Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एका शब्दातून दुसरा आणि
एका शब्दातून दुसरा आणि दुसऱ्यातून तिसरा अशी ओघवती चर्चा उत्तम झाली.
आपणा सर्वांचा सहभाग ज्ञानवर्धक आहे
धन्यवाद !!
रोचक एकाक्षरी ( गोरे कोश) :सू
रोचक एकाक्षरी ( गोरे कोश) :
सू
=
१. जन्म देणे ( वीरसू, कामसू )
२. शिवण्याची सुई
३. बाजू ( ऐतिहासिक) . . . उत्तरेकडील सू सांभाळा . . .
४. न उघडणारी कोवळी पाने, नारळाची झावळी
_ _ _ _ _ _ _ _
सै
= बरोबर (फारसी सही वरून)
.... सै-सै अचूक लिखाण आहे.
@ हपा, हळेबिडू सुंदर !
@ हपा, हळेबिडू सुंदर !
@ अस्मिता, अंधकापर्यंत आलाच होतात, त्याचाच मित्र गजासुर उर्फ़ नील तमिळ “गजासुरसंहार” / “शिव-गजसंहार” कथांचा नायक आहे. शिवानेच मारला त्याला. नीट आठवली कथा की योग्य जागी लिहितो. तसाच कुणी पांडीयन सम्राट इन्द्रज्ञुम्न आहे, (नांव नीट लिहिता येत नाही आहे ) त्याच्या हत्ती जन्माची पण काहीतरी स्टोरी आहे.
गजलक्ष्मी आणि गजांतलक्ष्मी एकच की वेगवेगळी याबद्दल कनफ्यूजन आहे, आता नीट वाचावेच लागेल
कुमार१, या अधिकच्या अवांतराबद्दल दिलगीरी !
लघिमा
लघिमा
१ हलकेपणा; कमीपणा. २ अष्टमहासिद्धीपैकी एक
[सं. लघु]
. . . गुणांच्याही पलीकडचा मुक्तपणा वाचकाला जाणवतो. विचारांतला हा मुक्तपणा ही गुरुचरण दास यांची ‘लघिमा सिद्धी’ ठरली आहे.
https://www.loksatta.com/sampadkiya/features/another-sort-of-freedom-boo...
महिमाच्या विरुद्धार्थी शब्द
महिमाच्या विरुद्धार्थी शब्द आहे हा
'गजांतलक्ष्मी'बद्दल विचार करत
'गजांतलक्ष्मी'बद्दल विचार करत होते. पुढे लिहीत आहे ती 'माहिती' नाही, तर माझा 'एज्युकेटेड गेस' आहे.
या शब्दात 'अंत' हा शेवट या अर्थी आलेला नसून चरमसीमा या अर्थी आला असावा. हत्ती विकत घेण्याइतकी संपत्ती आणि बाळगण्याइतकं स्थैर्य त्यात अभिप्रेत आहे. ती (आज असलेली) संपत्ती आणि (भविष्यकालीन) स्थैर्याची हमी ही संपन्नतेची सीमा झाली.
(पेट पेरेन्ट्स्ना त्या 'बाळगू शकण्या'चा अर्थ नेमका कळेल. त्यांचं अन्न, औषधपाणी, लशी, राहण्याची, व्यायामाची इत्यादी सोय, स्वच्छता, देखभाल अशा बर्याच बाबी त्यात येतात. हे सगळं करू शकणं, किंवा त्यासाठी लागल्यास हेल्प हायर करू शकणं ही मोठी कमिटमेन्ट असते.)
स्वाती, मेक्स सेन्स. छान
स्वाती, मेक्स सेन्स. छान पोस्ट.
सध्या फक्त 'कुत्रांतलक्ष्मी' बाळगून आहे.
अनिंद्य, तुमची पोस्टही वाचली. आवडली.
त्या अनुषंगाने धागा काढलात तर वाचायला आवडेल.
लाघिमा सिद्धी आणि महिमा
लाघिमा सिद्धी आणि महिमा सिद्धी -
'अणू पासोनी ब्रह्मांडाएवढा जात असे' अशा आहेत.
लाघिमा - भौतिक दृष्टीने हलकं नाही बहुतेक, सूक्ष्म रूपात वावरता येणं असं आहे.
महिमा सिद्धी म्हणजे मनाने चराचर व्यापून उरणं. 'हे विश्वची माझे घर ऐसी मती जयांची स्थिर' या अर्थाने.
बंगालच्या लाहिरी महाशयांना लाघिमा सिद्धी प्राप्त होती असं Autobiography of a Yogi मधे वाचलेलं आठवतंय.
कुत्रांतलक्ष्मी
कुत्रांतलक्ष्मी

उत्तम चर्चा ! वाचतोय
उत्तम चर्चा !
वाचतोय
'अणू पासोनी ब्रह्मांडाएवढा
'अणू पासोनी ब्रह्मांडाएवढा होत जात असे' अशा आहेत.
>>> ह्यात 'होत जात असे' हवं. ते 'होत' लाघिमा सिद्धी प्राप्त होऊन सूक्ष्म रूपात गेलं समजा.
तुम्ही 'लघिमा' लिहिले आहे आणि मी 'लाघिमा', ह्याची नोंद घेतली. बहुतेक मी इंग्रजी/ हिंदी उच्चार लिहितेय.
