शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती Lol

कृष धातूचा अर्थ ओढणे. त्यावरून आकर्षण, संकर्षण वगैरे आलेत. नांगर ओढणे यावरून कृषी.

जाल तिथं आपलं कल्चर न्या >>> खरं का ? Happy
मी ते नेहमी 'बॅक्टेरिअल' कल्चर याअर्थानेच घ्यायचे. या चांगल्या बॅक्टेरिआ सोबत तुम्हीही 'दुधो विरजो पुतो फलो' Happy

कृष धातूचा अर्थ ओढणे. त्यावरून आकर्षण, संकर्षण वगैरे आलेत.
>>>>> कृष धातूपासून 'संकर्षण'(बलराम) सोबत कृष्णही आलाय. Happy

कृष्टि >> कल्चर साठी हा शब्द काहीही आहे. संस्कृती दिल्याबद्दल त्यांना किती धन्यवाद द्यावेत! कल्चर कृष्टी, तर मग वल्चर (vulture) काय, वृष्टी?

ओह, हां. कृष्ण लक्षात नव्हता आला. बलराम संकर्षण हा नांगरावरूनच आला आहे.

जर
culture = संस्कृती
तर,
civilization = ? (सुचवा लोकहो !)
? सामाजिक सभ्यता
? सांस्कृतिक विकास

civilization शब्दाची संकल्पना संस्कृतीपेक्षा व्यापक असल्यामुळे त्यासाठी एक मराठी शोध शब्द शोधणे अवघड वाटते.

ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की संस्कृत भाषेत संस्कृती हा शब्दच नाही.
परंतु संस्कृत मध्ये संस्कार हा शब्द आहे. त्यामुळे पूर्वीच्या संस्कारांचे अभिसरण म्हणजे संस्कृती अशी व्याख्या करता येते.
तसेच संस्कृत मध्ये संस्कृ असा शब्द आहे त्याचा अर्थ स्वयंपाक करणे.

१. नुसती सभ्यता? >>> politeness ?

2. संस्कृ असा शब्द आहे त्याचा अर्थ स्वयंपाक करणे.
>>>> वा, मस्त !
..
civilizationमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आणि अन्य अंगांनी झालेला विकास अभिप्रेत आहे

मला असं वाटतं Culture ला समाज म्हणायला हवं (society या अर्थाने नव्हे. समाज हा शब्द त्यापेक्षा ब्रॉड अर्थाने वापरतात)
आणि Civilization ला संस्कृती.

स्वयंपाक असाच मूळ शब्द आहे का ?
पाक याचा अर्थ कळतो कुकिंग या अर्थाने
पण prefix स्वयं कसा लागला आहे ? कारण प्रत्येकाने स्वतःसाठी पाकसिद्धी करण्याची पद्धत कधीच नसावी.

चर्चा छान. नवीन माहिती आवडली.
कल्चर आणि सिव्हिलायझेशन -

Culture - जे काही सांस्कृतिक आणि अभिजात आहे ते. वर्तमानकाळातलं वाटतं. ज्यात परंपरेपासून मिळत गेलेले फक्त सामाजिक आणि सांस्कृतिक पैलू आहेत.

Civilization - includes culture , way of life, society with the previous stages (aspects - economical, cultural, traditional, religious)
प्राचीन किंवा मुळासहीत आजपर्यंत उत्क्रांत होत गेलेले आर्थिक, सामाजिक, नैतिक, धार्मिक, सांस्कृतिक ई
सगळे पैलू.

कल्चर हा सिव्हिलायझेशनचा एक पैलू आहे.

Civilization म्हणजे खरंतर नागरसंस्कृती.
एका भौगोलिक ठिकाणी पिढ्यान्पिढ्या वसती करून उत्क्रांत होत गेलेल्या राहणीमानाचे सगळे पैलू त्यात येतात. यात ‘वसण्या’चा भाग महत्त्वाचा आहे.

फिरस्त्यांनाही संस्कृती असते, पण ते civilization नसतं.

त्या अर्थी तो संस्कृतीचा उपसंच म्हणता येईल.

तसेच,
civility व civilization यात अर्थभेद आहे : https://www.etymonline.com/word/civilization#etymonline_v_13747

civilization हा शब्द फ्रेंचमध्ये रानटीपणा /निर्दयपणा (barbarity) याचा विरुद्ध अर्थ म्हणून आला.

सध्या पंढरपूरला सापडलेली मूर्ती आणि आनुषंगिक ज्या बातम्या येत आहेत, त्यात अनेक 'मूर्त्या' सापडल्याचं अनेक ठिकाणी - बातम्या आणि सोशल मिडिया - दोन्ही ठिकाणी दिसतं आहे. मूर्ती या शब्दाचं अनेकवचन मूर्तीच होतं. अनेक मूर्ती सापडल्या असं पाहिजे.

नागरसंस्कृती चपखल आहे.

--

लोकसत्तेने पांडुरंगाच्या पादस्पर्श दर्शनास प्रारंभ अशा मथळ्याची बातमी दिली आहे. देवाच्या पायावर डोके ठेवून दर्शन असा अर्थही दिला आहे. देवदर्शनाचे वेगवेगळे प्रकार असतात का? आणि देवाच्या पायावर डोके ठेवले की फार र ती पावले आणि खालची वीट दिसतील.

... देवदर्शनाचे वेगवेगळे प्रकार असतात का?...

हो तर ! देवमूर्तीचे 'मुख दर्शन' सर्वच देवळात होते. शिव मंदिरात शिवपिंडीला स्पर्श करणे जास्त प्रचलित आहे ते 'स्पर्श दर्शन'. वैष्णव मंदिरात त्यामानाने 'स्पर्श दर्शन' दुर्मिळ कारण सर्वच देवळात मूर्तीला स्पर्श करण्याची मुभा नसते - त्याबाबदीत पंढरीचा विठोबा मोकळाढाकळा आहे, त्याच्या चरणांना स्पर्श करता येतो, त्यावर डोके टेकवता येते. त्याआधी अर्थातच मुखदर्शन घेतात म्हणजे देवमूर्ती पूर्ण पाहतात.

प्रत्यंग दर्शन (देवमूर्तीला स्नान घालत असतांना वस्त्रहीन मूर्तीचे), अंग दर्शन (कपडे घालत असतांना), दर्पणात केलेले बिंब दर्शन, घाईने दुरुनच फक्त क्षणभर केलेले धूलीदर्शन / धूळदर्शन , अतीच गर्दी असली तर दुरूनच देवळाच्या कलशाचे/ ध्वजेचे ध्वजदर्शन असे अजूनही प्रकार आहेत.

....मूर्ती या शब्दाचं अनेकवचन मूर्तीच होतं...

+ १

अनेकवचन 'मुर्त्या' असे लिहिण्याची भिक्कार प्रथा मात्र फोफावली आहे Happy

आमच्या शेजारच्या तमिळ बाई जवळच्या मद्रासी मंदिरात सकाळी सकाळी देवाचं 'निर्माल्यदर्शन' घ्यायला जायच्या.

म्हणजे देवाची आंघोळ होण्याआधीचं दर्शन. आदल्या दिवसांचे हार, कपडे घातलेले असतानाचे पारोसे दर्शन. त्या मात्र स्वतः स्नान करून जात.

Pages