चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 March, 2024 - 01:57

आधीचा धागा भरला म्हणून हा नवीन धागा.

नवीन प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांच्या ट्रेलरवर चर्चा करायला हा धागा.
मराठी, हिंदी, ईंग्लिश तिन्ही भाषेतील चित्रपट याच धाग्यात चालतील.
चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आणि बघितल्यावर मात्र चित्रपट कसा वाटला हा धागा वापरा Happy

जुना धागा ईथे - https://www.maayboli.com/node/61689

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धुरंधर'चा ट्रेलर बघितला. व्हायलन्स पचवायची तयारी नसेल तर चुकूनही बघू नका. मूव्ही कधी रिलीज होणार माहीत नाही पण मेजर मोहित शर्मासाठी कदाचित बघेनही.>>> +१ खुप व्हॉयलोन्स आहे पण एडिटिन्ग जबरदस्त आहे..अक्षय, माधवन आणी अर्जुन रामपाल याचे लुक्स आवडले...रणविर परत पद्मावतचीच आठवण करुन देतो..सन्जु बाबाने हा लुक १० मुव्हित केला असेल.

वाराणसीचा ट्रेलर बघून मला फार काही समजलं नाही. नंदीवर बसून शंकर येतो का. ते अंटार्टीका वगैरे का दाखवलं. कैलास पर्वतावरुन शिव यायला हवा ना. त्या अक्राळ विक्राळ प्राण्याच्या तोंडातून आत जाऊन वगैरे, ते देवी वगैरे काही समजलं नाही. स्पेशल इफेक्टस भन्नाट. महेशबाबुचं वय काही वाढत नाही. चॉकलेट बॉय आहे एरवी, इथे डॅशिंग वाटला, छान दिसतोय. मी त्याला खरं तर नम्रता शिरोडकरचा नवरा म्हणून ओळखते (मला हाणू नका) , ती मला आवडते.

साऊथचे हल्ली बघितलेले काही पिक्चर्स वेद काळ, देव, एखादा राजा व त्यांचा सध्याच्या काळातील अवतार म्हणजे हिरो ह्या type असतात, अर्थात गुंफण इंटरेस्टिंग असते. आधी सुरुवात बोअर पण नंतर पकड. वाराणसी त्या type वाटला मला.

जसा मिराईचा हिरो रामअवतार, त्याची आई बगलामुखी देवीशी संबंधित तसा ह्यात हा महेशबाबू शिव अवतार.

आस्था किंवा श्रद्धेपेक्षा राजामौलीचा सिनेमा पडद्यावर जो अनुभव देतो तो त्याचा युएसपी आहे.
चमत्कारी दृश्यं दाखवायला पौराणिक / कल्पनिक कथेतच जास्त स्कोप असतो. म्हणून ट्रिपल आर एव्हढा नव्हता आवडला.

बाहुबली १ पेक्षा बाहुबली २ कमी आवडला. बाहुबली २ पेक्षा ट्रिपल आर थोडा कमी. पण या लेव्हलची भव्यता साऊथ आणि मुंबई दोन्हीकडचे सिनेमे दाखवू शकत नाहीत.

अंदाज बांधायचाच तर
अंटार्क्टिका खंडावर एक अशनी पडते. बहुतेक त्या अशनीमधे काही तरी दिव्यशक्ती असावी. यातला खलनायक हा व्हीलचेअर वर आहे. त्याला ती दिव्यशक्ती हवी असेल. ही शक्ती त्याला मिळाली असेल आणि त्यामुळे संपूर्ण जगाला धोका निर्माण झाला असेल. ७२०० वर्षांपूर्वी रामायण काळात ( खरा खोटा भाग बाजूला ठेवून) झालेलं युद्धातली काही तत्त्वे खलनायकाच्या हाती लागलेल्या शक्तीला न्युट्रल करत असावीत. किंवा आफ्रिका खंड , भारतीय महाद्वीप आणि अन्य ठिकाणांहून त्याचे अंश गोळा केले तर खलनायकाला थांबवता येत असावे.

काही पौराणिक कथात वाराणसी हे ब्रह्मांडाचे केंद्र आहे. त्यामुळे वाराणसीतूनच हे युद्ध सुरू होत असेल. असा प्लॉट असावा. ग्लोबट्रॉटर नावावरून तरी असंच वाटतं. फक्त एकच कन्युजन आहे , ग्लोबट्रॉटर हे इव्हेंटचं नाव आहे कि वाराणसीच्या पुढे ती टॅगलाईन आहे कि नावाचा हिस्सा आहे हे समजलं नाही.

रणविर परत पद्मावतचीच आठवण करुन देतो
>>>>>
रणवीरचा लुकही मोहित शर्माच्या कव्हर्ट ऑप लूक्ससारखाच आहे पण मेजर जास्त बॉईश होता. अर्थात तो फार तरुण होता.

या पिक्चरच्या कास्टिंग डिरेक्टरने आधीच अवॉर्ड घेऊन टाकावे. ऑलमोस्ट सगळी कास्ट खऱ्या लोकांच्या जवळपास जाते.
अगदी संजूबाबा पण. मला अक्षयसाठी फार बरं वाटतं. आजकाल त्याचे टॅलेंट दाखवणारे पिक्चर्स मिळताहेत.

