चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'अ फेस दॅट लॉन्चड थावझन्ड शिप्स' >> टोटली. मला कोणत्याच पिक्चर मधे वाटलेली नाही.

ऐश्वर्या शाहरुख चे मरणोत्तर >>> फक्त ऐश्वर्या ना? शाखा कोठे मरतो? अनलेस तेरे बिना जिंदगी भी लेकिन जिंदगी तो नही म्हणून किंवा ये जीना भी कोई जीना है लल्लू म्हणत स्वतःला मेलेला समजतो?

बाय द वे, शाखाही भूतच असतो ही एक थिअरी माबोवर नंदिनीने काढली होती. मोहब्बतें च्या धाग्यावर आहे. मोहब्बतें मधे मंगळसूत्र वाले भूत आहे तसेच देवाला नमस्कार करणारेही आहे.

मेहरुन्निसाऐवजी मलिक काफूर पद्मावतीच्या स्वागताला आला असता तर काही plan B तयार होता का त्याचा काहीच संदर्भ लागत नाही. >>> हे परफेक्ट निरीक्षण आहे Happy

Lol अरे सगळं सोडून गाणं बघायला लावलंत ना!
हे गाणं बोर वाटतंय. याच्या पेक्षा 'बेशरम रंग' जास्त ग्लॅमरस आणि हॉट होतं. नुसतं ऐकायला ही!

Lol
नुसतं ऐकायला ही!>>> हे लिहिणं फार महत्त्वाचं आहे. Wink

असामी Lol ही मला गोल्ड झुमके घातलेल्या सी- लायन सारखी वाटत होती. पण एलियनही जुळतंय.

अंजली, अगदी. Happy

Lol

गोल्ड झुमके घातलेल्या सी- लायन सारखी वाटत होती >>> "चिटियाँ कलाइयाँ वे" गाण्याची सी-लायन व्हर्जन बनवायला हवी. तू ला दे मुझे गोल्डन झुमके ई. चिटियाँ म्हणजे गोरे(*). तर कलाईयां च्या ऐवजी सी-लायन चे "फोअरफ्लिपर्स" असतात (*) त्यावर पंजाबीत काहीतरी लिहायला हवे या अ‍ॅडॅप्टेशन मधे

(*) सर्व माहिती विकीवरून. No one is supposed to just know this.

इथे वाचून 'इश्क जैसा कुछ' पाहिलं.

दिपिकाच्या सिनेमातील नृत्य आणि किंगफिशर कॅलेंडर यांच्यातील सीमारेषा धूसर होत चालली आहे.

चिटियाँ कलाइयाँ वे" गाण्याची सी-लायन व्हर्जन बनवायला हवी. तू ला दे मुझे गोल्डन झुमके ई. चिटियाँ म्हणजे गोरे(*)

>>> तिथं काळा बेदिंग सूट घालून वाळूत लोळणं होतं. इथं पांढरं टॉप घालून 'मी किती गोरी' म्हटलं आहे म्हणून
ते 'पोलरबेअर' व्हर्जन होईल नं Proud
पंजाबीसाठी+१ पण प्राणी मात्र आम्ही सुचवू तोच वापरावा लागेल.‌

बंडलबोअरला हसायचं राहिलं होतं. Lol

प्राजक्ता Happy

अंजूताई+१

मला वाटायचं चिटियाँ म्हणजे छोटी (पक्षी: नाजूक) मनगटे >>> मी अर्थासकट लिरीक्स शोधले त्यात गोरा असा अर्थ दिसला. स्वातीने लिहील्याप्रमाणे गोराचिट्टा सारखेच असेल. (नाहीतर आधी मला मुंगीसारखे मनगट वगैरे शंका आल्या होत्या)

प्राणी मात्र आम्ही सुचवू तोच वापरावा लागेल.‌ >> Lol पंजाबीत एक व मराठीत भलताच अर्थ होतो (उदा: पाजी) अशा एखाद्या प्राण्याचे नाव आठवायचा प्रयत्न करत होतो.

दीपिकाने वेगळेपणा म्हणून अंगभर कपडे लपेटून एखादे गाणे करावे.

