या चित्रात दोन स्टार्स ओळखा, एक डोळा बंद करून काय दिसले ते सांगा, गायीला गोठ्यात जायचा रस्ता कोणता असे प्रश्न सोमिवर येत असतील तर आपण एका नॉर्मल रिटे वातावरणात आहोत असे समजावे.
अशा प्रश्नांना काही वेळा तिरसट, तिरपागडी उत्तरे (त्या शहराचे नाव टाळले आहे. नोंद घ्यावी) दिलेली असतात कि लोळण फुगडी @ घातल्याशिवाय राहवत नाही.
@ Copyright मामी
या धाग्यावर असाच खेळ खेळायला या.
प्रश्न गहन / अवघड नको. तो रिटे वाटला पाहिजे.
त्याची उत्तरे जास्तीत जास्त ट्रोलिंग वाटेलशी असावीत.
प्रश्नांना क्रमांक देऊयात.
उदा.
0) घराचा छज्जा रस्त्यावर किती फूट असावा?
उत्तरे
प्रश्न 0) जितका जास्त काढता येईल तितका काढावा. एक ना एक दिवस हे सगळे इथेच सोडून जायचे आहे.
Submitted by Gangaram
प्रश्न 0) 50 फूटाला 40 फूट तरी असायलाच हवा.
Submitted by Dhondi Ram
प्रश्न 0) पापड, कुरडया वाळवता येईल इतके तरी असावे.
. Submitted by Thami
खेळ करायचा का सुरू मग?
विचारा प्रश्न..
विवीला pickup drop हवा तिथून
विवीला pickup drop हवा तिथून आणि हवा तिथे द्यावा.
उद्या कुणी moon south pole म्हटलं तरी तिकडे पाठवण्यासाठी यान तयार ठेवावं
वविला प्रमुख पाहुणे म्हणून
वविला प्रमुख पाहुणे म्हणून सनीला बोलवावे.
ववि ला जास्तीत जास्त
ववि ला जास्तीत जास्त माबोकरांनी यावे यासाठी काय करावे?>>>
प्रत्येक व्यक्तीच्या सोयीनुसार तिच्या घराच्या सर्वात जवळच्या बागेत ववि साजरा केल्यास "हो मग मी नक्की येईन" म्हणणाऱ्यांपैकी ३०% - ५०% येऊ शकतात.
ववी झूम मीटिंग द्वारे साजरा
ववी झूम मीटिंग द्वारे साजरा करावा.... अर्धी मायबोली (आयटी वाले) नक्की हजेरी लावेल
वविला प्रमुख पाहुणे म्हणून
वविला प्रमुख पाहुणे म्हणून सनीला बोलवावे. >> देओल यायचा. मग बसा बोंबलत.
ववि मध्ये दोन उपक्रम जाहीर
ववि मध्ये दोन उपक्रम जाहीर करा. एक "सासुची गाऱ्हाणी"(बाया व बाप्या दोन्ही साठी) .
अन दुसरा "आपण ताटात पडेल ते मुकाट्याने खातो" अशा बढाया मारण्याचा.
खानपान मध्ये पुरणपोळी, बटाटेवडे, श्रीखंड, पुरी, चिकन वडे वगैरे असा मस्त बेत जाहीर करायचा अन ठेवायचा पण.
खूप लोक येतील.
(दुसरा कार्यक्रम खानपानाच्या आधी ठेवायचा. ता.प.ते.मु.खा. बढाईखोरांना ऐनवेळी फक्त पांढरा भात, वरण, मैद्याची वात्तड पोळी अन तोंडल्याची भाजी वाढायची. कान धरून माफी मागून परत असं वंगाळ बोलणार नाही असं लिहुन दिल्यावरच मुख्य बेतातले पदार्थ वाढायचे, आधी ताटातलं संपवल्यावर.)
ववि ला जास्तीत जास्त
ववि ला जास्तीत जास्त माबोकरांनी यावे यासाठी काय करावे?
>>>
टाईम मशिनमधून २०१३ सालात जाऊन नुकत्याच जन्मलेल्या व्हॉटसपचा गळा घोटावा.
अब कहोगे रहने दो भाई. इतनी भी क्या दिक्कत.
दिवसाचा कंटाळा व झोप
दिवसाचा कंटाळा व झोप घालवण्याचे उपाय सांगा
कंटाळा येईल इतकं झोपा. मग
कंटाळा येईल इतकं झोपा. मग कंटाळ्यालाही झोप येईल आणि झोपेला कंटाळा येईल. मग आपला कंटाळा आणि झोप दोन्ही निघून जातील.
पहिले म्हणजे दिवसाला मोठा
पहिले म्हणजे दिवसाला मोठा मग कडक कॉफी पाजायची. त्याची झोप जाईल.
मग त्याला खेळणी द्यायची, छान गोष्ट सांगायची, ओटीटीवर थ्रिलर मूवी लावून द्यायची. फिरायला घेऊन जायचं.
पोहेच का? म्हणजे अगदी फ्रेज
पोहेच का? म्हणजे अगदी फ्रेज किंवा मेटॅफर होण्याइतकं?
हा प्रश्न पडतो आणि पडून राहतो.
आमचे एक कुज्कट मित्रसाहेब म्हणे- आता प्रश्न पडतो नाही? तेव्हा तर पोहे खाता खाता मोठ्ठेमोठ्ठे डोळे करून डोळ्यांत बघत होतास.
देओल यायचा. मग बसा बोंबलत.>>
देओल यायचा. मग बसा बोंबलत.>> देओलच माहिती आहे.
वविला पाऊस पडला नाही तर हैंडपंप उखडून देईल. घ्या उलटा पाऊस.
हे घ्या पोहेच का चे उत्तर.
हे घ्या पोहेच का चे उत्तर.
देओलच माहिती आहे. >> सनी
देओलच माहिती आहे. >> सनी गावस्करला वाईट वाटेल.
आता प्रश्न पडतो नाही? तेव्हा
आता प्रश्न पडतो नाही? तेव्हा तर पोहे खाता खाता मोठ्ठेमोठ्ठे डोळे करून डोळ्यांत बघत होतास. >>> अहो त्या पोह्यांमध्ये व्हिटॅमिन 'ए ' असते का पाहा बरे! उगीच का डोळे टपोरे झाले? दृष्टीसौंदर्य का काय ते! त्यांना वाटले मोठे डोळे करुन त्यांच्या डोळ्यांत पाहात होता तुम्ही.
Pages