रणवीस सिंगचा पिक्चर थेटरात जाऊन पहावा असं वाटत नाही. त्यातून एव्हढा व्हायोलन्स.
अ‍ॅनिमलची आठवण करून देतो हा ट्रेलर.

धुरंदर ट्रेलर कमाल धमाल आहे
असा चित्रपट थिएटर मध्ये बघायला जाईल का याची शंका आहे.. पण काही पडदाफाडू परफॉर्मन्स असणार त्यात हे नक्की.. बॅकग्राऊंड स्कोअर सुद्धा रापचिक दिसत आहे

मराठी चित्रपट -मॅजिक
https://youtu.be/wL9x7yuYAcc?si=Lf9ftZN_xDpA4hh4

क्रांतीज्योती विद्यालय,
https://youtu.be/bPvWVuqfz1Y?si=6OIVDsTX6MiqCuPL
हा हेमंत ढोमेचा चित्रपट आहे म्हणजे चांगल्या अपेक्षा ठेवायला हरकत नाही. चित्रपट उद्या 1 जानेवारी ला रिलीज होतोय.

हॅपी पटेल च्या ट्रेलर ऐवजी आमीर खान ने सुनील ग्रोवरला त्याच्या गेट अप मधे पेश केले आहे.
आमीर खान टॉकीज या त्याच्या युट्यूब चॅनेलवरून हा व्हिडीओ आला आहे.
https://www.youtube.com/watch?v=bpUMOVDmh1s

हॅप्पी पटेल खतरनाक जासूस
दिग्दर्शक - अभिनेता वीर दास, निर्माता आमीर खान

ट्रेलर सिरीज
१. https://www.youtube.com/watch?v=BK3nIvL3hAA
२. https://www.youtube.com/watch?v=znMM2TuyLrc
३. https://www.youtube.com/watch?v=H0zOZWL0kC4

"गांधी टॉक्स" पुष्पक नंतर आलेला दुसरा सायलेंट चित्रपट .
टिजर -https://youtu.be/Dv3qq4-TSv8?si=BkxWbPDaBb-bVVag

ट्रेलर- https://youtu.be/rph2F0uX-A0?si=MNIyyA1FYytsN_Cs
कास्ट- विजय सेतुपती, अरविंद स्वामी ,आदिती राव हैदरी ,सिद्धार्थ जाधव,
लेखक दिग्दर्शक -किशोर पांडुरंग 'बेळेकर'

फेक ट्रैलर
मंजुळे मागेच फेटाळून लावली होती शक्यता.
निर्माता बनवू शकतो. तुंबाड २ प्रमाणे.

एक दिन
जुनेद खान आणि साई पल्लवी.. दोघेही आवडतात .
https://www.youtube.com/watch?v=RCmyr_d3Hi0&pp=ygUOZWsgZGluIHRyYWlsZXI%3D

खूप दिवसांनी मारधाड ऍक्शन देशप्रेमाचा डोस नसणारा रोमँटिक मूवी... नक्की पाहणार.

एक दिन - कास्टिंग गंडलेलं वाटतंय...

जुनेद खान फार थोराड चेहऱ्याचा वाटतो
>>>
हो! त्याच्या वयापेक्षा मोठं वय वाटतं.
चाळीशी-पन्नाशीतल्या हिरोंना कॉलेजकुमार दाखवण्यासाठी मेक-अप करतात तसा यालाही गरजेचा आहे.

रितेशचा राजा शिवाजी !
अगदीच छावाचीच आठवण आली.. बॉलीवुड किवा साउथे मुव्हिसारखेच रक्तरन्जित फाइट सिन आहेत.
रितेश अजिबात म्हणजे अजिबातच सुट होत नाही बाकी ठिक आहेत पण तेच तेच कलाकार बघुनही कन्टाळा आला आता.
https://www.youtube.com/watch?v=FkxNoRIXDPY

शाळेच्या गॅदरिंग मधे नाटक बसवलं की सगळ्यांनाच शिवाजी महाराज व्हायचं म्हणून बाईंकडे जाऊन वॅ वॅ करतात तसं झालं आहे. कुणालाही मावळा व्हायचं नसतं. Lol

रितेश, अभिषेक, फर्दीन खान , संजय दत्त सगळी क्रिन्ज बी ग्रेड गँग. टपोरी बोलणारा अफजल खान Lol
सईबाई म्हणून जिनेलियाला घ्यायचा मोह आवरला नाही! काय तिचे अ‍ॅक्सेन्ट्स !! यापेक्षा रश्मिका चे मराठी बरे होते छावा मधे. Uhoh

आताचे शिवाजी महाराजांवरील चित्रपट बघून हे नक्की आहे की एकालाही जुन्या चित्रपटाची सर नाही.
निदान डब करायचे होते.. यांचे डायलॉग्ज ऐकणं म्हणजे जेवताना खडे लागल्यासारखं वाटतं...

हे तलवार खुपसून तोंडातून वगैरे रक्त आलेले दाखवणे आता कंटाळवणे झाले आहे.
शिवाय अचाट उड्या, टपोरी संवाद वगैरेही. आता फक्त मिर्झा राजे शिवाजी महाराजांना 'आग्रा चलकर आलमगीर से मांडवली करते है!' असे म्हणू नये म्हणजे मिळवली.

Pages