हा एक अगदी वेगळा प्रसंग आहे. तो घडल्यानंतर त्याचा अर्थ लावायला वेळ लागला. पण नंतर त्याचा अर्थ आणि अन्वयार्थ उलगडत गेला. ह्या प्रसंगाचा किस्सा आपल्यासोबत शेअर करत आहे. आजवर इतके रन आणि वॉक केले होते, पण ह्या प्रसंगाइतकं विचित्र आणि भयाण कधी धावलो व सैरावैरा चाललो नव्हतो! तर झालं असं होतं...
मला अनेक दिवसांपासून जाणवत आहे की, माझा मित्र मला काही सांगू इच्छित आहे. आणि तो जे सांगू इच्छित आहे ते रहस्यमय आणि गोपनीय आहे. त्याबरोबरच त्या गोष्टीवर कशाचं तरी सावटसुद्धा आहे. नक्कीच काही तरी वेगळी गोष्ट असली पाहिजे. मी काही निमित्ताने औरंगाबादला आलो आहे. बाहेरून मुक्काम केलेल्या घरी आलो तेव्हा कळालं की, माझा मित्र नुकताच येऊन गेला. मला भेट, इतकाच निरोप त्याने दिला आहे. आम्ही औरंगाबादमध्ये काही नेहमी भेटत नाही. पण तरी जवळच्या एखाद्या हॉटेलच्या परिसरात तो भेटेल असं वाटलं आणि मी नातेवाईकांना ते सांगून निघालो. शक्यतो मी कुठे जातोय हे सांगायला मला आवडत नाही. पण नकळत "सेफ्टीच्या" दृष्टीने मला हे सांगावसं वाटलं! जितेश- माझा शाळेपासूनचा अगदी जीवलग मित्र. त्याला मला काय सांगायचं असेल? आणि तेही काहीसं लपून छपून?
मी चौकात गेलो. शोधाशोध करत फिरत राहीलो. त्याबरोबर मनामध्ये विचारही सुरू राहिले की काय असेल नक्की प्रकरण? आणि मग आठवलं की, काही दिवसांपूर्वीही दिसला होता तेव्हा तो मला असा इशारा तर करत नव्हता? नक्कीच. काही तरी वेगळं असलं पाहिजे. पण काय असेल? नकळत एक अप्रिय- अशुभाचं सावट ह्यावर जाणवतंय. फिरता फिरता मला जितेश दिसला! पण त्याने फक्त हाताने खूण केली आणि आम्ही रस्त्यावर चालत राहिलो. त्याच्या चेह-यावरूनच जाणवतंय की त्याला जे सांगायचं आहे ते गोपनीय तर आहेच पण कदाचित धोकादायकसुद्धा आहे. म्हणूनच तो खूप काळजी घेतोय. आम्ही काही गल्ली बोळ ओलांडून आतल्या बाजूच्या एका छोट्या हॉटेलजवळ आलो. अगदी साधं असं हे हॉटेल आहे. शाळेत असतात तसे बेंच बसायला आहेत. तुरळक गि-हाईक आहेत. आमचं बोलणं सुरू झालं. तो मला विचारतोय की, मला काही गोष्टी गेल्या काही दिवसांमध्ये जाणवल्या का? काही खटकलं का? मी विचारात पडलो. काही तरी जाणवतंय खरं. काही तरी वाईट घडलं आहे असं वाटतंय. पण काय ते कळत नाहीय.
