चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Miss Shetty Mr Polishetty
Netflix
वेळ घालवायला म्हणून काल बघायला घेतला. टाईमपास वाटला. शेवट इमोशनल वगैरे फार छान वाटला. शाहरूखचा चाहता आहे. हलक्या फुलक्या पण डोळ्यात पाणी आणणाऱ्या प्रेमकथा मला नेहमीच आवडतात Happy

दरवेळी मख्खपणा परफेक्ट जमेलच असं नाही >>>> Biggrin Biggrin

हलक्या फुलक्या पण डोळ्यात पाणी आणणाऱ्या प्रेमकथा मला नेहमीच आवडतात >>> मग ९६ बघितला नसेल तर बघाच.

Once upon a time in mumbai.- अंदाजे 13 वर्षापूर्वी तुषार कपूर आणि हा मूवी आवडलेला. सिरियस आहे. चांगला केलाय असे वाटले ले तेव्हा तरी

आता आवडेल का माहीत नाही.

मग ९६ बघितला नसेल तर बघाच.>>>> हो बघितला आहे.. आयुष्यात इतके एकतर्फी दुतर्फा प्रेम करून ठेवले आहे की प्रत्येक लव्हस्टोरी मध्ये मला रीलेट्ट होणारे काहीतरी सापडतेच.. 96 मध्ये बरेच काही सापडले Happy

तुषार कपूर फारच बंडल आहे, तो आणि बहिणाबाई म्हणजे टिव्हीयुगातले शूर्पणखा आणि रावण वाटतात. एकता रावण आणि हा शूर्पणखा..! त्यांची ती 'क्या कूल है हम' फ्रॅन्चाईज पाच मिनिटे सुद्धा असह्य होते. बालाजी टेलिफिल्म्सचं 'टुडू टुडू टुडू टुडू ' आलं की बालाजीला नमस्कार करून टिव्ही बंद करतो. तिनं हात लावलं की सगळं उथळ होऊन जातं, 'मिडास टच' आहे तिचा.

96 बघणार आहे. रेकोबद्द्ल धन्यवाद. Happy

'हाय पापा' नेटफ्लिक्सवर बघितला. मृणाल ठाकूर आणि जो कोणी हिरो आहे. अतिशय गोड - रोमॅन्टिक प्रेमकथा. निसर्गरम्य कुन्नुर आणि सुंदर गाणी. पूर्ण सिनेमा पर्फेक्ट आहे असं नाही. पण एकुणात फारच तरल प्रेमकथा आहे, खूप दिवसांनी इतकं गोड प्रेम बघितलं. मृणाल फारच गोड दिसते आणि फारच गोड हसते.

ओके मृ , छान काम केलं आहे. साऊथचा असूनही ओव्हर ॲक्टिंग नाही. आत्मा थंड झाला. Lol

दरवेळी मख्खपणा परफेक्ट जमेलच असं नाही >>>> Lol
अंधारात कधीकधी गोळी लागतेही, आपण त्यालाच टॅलेन्ट समजू.

लोकहो शंभर वेळा घोकून पाठ करा. कुणी चुकलाच तर साऊथ च्या कोणत्याही किरकोळ स्टारच्या तोंडी (अक्षर शहा) देण्यात येईल.

१. सुपरस्टार - रजनीकांत
२. थलपती - विजय
३. पॉवर स्टार - पवन कल्याण
४. मेगा स्टार - चिरंजीवी
५. प्रिन्स स्टार - महेश बाबू
६. मेगा पावर स्टार - राम चरण तेजा पुत्र ऑफ मेगास्टार चिरंजीवी पुतण्या ऑफ पावर स्टार पवन कल्याण
७. स्टायलिश स्टार - अल्लू अर्जुन
८. डार्लिंग स्टार - प्रभास
९. रॉकिंग स्टार - यश
१०. रिअल स्टार - ****
११. नॅचरल स्टार - ****
१२. गोल्डन स्टार - ****
१३ क्रेझी स्टार - ******
१४. सुप्रीम स्टार - *****
१५. ***** स्टार - प्रशांत

गाळलेल्या जागा भरा. होमवर्क पूर्ण करून उद्या दाखवा.

जोड्या लावा

उलगा नयनन X मोहनलाल
लल्लेटन X कमल हसन

प्रश्नाचे उत्तर दोन शब्दात द्या.
दक्षिणेच्या रूपेरी केसांच्या हिरोचे नाव आणि त्याचे टायटल काय आहे ?

Lol
खरंच, 'श्री श्री श्री' शिवाय बातच नाही. बाकी सगळे 'धुमधडाका' मधल्या शरद तळवलकरसारखे 'अतिसामान्य' आणि हे 'व्याख्या विख्खी वुख्खु'. Wink

मराठीत पण लाट आली होती.
विनोदाचा बादशहा, विनोद सम्राट, विनोदाचा हुकमी एक्का, विनोदाचा राजा (राजा गोसावी)
सात मजली हशाचा शहेनशहा इ.

