Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57
आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.
नवीन प्रदर्शित होणार्या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा
जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्रेलर दोन विक जुनाच आहे पण
ट्रेलर किंवा टिझर या धाग्यावर आधीही येऊन गेला असेल म्हणायचे होते. कारण मी पाहिला होता आधीही...>>>>> ट्रेलर दोन विक जुनाच आहे पण या धाग्यावर आताच टाकलाय आणि टीझर चा वेगळा धागा कुठाय ? ट्रेलर चा हाच एक आहे. यावर कोणी टाकला नाही मागची पानं चेक करू शकतोस.
मग कदाचित मराठी चिकवा
मग कदाचित मराठी चिकवा धाग्यावर कोणीतरी लिंक दिली असेल..
आमीर खान इज बॅकसितारे जमीन पर
आमीर खान इज बॅक
सितारे जमीन पर..
https://youtu.be/YH6k5weqwy8?si=p_QG1IXqOZXLUMfq
ट्रेलरने आल्या आल्या हवा केली
हो..चांगला वाटला ट्रेलर.
हो..चांगला वाटला ट्रेलर..बघावा का?
स्पॅनिश पिक्चर चॅम्पियनची
स्पॅनिश पिक्चर चॅम्पियनची कॉपी की आधारीत आहे... पण आमीर खान टच जाणवत आहे.
आमिर खानचा look ,कराटे
आमिर खानचा look ,कराटे कीटमधल्या mr. Han सारखा वाटतो. Trailer आवडला , बघेन .
वॉव मस्त आमिर पेक्षा मला ती
वॉव मस्त आमिर पेक्षा मला ती मुलं जास्त आवडली
बघणारच.!
छान आहे ट्रेलर. लालसिंग
छान आहे ट्रेलर. लालसिंग पेक्षा हाच आधी रिलीज करायला हवा होता.
मुळ सिनेमा पाहिला नाही अजुन.
मुळ सिनेमा पाहिला नाही अजुन. प्राईमवर आहे बहुतेक. हा आमीरसाठी पहाणार.
एप्रिल मे ९९ - मराठी सिनेमाचा
एप्रिल मे ९९ - मराठी सिनेमाचा ट्रेलर! ती मुलगी रुजुता देशमुखसारखी खूप दिसतेय. तिचीच मुलगी आली की काय सिनेमात?
https://www.youtube.com/watch?v=_Z3W36QT1G0
तिचीच मुलगी आहे
तिचीच मुलगी आहे
चांगला वाटतोय ट्रेलर.
चांगला वाटतोय ट्रेलर.
हो मला पण आवडला.
हो मला पण आवडला. सिनेमॅटोग्राफी पण छान वाटतेय.
मस्त आहे ट्रेलर..
मस्त आहे ट्रेलर..
मुलगी रुजुता देशमुखसारखी >>
मुलगी रुजुता देशमुखसारखी >> आम्हाला पण हाच प्रश्न पडला होता.
ट्रेलर चांगला वाटला.
छान दिसतोय...
छान दिसतोय.. याचा टीझर बहुधा पाहिला होता..
एप्रिल मे 99 सालच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे रिलेट होणारा काळ.. त्यात कोकण.. हा जाईन बघायला.. चांगला असेल अशी अपेक्षा. बरेच चांगले मराठी चित्रपट एकाच वेळी येत आहेत.. हे चांगले की वाईट समजत नाही.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=-UcXWWB4op0
जारण.. ट्रेलर भारी आहे. भयकथा लेखक ह्रिशिकेश गुप्ते च दिग्दर्शक आहीत बहुतेक.
ट्रेलर भारी आहे +786
ट्रेलर भारी आहे +786
त्या सैतान सारखा हास्यास्पद नसावा असे वाटते..
फक्त नॉट माय टाईप.. उगाच काहीतरी भरले जाते मनात आणि डोक्यात.. नकोसे वाटते ते
जारण.. ट्रेलर भारी आहे >>> +१
जारण.. ट्रेलर भारी आहे >>> +१
ट्रेलर फार इफेक्टिव्ह आहे
ट्रेलर फार इफेक्टिव्ह आहे
अनिता दाते आणि अम्रुता सुभाष दोघिही फारशा आवडत नाहीत पण यात जबरदस्त दिसतायत..अनिता दाते तर कमाल दिसतेय..
सर्वधर्मसहिष्णू भीक
हृषीकेश गुप्तेची कथा आहे त्यामुळे सिनेमा खरंच सुपरनॅचरल असायची शक्यता आहे. पण खात्री नाहीच. आयत्यावेळी सायको थ्रिलर निघाला नाही म्हणजे मिळवली.
ऋषिकेश गुप्ते म्हटले कि
ऋषिकेश गुप्ते म्हटले कि निव्वळ भयकथा नसणार ही अपेक्षा.
गहिरं, गूढ.. डोक्याला झिणझिण्या आणणारं काही तरी.
