चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इठा आणि अल्फाचे टीझर - ट्रेलर्स पाहिले.
राझी चक्क थेटरात पाहिला होता. खूप आवडला होता. गंगूबाई नाही आवडला. सध्या येत असलेले आणि पाहण्यात आलेले बायोपिक बघताना जाणवतं कि ते अधांतरी आहेत. गंगूबाईची काय कथा सांगायची होती समजले नाही.

आलिया भटने रांझी मधे चांगला अभिनय केला. श्रद्धा कपूरचा हसिना पारकर पाहिला होता, अर्थात टिव्हीवर. काहीच आवडला नाही. श्रद्धा कपूरने पात्र चांगले केले आहे. पण अजून चांगले करता आले असते. हे बायोपिक पाहताना जाणवतं कि मंडळी लुक वर खूप मेहनत घेतात. कथा, पटकथा आणि शेवट यावर नाही. हसीना पारकरची कथा का बघायची हेच समजले नाही. बायोपिक म्हणजे एकतर प्रेरणादायी किंवा विलक्षण कहाणी हा समज आहे. यांनी सॅम मॅणेकशाची सुद्धा वाट लावली. लुक्स, मॅनरिजम्स सोडलं तर प्रेक्षकाला धरून ठेवणारं काहीही नाही.

अभिनयाने पात्र जिवंत करता येत नाही होय?
यामुळेच विठाचा ट्रेलर पाहून जायचे धाडस होणार नाही. पण ट्रेलर उत्तम आहे. सध्या कहीच्या काही पिक्चर बनत आहेत. ही कलाकृती असेल असे वाटते.

अल्फा बडा घर पोकळ वासा असावा असे वाटले.

विठा म्हणजे विठा भाऊ मांग नारायणगावकर ? त्यांच्यावर चित्रपट येतोय ?
प्रहार आणि इठा दोन्हीचा निर्माता दिनेश विजन आहे. त्याचे काही चित्रपट चांगले होते.

पठानों से कह दे चौहान आ रहा हैं - ट्रेलरचं हसू आलं पण वापरलेलं गाणं आवडलं. निर्माते धुरंधरच्या ज्योती देशपांडे आणि आनंद एल राय आहेत. बघूया कसा निघतो पिक्चर....

ईठा चा ट्रेलर प्रॉमिसिंग वाटला.
विठा म्हणजे विठा भाऊ मांग नारायणगावकर ? >>> होय! छावा फेम लक्ष्मण उत्तेकर करताहेत सिनेमा. आणि अजय अतुल चे संगीत.
अल्फा भरपूर ट्रोल होतो आहे. फार फनी मीम्स येत आहेत.
प्रहार - उज्ज्वल निकम च्या भूमिकेत राजकुमार राव ओळखता आला नाही अजिबात! कसाब ललित प्रभाकर हेही एकदमच सरप्राइज .

सध्याचा ललित प्रभाकर कसाब वाटू शकतो, चेहेऱ्याचं काहीतरी केलंय, मागे प्रेमाची गोष्ट 2 च्या वेळी बाईट्स वगैरे बघितले, अजिबात आवडला नव्हता. आधी आवडायचा.

व्हिलन करेल चांगला, सुरुवात ई tv वर एका सिरीयलमध्ये व्हिलन रोलने झालीय, तेव्हा वाटायचं हा गुड लुकिंग व्हिलन का बरं आहे. लगेच त्यावेळी त्याला झी मराठी वर हिरोचा चान्स मिळाला. अर्थात काम कुठलंही चांगलं करेल तो.

रा अ, हो मलाही अतिच वाटले. चालता सुद्धा येत नाही चकरा येतात, ब्लिडिंग होत असते. मनाने सुद्धा कड्यावरून ढकलून दिल्यासारखे होत असते पोस्टपार्टम हार्मोन्स मुळे. हे शौर्य म्हणून दाखवणं अस्वस्थ करणारे आहे. ते वाढलेले पोट पूर्ववत होण्यास किमान सहा महिने लागतात, इथे एकदम गायब झाले आहे.

https://www.youtube.com/watch?v=q6uHkXJR9qU
खाशाबाचा टिझर चान्गला वाटला, दन्गलची आठवण झाली..सगळे नागराज कॅम्पमधले ओळखिचेच चेहरे आहेत..मुख्य कलाकार कोण हे मात्र अजिबात कळु दिलेल नाही.
होपफुली अजय-अतुलला यात तरी सुर सापडला असेल.

ट्रेलर मधला तो भाग क्रूर वाटला. बघवत नाही.
नाट्यमय म्हणून काहीही दाखवायला लागलेत. पण नंतर दिग्दर्शक म्हणून लक्ष्मण उत्तेकर नाव पाहिलं.

एखादी बाई बाळंत झाल्याबरोबर नाचू शकेल का?
शरीर इतक्या लवकर नॉर्मलला येते का?
मला अकबर बिरबल ह्यांची एक गोष्ट आहे. ती आठवली.
कुणाला आठवते आहे का?

हो, राअ यांचा प्रश्न पाहिल्यावर तीच कथा आठवली.

"आमच्या काळी तर आम्ही असं केलं की, या आजकालच्या पिढ्यांना काय धाड भरते!" असं कुठे ऐकलं तरीही ती कथा आठवते. हल्ली काकाफॉ असतात यावर, पूर्वी अशा काकाक असायच्या.