मग त्यानेच सांगितलं की, गावामध्ये एक अपराधी लोकांना त्रास देत सुटला आहे. लोकांना पळवणं आणि गायब करणं सुरू झालं आहे. आणि अपराधी इतका तयारीचा आहे की, लोकांना जाणीवही नाही अजून की असं काही घडलंय. त्याने मग आमच्या दूरच्या मित्रांच्या संदर्भात माहिती दिली की त्यांच्यासोबत काय घडलंय. ते ऐकून धक्का बसला. मग मीच त्याला बोललो की, हे तू पोलिसांना का सांगितलं नाहीस, इथे का सांगतोय. त्यावर तो म्हणाला की, शत्रू खूपच खतरनाक आहे. इतका की, त्याच्याही जीवाला धोका आहे. त्यामुळे अगदी जपून आणि सगळी काळजी घेऊन आपल्याला काम केलं पाहिजे. मग मी त्याला विचारलं की, हे तुला कसं कळालं? तो म्हणाला की, एका बेकरीमध्ये जाताना त्याला एका व्हॅनमधलं ओरडणं ऐकून शंका आली. आणि ज्याला गायब केलं होतं, त्याचा मित्र जितेशला त्या दिवशी भेटला. त्यामुळे त्याला कळालं की, असं काही होतं आहे. आणि मग त्याने अजून पुढचे तपशील सांगितले. ते ऐकताना भितीही वाटत होती आणि काळजीही वाटत होती.
हॉटेलात चहा- वडा पाव आम्ही घेत होतो, पण तरीही आपल्यावर कोणाची नजर तर नाहीय, आपल्याला काही धोका तर नाहीय हा प्रश्न सतत मनात येतोय. टेबलवर बिलाचे पैसे दिले तरी आम्ही बोलत बसलो. आजूबाजूचे तुरळक लोक त्यांच्या तंद्रीत आहेत. आमच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीय. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. हळु हळु ह्यामध्ये असलेली रिस्क आणि गांभीर्य कळत गेलं. अखेर ठरवलं की, जितेशच्या घरच्यांना हे सांगायचं आणि त्यांची मदत घ्यायची. तसं थोडं हलकं वाटलं आणि निघालो. काउंटरवर गूगल पे ने पैसे देणार तितक्यात आठवलं की, पैसे तर टेबलवरच दिले आहेत. आपल्या मागावर कोणी नाहीय ना ह्याची परत परत खात्री करत निघालो. बाहेर तर सगळं नॉर्मल वाटतंय. पण नकळत एका सावटाची जाणीवही होतेय.
जितेशच्या घरी आम्ही पोहचलो. काका- काकूंना खूप वर्षांनी भेटलो. लहानपणीच्या आठवणी निघाल्या. मग सध्या काय सुरू आहे ह्यावर बोलणं झालं. ह्या गप्पांमध्ये मुख्य बोलायचा विषय मागे पडत होता. रात्र होत आल्यामुळे काका- काकूंनी त्यांच्याकडेच जेवायचा आग्रह केला. जेवण झाल्यावरच आपण बोलू असं ते म्हणाले. शेवटी जेवणानंतर शांततेत सविस्तर बोलू असं ठरवून आम्ही तिथेच थांबलो. वरवर हसत असलो व नॉर्मल दिसत असलो तरी आतून आम्ही दोघंही प्रचंड अस्वस्थ आहोत. आणि का कोण जाणे, पण मला "सेफ" वाटत नाहीय. जणू तो अपराधी आमच्याच मागावर आहे असं वाटतंय.
आम्ही जेवायला बसलो. गप्पाही सुरू आहेत. आमचं जेवण संपता संपता जितेशच्या बाबांचे एक मित्र घरी आले. तेही थोडं जेवले आणि मग आमच्यासोबत बसले. जितेशचे बाबा म्हणाले की, हे खूप अनुभवी आहेत, तुम्हांला जे सांगायचंय ते त्यांनाही सांगा. त्यांचीही मदतच होईल. मग अखेर आम्ही विषय काढला. जितेशनेे सगळे तपशील सांगितले. गायब झालेले ते लोक, त्याचा मित्र आणि कसं झालं ते सांगितलं. त्याबरोबर ह्याची कुठेच नोंद नाहीय, बातमीसुद्धा नाहीय हेही तो बोलला. त्याचे बाबा आणि ते काका शांतपणे ऐकून घेत होते. आम्ही आम्हांला वाटणारी काळजीही बोलून दाखवली. त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. त्यावर ते इतकंच बोलले की, तुम्ही काळजी करू नका. पोलिस त्यांचं काम करत असतात. आपल्याला दिसत नसलं तरी पोलिसांना सगळं कळत असतं. जितेशनेे त्यांना सांगायचा प्रयत्न केला. पण ते ठाम होते. मग ते काका म्हणाले, मुलांनो तुम्ही इतका विचार का करताय. चला माझ्यासोबत, आपण मस्त फिरून येऊ. कसं काय पण जितेश तयार झाला आणि त्याचे बाबाही तयार झाले. मला विरोध करता आला नाही.
