चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला जुनैद चा महाराज आवडला होता. नेपो किड सारखं त्याला फ्लेक्स करण्याचं ट्रेनिंग मिळालेलं नाही बहुधा. त्यामुळे तो प्रचंड बावरलेला आणि बुजलेला वाटतो.

रश्मिका मला सुद्धा अज्जिबात म्हणजे अज्जिबात आवडत नाही.

अकाली प्रौढ वाटतो जुनेद खान.
>>
Yess
लवयापा मधे ही पकाव च होता

साई पल्लवी अन् रश्मिका कायच्या काय ओव्हर हाईप्ड आहेत

नेपो किड सारखं त्याला फ्लेक्स करण्याचं ट्रेनिंग मिळालेलं नाही बहुधा. त्यामुळे तो प्रचंड बावरलेला आणि बुजलेला वाटतो.
>>
आमिर अनेक वर्ष सांगत फिरत होता की जुनैदला डायरेक्टर व्हायचं आहे, ॲक्टिंग मधे इंटरेस्ट नाही. शाहरुख म्हणायचा की आर्यन हिरो होणार

झालं उलटंच...

साई पल्लवी आणि रश्मिका आपल्याकडच्या सौंदर्याच्या व्याख्येत फिट बसत नाहीत.
पण माझ्यामते दोन्ही अभिनय कमाल करतात आणि त्यांचा पडद्यावरचा प्रेझेन्स मला फार आवडतो.
साऊथच्या हिरोबाबत सुद्धा असे बरेच अनुभव येतात मला. दिसायला छान न वाटणारे सुद्धा नंतर त्यांच्या अदाकारीने आवडू लागतात. एक ओळखीचे जगप्रसिद्ध उदाहरण म्हणजे धनुष..

पण माझ्यामते दोन्ही अभिनय कमाल करतात
>>
रश्मिका ची डायलॉग डिलिव्हरी भयानक लेथार्जिक वाटते
तापसी पन्नू ची पण

हो तिचा स्वतःचा एक accent आहे अलग
पण मला त्याचा कधी त्रास झाला नाही.

थोडेसे गुगल केले तिच्या मातृभाषेबद्दल

रश्मिका मंदान्ना यांची मातृभाषा कोडवा टक्क (कूर्गी म्हणूनही ओळखली जाते)आहे , ही कर्नाटकातील कोडगू जिल्ह्यात बोलली जाणारी द्रविड भाषा आहे. ती कोडावा वंशाची आहे, ती विराजपेठेत जन्मलेली आणि वाढलेली आहे आणि ती अनेकदा सोशल मीडियावर तिची मुळे आणि भाषा हायलाइट करते.

मध्यंतरी तिचा गर्लफ्रेंड पिक्चर पाहिलेला. Toxic रिलेशनशिपवर होता. मस्त अक्टिंग केली होती. स्पेशली शेवट कडक होता. त्यामुळेच शोभेच्या बाहुल्या बघण्यापेक्षा रश्मिका जास्त भिडते. आणि गर्ल नेक्स्ट डोअर वाटते.

सुंदरही नाही आणि अभिनयही येत नाही. मागे तिला साऊथच्या बशीत बसवायला अकरा अकरा रू विपू करा सगळे मिळून "गो फंड रश्मिका" काढू म्हंटले होते. कुणीच पाठवले नाही, घ्या आता. रमली ती इथेच! Proud

मला साई पल्लवी सर्व साधारण अशी वाटते दिसायला पण तिची इमेज अशी काही असामान्य सौन्दर्याची व्याख्या टाईप केली जातेय हे पाहून नवल वाटते. >>> +१ मलाही साई पल्लवी फारच सामान्य वाटलेली , अगदी गर्ल नेक्स्ट डोअर.
फार ओव्हरहाइप आहे त्या ! त्यापेक्षा बाहुबलीत अनुष्का मस्त होती, तिचे डायलॉग , अ‍ॅक्टिन्ग पण चान्गली होती.

रश्मिका कुठे नाही जात
या पिढीसाठी ती नॅशनल क्रश आहे Happy

मला तिचा नवरा विजय देवरकोंडा सुद्धा आवडतो.
त्या दोघांचा गीता गोविंदम आणि डियर कॉम्रेड दोन्ही मस्त आहेत. गीता गोविंदम जास्त टाईमपास आहे. फक्त फार लॉजिक लाऊ नये..

विषय निघालाच आहे तर विजय देवकोंडाचा The फॅमिली स्टार सुद्धा मस्त आहे. मी याच वीकेंडला दुसऱ्यांदा पाहिला. त्यात मृणाल ठाकूर आहे. तिच्या अभिनयाला फार मर्यादा आहेत. पण ती दिसते फारच सुंदर. सर्फ करताना दिसली तर न थांबता पुढे जायला जीवावर येते Happy

Happy मी पाहिला आहे तो सिनेमा. विजय देवेरकोंडा आणि मृणाल ठाकूर दोघेही देखणे आहेत. गाणी पण मस्त आहेत त्यातली. मृणाल ठाकूरचा चेहरा गोड आहे. हल्ली गोडवाच राहिला नाही चेहऱ्यांमधे, त्यामुळे ती लक्ष वेधून घेते.

