बे एरियातील खादाडी

Submitted by Admin-team on 12 June, 2009 - 00:28

बे एरियातील खादाडी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विष्णुजी असतात तेव्हा जेवण (थोडेतरी) बरे असते असे ऐकुन आहे.
पुर्वी इथे बॉम्बे टु गोवा असे होते बहुतेक. त्याच माणसाने विष्णुजी बरोबर भागिदारी करुन हे चालु केले आहे. बॉम्बे टु गोवा चा मालक पुर्वी आयटी मधे होता. (बायको डेन्टिस्ट). हा मराठी रेडीओचे कार्यक्रम ही करायचा. रेस्टॉरंट हे पॅशन म्हणुन चालु केले की एक साईड इन्कम म्हणुन माहिती नाही पण कधी बरे असते कधी कंप्लिट हुकलेले असे अनेकांनी सांगितले.

मराठी पद्धतीच्या पदार्थासाठी पुरणपोळी नावाचे रेस्टॉरंट मागच्या वर्षी निघाले आहे. अन्नपुर्णा आता नविन मोठ्या जागेत स्थलांतरीत झाले आहे. पुरणपोळी च्या मालकाची आइ आणि बहिण जे आता पुरणपोळीचे किचन सांभाळतात हे पुर्वी अन्नपुर्णात होते म्हणे.
नविन वडापाव नावाचे पण निघाले आहे. कसे आहे माहिती नाही.
स्वराज्य चा फुडट्रक आणि त्यांचे रेस्टॉरंट पण आहेच

बॉम्बे टू गोवा आवडले नाही कारण सोलकढीच्या नावाखाली पाजलेले कोकम सार Sad बाकी नॉन-व्हेज चे माहिती नाही
त्याच जागेत त्याच्या अगोदर आंध्राभवन होते ते बरे होते

चाट भवन ची कॉपी असलेल मिशन फ्रीमाँट वरचे चाट-हाउस पण बरे वाटले होते १.५ वर्षापूर्वी

माझ्या मित्राने त्याच्या लग्नात UlavacharU यांचे केटरींग ठेवले होते. आंध्रा फुड चांगले होते. पाव-भाजी गंडलेली होती.
राजवाडी थाळी (सनीवेल आणी फ्रिमाँट) हे दोन्ही पण काही खास नाही. गुजराथी थाळी म्हणुन पंजाबी भाज्या खाउ घालतात. आणि त्यांचे भाव पण दिड-वर्षात त जवळपास दुप्पट झालेत.

सनीवेल मधे आम्ही पूर्वी जेथे राहायचो तेथील जवळच्या गॅस स्टेशनच्या पार्किंग मधे २-३ वर्षांपूर्वी देसी फूड ट्रक व तेथे जमलेली देसी पब्लिकची कोंडाळी पाहून पूर्वीचे सनीवेल राहिले नाही याची खात्री पटली होती. फेअर ओक्स आणि ओल्ड सॅन फ्रान्सिस्को रोडच्या इण्टरसेक्शन वर. म्हणजे सनीवेलमधे देसी कोंडाळी कायमच असत पण ती रेस्टॉ मधे. फूड ट्रक्स हे सहसा मेक्सिकन फूडचे पाहिले होते.

एक जमाना होता जेव्हा बे एरियातील विविध भागातून सनीवेल व फ्रीमॉण्ट मधे लोक वीकेण्डला केवळ देसी फूड करता यायचे.

ते फुड ट्रक्स तिथच आहेत. एकुण ५-६ ट्रक्स झाली आहेत त्या जागेवर.
बे एरीयात अजुनही अनेक ठिकाणी फुड ट्रक्स निघाली आहेत.

सॅन रमोन फार्मस मार्केट मधे (शनिवारी) एक डोसा ट्रक असतो. त्याच्याकडे फक्त २ प्रकारचे डोसे आहेत. पण गुरुवारी त्यासाठी ऑनलाईन बुकींग करावी लागते. मग एक ईमेल येते की किती वाजता येउन पिक-अप करायचे. शनिवारच्या डोसा साठी गुरुवारी बुकींग. https://suryadarshinicom.wixsite.com/sdhome
इतके प्लॅनिंग आयुष्यात केले असते तर कुठल्याकुठे गेलो असतो.

