Submitted by कुमार१ on 15 March, 2024 - 20:34

भाग २ इथे : https://www.maayboli.com/node/83225?page=33#new
......................................................................................................................
शब्दवेध व शब्दरंग......
अर्थात मराठी शब्दांचे अंतरंग.....
शब्दज्ञान आणि मनोरंजन....
सुस्वागतम !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निघंट, निघंटु
उत्तम चर्चा
***************"
निघंट, निघंटु
१. वैदिक शब्दकोश.
२. (सामा.) शब्दकोश.
३. वैद्यकीय कोश. [सं. निर्+ग्रंथ्]
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ)
. . . विनोदवेदाचे दोन निघंटु अभ्यासता आले . . .
Possibility आणि Probability
Possibility आणि Probability साठी योग्य मराठी शब्द काय? सुचवा.
मला दोन्हींसाठी शक्यता आणि संभावना (हा थोडा हिंदी वाटतो) सुचत आहेत.
Probability statistics मधे
Probability statistics मधे फार वापरला होता. Probability म्हणजे मला जरा calculated शक्यता वाटते. Possibility शक्यता मात्र नुसता अंदाज, uncalculated/ less mathematical.
महाराष्ट्र बोर्डाच्या
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या गणिताच्या पाठ्यपुस्तकात शोधलं.
Probability स़ंभाव्यता
-
तिथे यादॄच्छिक असा एक शब्द दिसला. म्हणजे काय असेल?
तुम्ही तर चर्चा सुरू केली की
तुम्ही तर चर्चा सुरु झाली की संपवली
यादृच्छिक -
ऐच्छिक ?
नवा खाऊ दिला.
नवा खाऊ दिला.
Random?
Random?
नवा खाऊ.
नवा खाऊ.
मानवदादा+१
हे सापडलं.
Something that is done or chosen in a random way, or at random, is done or chosen without a definite plan or pattern.
Random बरोबर. हा शब्द
Random बरोबर. हा शब्द पाडलेला असेल का?
शब्दकोशातला अर्थ सहज घडणारे. मूळ संस्कृत शब्द आहे.
इथे उत्स्फ़ूर्त, योगायोग,
इथे उत्स्फ़ूर्त, योगायोग, योगायोगाने, अनपेक्षीत असेही अर्थ दिले आहेत.
मग
मग
Possibility = शक्यता
Probability= स़ंभाव्यता
?
हो, तीच 'संभाव्यता' दिसते आहे
हो, तीच 'संभाव्यता' दिसते आहे. लॉक किया जाय
उन्हाची तिरीप पडते, त्यात जे
उन्हाची तिरीप पडते, त्यात जे धुळीचे कण तरंगताना दिसतात, त्यांची गती ही यादृच्छिक गती असते असं आमच्या विज्ञानाच्या पुस्तकात असायचं
random याच अर्थाने. पाडलेला शब्द आहे की कसं ते नाही माहिती.
पाडलेला म्हणजे काय?
पाडलेला म्हणजे काय?

तसे तर सगळेच शब्द कुणीनाकुणी पाडलेलेच आहेत.
बरोबर. पण बहुधा त्यांना "ते
बरोबर. पण बहुधा त्यांना "ते स्वतःहून तोल जाऊन पडलेत की कुणीतरी धक्का देऊन (ओढून ताणून) पाडलेत" असं विचारायचं आहे. रास्त प्रश्न आहे.
उत्तम चर्चा
उत्तम चर्चा
***************"
‘सदोष मनुष्यवध"
वृत्तपत्रांमधील या शब्दप्रयोगाला हरकत घेणारे एक वाचकांचे पत्र : https://www.loksatta.com/sampadkiya/columns/readers-comments-on-loksatta...
. . . कोणतीही दुर्घटना घडली की ‘सदोष मनुष्यवधा’चा गुन्हा दाखल केला जातो. मुळात ‘वध’ हा वाईट प्रवृत्तीच्या माणसांचा केला जातो. सामान्य माणसे मरण्याला ‘मनुष्यवध’ म्हणणे हेच संतापजनक आहे. कुठलीही ‘सदोष’ गोष्ट भविष्यात अधिकाधिक ‘निर्दोष’ बनणे अपेक्षित असते.