अरे ती नॅशनल क्रशची फिरती ढाल आता गिरीजा ओक कडे आली असे वाचले होते. सध्या कोठे आहे माहीत नाही (ढाल. गिरीजा ओक नव्हे). नाहीतर नॅशनल म्हणजे सीमांध्र व तेलंगाणाच्या आसपासचा भाग समजायचा. तिरंगा मधे राकु देशाचे रक्षण गुहेतून करताना तेथे नकाशा फक्त "महाराष्ट्र व परिसर" असा असतो, तसे.

रश्मिका असली की पिक्चर तुडुंब चालतो असा एक बिलीफ मधे इण्डस्ट्रीत तयार झाला होता. च्रप्स की कोणीतरी लिहीले होते - ते खरेच वाटते. त्यामुळेच तिला अनेक भूमिका मिळाल्या असतील. ती कायम चिडल्यावर संताप आवरत शांत आवाजात बोलल्यासारखी बोलते.

काय पर्फेक्ट निरीक्षण आहे! दात ओठ खाते ती. थामा मधे तर व्हॅंपायरच केले आहे सरळ. पण मला तिची देहबोली मुळची आदिवासी भिल्ल तरूणी नागरसंस्कृतीत पहिल्यांदाच आल्यावर ज्या कुतूहलाने, त्राग्याने बघेल तशी वाटते. जसं पिकेत आमिर पृथ्वीवर पहिल्यांदा आल्याने कसं दचकल्यासारखे करतो तसं. ही आपल्या गोळ्यावरची नाहीच Lol गर्ल नेक्स्ट डोअर प्लॅनेट.

ती कायम चिडल्यावर संताप आवरत शांत आवाजात बोलल्यासारखी बोलते.
>>>>

हे भारी निरीक्षण आहे. पण बहुधा यामुळेच तिला बरेच रोल सूट होत असावेत. आपल्या समाजात बायकांवर अशी वेळ जास्त येत असावी आणि त्याचे प्रतिबिंब चित्रपटात उमटवणारे रोल ती साकार करत असावी.

गाणी पण मस्त आहेत त्यातली.
>>>>>
हो, मलाही दोनेक आवडली त्यातली. जनरली असे डब चित्रपटाबाबत होत नाही.

आणि या गाण्यामधील ही हूक स्टेप मस्त आहे.
https://youtu.be/rxaMuipTMI4?si=tprW2bpvAaFGwhbd&t=145

रश्मिका असली की पिक्चर तुडुंब चालतो असा एक बिलीफ मधे इण्डस्ट्रीत तयार झाला होता. च्रप्स की कोणीतरी लिहीले होते - ते खरेच वाटते. त्यामुळेच तिला अनेक भूमिका मिळाल्या असतील. ती कायम चिडल्यावर संताप आवरत शांत आवाजात बोलल्यासारखी बोलते.>>> फा, अफाट निरीक्षण! Happy
रश्मिका ला फार मर्यादीत अभिनय येतो. टॉक्सिक मधे बुजलेली मुलगी तिने छान उभी केली आहे. छान आहे तो मुव्ही.
म्रिनाल ठाकूर & विजय दे. चा तो महान फॅमिली स्टार मागे चर्चिला होता इथे. इल्लॉजिकल एकदम. मृणाल फार म्हणजे फार गोड दिसते, अभिनय पण चांगला आहे. तिचा १ सलमान दुलकर सोबत चा मुव्ही फार आवडला होता.

ती कायम चिडल्यावर संताप आवरत शांत आवाजात बोलल्यासारखी बोलते

तिची देहबोली मुळची आदिवासी भिल्ल तरूणी नागरसंस्कृतीत पहिल्यांदाच आल्यावर ज्या कुतूहलाने, त्राग्याने बघेल तशी वाटते. जसं पिकेत आमिर पृथ्वीवर पहिल्यांदा आल्याने कसं दचकल्यासारखे करतो तसं

<< दोन्ही निरीक्षणे चपखळ .. दोन्ही गोष्टी रश्मिकाला कमाल लागू होतात.

मला साई पल्लवी सर्व साधारण अशी वाटते दिसायला पण तिची इमेज अशी काही असामान्य सौन्दर्याची व्याख्या टाईप केली जातेय हे पाहून नवल वाटते
>>>>
मलाही ती सर्वसाधारण वाटते आणि तिला रोझासीआ असा काहीतरी स्किन प्रॉब्लेम आहे म्हणून ती मेकअप करत नाही. पण मेकअप न करता चित्रपटात काम करते हा काही अप्रतिम सौन्दर्याचा क्रायटेरिया असू शकत नाही. फार फार तर कॉन्फिडन्सचा असेल.

रश्मीका पूर्वीच्या दिवाळी अंकांवरच्या बायकांसारखी सुंदर वाटते. त्या बोलतच नाहीत त्यामुळे झाकली मूठ राहते

आदिवासी भिल्ल तरूणी नागरसंस्कृतीत पहिल्यांदाच आल्यावर >>> बरोब्बर

नॅशनल क्रशची फिरती ढाल >>>> Lol

रश्मिकाला धनंजय मुंडेंच्या एका कार्यक्रमात पाहिलं. ती स्टेजवरून फ्लाइंग किसेस , स्माइल्स , नेत्र कटाक्ष फेकून ऑडियन्स मधल्या पुरुषांना घायाळ करत होती.

Pages