थोड्याच वेळात त्या काकांसोबत आम्ही त्यांच्या गाडीने निघालो. वाटेत कुठे तरी थांबून त्यांनी आमच्यासाठी सरबतासारखं पेय घेतलं. मी ते बाजूला ठेवून दिलं. जितेश खूप दमलेला वाटत होता. त्याने ते गटागटा पिऊन टाकलं. ते पिऊन झाल्यावर त्याला एकदम शांत वाटलं. रिलॅक्स होऊन तो बसला आणि बघता बघता त्याला डुलकी आली. माझं मन मात्र अस्वस्थ आहे. कुठे तरी मेजर घापा आहे असं वाटतंय. पण कुठे??? तेवढ्यात गाडी थांबली. कोणती तरी बेकरी दिसते आहे. इथे ते काका उतरले. दोन मिनिटांत येतो, तुम्ही थांबा म्हणाले. माझ्या मनात शंका कुशंका येत आहेत. आणि अचानक- अगदी अचानक मला जाणीव झाली! बेकरी!! आम्हांला घेऊन जाणारे ते काका! जितेशला आलेली गुंगी! आणि अचानक मला जाणीव झाली की, अपराध्यांनी मला पकडल्यात जमा आहे. आपण आत्ताच निसटलं पाहिजे! आणि मी गाडीचं दार उघडून पळत सुटलो! ते काका बेकरीमध्ये गेले असावेत, त्यांना कळालं नाही आणि मी धावत सुटलो!
जिथे पाय नेतील तिकडे धावत गेलो. थोडं दूर आल्यावर मी नक्की कुठे आहे, इथून माझं नातेवाईकांचं घर किती लांब असेल हे विचार मनात यायला लागले. पण इतकी जबरदस्त भिती वाटतेय की, कोणाला बोलायची हिंमत होत नाहीय. न जाणो माझ्यासमोर असलेली व्यक्ती नेमकी अपराध्यांची हस्तक असली तर? कसा विश्वास ठेवायचा? माझ्या नातेवाईकांचा फोन लावला. पण तोही लागत नाहीय. लोकांना रस्ता विचारावासा तर वाटतोय पण हिंमत होत नाहीय. इतकं हतबल कधीच वाटलं नव्हतं. माझी चाल अगदी वेड्यासारखी आहे. लोकांना थांबून रस्ता विचारायचा आहे पण पाय थांबत नाही आहेत. अक्षरश: सैरावैरा जातोय. आजवर इतके रन आणि वॉक केले होते, पण इतकं विचित्र आणि भयाण कधी चाललो नव्हतो! लोकही माझ्याकडे चमत्कारिक नजरेने बघत आहेत... एक भयाण हतबलतेने मला घेरलं. प्रचंड हेल्पलेस वाटलं. जणू ते अपराधी कधीही मला पकडणार अशी घनदाट भिती वाटते आहे. अतिशय भितीदायक जागी मी अडकलो आहे असं जाणवतंय...
भितीची आणि असुरक्षेची भावना खूप वाढत गेली. सगळे मार्ग बंद झाले आहेत आणि सगळीकडून डेड एंड आहे ही असुरक्षितता वाढत गेली. इतकी वाढत गेली की अखेर माझ्यातला "बघणारा" जागा झाला आणि खाडकन माझे डोळे उघडले! दृश्य इतकं विपरित होतं की, स्वप्नावरून सजगता स्वप्न बघणा-याकडे आली. रात्रीचे दोन वाजलेले आहेत! आणि हे स्वप्न होतं! पण स्वप्न तरी कसं म्हणायचं? मला वाटलेली भिती, ते सगळे प्रसंग, तेव्हा वाटलेली चिंता, काळजी, भय हे सगळं अगदी जीवंत तर वाटत होतं. मित्राचे ते काका असं काही करतात ह्यामुळे बसलेला धक्का तर किती जीवंत होता! सगळं तर समोर घडलं होतं. जणू मी अनुभवलं होतं. हे स्वप्न होतं, पण त्याच्याही पलीकडे काही होतं. जाग येऊनही शांत व्हायला काही मिनिटं लागली. थोड्या वेळाने हायसं वाटत गेलं! आणि मग हळु हळु मनात विचार सुरू झाले. एक एक गोष्ट उलगडत गेली आणि मग मन शांत होत गेलं... पण उरलेली रात्र अजिबात झोप लागली नाही!
