बे एरियातील खादाडी

Submitted by Admin-team on 12 June, 2009 - 00:28

बे एरियातील खादाडी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

परवाच (६ जुन ला) Newark मधे मुंबई चौक नावाचे नवीन रेस्टॉरंट चालु झाले आहे. नावावरुन महाराष्ट्रीयन वाटते (विशेषत: मुंबई ह्या शब्दप्रयोगा मुळे)>>>>

आम्ही गेलो होतो. मालक मुंबईचा आहे. आणी कूक पण पंजाबी आहे पण मुंबई चा आहे.
वडा पाव जमला नाही
पण चिकन कोल्हापूरी/ व्हेज कोल्हापूरी बर्‍या होत्या. बरेच दिवसांनी पंजाबी (टोमॅटो+कांद्याच्या ) ग्रेव्ही पेक्षा वेगळी चव होती.
एकदा ट्राय करायला हरकत नाही Happy

डब्लिन मधे कडुपुल नावाचे श्रीलंकन रेस्टॉरंट आहे. आता पर्यंततरी मी कुठे श्रीलंकन पदार्थ मिळतात असे रेस्टॉरंट पाहिले नाही. अनेकजणांनी आवर्जुन जायला सांगितले.
पदार्थ थोडेफार द.भारतीय प्रकाराचे वाटले पण चव एकदम वेगळी होती. क्वांटीटी खुप होती. मँगो चिकन ,त्याची ग्रेव्ही चांगली होती. कोट्टु रोटी नावाचा एक पदार्थ हा आपल्या फोडणीच्या पोळी सारखा आहे. पण चव खुपच वेगळी आहे. (चव सगळ्यांना आवडेलच असे नाही). मेन्युवर लिहले होते की स्पायसी आहे, आम्हाला तरी काहीच तिखट लागले नाही.
जागा खुप लहान आहे पण सजावट बरी आहे. घरगुती कारभार असल्याने सर्व्हीस खुपच स्लो आहे.
थोडक्यात काहितरी नविन ट्राय करायचे असेल एकदा जायला हरकत नाही

फ्रिमॉंटमधील काही खादाडीच्या जागा:
१.चाट भवन - बरेच पदार्थ चान आहेत. दाबेली, बटाटावडा, भेळ ई. चांगले असतात. छास पण झक्कास.
२. सला थाय - ईथे शहाळे मिळते, मलई वाले. अगदी आपल्यासारखे नसले तरी बर्यापैकि असते. पपया सलाड, थाई टी, पनांग करी मस्त.
३. ला सेन - व्हीएतनामीज फूड - फ्रीमाँट हब- टोफू विथ एगप्लांट, तसेच बर्याच डिशेश चांगल्या आहेत. ओकलंड मधील फो८४ ईथे उत्तम व्हीएतनामीज फूड मिळते.
४. इंडिया किचन पण बर्यापैकी आहे.
५. सलांग पास- अफगाणी
६. पिझ्झा अँड करी - देसी पिझ्झा
७: लव्हली - भारत बझारच्या जवळ- पराठे चांगले असतात.
८. बिर्याणी बोल - बिर्याणी मस्त असते.

४. इंडिया किचन पण बर्यापैकी आहे.- मालक/चालक मग्रुर वाटला.
८. बिर्याणी बोल - बिर्याणी मस्त असते. - मला तर साध्या भातात भाजी मिस़ळल्यासारखी लागली. त्यापेक्शा Union City मधल्या dawaat ची बिर्याणी आवडली होती

मला Fremont मधे Shrikrishna चे जेवण आवडते, साधे आणि चविष्ट

सुयोग, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

इंडिया किचन मधे कधी मालक किंवा इतरांचा वाइट अनुभव आला नाही.
बिर्याणि बोलची बिर्याणी इतरांपेक्शा वेगळी वाट्ली. दम स्टाइलची.

मी पूणेकर, 'श्रीकॄष्णा' फ्रिमाँट बुलेवार्ड वर आहे. भारत बझारच्या जवळ्पास म्हणता येइल. तिथे गुजरथी पदधतीचे घरगुती टाइप जेवण मिळते. फुलके चांगले असतात. मला त्यांचा खमण ढोकळा खूप आवडतो. थाली मधे एक गाजराचे फ्रेश लोणचे असते, ते पण आवडले. बाकी थाली ओके टाइप वाट्ली. डाळ गोडसर असते.

थँक्स किया, सुयोग!
मी घरगुती पध्दतीचे जेवण मिळणारी ठिकाणं शोधत आहे सध्या, ट्राय करेन एखाद्या दिवशी हे पण Happy

कृष्णा मधे ३ वेळ गेलो आहे ते फक्त गुजराथी कढी साठी. तिन्ही वेळा कढी उतरलेली. दरवेळी मालकाशी भांडलो पण त्याला काही फरक पडला नाही. ५-७ डॉ. मधे थाळी येते म्हणुन अनेक भारतातुन नविन आलेले येत असतील पण मला तरी बकवास वाटले. ढोकळा ४-५ वेळा पार्टीसाठी घेउन गेलोय. त्यांचा ढोकळा चांगला असतो.
अर्थात माझा अनुभव ५ वर्षापुर्वीचा आहे. त्यानंतर फार बदल पडला असावा असे वाटत नाही.

