शब्दवेध व शब्दरंग (३)

Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दिग्गज म्हणजे दिशा जिंकणारा असा अर्थ समजत होतो.

Happy

हत्ती नवीन समजले, आभार ! बहुदा बलशाली आणि बुद्धीमान दोनही असल्याने हत्तींची योजना असावी

८ हत्तींचा संदर्भ मस्तच.

पण आपण एका व्यक्तीकरता पण दिग्गज शब्द वापरतो. मग एक आणि आठ हे समीकरणात कसे बसवायचे?

आठ हत्तीच्या बळाएवढे कर्तृत्व असणारा - असा अर्थ घ्यायचा का?

हे सर्व लाक्षणिक अर्थ :

२. (ल.) सुंदर व धिप्पाड माणूस. ३. मोठा पंडित; बडा विद्वान. ४. (थट्टेने) अवाढव्य, राक्षसी, दांडगा माणूस. [सं.]

मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)

त्या आठ गजांनी आठ दिशांनी पृथ्वी तोलून धरली आहे. त्यातला एक गज जरी हलला, तर पृथ्वीचा तोल ढासळेल!
त्यावरून दिग्गज म्हणजे अशी व्यक्ती, जिने आपल्या कर्तृत्वाने/प्रावीण्याने एखाद्या क्षेत्राचा जणू तोल आपल्या शिरावर सांभाळला आहे.

<त्यावरून दिग्गज म्हणजे अशी व्यक्ती, जिने आपल्या कर्तृत्वाने/प्रावीण्याने एखाद्या क्षेत्राचा जणू तोल आपल्या शिरावर सांभाळला आहे.> वा!

“गज” आणि “दिग्गज”

- वज़नदार शब्द नीट समजले !

आभार भरत, स्वाती, कुमार१

sky-clad = naked, clothed in space.
नवीन शब्द कळला. धन्यवाद कुमार सर

दिग्गज>>>>
अर्थ नीट समजला
धन्यवाद भरत, स्वाती_आंबोळे

दिग्गज आणि त्यातील आठ हत्तींनी mythologies and symbols वगैरेच्या प्रांतात नेले, बसलो वाचत. त्यात नरक ११ प्रकारचे असतात हे समजले :

तामिस्त्र
अंधतामिस्त्र
रौरव
महारौरव
सांडस
कुंभीपाक
काळसूत्र
तप्तसूर्मि
वैतरणी
वज्र- कंटक
असिपत्र

आता हा क्रम नरकांच्या/ यातनांच्या severity प्रमाणे आहे की कसे हे माहित नाही. स्वत: नरकात जाण्याची शक्यता धूसर असल्याने अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही Happy

छान माहिती अनिंद्य.

तामि स्त्र स्र
अंधतामि स्त्र स्र

हे सहस्र, स्राव, स्रोत इत्यादींप्रमाणे आहेत. त्यांमध्ये बर्‍याचदा चुकून स्त्र लिहिला जातो.

सांडस >> हे नाव आवडलं. अर्थात का ते सांगायची गरज नाही. Happy

सांडसचा मूळ अर्थ : चिमटा, पकड. >>>> ( सांडशी = लहान सांडस)
आणि
त्या शब्दाखालची ही टिप्पणी :
(सं. संदेश; प्रा. संडास; हिं. सँडसी)

दाते शब्दकोश

तमिस्र - अंधारा. कृष्णपक्षाला ‘तमिस्रपक्ष’ही म्हणताता.
तमिस्रा म्हणजे काळोखी रात्र.

गीतरामायणात ‘मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे’ गीतात
कठोर झाली जेथे करुणा
गिळी तमिस्रा जेथे अरुणा

असा उल्लेख आहे.

तामिस्र म्हणजे अंधारातूनच उगम पावलेला असं असेल का? आंणि अंधतामिस्र म्हणजे त्याहून गडद?

तामि स्त्र स्र
अंधतामि स्त्र स्र

ही चूक होते अनेकदा. दुरुस्ती बद्दल आभार !

… सांडसमार्ग हेच मूळ नाव असावं. सॅण्डहर्स्ट रोड म्हणे! Lol

… तमिस्रा म्हणजे काळोखी रात्र….

अहाहा, सुंदर !

…. सांडस Proud

तुम्हाला काय सुचलयं ते समजलं !

आता सर्व नरक आणि त्यातल्या नरकयातना डिटेलवार वाचाव्या लागणार !