मग आठवले मला पडलेले असे किती तरी स्वप्न ज्यांना एक सूचक अर्थ होता- representative meaning होतं. किती तरी स्वप्न. ज्या ज्या ठिकाणी मी सायकलिंग, रनिंग केलं आहे त्या भागांचे सूचक स्वप्न मला पडले होते. स्वप्नामध्ये एक प्रकारे त्या जागा दिसल्या होत्या. मग ते वाईचं मंदीर असेल, मुंबई मॅरेथॉनमधला सीलिंक असेल किंवा हिमालय असेल. लदाख़च्या पहिल्या सायकलिंगच्या वेळी तर स्वप्नाने मला इतका तरल अनुभव दिला की त्यामुळेच माझा आत्मविश्वास वाढला, एक प्रकारे खात्रीच पटली. स्वप्न! स्वप्नावस्था हीसुद्धा चेतनेची एक स्थिती असते. किती तरी वैज्ञानिक शोध, कूट प्रश्न, अनेकांच्या आयुष्यातले प्रश्न ह्यावर स्वप्नावस्थेमध्ये उत्तरं मिळालेली आहेत. अतिशय दुर्गम ठिकाणी आणीबाणीत अडकलेल्या ट्रेकर्सना स्वप्नामध्ये मदतसुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे स्वप्न हे असत्य असलं तरी सूचक असतं. त्याला एक अर्थ असतो, एक indicative meaning असतं. स्वप्न जरी रूढ अर्थाने खरं नसलं तरी त्यावेळी वाढलेलं बीपी, हार्ट रेट हे तर खरे असतात.
कधी कधी काही घटना ह्या प्रचंड मोठी सजगता निर्माण करणा-या असतात- एखादा अतिशय दु:खाचा किंवा आपत्तीचा प्रसंग. किंवा एखादा अगदी वेगळा- अतिशय नवीन प्रसंग. जेव्हा मी माझी पहिली हाफ मॅरेथॉन ईव्हेंट पळालो होतो, तेव्हा आदल्या रात्री झोप लागतच नव्हती. कारण पुढच्या दिवशी इतकी नवीन गोष्ट होती की, त्या गोष्टीची जाणीव- सजगता इतकी प्रखर होती की, ती झोपेचा अडसर ओलांडून जाणवत राहिली. सायकलिंग- रनिंगमधले ठिकाणं आधी स्वप्नात दिसण्याचं कारण कदाचित हे असू शकेल की, त्यावेळी तिथे राईड करताना/ ते अनुभवताना सजगता इतकी प्रखर होती की, ती खोलवर अशा स्वप्नावस्थेमध्येही डिटेक्ट झाली असेल.
आणि ज्याला आपण सत्य म्हणतो तेसुद्धा अनेकांसाठी असत्यच तर असतं. आपल्याला जे दिसतं ते आपल्या जवळच्याच व्यक्तीला कधी कधी दिसत नाही. किंवा दुस-या व्यक्तीला जे ढळढळीत दिसत असतं ते आपल्याला दिसत नाही! मग सत्य व स्वप्न हा फरक कसा करता येईल! अजून एक स्वप्न आठवतं. स्वप्न असं होतं की, औरंगाबादचेच माझे नातेवाईक व मी एका छोट्या गावात फिरतोय. काही निमित्ताने त्या गावात जमलो आहोत. स्वप्नानंतर काही महिन्यांनी माझ्या आजी गेल्या. तेव्हा आम्ही अंत्यविधीसाठी पैठणजवळच्या गावासारख्या वस्तीत गेलो. तेव्हा कळालं की, अरे "ते स्वप्न" “ह्या अनुभवाचं विजन" होतं! एक स्वप्न एका रस्त्याचं पडलं होतं. मोकळा रस्ता व पलीकडे भिंत, एक विशिष्ट लँडस्केप. एका वेळी श्रीनगरमधून सायकलसोबत जाताना जाणवलं की, अरे ते स्वप्न ह्या दृश्याचं होतं! इतकं ते ओळखीचं वाटलं. Deja vu वाटलं!