ज्याला आपण भय किंवा गूढ
ज्याला आपण भय किंवा गूढ म्हणतो त्या भयाला खूप पदर आहेत. आपल्या मनात निर्माण होणा-या संशय या भावनेमागची मूलधारणा ही भयाचीच आहे. या संशयाचे जे दीर्घरूप आहे, म्हणजे संदेह, हा संदेहही अंतिमत: भयाचीच वस्त्रे परिधान करून येतो. चिंतेचा कणा भयाचा आहे. एखाद्या गोष्टीच्या काळजीमागेही जे मनात धरलेले सावट असते ते भयाचेच असते. तर भय या भावनेला आपण एवढे दुय्यम मानायला नको. मुळात आदीमानवाला जेव्हा आपल्या अस्तित्वाचे सर्वप्रथम भान आले, तेव्हा प्रेम, क्रोध, हिंसा, द्वेष या सर्व भावनांआधी त्याच्या मनामेंदूला स्पर्श करणारी भावना ही भयाची होती. हे भय अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या जीवघेण्या स्पर्धेतून आले असणार; पण ती एक सर्वाधिक आदीम भावना आहे हे नाकारता येत नाही. स्वतःच्या दैनंदीन आयुष्याकडे नीट न्याहाळून पाहिलं तर भय नामक भावनेनं उभा समाज ग्रस्त झालेला दिसेल. हे भय आर्थिक संकटाचे असू शकेल वा कुटुंबात निर्माण झालेल्या ताणतणावांचेही असू शकेल. भयाला अनेक पदर आहेत. भयाची अनेक रुपं आहेत.
उभं जग जेव्हा सावज शिकारी-सावज अशा निसर्गचक्रात अडकलेलं होतं अगदी त्या काळापासून भय ही संवेदना सर्वच प्राणीमात्रांच्या मनामेंदूतून, जाणिवेनेणिवेतून जनुकीय मार्गांद्वारे संक्रमीत झालेली आहे. ही संवेदना मानवासह सर्वच प्राणिमात्रांत कमीअधिक प्रमाणात वसलेली आढळते. आनंद, दु:ख, कारुण्य या जाणिवांपेक्षाही भय ही अधिक अनादी अशी संवेदना आहे. पण मराठी साहित्यात या संवेदनेचा वापर भयरसाच्या ज्या अविष्कारात केला गेला तो प्रामुख्याने अतार्किकाचे (भूतखेतांचे) भय याभोवतीच केंद्रीत होता. या भीतीचे स्वरूप लहानपणापासून आजतागायत अशा काळाच्या पट्टीवर मापायचे झाल्यास त्यामागील धारणा आणि कारणे यांच्यातही प्रचंड वैविध्य असलेले जाणवते. बालपणातील अनाकलनीयाची बाळबोध भीती, पौगंडावस्थेतील जगाविषयीच्या कुतुहलातून निर्माण झालेली भीती आणि प्रौढावस्था गाठेपर्यंत मनात रुजलेली जीवनाच्या अनिश्चिततेची आणि जबाबदा-यांची भीती.
आनंद, दुःख व कारुण्य यांसह भय ही सुद्धा एक मानवी मनोवैज्ञानिक गरज आहे. भयकथा वाचताना वा भयचित्रपट पाहताना आपण सगळेच स्वत: एका सुरक्षित कोशात राहून भय नामक आपल्या या मनोवैज्ञानिक गरजेचा निचराच करत असतो.
- ऋषिकेश गुप्ते
जारण चा ट्रेलर छान वाटतोय.
जारण चा ट्रेलर छान वाटतोय. चित्रपट सुद्धा चांगला असेल अशी अपेक्षा. ह्रिषीकेश गुप्ते यांची २ पुस्तके वाचली आहेत. खूप आवडली होती. तो मुंज्या चित्रपट काही खास वाटलं नव्हता. तुंबाड आवडला होता.
राभु काय सुरेख लिहीलयस.
राभु काय सुरेख लिहीलयस. वेगळा धागा काढ. निदानपक्षी हा उतारा साजिरा यांच्या लेखात कमेन्ट म्हणुन टाक. त्यांचा भीती बद्दल एक मल्टायलेयर्ड लेख आहे. मला आता नाव आठवत नाही.
सामो, हे माझं लिखाण नाही.
सामो, हे माझं लिखाण नाही.
गुप्तेंनीच लिहीलेलं. त्या वेळी सेव्ह करून ठेवलं होतं. नाव दिलं आहे खाली.
साजिरा यांचा कोणता लेख?
ओह ओके. सॉरी गं.
ओह ओके. सॉरी गं.
साजिरा यांचा लेख सांगते - रामन राघव टू ट्रॅप्डः व्हाया फियर स्टेशन्स
लिंक बद्दल धन्यवाद सामो.
लिंक बद्दल धन्यवाद सामो.
काजोलच्या मां चित्रपटाचा
काजोलच्या मां चित्रपटाचा ट्रेलर.
सुपरनॅचरल वाटतोय. मुंजा, शैतान आणि तब्बूच्या एका मूवीचं मिश्रण वाटतोय. तब्बू हिमाचल प्रदेश मधे एका जुन्या बंगल्यात रहायला आलेली असते तो. नाव आठवत नाही.
दृश्यम 3 ट्रेलर बघितलेला,
दृश्यम 3 ट्रेलर बघितलेला, आधीचे दोन्ही आवडलेले, हा आवडेल असं वाटत नाही.
यावेळी तब्बूच्या नवऱ्याचा, मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्लॅन असावा काही असं वाटलं.
Pages