या चित्रात दोन स्टार्स ओळखा, एक डोळा बंद करून काय दिसले ते सांगा, गायीला गोठ्यात जायचा रस्ता कोणता असे प्रश्न सोमिवर येत असतील तर आपण एका नॉर्मल रिटे वातावरणात आहोत असे समजावे.
अशा प्रश्नांना काही वेळा तिरसट, तिरपागडी उत्तरे (त्या शहराचे नाव टाळले आहे. नोंद घ्यावी) दिलेली असतात कि लोळण फुगडी @ घातल्याशिवाय राहवत नाही.
@ Copyright मामी
या धाग्यावर असाच खेळ खेळायला या.
प्रश्न गहन / अवघड नको. तो रिटे वाटला पाहिजे.
त्याची उत्तरे जास्तीत जास्त ट्रोलिंग वाटेलशी असावीत.
प्रश्नांना क्रमांक देऊयात.
उदा.
0) घराचा छज्जा रस्त्यावर किती फूट असावा?
उत्तरे
प्रश्न 0) जितका जास्त काढता येईल तितका काढावा. एक ना एक दिवस हे सगळे इथेच सोडून जायचे आहे.
Submitted by Gangaram
प्रश्न 0) 50 फूटाला 40 फूट तरी असायलाच हवा.
Submitted by Dhondi Ram
प्रश्न 0) पापड, कुरडया वाळवता येईल इतके तरी असावे.
. Submitted by Thami
खेळ करायचा का सुरू मग?
विचारा प्रश्न..
७) एकाच न्यायाधिशाचे टक्कल
७) एकाच न्यायाधिशाचे टक्कल झाकणे बरे दिसत नाही, सर्वांनाच नियम केला तर ती परंपरा आहे असा समज होतो.
७)
७)
- मेंढीसारखे ऊबदार वाटावे म्हणून.
- पांढरे केस अनुभव दर्शवतात. आतमध्ये काळे असले तरी सगळे ज्युरी mature वाटावेत म्हणून सगळ्यांनाच.
- सरळ सुळसुळीत केस नीट बसत नाहीत. टक्कल असेल तर घसरून पडेल टोप आणि गंभीर खटला चालू असताना असं झालं तर...
कुरळे केस कसे, बसतील व्यवस्थित.
- लांब पट्टी : आता ज्युरी काय सारख्याच उंचीचे असणार का? म्हणून फ्री साईझ बरा.
छान उत्तरे!
७) न्यायाधीश न्यायालयात
७) न्यायाधीश न्यायालयात सर्वोच्च स्थानी बसलेले असतात. बाकी सर्व त्यांच्याकडे तोंड करून बसलेले असतात. हे सिद्ध झालेले आहे कि खालून वर ज्या वस्तूकडे आपण पाहतो त्यामुळे काहीसे संमोहित होतो म्हणूनच चित्रपटगृहात आपल्या उंचीपेक्षा मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहताना प्रेक्षक मंत्रमुग्ध होतो पण तो अनुभव घरच्या स्क्रीनवर येत नाही.
याच न्यायानुसार जर न्यायालयातल्या महिला ( आणि काही पुरूष) न्यायाधिशांकडे आकर्षित झाले तर अराजक माजेल. हे टाळण्यासाठी पांढर्या केसांचा विग त्यांना दिला जातो. पांढर्या रंगामुळे त्या व्यक्तीपुरतं समोरच्याला वैराग्य येतं.
आपल्या पूर्वजांनी सर्व गोष्टी खूप विचारपूर्वक केल्या आहेत.
(No subject)
>>आपल्या पूर्वजांनी सर्व
>>आपल्या पूर्वजांनी सर्व गोष्टी खूप विचारपूर्वक केल्या आहेत.
ही वरची आक्खी पोस्ट whatsapp forward म्हणून सहज खपेल.... लोक नवीन काहीतरी माहिती कळल्यासारखे एकमेकांना आणि ग्रूप्समध्ये चिकटवून देतील.
कालांतराने ही माहिती quora वर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरात शिरकाव करेल जी पुढे जाऊन विकिपीडियावर वगैरे सुद्धा झळकू शकते
@अतुल, लूनावाल्या
@अतुल, लूनावाल्या ब्रह्म्यांच्या लेखासाठी शतशः धन्यवाद!
खूप वर्षांनी परत वाचला. मुक्तपीठ भारी होतं! हिग्ज बोसॉनवाला एक लेख होता एका काकूंचा, तोही अशक्य होता. लेखापेक्षा प्रतिक्रिया वाचायला जास्त मजा यायची. एक बबन म्हणून आयडी होता, तो 'वेगळा विदर्भ झालाच पाहिजे' असं सतत लिहायचा. मग कुणीतरी विदर्भ आयडी घेऊन लिहिलं होतं, 'वेगळा बबन झालाच पाहिजे' 

@ रघू आचार्य, अवांतराबद्दल सॉरी.
या धाग्याची जी कल्पना आहे, तसा आम्ही एक खेळ खेळायचो, पण थोडा वेगळा. प्रश्न विचारताना एकच शब्द वापरायचा. उदा. 'किती?' पण मनात पूर्ण प्रश्न तयार ठेवायचा. समोरच्याने उत्तर दिलं की पूर्ण प्रश्न सांगायचा.
