चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दशरथ म्हणून अरुण गोविल आवडले. त्यांच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव शोभतात.
यशचा लूक आवडला रावण म्हणून. पण शिवतांडव स्तोत्र रचायचं सोडा, त्याला मनाचे श्लोक तरी म्हणता येतील का नाही असं वाटतं एकंदरीत कॅरॅक्टरकडे पाहून. बॉलिवूडमधे बऱ्याच लोकांवरचा खिलजी इफेक्ट उतरला नसावा.

कैकेयी कोण आहे समजलं नाही.

लीड पेअर अज्जिबात नाही पटले.

रणबीर कपूर रॉकस्टारमधे यशस्वी होण्यासाठी त्या हिरॉईनकडून मुद्दाम ब्रेकअप करून दुःखी होण्याचा प्रयत्न करतो तसा टोटल फेक चेहरा ठेवून वावरला आहे.

साई पल्लवीचा लूक, तिची चीकबोन्स विचीत्र दिसतात, सतत प्रौढ दिसते. सीता म्हणून तर शोभत नाहीच पण तिचा नॅचरल गोडवाही जाणवत नाही. रामायणात सीतेच्या आवाजाची तुलना वीणेच्या स्वरांशी केलेली आहे. हिचा आवाज राष्ट्रीय शोकप्रसंगी दूरदर्शनवर वाजणाऱ्या रुद्रवीणेसारखा आहे.

खिल्जी, संभाजी, राम, रावण एकाच वीएफएक्स स्टाईलने लढाया करतात हे बघून डोळ्यांचं पारणं फिटलं.

सतत अंधारे व्हिज्युअल्स थेटरात बघणे शक्य नाही. कदाचित साऊंड इफेक्ट्ससहीत पाहताना जाणवणार नाही. खरोखरचं शूटींग करणं परवडणेबल असतं. शिवाय नैसर्गिक उजेड जास्त भावतो.

रणवीर कपूर आता संजय दत्त वाटू लागला आहे. राम, कृष्ण आणि बुद्ध यांचे चेहरे स्त्रैण पहायची सवय लागली आहे. लेण्यातून बुद्धाचा चेहरा तसा दर्शवला आहे. राजा रविवर्माने त्यावरून देवांचे विशेषतः राम कृष्ण यांचे चेहरे तसे दर्शवले. आज तेच चेहरे रूढ आहेत.

लहानपणी महादेवाचा रूंद आणि मर्दानी चेहरा पाहिला आहे. आताचा वेगळा असतो. इथून पुढच्या पिढीला सवय होईल.
राजपुताना फाईल्स एक्सवरून साभार
राम
Screenshot_20260730_133340_ChatGPT.jpg
कृष्ण
Screenshot_20260730_130642_ChatGPT.jpg

लहानपणी महादेवाचा रूंद आणि मर्दानी चेहरा पाहिला आहे. >>>
मी लहानपणी जे महादेव पाहिले ते मोस्टली जेमिनी गणेशन टाईप गुबगुबीत, गुळगुळीत पुरीसारखे गोल चेहरे होते जे अज्जिबात झेपले नव्हते.
आता महादेव मोहित रैनाच! परफेक्ट पहाडी, मॅचो लूक.

अजिंठा लेण्यात त्रिमूर्ती म्हणून जे शिल्प आहे त्यात मधला शिव आहे. तो देखणा पण मर्दानी आहे. विशेष म्हणजे यापैकी कुठल्याही देवाला, बुद्धाला दाढीमिशा नाहीत. एकदम गुळगुळीत, सफाचट.

सीता म्हणजे एका खऱ्याखुऱ्या राजघराण्यातील स्त्रीचा चेहरा आहे. राजा रविवर्मा साठी तिने मॉडेलिंग केले होते असा उल्लेख रणजित देसाईंच्या पुस्तकात आहे.

