चित्रपट कसा वाटला -९

Submitted by mrunali.samad on 2 January, 2024 - 23:58

आधीचा धागा एकोणीसशे पार..म्हणून हा नवा धागा...
येऊ द्या नव्या वर्षात नव्याने नव्या-जुन्या पाहिलेल्या सिनेमांचे रिव्यूज..

हा आधीचा धागा
https://www.maayboli.com/node/83338

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चेहऱ्यावरचे ना सी फडके >> Lol
दांडक्याने चेहऱ्यावरील 'न उडणारी माशी' तरी उडाली असेल हा आशावाद ठेवा. तालिबानी काल्पनिक आहेत पण माशी खरी आहे. Proud

फडके म्हणजे त्याचे डोळे झाकलेले असतात का? >>>

टण्या मोड ऑन
नाही रे फा. अरे ना सी फडके म्हणजे ते लेखक!
टण्या मोड ऑफ

चेहऱ्यावरील 'न उडणारी माशी' तरी उडाली असेल हा आशावाद ठेवा >> Lol

लोकहो, टायगर हे मनोरंजन सोडू नका. एकदम "पीस"फुल आहे. नॉनस्टॉप हसण्यासाठीच सिनेमा आहे हा.
टॉपचा हिलेरियस सीन कुठला असेल तर टॉवेल फाईट Lol
त्या एव्हढ्या भल्या थोरल्या हमामखान्यात दोघीच टॉवेलवर हाणामारी करत असताना या बाया (एकमेकींपासून) जीव वाचवण्याऐवजी टॉवेल वाचवत असतात आणि तो सुटू नये म्हणून किंचाळत असतात. Rofl
बाकि चोप्रा गँगचा शेवटचा भारताचे हेर पाकिस्तानची डेमोक्रसी वाचवण्यासाठी टेन्शन घेत असतात, पाकिस्तानी पीएमला तळघरात लपवून दोन दंबूका हातात दाबून पाकच्या चीफ ऑफ आर्मी स्टाफची लढाई करतात आणि पाकिस्तानचे हेर भारताच्या आणि पाकिस्तानच्या मैत्रीत बाधा येऊ नये म्हणून चिंताग्रस्त असतात हे हमखास हशे वसूल करणारे सीन्स.

शाहरूखखानचा कॅमिओ आणि सलमान शाहरूखचे खैबरच्या पुढच्या हिमालयातले स्टंट्स आणि "अरे देख के" "संभल" वगैरे डायलॉग ऐकून करमणूक होतेच. पठाण मधे पण हा बालिशपणा होताच.

आम्ही लहान असताना डंकर्क कॉलनीच्या जवळ ओढ्यातले जे खडक आहेत तिथे शोले शोले खेळायचो. त्यात लाकडी फांद्या बंदूका असायच्या, एकच खड्यांची रायफल होती, ती बच्चन झालेल्या मुलाकडे कंपल्सरी असायची, मला नेहमी संजीवकुमार बनवायचे आणि खडकावर चढून गब्बरच्या अंगावर उडी मारायला लावायचे. मामेबहीण आमची सगळ्यांची आई असायची. शोले मधेच हरवलेले भाऊ सापडायचे, दोघा भावांच्या लढाईत आई येऊन "नही, तुम दोनो भाई हो" म्हणून ओरडायची. मग बाह्या वर करून बॉलपेनने काढलेली चित्रं दाखवली कि मग सगळे गब्बरच्या मागे जायचे. एकदा गब्बर रुसून म्हणाला " मी चाललो घरी,दर वेळी मीच का मार खायचा ?"
किमान त्या डायलॉग्ज मधे थोडं तरी लॉजिक होतं...
टायगर, पठाण म्हणजे संवाद लिहीणार्‍याचा सदमा मधला श्रीदेवा झालाय.

चेहऱ्यावरचे ना सी फडके >>> Lol "ना सी" फडके म्हणजे त्याचे डोळे झाकलेले असतात का? >>>> "नासिकेला फडके" ह्या पूर्वी चांगल्या वाटलेल्या परंतु आता आउटडेटेड झालेल्या विनोदानंतर बऱ्याच वर्षांनी एक फ्रेश विनोद वाचायला मिळाला. Happy

टायगर ३ धमाल विनोदी (दुसर्‍या प्रकारात) आहे. एव्हढे खतरनाक मनोरंजन सोडून 12 वी नापास काय बघणार. >>> खरंय, भाईजान चे चित्रपट फॅमिली चित्रपट असतात, सगळ्यांनी एकत्र बसून बघितले तरी चालणारे असतात आणि धमाल मजा सुद्धा असते.

बाकी 12th Fail म्हणजे शिळ्या कढीला उत. जो जिता वही सिकंदर, तारे जमी पर, 3 idiots, दंगल इत्यादी (हायला सगळे आमिरचे चित्रपट) मध्ये असा संघर्ष वगैरे दाखवून यशस्वी होणे थीम किती तरी वेळा झाली आहे.