वेगळा बबन झालाच पाहिजे'>>हो
वेगळा बबन झालाच पाहिजे'>>हो हो मला पण आठवतं, खरं तर फक्त प्रतिसाद वाचायला म्हणून मी मुक्तपीठ लेख वाचायचे,मज्जा यायची
८) कवटी नेहमी हसरी कशी काय
८) कवटी नेहमी हसरी कशी काय दिसते?
कारण कवटीचा मालक स्वर्गात
कारण कवटीचा मालक स्वर्गात सुखात असतो.
लुनावाले ब्रम्हे आठवले
लुनावाले ब्रम्हे आठवले
मजा आली
ट्रोलिंग / व्हायरल होणे काय असतं माहीत नसण्याच्या काळात फेमस झालेली गोष्ट
वेगळा विदर्भ वेगळा बबन आठवले
त्यावेळी मी नवखा कार चालक होतो आणि मुक्तपिठातील एका लेखाने मला फार भिती घातलेली. घाटात कार चालवताना ब्रेक पॅडल खाली मुलांचा खेळण्याचा बॉल येउन अडकणे आणि ब्रेक न लागणे. Imagine करून ( नको तिथे डोकं लै फास्ट ) फार भिती वाटलेली.
त्या लेखाखाली देखील भरपूर मनोरंजन होते. Gravity चे नियम वै
हो हो आठवला तो बॉलवाला लेखपण!
हो हो आठवला तो बॉलवाला लेखपण!
नन्तर बॉल च्या जागी पाण्याची
नन्तर बॉल च्या जागी पाण्याची बाटली येऊन कायप्पा ढकलगाडी झाली होती
एक नंबर झकासराव! मलाही आठवला
एक नंबर झकासराव! मलाही आठवला तो. 'घाटात फुटला घाम' असं शीर्षक होतं. लोकांनी खाली वाट्टेल ते प्रतिसाद दिले होते. कुणीतरी लिहिलं होतं 'हे तर काहीच नाही, टायटॅनिकच्या खाली आख्खा हिमनग आला होता', त्यावर दुसरा कुणीतरी म्हणे 'सर्विस मोटरीच्या टायमाला असला तर्रास न्हवता'.

रिटे प्रश्न थंडावले?
रिटे प्रश्न थंडावले?
कुणाला रिटेचं रिठे वाटले तर ?
कुणाला रिटेचं रिठे वाटले तर ?
कच्चे खायचे की उकडुन, उपासाला
कच्चे खायचे की उकडुन, उपासाला चालतात काय असे प्रश्न आले असते.
रिठे वाटले तर ? >>> पाट्यावर
रिठे वाटले तर ? >>> पाट्यावर वाटणार?
पाट्यावर वाटले तर रिठ्याच्या
पाट्यावर वाटले तर रिठ्याच्या तोंडाला फेस येईल का?
>>कुणाला रिटेचं रिठे वाटले तर
>>कुणाला रिटेचं रिठे वाटले तर ?
तर ते ठेरि (पक्षी: ठेवणीतले रिकामे) असतील
तर ते ठेरि>>> पण कुणी ढेरी
तर ते ठेरि>>> पण कुणी ढेरी वाचलं तर?
ववि ला जास्तीत जास्त
ववि ला जास्तीत जास्त माबोकरांनी यावे यासाठी काय करावे?
फ्री ठेवावा.
फ्री ठेवावा.
आणि आल्याबद्दल इनाम दस हजार.
“ ८) कवटी नेहमी हसरी कशी काय
“ ८) कवटी नेहमी हसरी कशी काय दिसते?” - मला ‘नेहमी’ कवटी दिसतच नाही.
८) कवटी नेहमी हसरी कशी काय
८) कवटी नेहमी हसरी कशी काय दिसते?” >>> कारण ती मुकद्दर का सिकंदर कहलाती है.
(No subject)
षटकारच एकदम!
कवटी नेहमी हसरी कशी काय दिसते
कवटी नेहमी हसरी कशी काय दिसते
>>>
एकदम 'हसते हसते कट जाए रसते' वरून 'जिंदगी मौsssत ना बन जाए संभालो यारो' असा प्रवास झाला. तो आणखी पुढे जाणार तेवढ्यात वरती मुकद्दर का सिकंदर दिसलं. हुश्श.
असे डरावने खेळ का खेळता मुलांनो. भिती वाटते ना. जिंदगी अणि मौत- दोघांच्या भावना दुखावल्या म्हणजे? जिंदगी-मौत काहीच मिळणार नाही. मोक्ष नाही. मध्येच त्रिशंकूवस्थेत असे माबोवर एंडलेस भटकत राहणार तुम्ही
ओ! जरा दोन्चार त्रिशंकू लोक
ओ! जरा दोन्चार त्रिशंकू लोक भेटले तर त्यांना पण घालवुन द्या तुम्ही!
कारण ती मुकद्दर का सिकंदर
कारण ती मुकद्दर का सिकंदर कहलाती है >> अल्टिमेट!
सहीच अश्विनी!
सहीच अश्विनी!
Pages