बटवारा सिनेमा म्हणजे टिपिकल चीजी मसाला मूव्ही दिसतो आहे!
धुरंधर च्या निमित्ताने "बॅन उर्दूवुड" वगैरे लाट आली होती त्याला आमीर खानचे हे उत्तर आहे का ? Happy मुसलमान हिरो. त्याने हिंदू स्त्रीचे मंदिर वाचवायला लढणे. त्यासाठी कलाकार बरोबर उलट धर्माचे. म्हणजे परत त्या चर्चेला ऊत येऊ शकतो. Happy

रामायण - मला पण रावण आवडला, दशरथ ही चांगलाच आहे. पण अ‍ॅज एक्सपेक्टेड , राम सीताच नाही झेपले. रणबीर चे झोपाळू डोळे रामाच्या वर्णनाला मिसमॅच आहेत. ते अरुण गोविल चे ही मिसमॅचच होते म्हणा. साई पल्लवी तर काहीही केल्या कुठल्याही अँगल ने सीता नाही वाटत आहे. दोघेही वय ३५-४० वाटत आहेत, रावण यंग वाटतोय त्यांच्यापेक्षा!! व्हिएफेक्स धन्यवाद आहेत. एकूण सीनरी मधे भारत - श्रीलंकेची लश ग्रीनरी दिसत नाही. ग्रे रंगच दिसतोय जास्त त्यामुळे ती आपल्याकडची दृष्ये वाटतच नाहीत. एकूण हा सिनेमा फ्लॉप जावा अशी इच्छा होते आहे Happy

त्यात रामाने कुठले तरी घंटासदृश भांडे बाणाने नेम धरून उडवणे तर चक्क तुर्किश सीरिअलमधून उचलले आहे. केवढे कल्पनादारिद्र्य!!!
मग सात तालवृक्षांना भेदून वालीला मारणे दाखवायचे ना...

रामायण ट्रेलर च्या 4 मिनिटात हनुमानाचा एकही शॉट नाही?? सनी चा हिरो वाला ट्रेलर आलाय म्हणून यातला सपोर्टिंग रोल मार्केट केला नसावा की तिथे तो पाकिस्तानी मुस्लिम अन् इथे हनुमान म्हणून कंट्रोव्हरसी टाळायला असं केलं असावं???
सीता मात्र फारच उदास वाटली. दुसरी कुणीही चालली असती. रकुल प्रीत ला सीता अन् हिला सूर्पणखा दाखवूनही चाललं असतं.
इतरांचे कपडे ड्रेपरी वाल्याकडून आणले, पण कैकेयी चे विसरले बहुतेक, मग ऐन वेळी बाजूच्या फ्लोअर वरच्या सीरियल वाल्यांकडून उधार घेतल्यासारखे वाटले

कैकेयी एकता कपुरची व्हॅम्प दिसतेय Proud लारा दत्ता काय Uhoh
कितीतरी मिड एज्ड हिरॉइन्स मिळाल्या असत्या, विद्या बालन ला का नाही घेतलं ? किंवा ऐश्वर्या !
शिबा शूर्पणखा म्हणून योग्यं आहे, तिला ९० च्या काळात पहिल्यांदा पाहिलं तेंव्हाच पब्लिक शूर्पणखा म्हणायचे तिच्या नाकाला Biggrin

बटवारा सिनेमा म्हणजे टिपिकल चीजी मसाला मूव्ही दिसतो आहे!
धुरंधर च्या निमित्ताने "बॅन उर्दूवुड" वगैरे लाट आली होती त्याला आमीर खानचे हे उत्तर आहे का ? Happy मुसलमान हिरो. त्याने हिंदू स्त्रीचे मंदिर वाचवायला लढणे. त्यासाठी कलाकार बरोबर उलट धर्माचे. म्हणजे परत त्या चर्चेला ऊत येऊ शकतो>>>>>>>>>

हां तेच any kind of publicity is good तसं झालंय बहुतेक.

रामायण ट्रेलर मधे आलेले व्हिएफएस या आधी आलेल्या सैफुवाल्या मुव्हिची भितिदायक आठवण करुन देतात, हवेत उडुन मारामारी करणारे ह्युमन/ राक्षस वैगरे फार बोरिन्ग प्रकार वाटतो.
सुदैवाने रितेशच्या शिवाजी महाराजासारखे रणबीरने साकारलेले राम हवेत उडुन मारामारी करताना दाखवले नसतिल ही अपेक्षा आहे. ..रणबिर अजिबात म्हणजे अजिबातच आवडत नाही, सगळ्या कपुर अ‍ॅक्टर्स मधे सगळ्यात बोअरिन्ग, एकसुरी अभिनय, दिसायलाही अजिबातच कपुर चार्म नाही...अर्जुन कपुर इतका दगडी नाही तरी लोक कौतुक करतात तितका भारी तो कधिही वाटलेला नाही ..तो राम म्हणून टिझर मधेच नव्हता आवडला.
ईईईई त्या साईपल्लवीला काय घेतलय सिता म्हणून???एकदम सामान्य चेहरा आणी वावर... नीट बघितल तर तिच्या एन्ट्री शॉटला तिच्या शेजारची साइड अ‍ॅक्ट्रेस जास्त चान्गली दिसतेय तिच्यापेक्षा.
रावण ,दशरश कास्टीन्ग आवडल...रकुल गोड दिसते.

