बे एरियातील खादाडी

Submitted by Admin-team on 12 June, 2009 - 00:28

बे एरियातील खादाडी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Santa Clara / Sunnyvale area मधे चान्गला वडापाव कुठे मिळतो काय ?

एल कमिनो आणि हेन्डरसन च्या चौकात भाविका आहे तेथे आणि फेअर ओक्स आणि एल कमिनो च्या जवळ हॉट ब्रेड्स आहे तेथे, त्यातल्या त्यात बरा मिळतो.

चाट भवन फ्रीमाँट, ताझा कॅफे (फ्रीमाँट / डब्लीन) इथे पण बरा मिळतो पण रीसल आईसक्रीम इथे मिळणारा खुप चांगला असतो असे ऐकले आहे.

सनीवेल मधे Vaigai नावाचे रेस्टॉरंट आहे म्हणे. कोणाला याबद्दल चांगला-वाईट अनुभव आहे का?

महागुरु, Vaigai ऑफीसच्या जवळ असल्याने जाण होत अधुन मधून (पटकन जाऊन येता येते म्हणून)
मेनु क्वांटीटी मधे कमी आणी किमतीत मात्र उगाचच चढा वाटतो मला.(बाकीच्या रेस्टॉरंट च्या मनाने)

करी अप नावाचा एक देसी ट्र्क आहे. http://www.curryupnow.com/
त्यांचा देशी भाज्यांचा बरीतो छान असतो असं ऐकलयं
मोबील असल्यामुळे बे एरियात वेग वेगळ्या ठिकाणी असतो.
सॅन फ्रांसीस्कोला बहुतेक वेळी शुक्रवारी असतो.

Fremont मधे thornton वर chat express मधे चाट items वडा पाव, दबेली, रगडा प्याटिस, मिसळ पाव, उसळ पाव वगेरे कोणी try केले आहे का? chaatexpressfremont.com

काल दासप्रकाश मधे गेलो होतो. उपहारगृहाची सजावट चांगली आहे. पण सर्व्हीस खुप स्लो आहे त्याचे कारण काल फक्त ३ लोक होते तिथे कामाला. एक (भारतीय) किचन मधे , एक (मेक्सिकन) भांडि घासायला आणि तिसरा (मेक्सिकन) हा लोकांना बसवणे, ऑर्डर घेणे आणि बिलिंग वगैरे साठी. सगळे द. भारतीय पदार्थ होते ..च ठिक आहे. सध्याच्या भिमाज् आणि वुडलँडपेक्षा बरे वाटले. थोडक्यात त्या भागात असाल आणि वेळ फारसा नसेल तर एकदा जायला हरकत नाही.

पराठा पॉइंट बद्दल मला मिळालेले फिडबॅक हे ओके-ओके टाईप होते. फर काही खास नाही असे ऐकले. बहुतेकांनी नाही गेलास तरी काही बिघडत नाही असेच सांगितले.

थाई
अमेरन थाई - माउंटन व्हिव
स्वीट बेसिल थाई - फोस्टेर सीटी

मेडिटेरिअन
फलाफल बाईट - सनीवेल ?

अमेरिकन / बेर्गेर
जॅक्स प्राईम - सॅन मटेओ
जेफेरीज - मेन्लो पार्क
द काऊंटर (चेन रेस्टॉ)

स्वीट बेसिल थाई >> हे चांगले रेस्टॉरंट आहे. बहुतेक केदार आला होता त्यावेळि एक गटग इथेच झाले होते. (नंतर सशलच्या घरी गप्पा रंगल्या होत्या)

अमेरिक/फ्युजन -
Calafia - Palo Alto - इथे प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचा फोटो लावलेला आहे.

मेडीटेरियन -
डिश-डॅश - सनीवेल
कॅफे सोफिया - पालो आल्टो - http://www.cafesophia.com/

वॉव बर्‍याच नविन जागा कळल्या खादाडीसाठी Wink मुंबई चौक, वेदांत, नान न् मसाला, ग्रेट!
फ्रीमाँट जवळ एक ताझा कॅफे आहे, तिथे पण तंदूरी सिझलर्स वगैरे चांगले मिळतात, ऑफ कोर्स अगदी भारतात मिळतात तसे नाहीत, पण प्रयत्न खूप चांगला आहे. ओनर्स चांगले आहेत, बहुतेक ABCD आहेत, पण यु.स. मधे राहून भारतीय खाद्यसंस्कृती पुढे चालवत आहेत हे बघून आनंद झाला Happy

http://www.allmenus.com/ca/fremont/292594-cafe-tazza/menu/
http://www.yelp.com/biz/cafe-tazza-newark-2

मागच्या आठवड्यात इंडिया चाट कुझिन (एल कमिनो - सनीवेल) मधे गेलो होतो - पराठे अतिशय चांगले होते. पुरणपोळी पण होती, पण ती एवढी छान नव्हती. अधूनमधून गूळ लागत होता. मिसळ-पाव मात्र मस्त.