आचार्य Lol
सहनशक्ती जबरदस्त आहे तुमची

Leo पाहिला… hands down २०२३ चा बेस्ट चित्रपट… काय डायरेक्शन… काय अभिनय… थलपती विजय- एक नंबर…

थे का कुठे\वाचून थ्री ऑफ अस पाहिला. अतिशय रटाळ आणि कंटाळवाणा वाटला. >>>> अगदी अगदी. मलापण अतिशय बोर झाला. पण मी आता काही होईल मग काहीतरी होईल करत नेटाने शेवटपर्यंत पहिला आणि शेवट कळलाच नाही. लहानपणी दूरदर्शनवर आर्ट सिनेमे पाहिले होते. त्याची आठवण झाली. अशा सिनेमात साधारण कोणीतरी ३ मिनिटे कुठेतरी टक लावून पहात असते किंवा काहीतरी खलबत्यात दळत असते असे सीन्स असत. आणि शेवट काहीतरी abrupt असे, आपण नक्की काय पहिले हे कळत नसे. पण कदाचित तेवढी आपली चित्रपट appreciation ची क्षमता नसावी असे वाटे. थ्री ऑफ अस पाहताना तसेच झाले. खूप अपेक्षेने पाह्यला गेले, स्टार कास्ट ही आवडीची पण नाही जमलं

मात्र यात वेंगुर्ल्याचे लोकेशन्स आहेत. फार सुंदर शॉट्स ! आमच्या गोव्यातल्या गावाची, घराची आठवण आली.

सजीनी शिंदे पण पहिला. चांगला वाटतो म्हणेपर्यंत क्लायमॅक्स अगदीच फुसका निघाला. बरे झाले भाग्यश्री लग्न करून बाहेर गेली. नाहीतर अक्टिंगच्या नावाने बोंब होती. वन फिल्म वंडरच आहे. यातही पुण्याचे लोकेशन्स आहेत. नॉस्टॅल्जिक ! एक सीनमध्ये कॅम्पमधील मारझोरिन मध्ये शूट केले आहे. ते पाहून तिथल्या चटनी सॅन्डविचची आठवण झाली. कित्येक दिवसात खाल्ले नाही.

नेट फ्लिक्सचे दोन सिनेमे निराशाजनक ! क्रिएटिव्ह टीम काय करतेय ?

पंचक पाहिला(असंच 6.30 ला ठरलं आणि 6.45 ला जाऊन पहिला).
मूळ कथा विषयात चांगली आहे.पण संगीत खूप लाऊड वाटलं.काही ठिकाणी इंटर्व्हल आधी ओव्हर ऍक्टिनग वाटली.
शिवाय प्रभावळकर फक्त 5 मिनिटे असल्याने जरा लहान मुलाला खाऊ चं चित्र दाखवून खाऊ न दिल्यासारखं झालं.कोकण पार्श्वभूमी असलेल्याना कथा आवडेल.कथेचा जीव एका 30 मिनिटाच्या युट्युब शॉर्ट फिल्म इतकाच आहे.

तिसरा वाघ पाहिला
पठाण मधे ९० अंशात उभं वळून वर जाणारं हेलिकॉप्टर पाहिल्याने यातल्या करामती पीचपिचीत वाटल्या. YRF मधे कथा ॲप्रूव करणारा विशीच्या अलीकडचा टिकटॉकर असावा, दीड मिनिटात संपणारी कथा नसेल तर बजेट सांक्शन न करणारा.

दर दोन पाच मिनिटांनी कुणीतरी 'बघा काय भारी काम करतोय' टाईप लुक देतं (सल्लू हे एकच लुक देतो हे काही नवीन नाही)

दिल बहालाने के लिये स्पाय युनिव्हर्स वगैरे खयाल अच्छा है...
यातले पुढचे सर्व सिनेमे ही याच टाईप असणार हे मात्र नक्की

दर दोन पाच मिनिटांनी कुणीतरी 'बघा काय भारी काम करतोय' टाईप लुक देतं

>>> अलीकडच्या हिंदी अ‍ॅक्शन सिनेमांमध्ये अ‍ॅक्टर्स, दिग्दर्शक, कॅमेरामन, एडिटर सगळे कायम याच आविर्भावात असतात. नको तिथे स्लो-मोशन्स, नको तिथे चेहर्‍याचे क्लोज-अप्स, फार बोअर होतं ते!

YRF मधे कथा ॲप्रूव करणारा विशीच्या अलीकडचा टिकटॉकर असावा, दीड मिनिटात संपणारी कथा नसेल तर बजेट सांक्शन न करणारा. Biggrin

रजनीगंधा : जुना सिनेमा पाहिला
संथ आणि कंटाळवाणा
पण वैताग नाही येत पाहताना. अभिनय वगैरे छानच आहे. हिरवीनीच्या साड्या बघण्यात मस्त वेळ गेला.
कोकोमेलन पाहून माझी सहनशक्ती कमी झालीये screen ची बहुतेक.

रजनीगंधा खूप क्रिटिक ने नावाजलेला आहे.यावर (बहुतेक) शांता शेळकेंच्या एका पुस्तकात पण लेख आहे.मला ओके वाटला.विद्या सिन्हा अमोल पालेकर असराणी अशोक कुमार च्या छोटी सी बात च्या जादूतून मी बाहेर न निघाल्याने असाच पाहिला.
अजून एक धमाल पिक्चर बघायचा असेल तर नरम गरम किंवा दामाद बघ.चष्मेबहाद्दूर पण.