फ्रेम नावाचा ट्रेलर आहे. नागराज मंजुळे आणि फाफे फेम अ‍ॅक्टर ( दिल दोस्ती दुनियादारी मधला) आहे. मंजुळे फक्त अ‍ॅक्टर म्हणून आहे. लेखक, दिग्दर्शक नाही. प्रेझेंटेशन हिंदी चित्रपटासारखं आहे. पण विषय प्रेस फोटोग्राफरचा.

संवेदनशील फोटोच्या वेळी एक चांगला फोटोग्राफर किंवा संवेदनशील व्यक्ती हे दोन्ही होता येत नाही. हा एक संवाद आहे. बर्‍याचदा फोटोग्राफरने क्लिक करायच्या ऐवजी जीव का वाचवला नाही असे प्रश्न विचारले जातात. हा विषय बांधून ठेवेल का? झी५ वर येणार आहे.

विषय चांगला वाटतो, केव्हीन कार्टर आठवला पटकन.
फार खोल विचार न करता क्लिकच्या वेळी नक्की प्रसंग, परिस्थिती, स्कोप काय आहे यावर अवलंबून असेल असे वरकरणी वाटते, हा विषय त्यात नीट हाताळला असेल तर बघायला आवडेल.

विषय त्यात नीट हाताळला असेल तर बघायला आवडेलविषय त्यात नीट हाताळला असेल तर बघायला आवडेल >> +१

क्राईम फोटोग्राफर + पर्सनल लाईफ असा असेल विषय.

केव्हीन कार्टर आठवला पटकन >> +७८६ मला तर त्याचे नावही लक्षात नव्हते. पण तुम्ही त्याबद्दलच बोलत असणार हे समजले.

अरे! विठाबाईच्या बाबतीत ती गोष्ट प्रत्यक्ष घडली होती ना? त्यांच्यावरच्या अनेक लेखांमध्ये वाचलंय.

ट्रेलर आवडला नाही.

अंजलीने दिलेला ट्रेलर टिपिकल मसाला आहे एकदम Happy
प्रीती झिन्टाला आवाज कोणी दुसर्‍या व्यक्तीचा दिसतोय !
बाकी सन्नी पाजी पाकि मुस्लिम, शबाना आझमी धार्मिक हिन्दु कास्टिंग ज्याला सुचले त्याची गंमत वाटते .. अर्थात सनी कोणी असो, भारता साठी हेडपपंप उखाडण्याचा आवेश काही कुठे जात नाही !
तो दगडोबा कोण आहे सनीचा मुलगा झालेला ? नेपोकिड दिसतोय !

बहुचर्चित रामायणचे ट्रेलर आलय !
https://youtube.com/watch?v=lNaSdnz2I8g&si=GsZNWL072fiYGESQ
रावण आवडला , अगदी अरविन्द त्रिवेदीचे फिट धिप्पाड व्हर्जन आहे Happy
आणि प्लेझन्टली सरप्राइझ्ड बाय रणबीर, चक्क चांगला वाटतोय राम म्हणून !
पण….;; बेस्ट कास्टिंग दशरथाचे आहे, साक्षात प्रभु अरुण गोविल Happy
सीता मात्रं, अशक्यं मिसफिट दिसतेय.. साई पल्लवी? का ? का ?? आत्ता पर्यन्त सीतेचं इतकं वाईट कास्टिंग कधीच बघितले नव्हते Uhoh असेल साउथ मधे फेमस पण म्हणून आम्ही का आवडून घ्यावी ?
असो, बाकी युद्ध, व्ही एफ एक्स हे टिप्पिकल बाहुबली स्टाइल साउथचे असल्यामुळे मुळीच नाही आवडले !

सीता मात्रं, अशक्यं मिसफिट दिसतेय.. साई पल्लवी? का ? का ??>> अगदी असेच वाटले

मला तर रणबीर पण फार खोटा वाटला. अरुण गोविल राम म्हणून चांगला होता.

मारामारी थोडी फार व्हिडिओ गेम मधून उचलल्यासारखी वाटते.

आताच ओडिसी पाहिल्यामुळे खरे खरे शूटिंग किती चांगले दिसू शकते हे पाहिले आहे त्यामुळे हे सगळेच खूप बेगडी आणि खोटे वाटले. उगीच चांगले नसलेले vfx वापरून काय फायदा. त्यापेक्षा मग आदिपुरुष बरा Lol

अजून एक नकली VFX पिक्चर आला की काय असे प्रथमदर्शनी वाटत आहे.
रिअल इमोशन नाही तर पिक्चर नाही.

साई पल्लवीचा अभिनय मला आवडतो. नैसर्गिक असतो. यात किती वाव असेल कल्पना नाही. पण बॉलीवूड पब्लिकला सीता सुंदर हवी असते आणि तिचे सौंदर्य इथल्या निकषात तरी फिट बसत नाही.

राम ब्रह्मास्त्र मधून उचलला आहे. दशरथ रामायणातून घेतला आहे. बाकीचे कोणी पटकन ओळखता आले नाहीत.

अरे हो,
हनुमान गदर मधून घेतला असे ऐकून होतो.. तो ट्रेलरमध्ये दिसला नाही कुठे?

Pages