‘कल्पेबल होमिसाइड’ला ‘सदोष मनुष्यवध’ हा अत्यंत असंवेदनशील मराठी प्रतिशब्द न वापरता ‘गुन्हासदृश लोकहत्या’ असे काही म्हणता येईल. परिस्थिती बदलण्याची आशा तशीही नसल्याने निदान शब्दप्रयोग बदलून काहीतरी केल्याचे समाधानही मिळेल.
प्रसाद दीक्षित, ठाणे
............. .......................................................
वध, खून, हत्या, संहार, . . . इ. या प्रत्येकाची अर्थछटा वेगवेगळी आहे हे बरोबर.
पण सदोष मनुष्यवधाची आपल्याला
पण सदोष मनुष्यवधाची आपल्याला इतकी सवय झाली आहे की, हे गुन्हासदृश लोकहत्या नक्की काय प्रकरण आहे ते कळणार नाही लवकर!
#नको तिथे सखारामगटणे
सदोष मनुष्यहत्त्या कसे वाटेल?
सदोष मनुष्यहत्त्या कसे वाटेल?
सदोष मनुष्यहत्त्या >>>
सदोष मनुष्यहत्त्या >>> योग्य व सोपे.
कीचकाचा वध, रँडचा खून,
कीचकाचा वध, रँडचा खून, ज्यूंची हत्या, हिरण्यकश्यपूचा संहार, गायींची कत्तल...
बरोबर आहे का?
होय.
होय.
थोडी भर :
1. हत्या = Murder; killing in general, but understood only of that killing (whether of man or of any animal) which is viewed as criminal.
मोल्सवर्थ शब्दकोश
2. कत्तल =
हिंसा; लढाईंत होणारी माणसांची कापाकापी; छाटाछाटी
दाते शब्दकोश
आपण मरणाऱ्याचे समर्थक असू तर
आपण मरणाऱ्याचे समर्थक असू तर हत्या आणि मारणाऱ्याचे समर्थक असू तर वध. गांधी हत्या म्हणायचं की गांधी वध यावरून झालेलं राजकारण हा फरक दाखवण्यास पुरेसं आहे.
सुधारणा - हत्या म्हणायला समर्थकच हवे असं नाही. तो शब्द जास्त समर्थननिरपेक्ष असावा. काय म्हणता?
मी तेच लिहीत होतो. पोस्ट
मी तेच लिहीत होतो. पोस्ट करण्यापूर्वी लिहिलेले कॉपी करून एकदा रिफ्रेश केले आणि तुम्ही केलेली दुरूस्ती दिसली.
तरी पण खाली पेस्ट करतो लिहिलेले.
-----
मला वाटते मरणाऱ्याचे विरोधक असु आणि त्याची हत्या केली म्हणुन मारण्याऱ्याचे समर्थन करत असु तर वध.
हत्या म्हणण्यास मरणाऱ्याचे समर्थक असणे गरजेचे नसावे.
उदा. इंदिरा गांधींची हत्या म्हणण्यास त्यांचे समर्थक नसणाऱ्यांचाही आक्षेप नसावा.
जरा विचार करतो
जरा विचार करतो
दरम्यान माझी पण एक शंका.
एखाद्या गुन्हेगाराने सामान्य माणसाला मारले तर तो खून झाला. परंतु त्याच गुन्हेगाराने जर एखाद्या राष्ट्रपुरुषाला मारले तर तेव्हा हत्याच म्हणायचे असा काही नियम आहे का ? तिथे खून म्हटलं तर नक्की काय आक्षेप आहे ?
जेव्हा पाश्चात्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांना गोळी घालून मारले होते तेव्हा भारतातील बातम्यांमध्ये खून हाच शब्दप्रयोग वापरला होता.
खून शब्द जरा जास्ती भडक आणि
खून शब्द जरा जास्ती भडक आणि अंगावर येणारा आहे. तिरीमिरीत येऊन खून करता येतो, हत्या नाही.
हत्या ही प्लॅन करून केलेली, एखाद्या मोठ्या व्यक्तीची असते.
* मोठ्या व्यक्तीची>>>
* मोठ्या व्यक्तीची>>>
अंशतः सहमत.
पण मग जोशी अभ्यंकर हत्याकांड असे म्हटले होते ना ? तेव्हा खूनसत्र हा शब्द अधिक योग्य ठरला असता का?
तत्त्वासाठी ठार मारले तर हत्या म्हणायचे असे आहे का?