फार्मर्स मार्केट मधे येणारा मोमोज् ट्रक मधील डिशेस् चांगल्या आहेत.

(येल्पवर मी अनेक ठिकाणांचे सविस्तर रिव्ह्युज् लिहले आहेत)

इतके प्लॅनिंग आयुष्यात केले असते तर कुठल्याकुठे गेलो असतो. >>> Lol

डोश्याचे बुकिंग दोन दिवस आधी म्हणजे पुण्याच्या वरताण झाले. बाकरवडीला अजूनतरी बुकिंग वगैरे नाही.

तो पुण्याचा वरताण आहे. त्याला कमी तिखट, चिज नको असे काहीही सांगु शकत नाही. तो म्हणतो डोसा हा असाच असतो आणि असाच खायचा.
आणि ट्रक वर आता कायम स्वरुपी डोसे संपले अशी पाटी लावुन ठेवली आहे

Lol
कूपरटीनो / होमस्टेडला कायझर जवळ एक चाट ट्रक असायचा.
लॉरेन्स वर सनिवेल नॉर्थ/ Milpitas साईड ला तर सात आठ देसी फूड ट्रक कोंडाळ करून असायचे. तिकडे मिसळ, वडापाव इ. बरच काही मिळायचं. आणि एक सनीवेलला गॅस स्टेशन (वूल्फ मला वाटतं) बाहेर असायचा.
बॉम्बे टू गोवा वाल्याचे असेल तर हिट ऑर मिस बरोबर आहे. तिकडे कधी भारी मालवणी मासा मिळायचा तर कधी अगदीच बेकार जेवण. अन्नपूर्णा सोडलं तर मराठी पदार्थ/ वडापाव इ. कुठेही आवडले नाहीत बे एरियात.

नॅचरल आईस्क्रीम सारखे आइस्क्रीम आता सनीवेलला कुठेतरी मिळते म्हणे असे ऐकले. कोणास ठाऊक आहे का ?

सँटा क्लाराला इंडिआ कॅश अँड कॅरीच्या शेजारी निर्वाणा म्हणताय का? ते ठीक आहे. नॅचरल्स इतके भारी नाही अर्थात.

नॅचरल आईस्क्रीम सारखे आइस्क्रीम >> निर्वाणा,रिअल आइस्क्रिम तसेच डब्लिन मधे असलेले क्वालिटी आईसक्रिम असे बरेच चॉईसेस आहेत पण अर्थात भारतातल्या आईसक्रिमची चव वेगळीच असते.
आजकाल ईंडीयन ग्रोसरी मधे अमुल, वाडीलाल ची आईसक्रिम पण मिळतात.

निर्वाणा नाही. ते जुने झाले. हे कोणीतरी सजेस्ट केलेले. Pints of joy म्हणून आहे. सनीवेलला त्यांचा ट्रक आहे. मागच्या शनिवारी पाहुणे होते तेव्हा आणून पहिले. मँगो, चिक्कू आणि गुलाबजाम. त्यातील चिक्कू आवडले. बाकीही ठीक वाटले. पण छोटुसा कप साईझच ६ डॉलरला होता. त्यामुळे किंमत जरा जास्त वाटली. असो. नंतर सीताफळ, पेरू, आणून पाहीन. मला स्वतःला पुरणपोळी, गुलाबजाम, तिळगुळ असे देसी फ्लेवर आईसक्रीम मध्ये आवडत नाहीत.
महागुरू.. थँक्स. वाडीलालची मटका कुल्फी आणली होती. खूपच मस्त !

सही! एम्जी म्हणजे आता तू "पान नाही का? मग ठेल्यावरून बोलावून घ्या ना बे!" असे म्हणून एखाद्या पुणेकराची किंवा मुंबईकराची विकेट बे एरियातही आता काढू शकतोस Happy

अरे काही भर टाका इथे ... Happy
उल्वचारू टीफिन्स (सँन्टा क्लारा डिएम्व्ही जवळ) जरा स्पायसी आहे पण चांगले आहे

Pages