आमचा पण अनुभव फारसा चांगला नाही कृष्णा मधे. Sad आणी त्यात ते रात्री ८ ला बंद होतं त्यामूळे ७:४५ ला गेलात कि बरेच द काहीतरी संपलय असच असतं
आम्ही पण ४ वर्षात गेलो नाही त्यानंतर सुधारणा असेल तर माहित नाही.

सॅन फ्रान्सिस्कोमधले Chaya Brasserie हे चांगले रेस्टोरंट आहे. जॅपनीज आणि फ्रेंच काँबो. एम्बरकॅडेरो वर आहे. फेरी बिल्डिंगच्या जवळ.

मग काय उपयोगाच नाही दिसत ते कॄष्णा , लांबवर जाऊन जेवण जर खास नसेल तर Sad
आमच आपलं ईंडिया चॅट हाऊस, दीदीज बर चाललय मग Wink

माझा तरी कॄष्णा चा अनुभव चागला आहे (४/५), भाज्या अति मसालेदार जळजळित आणि तेल़कट नसतात आणि मला प्रत्येकवेळा आवडले. मला जावुन बरेच दिवस झाले.

मीपुणेकर फ्रिमोन्ट परिसरात येणार असेल तर ट्राय कर.

सनिवेल मधे Elko Dr वर अन्नपुर्णा आहे, मला स्वताला अनुभव नाही पण एकले आहे कि घरघुती जेवण मिळते, कोणी ट्राय केले आहे का?

Paratha Point आम्हाला पहिल्यांदा चांगला अनुभव आला पण परत गेल्यावर अनुभव चांगला नाही

महागुरु, गुजराथी कढी साठी स्वामिनारायण टेपल मधे जा.

अन्नपूर्णात मला खूप वाईट अनुभव आला आहे....जेवण यथातथाच होतं. एक छोटासा पराठा $१.५० ....सर्वसाधारण तुम्हाला कमीतकमी ३ तरी लागणारच अशा बेताने पराठे/ नान होते..
सर्व्हिस तर खूपच वाईट....त्या वेट्रेसने जी एशिअन वाटत होती आधी लक्षच दिले नाही आणि हाय चेअर मागवली तर मला दाखवली कुठे आहे आणि घ्या म्हणाली....
सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे माझ्या नवर्याचं जेवण झालं होतं आणि मी अजून जेवतच होते तरी तिने येऊन टेबल क्लीन केलं...कॅशिअर मुलगी सुद्धा अगदी उद्धटपणे वागली...

मी त्यांच्या मालकाला सांगतिले तर त्याने " आमचा प्रोफिट कसा कमी आहे, कसे studant ना आम्ही कामावर ठेवतो " वगैरे वगैरे सांगून त्या वेट्रेसला defend केले... चार वर्षापूर्वीची गोष्ट...पुन्हा काही मी त्या हाटेलात गेले नाही...फरक पडला असेलसे वाटत नाही...

लयांग लयांग (मिलपिटास) हे पण एक आवडलेले ठिकाण. मलेशिअन पद्धतीचे हे रेस्टॉरंट आहे. खुप पुर्वी बनाना लिफ मधे गेलो त्यावेळी सागरी खाद्यपदार्थांचा खुप वास आला होता. पण इथे तसे जाणवले नाही. रेस्टॉरंट तसे लहान आहे पण सजावट चांगली आहे. भरपुर शाकाहारी पदार्थ आहेत. सर्व्हीस पण चांगली आहे आणि आपल्या गरजेप्रमाणे पदार्थ बनवतात (उदा. नो एग). बेबी कोकोनट (शहाळे) ची मजा खुप दिवसांनी अनुभवली. बाकीचे सगळे पदार्थ पण आवडले. खुप महाग पण नाही . जागा लहान असल्याने बहुतेक वेळा थोडे थांबावे लागते. त्यांचे मलेशिअन इंग्रजी आपल्याला पटकन झेपत नाही (आणि आमचे मराठी विंग्रजी त्याला झेपले नसेल) म्हणुन ऑर्डर देताना मेन्युवरील पदार्थ क्रमांकाचा आधार घ्यावा लागला.

दीदीस एकदम छान आहे...आम्हि जवळ जवळ प्रत्येक वीकेन्द ला तिकडे पडीक असतो.....

फ्रिमाँट मध्ये चाट भवन सारखे कुठले नाहि...

आणि खाली साउथ बे मध्ये बरिच दक्शीण भारतिय रेस्तौरन्त्स आहेत....

ईन्डिआ चाट कुसिन मात्र महाराश्त्रियण मेनु आहे....

Bombay Garden buffet ,Pizza Pub (pavbhaji pizza) are good.
Fusion 9 drive through is good for non veg .(biryani ,tikka ,chicken curry).

टिपिकल मराठी जेवण मिळणारे एकही उपहारगृह बे एरियामधे नाही. खालील ठिकाणी काही मराठी पदार्थ मिळतातः
http://www.indiachaatcuisine.com/index.html
http://www.mydeedees.com/weekendm.html (2nd Weekend)

>> भाई कधी येताय?

परत MG लाच इमेल पाठवून परस्पर त्याच्याकडे जाणार वाटतं .. ठीक आहे पण नंतर बाकी बेकरांच्या नावाने तक्रार करायची नाही हां GTG ला कोणीच येत नाही अशी .. :p

हम आवेंगे तो ऐसे ही थोडी ना आवेंगे. आवेंगे तो ढोल ताशे बजाते हुये आवेंगे. सब दुनियाको पता लगे की हम आवत है. Happy

Pages