* सूक्ष्म रूपात गेलं >>> होय.
* सूक्ष्म रूपात गेलं >>> होय. ( the lightness of being)
लघिमा असे मराठीत.
कुत्रांतलक्ष्मी
कुत्रांतलक्ष्मी

परज
परज
[हिं. पर्ज]
अनेक अर्थ असलेला रोचक शब्द !
१. तरवारीची, ढालीची, पट्ट्याची मूठ = खोबळा
२. (संगीत) एक राग
३. मूढ
४. ओढा
वरचा ‘ओढा’ = ? खांब व तुळई यांना बळकटीसाठीं जें एक जोड लाकूड जोडतात ते. (माझा अंदाज )
‘तरवार परजणे’ हे परिचित असते पण निवळ परज हा शब्द सहसा वापरात दिसत नाही.
खुतखावणी
खुतखावणी
= धनीण; यजमानीण
[फा. खुद = स्वतः + खाविंद=मालक]
‘वाढिताती नवजणी । खुतखावणी जाणोनी ।’
(एकनाथी रुक्मिणी स्वयंवरातून)
खुद- खाविंद = खुतखावणी. छान.
खुद- खाविंद = खुतखावणी. छान.
खाविंद सारखाच एक उर्दू शब्द आहे ख़र-ख़ाविंद ! अर्थ म्हणाल तर विद्वान परंतु “दीडशहाणा” सारखा उपरोधिक वापरतात नेहेमी
खाविंद आणि मख़्दूम असे जोडीने येतात. मखदूम/ मख़्दूम म्हणजे सेव्य / मालक/ धनी.
आडनाव मकदूम/ मखदूम असलेले मराठीजन माहितीत आहेत. मख़दूम / मगदूम चा मराठी अर्थ मात्र “चाकरी केलेला” / चाकर असा आहे.
@ स्वाती, तुमचा गजांत लक्ष्मी
@ स्वाती, तुमचा गजांत लक्ष्मी चा 'एज्युकेटेड गेस' पटेबल आहे
**ख़र-ख़ाविंद ! अर्थ म्हणाल तर
**ख़र-ख़ाविंद ! अर्थ म्हणाल तर विद्वान परंतु “दीडशहाणा" >>> छान !
‘गोष्टी गाण्यांच्या’ या
‘गोष्टी गाण्यांच्या’ या कार्यक्रमात अवधूत गुप्ते यांनी कोल्हापुरी भाषेतील काही खास शब्द सांगितले :
१. डाळलं = फसवले
२. फाळलं = फावले किंवा फायदा झाला
( त्याचं व तिचं फाळलं)
तसेच..
३. एखाद्या तरुणीने जर तरुणाला विचारले, “जेवलास का ?”
तर,
त्याचा गर्भित अर्थ वेगळा असतो - लगट करण्याचा हा एक प्रश्न मानला जातो !
हो, "जेवलीस का" ही सध्या
हो, "जेवलीस का" ही सध्या तरुणांमध्ये बरीच लोकप्रिय पिकप लाईन आहे. त्यावर मिम्स् पण आहेत.
आणि ते 'जे1 झालं का?' असं
आणि ते 'जे1 झालं का?' असं पद्धतशीरपणे विचारायचं असतं.
अरे बापरे, मला हे माहीत
अरे बापरे, मला हे माहीत नव्हतं. इतकी बोअर 'मदरली' 'पिकप लाईन' आहे की लक्षातही आलं नसतं.
जेवलीस का मॅसेज केला तुला
जेवलीस का मॅसेज केला तुला रिप्लाय नाही आला मला असं एक गाणं आहे!
एवढंच ना एकटे जगू या गाण्याचं विडंबन जेवलीस का हे पण एक आहे.
काय गाणं आहे, माहिती नव्हतं
एवढंच ना एकटे जगू या गाण्याचं
एवढंच ना एकटे जगू या गाण्याचं विडंबन जेवलीस का हे पण एक आहे. >>> हॉरर सिनेमे माहित होते. हॉरर गाणं पहिल्यांदाच ऐकलं.
गचपन / ण
गचपन / ण
= पसार्याची किंवा अडगळीची स्थिती ( overgrown and tangled state)
. . . पुढे पुढे फांद्यांचे शेंडे एकमेकांत मिसळून पानांचं गचपन झालेलं असतं.
(डॉ. आनंद यादव यांच्या लेखातून)
सुंदर शब्द !
गचपण - पहिल्यांदा वाचला तो
गचपण - पहिल्यांदा वाचला तो संभाजी महाराजांच्या संदर्भात.
जावळी येथे झाडा - वेलींचे गचपण झाले होते, निसटण्याचे सर्व मार्ग एकात एक गुंतल्यागत वाटत होते.
"गचपन ढवळ्या" अशी एक शिवी
"गचपन ढवळ्या" अशी एक शिवी ऐकली आहे.
गचपन ढवळ्या" अशी एक शिवी ऐकली
गचपन ढवळ्या" अशी एक शिवी ऐकली आहे.
+१
समानार्थी शब्द “ऐचण” ऐकला आहे.
गचपण हा शब्द बरेचदा वाचलाय.
गचपण हा शब्द बरेचदा वाचलाय.
मला वाटतं धारपांच्या कथांमधे असतो.
Pages