असायचं
ब्रह्मे मुक्तपीठ काळात तो लेख
ब्रह्मे मुक्तपीठ काळात तो लेख आणि त्यातल्या निवडक प्रतिक्रिया डायरीत लिहून ठेवल्या होत्या. स्ट्रेस बस्टर होतं ते सगळंच. सकाळने नंतर सगळ्या चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया काढून टाकल्या आणि मग लेखच.
मांजर लेख - सप्तर्षी बाई ना?
अजून त्यात कुणीतरी नानावाड्यात शिक्षिका होत्या त्यांचा लेख, लाडू कावळा नावाचा लेख असे बरेच हहपुवा होते. तिथे खाली काही ठराविक ट्रोलस् होते - ज्युनियर ब्रह्मे, यार्देना सासोनकर इस्राईल, इत्यादी नावं आठवत आहेत.
स्वाती जठार का ठाकर (?) खरी
स्वाती जठार का ठाकर (?) खरी व्यक्ती आहे हे अनेकांच्या फेबु मित्रयाद्या बघून कळालं होतं तेंव्हा धक्का बसला होता.
यार्देना सासोनकर इस्राईल >> हे नाव मी तेंव्हाही वाचायचा प्रयत्न केला नाही नि आत्ताही करवत नाही.
मी पूर्वी खूप वाचायचे मुक्तपीठ.
प्रश्न ७) तमाम ज्युरींना
प्रश्न ७) तमाम ज्यूरींना
पांढरा शुभ्र, कुरळ्या केसांचा, लांब पट्टी -विग लावण्यामागे नक्की काय कारण असावे?
केस कितीही गुंतागुंतीची असो,
केस कितीही गुंतागुंतीची असो, कितीही लांब चालो, आणि वाटेल तेवढ्या असो तरी आम्ही त्या चालवतो असा संदेश देण्यास.
Pages