ती प्रकाश पदुकोणची मुलगी आहे. प्रकाश पदुकोणला एके काळी क्रिकेटस्टार पेक्षाही जास्त रिस्पेक्ट मिळत होता. दीपिकेला खेळ किंवा अशा विषयावरचे चित्रपट का मिळत नसतील ? तशा भूमिका प्रियंका चोप्राने केल्या. सध्या दीपिका, कॅटरीना आणि फुल्लस्टॉप असं नायिकेंच्या बाबतीत झालंय. पठाण मधे दीपिका, टायगर मधे कॅटरिना.

मजा चालुय इथे :
मामी किंगफिशर कॅलेंडर बद्दल सहमत.
फारएन्ड, मी 'दोघं मेल्यावर मरणोत्तर आयुष्य' म्हटलं नाहीये.एक मेला तरी दोघांचं आयुष्य ( तिच्या) मरणोत्तरच असेल Happy तिथे 'मरणोत्तर संसाराचे प्रमेय'मध्ये 'बोथ ऑफ देम मस्ट बी डेड इन लास्ट 5 इयर्स ऑर लेस' अशी अट नाहीये.

चिटियाँ म्हणजे गोरे >>> बरोबर, "उडता पंजाब" मध्ये "चिट्टा वे" हे गाणे आहे. ड्रग्स/कोकेन इत्यादीला पांढरी पावडर म्हणून "चिट्टा"

मला ते चिटिया म्हणजे चोरुन (चिट करुन) कलाइया वाटल पण अर्थ काहि लागेना पण पन्जाबी गाण्यात काय अर्थ शोधणार ! चिटिया म्हणजे गोरे हे मात्र लक्षात नाही आल.
दिपु कडे अ‍ॅक्तिन्ग स्किल आहेत (पिकु) तिने असली गानी नोरा फतेह वैगरे साठी ठेवावी ...ही अस्ले रोल करते मग आलिया रन्ग-रुप-आकार-उकार कशातच काही नसताना बरी बरी काम करुन नॅशनलच्या खिरापती घेवुन जाते.

चिटिया म्हणजे चोरुन >> +१
पंजाबी गाण्यातले शब्द म्हणजे तांब्यात खडे टाकून तांब्या जोरजोरात हलवल्यावर येणार्‍या आवाजासारखे वाटतात.

पंजाबी पॉप गाण्यात विच विच हा शब्द सारखा येतो. त्यावरून पंजाबात चेटकिणींचे प्रमाण खूप असावं असा समज होतो.

****आलिया फॅन अलर्ट ***

आलियाचे फीचर्स शार्प नसतील पण तिच्या चेहऱ्यात एक सॉफ्टनेस आहे. आणि तिची चित्रपटांची निवड नक्कीच चांगली आहे. नाहीतर तिने हायवे, गली बॉय, डार्लिंग्ज, उडता पंजाब वगैरे चित्रपट केले नसते. महेश भट्ट/सोनी राझदानची मुलगी असल्याने एकतर जिन्स किंवा घरातील वातावरण याचा फायदा मिळत असेल कदाचित. अभिनय करता येतो ही जमेची बाजू आहेच.

खरं तर हृतिक गाण्यात असेल तर आजूबाजूला लक्षच जात नाही, बघणाऱ्याचा फोकस फक्त हृतिकवरच असतो. त्यातून दोन्ही गाण्यात नाच आहे. मग काय बोलायलाच नको! मात्र दिपिकाची जोडी शाहरुख पेक्षा हृतिक बरोबर चांगली दिसते.

इथे वाचून mute करून गाणं बघतेय. दिपीका पेक्षा ह्रितिक कडेच लक्ष जातंय माझं Lol
वळवळत पडलेली Lol

यावर्षी शाहरूखने जे बॉक्स ऑफिसवर केले आहे ते पाहता त्याची स्टार पॉवर त्याची हिरो म्हणून करीअर खूप खेचणार हे नक्की.
जसे रजनीकांत म्हातारा झाला तरी तरुण भुमिका करायचा तसेच शाहरूख बाबत होणार. तो कधी अमिताभसारखी सेकंड इनिंग सुरु नाही करणार. शेवटपर्यंत हिरो म्हणूनच राहणार. अफाट एनर्जी आहे त्या माणसात Happy

अफाट एनर्जी आहे त्या माणसात >> हाउ साठ साल का बुढा या साठ सालका जवान!! च्यवन प्राश खाता होगा जरुर Wink करु दे करु दे काम.
लेकीला काय येत नाय तिला उजवायचे आहे. पोरगा हाताशी नाही. बारका फारच बारका आहे. उसको मेहनत करनाइच पडेंगा बुढापेमें

Pages