आतले वातावरण तेथे बसून खायलाही चांगले आहे.

क्ष - थाई पेपर फ्रीमॉन्ट अ‍ॅव्हेन्यू वरचे ना (सनीवेल)? आमचेही फेवरिट आहे.

ते इंडिया चॅट कुझीन (सनीवेल) चांगल वाटत आम्हालापण.
त्यांची थाळी पण बरी आहे (म्हणजे त्यात फुलके,उसळी, भाज्या वगैरे घरगुती असतात चवीला, हेवी,/क्रीमी, पंजाबी स्टाईल अश्या नाहीत) हे म्हणजे ज्यांना बरेचदा बाहेर जेवण होते म्हणून साधच जेवण हव असतं अश्यांना थाळी चांगला ऑप्शन आहे.
त्यांची ती स्प्राऊट भेळ पण बरा आहे प्रकार.
भटुरे पण मस्त असतात.

'डोसा बावर्ची' (मिलपिटास) ग्रेट मॉल जवळ बर वाटल. अँबियन्स छान आहे.
त्या भागात गेलं की त्या तिरुपती भिमाज ला ऑप्शन मिळाला.
आम्ही घेतलेले साऊथ इंडीयन पदार्थ छान वाटले.
पण दुपारी फक्त लंच बुफे असतो असं समजलं.

बर्मिज रेस्तरॉ
मिंगलबा - बर्लिंगेम
झकास. ह्या वेळेस त्यांच करी सुप ट्राय केले. आपल्या वडा सांबाराची ही बर्मिज बहिण. अ मस्ट व्हिजिट...

बे एरियात बर्‍याच टी सेर्व्हिस आहेत
त्यातले आवडते. समोव्हर टी लाऊंज सॅन फ्रँक मधले. जबर्दस्त व्हिव व सुंदर चहा. इथे मी देसि सर्व्हिस ट्राय केली आहे. ( मसाला चहा आणि पनिर भाजी विथ राईस) बाकि इतर बर्‍याच आहेत. भेट देणे आवश्यक!

पॉश बेगल
नाश्टा स्पोट - माऊंटन व्हिव
झकास बेगल व क्रेप्स

परवा एका मित्राच्या इच्छेनुसार वुडलँड्स, फ्रीमाँटला भेट दिली. सर्व्हीस, फुड क्वॉलीटी एकदम बिघडली आहे. भीमाज्, दासप्रकाश नंतर आता वुडलँड्सपण लिस्टमधुन कटाप.

हो फारेण्डा .. तेच ते थाय पेपर!
माऊंटन व्ह्यू मधल्या सकून मधली व्हेज बिर्याणी ग्रेट होती! अगदी दम वगैरे..
सनीव्हेल डाऊनटाऊनमधल्या टर्मरिकमध्ये कच्च्या फणसाची बिर्याणी चांगली होती.. दिदीज मध्ये महिन्याच्या दुसर्‍या विकांताला (ऑलमोस्ट) मराठी जेवण असतं.. ठीक असतं.. श्रीखंड मात्र छान करतात ते..
स्टीवन्स क्रीक वरच्या ब्ल्यू मँगोमधलं मँगो स्टीकी राईस डेजर्ट टेस्टी..
पेशव्याला मोठ्ठा मोदक कॅस्ट्रोजवळच्या समोवरसाठी.. मसाला चहा छान असतो (सिंहगडावर दही मिळतं तशा छोट्या मडक्यात देतात आणि निवांत पिता येतो)

दीदीज आणि कोकिला दोन्हीकडे मी बर्‍याच वेळेस श्रीखंड डावाने ओतता येइल एवढे पातळ बघितलेले आहे. आता घट्ट केले का शेवटी?

Pages