फायनली आज The Archies पिक्चर पाहिला.
अगदीच फसवले या चित्रपटाने...

ट्रेलर बघूनच वाटलेले की हा आपल्या टाईपचा नाही..
सोशल मीडियावर बरेच जणांनी त्याची छान पिसे सुद्धा काढली होती..
त्यात नेपोकिड म्हणजे अभिनयाच्या नावाने बोंब वगैरे सुद्धा डोक्यात होतेच..

तरीही काही जणांनी छान छान म्हटल्याने आणि आज बिलकुल झोप येत नसल्याने, आणि आजारामुळे काहीतरी डोक्याला त्रास न देणारे हलकेफुलके बघायचे म्हणून नेमका हाच बघायला घेतला...

आणि चक्क आवडला Happy

नुसता आवडला नाही तर बायकोला सुद्धा बघायला लाऊन तिच्यासोबत पुन्हा एकदा बघू शकतो इतका आवडला.
खरे तर अश्या जॉनरचे चित्रपट मी तिच्यामुळेच इंग्रजीतच पाहिले होते, आणि ते मला आवडायचे बघायला.. हा सुद्धा फार आवडला.

कुठला अतिरंजित संघर्ष नाही. पण जो विषय पोहोचवायचा होता तो व्यवस्थित पोहोचवला. प्रत्यक्ष आयुष्यात इतके सहजसोपे नसते हे कळून देखील काय योग्य आहे हे प्रेक्षकांपर्यंत बरोबर पोहोचते.

एकूणच चित्रपटाचा मूड खूप छान आहे. प्रत्येक फ्रेम डोळ्याला सुखावणारी आहे. गाणी किंबहुना त्या म्युजिक, बीटस, डान्स स्टेप्स फार आवडल्या. एकही पुढे ढकलावेसे वाटले नाही. जे ढकलावेसे वाटले ते चार ओळीत संपले. सुहाना खान सोडून कोण कोणाची पोरगी हे मी ओळखत सुद्धा नाही. पण सर्वांनी काम अगदी सहज सुंदर केली. कोणीही मिसफिट वाटले नाही. कोणाला अश्या प्रकारचे चित्रपट आवडतं असतील आणि अजूनपर्यंत हा पाहिला नसेल तर जरूर बघा. फिल गूड चित्रपट आहे. माझा आजाराचा पकलेला मूड छान झाला. अडीच तास मी सुद्धा त्या चित्रपटाच्या दुनियेत जात निसर्गरम्य रीवरडेलमध्ये अश्या छान मित्रासोबत आयुष्य एन्जॉय करतोय असे झाले Happy

ज्यांनी या पिकचरबद्दल इथे छान लिहिले होते त्या सर्वांचे आभार! अन्यथा मी बघितलाच नसता..

सिनेमा इतका खास वाटला नसला तरी गाणी मात्र मस्तच आहेत. Everything is politics, oh ruby ही तर अगदी मस्त, नेहमी ऐकायच्या प्लेलिस्ट मध्ये टाकली आहेत. आणि सगळी कास्ट फ्रेश आणि नेत्रसुखद.

नरम गरम, रंग बिरंगी पाहिले. छान आहेत >>> मुलाला दोन तीन वेळा गोलमाल पहायला धरून बसवले. पण प्रत्येक वेळी मुलाखतीचा कार्यक्रम संपलाकि उठून जातो. आता पुन्हा एकदा ट्राय करणार आहे.

नरम गरम, रंग बिरंगी पाहिले >>
छान आहेत. अगदी निखळ करमणूक! संजू कुमार - देवेन वर्मा चा अंगूर पण छान आहे.

मुलाला दोन तीन वेळा गोलमाल पहायला धरून बसवले. >>
रोहित शेट्टीच्या गोलमाल सिरीज मधील २ (अँथनी गोंसाल्विस) व ३ (पप्पी भाई ) मला आवडतात. डोकं बाजूला ठेवून बघण्यासारखे आहेत.

The Archies मधल्या त्या छोट्या छोट्या कविता मस्त आहेत. त्यातल्या त्या एथेल (आदिती डॉट) नेच लिहिलेल्या आहेत.

जरा थ्रिलर पासून चालू करा, गुमनाम, शालिमार वगैरे.कधीकधी रेट्रो म्हणून आवडतं.
अनघा, मला पण गोलमाल(नवा) सिरीज मधला भाग 2 सर्वात जास्त आवडतो.तो आज की ताजा खबर(आणि मराठी फेकाफेकी) ची कॉपी आहे.गोलमाल 3 खट्टा मिठा चो कॉपी आहे.4 आणि 1 कशाचीच कॉपी नाहीत, पण थोडे गंभीर वळणाला जातात त्यामुळे आवडत नाहीत.
गोलमाल 2(अँथनी गोंसालविस) अतिशय धमाल आहे.(धमाल सिरीज पण मस्त.)

Pages