बे एरियातील खादाडी

Submitted by Admin-team on 12 June, 2009 - 00:28

बे एरियातील खादाडी

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डब्लिन मधलं डब्लिन वरचं पमिर मस्त आहे ..

आम्ही खाल्लेल्यापैकी योगर्ट (अ‍ॅज् अ डिपींग सॉस फॉर बोरानी), बोरानी, चिकन कबॉब्ज्, राईस (व्हाईट बासमती आणि अजून एक थोडा मसालेदार ब्राऊन राईस ( रंगाने ब्राऊन), आणि फिरनी अप्रतिम होती ..

बकलावा मात्र म्हणावा तितका इम्प्रेसिव्ह वाटला नाही ..

मधुबन चांगले आहे. त्यांचा छोटा पार्टी हॉल पण आहे.

थाली चांगले आहे पण खुप छोटे आहे त्यामुळे कमीतकमी ४० मि, वाट बघावी लागते.
पदार्थ गुजराथी प्रकारातले असले तरी चवीला आपल्या परिचयाचे आहेत.

थाली तुम्हाला थाळी आवडत असेल तर छान आहे. आम्हाला १ तास थांबावे लागले होते. एक कमालीची गोंधळलेली वेट्रेस सोडली तर बाकीचे सगळे वेटर्स्/सर्वर्स एकदम फ्रेंडली आहेत.

बाकीचे सगळे वेटर्स्/सर्वर्स एकदम फ्रेंडली आहेत. >> +१
एक अण्णा टाईप वेटर सगळ्यांना आग्रह करुन वाढत होता.

फ्रिमाँट - मिशन्/वॉर्म-स्प्रिंग जवळ मँगो गार्डन म्हणून एक मलेशियन-थाय चालू झालं आहे.
बनाना लीफ चा भाऊ आहे Wink
पण फूड मस्त आहे. क्वांटिटी पण बनाना लीफ पेक्षा जास्त आहे.

ते सॅन होजे ला सिसेरोज पिझ्झा पाशी पण आहे बहुतेक. चेक करुन सांगते नक्की कुठे.
मेक्सिकन आवडत असेल तर कुपर्टिनो मधे डीएन्झा वर अ‍ॅक्वी म्हणून आहे ते ही मस्त आहे. व्हरायटी खूप आहे. चव, अँबियन्स छान.

कुपर्टिनो मध्ये 'आर्या' मेडिटेरियन मस्त आहे. आम्हाला अँम्बियन्स खुप आवडतो. वीकेंडला डिनरला बेली डान्सर पण असते Happy
सॅन्टाना रो मधलं पिझ्झा अ‍ॅन्टिका चांगलय.

मला कुपर्टिनो व रेडवुड सिटी मधले दोन्ही च्या चवीत खूप फरक वाटला. दोन्ही एकाच मालकीच्रे आहे की नाही माहीत नाही. मात्र कुपर्टिनो मधल्या आर्या कडून आम्ही (त्यावेळेस तेथे बेली डान्सर असूनही :P) टेक आउट केले होते, त्यामुळे स्टार्टर्स पासून डेझर्ट पर्यंत सगळे टेस्ट केले नाही. रेडवुड सिटीमधले खूप आवडले.

माझ्या बेकरीवारी मध्ये आम्ही दुसिता नावाच्या थाय रेस्टॉ. मध्ये गेलो होतो. छोटं आहे पण फूड ऑसम होतं.
सँटा क्लॅरा मध्ये एल कमिनोवर बहुतेक.

शूम्पी, तू तुझ्या याच वेळच्या ट्रिप मध्ये सँटाना रो च्या काँझ्युएला मध्येही गेली होतीस का(ना)? उत्तर हो असल्यास, कसं आहे?

फा, Lol

फ्रीमाँट मध्ये एक बिजन (बेकरी नाही सॅन होजे डाऊनटाऊन मधली) नावाचं मेडिटरेनियन आहे तेही छान आहे म्हणे आणि तिथेही बेली डान्स असतो म्हणे ..

शूम्पी, यावेळच्या फेरीत गेला होतात? >> हो हो. २०१३ थँक्सगिव्हिंग ब्रेक मध्ये गेलो होतो. त्यांच्या अनेक शाखा आहेत का मग? (आमची कोठेही शाखा नाही च्या उलट?)

शूम्पी, तू तुझ्या याच वेळच्या ट्रिप मध्ये सँटाना रो च्या काँझ्युएला मध्येही गेली होतीस का(ना)? >> होहो. तिथे पण गेले होते. ठीकच होतं. वाइट नव्हतं पण पुन्हा पुढल्या वेळी तिथे नाही जाणार. दुसरीकडे नविन काही ट्राय करीन.

शिवाय आम्ही पालो आल्टो ला एका फॅमिली स्टाइअल इटालियन मध्ये पण गेलो होतो. ते फार्च आवडलं मला. ती आम्च्या इथे डॅलसमध्ये पण आहे पण फार दूर आहे म्हणून जाणं होत नाही. बुका दी बेपो(?) की असच काहीसं नाव आहे.

हो ते बुका डि बेप्पो च ..

तशाच स्टाईलचं सँटाना रो मध्ये मॅज्जियानोज् लिटल इटली आहे तेही ठीक आहे .. (फार गोंगाट असतो पण तिथे म्हणजे मॅज्जियानोज् मध्ये) ..

buca di beppo.. Happy
इथे युनिव्हर्सल सिटीमध्ये आहे.. मला नाव भयंकर आवडतं हे. Happy

मला बब्बा गम्प श्रिंप पण फार्फार आवडतं. नाव, मुव्ही, तिथलं फुड सगळंच. तिकडे फॉरेस्ट गम्पची क्विझ झाली होती, त्यात आम्ही जिंकलो होतो.. फार मजा! Happy

सॅ फ्रा ला पीयर ३९ ला पण मस्त वाटतं तिकडे. या वेळी साबांना पीयर ३९ फारच आवडल्याने जवळजवळ बरीश रेस्टॉ ट्राय करुन झाली तिकडची.
सॉसेलिटो मधलं एक पिझ्झा चं रेस्टॉ अल्टिमेट आहे, नाव आठवून सांगते. पिझा तर सहीच आहे शिवाय जागा एकदमच टुमदार, समोर समुद्र.. मस्त. Happy

ते सॅन होजे ला सिसेरोज पिझ्झा पाशी पण आहे बहुतेक << हो मॅन्गो गार्ड्न आहे तिथे. पण फुड ठिकठाकच आहे. बनाना लीफ इज मच बेटर.

रामा-५ झाले (Rama-IV) << हे एकतर Rama-V पाहीजे नाहीतर रामा-४ Happy

मॅक्स तू कसलं नाव विचारतोयस ?, हो अदिती, आहे ना तिथेच, मला बघितल्याचं आठवत होतं.
बादवे सिसेरोज पिझ्झा पहिल्यांदा खाल्ला तेव्हा अजिबातच आवडला नाही, मग खाल्ला तेव्हा चव आवडली पण खूप ग्रीसी वाटतो.

कुपरटिनोत डीअ‍ॅन्झा वर होमस्टेडच्या नोर्थला डावेकडे एक तपरी टाइप फलाफल जॉइंट आहे तिथलं फलाफल पण गेल्या ट्रीपला खाल्लं. सर्विंग साइझ बराच मोठा होता.

Pages