सीता साठी त्यांना सोज्वळ चेहरा असलेली अभिनेत्री पाहिजे होती
कास्टिंग झाली तेव्हा अनिता पद्दा नव्हती आणि बाकी सर्व हेरॉईन ग्लॅमरपूस होत्या

सीता साठी त्यांना सोज्वळ चेहरा असलेली अभिनेत्री पाहिजे होती
>>>>> इथेच कास्टिंगची चूक झालीये. नॉन ग्लॅमरस लुक आपोआप सोज्वळ ठरत नाही. किंवा ग्लॅमरस नायिका पौराणिक पिक्चर्समध्ये चांगल्या दिसत नाही असाही नाही. (उदा. पी एस मधली तृषा किंवा ऐश्वर्या)
साई पल्लवी ट्रॅडिशनल सुंदर, सोज्वळ (जया प्रदा सारखी) नाही. तिचा लुक गर्ल नेक्स्ट डोअर आहे आणि लोकांना पौराणिक पिक्चरमध्ये नायिका रूढार्थाने सुंदर दिसणे अपेक्षित असते.

रणबीर छान दिसलाय. पण मला गीत रामायणातलं ' सावळा ग रामचंद्र ' आठवलं.

कैकेयीने आपले वर मागितल्यावर आणि पुत्रवियोग होताना दशरथाचा अभिनय अरुण गोविलला झेपेल का?

म्हणून तर दशरथ नेहमी दाढीमिश्यावाला दाखवतात. चेहराच जास्तीत जास्त झाकला की झालं.

सीता मात्र फारच उदास वाटली. दुसरी कुणीही चालली असती. रकुल प्रीत ला सीता अन् हिला सूर्पणखा दाखवूनही चाललं असतं.>>>> खूप हसले Rofl
साई पल्लवी अवघडलेली वाटतेय सतत...
नीट बघितल तर तिच्या एन्ट्री शॉटला तिच्या शेजारची साइड अ‍ॅक्ट्रेस जास्त चान्गली दिसतेय तिच्यापेक्षा.>+१
रणबिर अजिबात म्हणजे अजिबातच आवडत नाही>>> प्राजक्ता धिस इस नॉट फेयर गं.. रॉकस्टार, रॉकेटसिंग, वेक अप सीड, ये जवानी , बर्फी किती उत्स्फुर्त अभिनय केलाय रनबीर ने. राम शोभत नाहीये हे खरे पण तू तर अगदी कपडेच फाडलेस की त्याचे. अर्जून कपूर शी तुलना करून.

कास्टिंग झाली तेव्हा अनिता पद्दा नव्हती>>> अनिता पद्दा ने किसींग सीन्स & कमी कपडे घातलेत. साई ची प्रतिमा सोज्वळ आहे म्हणुन तिला घेतले असावे. पुरुषांना काय काहीही चालतं म्हणुन अ‍ॅनिमल रामाला चालवून घ्या.

राम शोभत नाहीये हे खरे पण तू तर अगदी कपडेच फाडलेस की त्याचे. अर्जून कपूर शी तुलना करून.>>> म्हटल ना इतकाही वाइट नाहिये पण जितक त्याला हाइप केल तितका तो अजिबातच नाहिये त्याच्या समकालिन रणविर सिन्ग पुढे त्याचा अभिनय आणी भुमिका फार मर्यादित वाटतात..

अनिता पद्दा कोण इथपासून माझी सुरूवात आहे. ती सैय्यारा वाली असावी असा अंदाज.

ट्रेलर नाही पाहिला अजून. फक्त राकुल प्रीत सिंग चे शूर्पणखा म्हणून फोटो पाहिलेत. ती एकदम ग्रेसफुल दिसते. फोटो ती (शूर्पणखा) सुंदर होऊन येते तेव्हाचे असतील.

साई पल्लवीची तारीफ खूप ऐकली आहे. फोटोवरून तरी ती एकदम साधी वाटते.

पुत्रवियोग होताना दशरथाचा अभिनय अरुण गोविलला झेपेल का?
>>>>

अहो त्यांनी राम बनून रामायण हिट केले आहे.
आता रामाच्या आयुष्यात असा एकही क्षण आला नव्हता का की ज्यात अभिनयाची कसोटी लागेल Happy

Pages