हत्या ही प्लॅन करून केलेली,
हत्या ही प्लॅन करून केलेली, एखाद्या मोठ्या व्यक्तीची असते. >>> असंच नाही. सलमान खानने फुटपाथवरच्या माणसांना मारले तेंव्हा 'निघृण हत्या' असंच म्हटलं होतं वर्तमानपत्रांनी.
मागे इथे मुलगा - मुलगी- मूल
मागे इथे मुलगा - मुलगी- मूल यावर चर्चा झाली आहे. या शब्दाचं मूळ काय असावं हा मला प्रश्न पडला होता. उत्तरेत असा शब्द दिसत नाही. दक्षिणेत कन्नडात हुडुगा - हुडुगी असे शब्द आहेत. मुलगा हा जेव्हा नातेसंबंधी येतो, म्हणजे अमुकतमुकचा मुलगा, तिथे कन्नडात मगा (मगु) असा शब्द आहे. दक्षिणेतील सगळ्या भाषांपैकी तमिळ सर्वात जुनी आहे म्हणतात. कार्त्तिकेयाला तिथे मुरुगन / मुरुगा असा शब्द आहे. कार्त्तिकेयाच्या इतर नावांपैकी कुमार (म्हणजे छोटा मुलगा या अर्थाने) असंही एक नाव आहे (आता हे नाव धागालेखकांशी जुळतं हा निव्वळ योगायोग असावा). पण मी मुरुगा या शब्दाचा अर्थ आणि व्युत्पत्ती शोधायला गेलो, तर तमिळात 'मुरु' म्हणजे कोवळा, नाजूक, सुंदर. असा कोवळ्या वयातला तो म्हणजे 'मुरुगा' अशी व्युत्पत्ती सांगितली जाते. पुल्लिंगी नामांना तमिळात शेवटी अन् प्रत्यय लागत असल्यामुळे (आणि आदरार्थी उल्लेख करताना त्याच नावाला अन् ऐवजी अर् प्रत्यय लावतात) मुरुगन असं नाव आणि मुरुगन = कुमार असा अर्थ लागतो. मग मराठीत आलेला मुलगा हा मूळ तमिळोद्भव आहे की काय अशी मला शंका आहे. कुणाला कल्पना असल्यास खुलासा करावा.
सध्या कार्त्तिकेयाचं वाहन मोर असलं तरी जुन्या उल्लेखांप्रमाणे पूर्वी कोंबडा होता. कोंबड्याला हिंदी शब्द मुर्गा असा आहे. संस्कृतात 'मृग' म्हणजे हरीण किंवा जंगली प्राणी असा अर्थ असला तरी त्याचं मूळ प्रोटो-इंडो-युरिपियन भाषेत मृगस आणी त्यावरून जुन्या अवेस्तन भाषेत मेरेया (= पक्षी) आणि फारसी भाषेत मोर्ग ( = कोंबडी) आले आहेत. हिंदी मुर्गाचं मूळ फारसी मोर्ग हे असावं.
अश्या प्रकारे मुरुगा आणि मुर्गा हे दोन्ही वेगवेगळ्या अर्थाचे शब्द, वेगवेगळ्या भाषामूळातून जन्मलेले असले तरी कार्त्तिकेय आणि त्याच्या वाहनाच्या रूपाने एकत्र आले आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.
हर्पा,
हर्पा,
सुंदर पोस्ट. भाषा प्रांतातील सुंदर मुशाफिरी, अन्यथा तामिळ मुरुगा आणि अरेबिक/पर्शियन मुर्ग यात काही संबंध असेल हे डोक्यातच आले नसते
स्कंद / कार्तिकेयाचे प्रथम वाहन कोंबडा हे बरोबर, जुन्या तमिळ शिल्प / चित्रात दिसतो (कोंबडी नाही, तुरेवाला, मेल फक्त). मोर नंतर आला समहाऊ.
रच्याकने, एका प्रोजेक्टला दुसऱ्या टीम मध्ये सात मुरुगा होते :
मुरुगा राजन - १ आणि २
मुरुगासुंदरम -१
मुरुगन - १
मुरुगाषण्मुगन -१
मुरुगेशन -१
मुरुगा मुरुगन -१
आम्ही त्यांच्या युनिटला 'मुर्गो का दडबा' म्हणायचो गमतीने
सुंदर विवेचन !!
सुंदर विवेचन !!
Pages