पूर्वी एकदा “गरुड़ पुराण” सक्तीने “ऐकावे” लागले होते. Human imagination चा कहर आहे ते प्रकरण. त्यात हे संडास प्रकरण फार ग्राफिक होते Happy

Adultery / बलात्कार/ स्त्रीच्या मनाविरुद्ध संभोग इ. साठी मेल्यावर कुठल्याश्या नरकात जावे लागते. पापक्षालन होईस्तोवर अनेक वर्ष रजस्वला स्त्रीचे रक्त, मानवी विष्ठा, पू, शेंबूड, वीर्य आणि कुजलेल्या मलमूत्रादी द्रवानी भरलेल्या “पूयोदक” नामक विहिरीत गटांगळ्या खात रहावे लागते असे वर्णन होते !!!! यक्स अगदी. “जुगुप्सा” हाच शब्द वापरता येईल.

होय !

मला आधी वैतरणी स्वर्गातली नदी असे माहित होते. परत चेकवतो ही नरकात का आली ते Happy

मृतात्म्यांचे पाप धुवून टाकणारी म्हणून वैतरणी नदी माहित होती (स्वर्गात की नरकात ते माहीत नाही)

भारतात सहसा नदीला देवी मानतात. मग ठाण्यातील एका नदीला नरकाचे नाव का दिले असावे? प्रचंड उत्पात घडवण्याइतकी ती मोठी पण नाहीये.

वैतरणी >>
इथे विविध पौराणिक संदर्भ दिले आहेत व त्यात काही स्पष्टीकरणे दिलीत.
https://en-m-wikipedia-org.translate.goog/wiki/Vaitarani_(mythology)?_x_tr_sl=en&_x_tr_tl=mr&_x_tr_hl=mr&_x_tr_pto=sc

* सत्पुरुषांना अमृतसमान पाण्याने भरलेली नदी दिसते, तर पापींना ती रक्ताने भरलेली दिसते.
* वैतरणीमध्ये पडणाऱ्या प्राण्यांना रक्त, पाणी, कफ, मूत्र आणि विष्ठा अशा दुर्गंधीयुक्त द्रवपदार्थांचा अनुभव येतो . . .

वैतरणीच्या तीरी नाव येऊन का गाय येऊन तिचं शेपूट धरून पुण्यवान आत्म्याला पुढच्या लोकी (सहसा चांगली गती मिळते) जाता येते असं वाचलं होतं.

मी पण रौरव नरक तेवढा वाचला होता.
छान चर्चा. तमिस्र शब्द फार आवडला. तमस आणि तिमिर दोन्हींच्या मधला वाटला.

गज वरून गजांतलक्ष्मीचा संदर्भ नेमका काय आहे? अर्थ माहित आहे.
शिवतांडव स्तोत्रात -
गजांतकांधकांतकम् तमंतकांतकम् भजे अशी ओळ आहे.
कोणत्या गजाचा अंत केला आहे? अंधक माहिती आहे.

गजांतलक्ष्मी
>>> इथे एक महाभारतातली आख्यायिका दिलेली आहे पण तिच्यात गजाचा अंत वगैरे नाही.
https://marathi.indiatimes.com/business/business-news/articleshow/150376...

".’भीमाने कृष्णाला गजांतलक्ष्मी कुठे मिळेल, असा प्रश्न केला. त्यावर कृष्ण म्हणाला, ‘इंद्राचा हत्ती ऐरावत हाच मुळात गजांतलक्ष्मी आहे. त्याला तू तुझ्या दारात आण म्हणजे तुला तुझं राज्य परत मिळेल आणि ते टिकूनही राहिल".

गजांतलक्ष्मीबाबत माहीत नाही, पण वरती शिवतांडव स्तोत्र आलं आहे म्हणून -
गजासुर या राक्षसाचा वध शिवाने केला अशी एक कथा आहे. त्यावर आधारित एक सुंदर शिल्प कर्नाटकात हळेबिडू येथील एका मंदिरात पाहिलं होतं मी. हत्तीच्या पोटात शिरून शिव तांडव नर्तन करतो आहे असं ते शिल्प आहे. त्या नर्तनात शिवाने साधलेला तोल, दुमाडलेल्या पायाचा वर मुडपलेला अंगठा, त्रिशूळ इत्यादी डिटेल्स - सगळं बघण्यासारखं आहे.

दोन्ही लिंक्स वाचल्या, आवडल्या. Happy
शिल्प खरोखरच सुरेख आहेत. चोळ आणि पल्लव वाचून PS आठवले. गजांत महादेवाला का म्हणतात हा संदर्भ कळला पण याचा गजांतलक्ष्मीशी संबंध नसावा. ऐरावताचेच दुसरे नाव आहे हेही कळलं पण आपण समृद्धीसाठी उपमेत जी वापरतो ती ही नाही.
कधी येणार गजांतलक्ष्मी ! Happy
धन्यवाद दोघांनाही.

Pages