दक्षिणेच्या रूपेरी केसांच्या हिरोचे नाव आणि त्याचे टायटल काय आहे ?>>>>> अजिथकुमार..थाला
रिअल स्टार- होता श्रीहरी.. (हयात नाही आता)

काल "पार्किंग" बघितला, अप्रतिम चित्रपट
दोन मध्यमवर्गीय कुटुंब, प्रेमळ आणि सभ्य, दोंघांच्या एका कॉमन पार्किंग साठी काय करतात हे बघण्यासारखे आहे

मृणाली ताई रेकॉमेंडेशनसाठी धन्यवाद

Submitted by फिल्मसुख बांगडू on 17 January, 2024 - 21:29 >> मस्त माहिती Happy एवढ्या सगळ्या उपाध्या माहिती नव्हत्या

अरे पुन्हा तुषार कपूर ला आणतो पण त्याचे क्या कुल है हम आणि क्या सुपर कुल है हम मधले काम पण भारी आहे. कॉमेडी चे टायमिंग चांगले आहे त्याचे. सुपर कुल मध्ये तर त्याने आपल्याच गोलामालच्या रोल चा स्पूफ केला आहे

क्या कुल है हम मध्ये भारी आहे.एकंदरीत तुषार कपूर ला साईड रोल मध्ये ठेवून चांगले कॉमेडी रोल दिले तर हिट होतो(रितेश चं पण असंच.)

कुणीतरी ह्या सगळ्याचा कौतुकाचा स्क्रिनशॉट घेवुन पाठवा त्या जितेन्द्र पुत्राला..भरुन येइल बिचार्‍याला... आपल्यात नसलेले अभिनय गुण पब्लिकला कुठुन सापडले बघुन

अरे तुषार कपूर मला बोर वाटायचा. उदय चोप्रा पण.
इथलं वाचुन आता तुषार कपुरचा फोमो येणारे असं वाटू लागलंय. Lol

मला चालतो.मला त्या मानाने ते दिनो मोरिया,हेट स्टोरी 2(सुरवंट चावला आहे त्यात, तिला जिवंत गाडलेलं असतं) मध्ये जो हिरो आहे तो हे सर्व ठोकळे वाटतात. त्यापुढे तुषार कपूर एनी टाईम ओके.

हेट स्टोरी 2(सुरवंट चावला आहे त्यात, तिला जिवंत गाडलेलं असतं>>> लोल अनु!! मी लिटरली "सुरवन्ट चावलेला कुठला मुव्हि "आठवायचा प्रयत्न करत होते...

Let me rephrase:
Once upon a time in mumbai.- अंदाजे 13 वर्षापूर्वी हा मूवी आणि केवळ ह्या एकमेव मूवी मध्ये तुषार कपूर आवडलेला. सिरियस आहे. चांगला केलाय असे वाटलेले तेव्हा तरी

आता आवडेल का माहीत नाही.

सुरवंट चावला Lol

सुरविन चावला असेल, ह्या नावाची आहे ना actress.

ये जवानी है दिवानी फायनली पूर्ण पाहिला. आजवर मधूनच तुकड्यात एखादा दुसरा सीन बघणे होत होते. मला वाटायचे अशीच टाईमपास उथळ लव्हस्टोरी असेल पण आज पूर्ण पाहिला आणि अगदीच पोहोचला. खूप आवडला. या दोघांच्याच तमाशा पिक्चरची आठवण झाली. तो एक फारच उच्च दर्जाचा चित्रपट होता. आणि या दोन्हीत एक समान धागा आहे. दोन्ही चित्रपटांनी प्रेम आणि स्वत:च्या आवडीचे आयुष्य जगणे याबद्दलचे माझे विचार अजून समृद्ध केले Happy

बाकी ती कल्की कोचलीन दिसायला वेगळीच आहे. माझ्या तरी बाह्य सौंदर्याच्या निकषात बिलकुल बसत नाही. तरीही तिच्या ॲक्टिंगमुळे म्हणा, किंवा जसे तिचे चित्रपटात नेहमी कॅरेक्टर असते त्यामुळे म्हणा, का माहीत नाही, मला आवडते Happy

तुषार कपूर चे सर्वात चांगले काम खाकी चित्रपटात होते>>> आय अ‍ॅग्री. गोलमाल मधे ही शर्मन त्याचे हावभाव शब्दातित करतो तेंव्हा लय हसू येतं कॉन्सेप्ट पण नवी, वेगळी वाटलेली तेंव्हा Happy
धमाल मी १ च पाहिलाय बहुधा, आदी मानव, जावेद जाफ्री, अर्शद वार्सी तिसर्‍या मित्राच्या बापाची गाडी चोरून नेतात, ती गाडी स्फोटात जळते, संजय दत्त खजिना वगैरे..मजा होती. त्यात च ते जावेद जाफ्री आणि साउथ माणसा चे भले मोठ्ठे नाव सांगणे प्रकार होता Lol

दरवेळी मख्खपणा परफेक्ट जमेलच असं नाही >>> परफेक्ट अनू कॉमेंट Happy

अर्जुन कपूर बाबत हेच टू स्टेटस चित्रपटाबाबत झालेले. त्याचा ठोंब्या सारखा वावर मला त्याची कूल स्टाईल वाटलेली>>> मला ही आवडला, त्यात त्याला आलिया ने कमालीची साथ दिलिये.. रोहित रॉय नेहमी प्रमाणे छाप सोडून जातो, रेवती, अमृता सिंग वगैरे वाह Happy

सुरवंट चावला>> लोल! दिनो मोरिया म्हटल्यावर सुरवंट चावू शकतो, अशी समजूत करून घेतली आणि असा सिनेमा बघणाऱ्यांना मनोमन दंडवत सुद्धा घातला.

Pages