मला ओशोंचीही अनेक स्वप्न पडली आहेत. त्यांना मी भेटतो आहे. आत त्यांचं व्याख्यान सुरू आहे आणि मी बाहेर बसलो आहे, जाताना ते दोन क्षण माझ्याशी बोलून जातात. किंवा पाठीवर हात फिरवतात. एका मोठ्या आलीशान इमारतीत त्यांचा एक कार्यक्रम आहे- ठिकाणसुद्धा मी स्वप्नात ओळखलं होतं की हे स्वारगेटजवळचं आहे (कदाचित गणेश कला क्रीडा मंच). त्यांना समोरून बघितल्याच्या खूप आठवणी स्वप्नात दिसतात. पूर्व जन्मातल्या असल्या तरी आठवणीच म्हणेन. त्यांचं प्रवचन ऐकून मी बसने परत जातोय असं एक स्वप्न पडलं होतं. आणि स्वप्नातला रस्ता बंडगार्डन रोड मला ओळखू आला, कारण मी वाडिया कॉलेजला असताना तिथे अनेकदा जायचो. म्हणजे भूतकाळातच नाही तर पूर्व जन्मात घडलेल्या घटनांच्याही सूक्ष्म मेमरीज/ इंप्रेशन्स असतात आणि स्वप्नावस्था खोल असली तर कधी कधी त्या मेमरीजसुद्धा वर येऊ शकतात. मी समुद्र किना-यावर आहे आणि तीन बाजूंनी समुद्र आहे. अचानक माझ्या अंगावर त्सुनामीसारखी महाकाय लाट येते आहे आणि मला पळायला जागा नाही. आणि ती लाट माझ्या अंगावर आता कोसळणारच असं अगदी स्पष्ट स्वप्न तीन वेळेस पडलं. आणि ओशोंच्या पुस्तकात त्याचा अर्थही उलगडला.
आणि स्वप्नाबरोबर इतरही अनेक प्रकारे आपल्याला irrational संवेदना होतातच ना. अचानकच एखाद्या व्यक्तीची काळजी वाटते. तीव्र आठवण येते. किंवा आपण जी गोष्ट करत नाही ती केली जाते. स्वप्नामध्ये सुप्त इच्छा- आकांक्षा जशा प्रोजेक्ट केल्या जातात, तशाच सूक्ष्म जाणीवाही पॉप अप होतात. जे सामान्यपणे आपली बुद्धी सरफेसवर येऊ देत नाही, बुद्धी जे लगेच नाकारते, ते स्वप्नाच्या खोलवरच्या शांततेत सरफेसवर येतं. असो.
बोकोजू ह्या फकिराने एक दिवस त्याच्या शिष्यांना सांगितलं की, मला रात्री स्वप्न पडलं होतं की, मी फुलपाखरू झालो आहे आणि इकडे तिकडे फिरतोय. त्याचे शिष्य हसले. तो पुढे म्हणाला, ते स्वप्न तर संपलं. पण आता मला प्रश्न पडलाय की, कशावरून मी आत्ता जे करतोय ते त्या फुलपाखराला पडलेलं स्वप्न नसेल? ज्ञानी माणसं म्हणतातच की, आपलं जीवन हे जरा जास्त वेळ चालणारं पण स्वप्नच आहे. अर्थात् आपल्या दृष्टीने. तारे- आकाशगंगांच्या संदर्भात तर आपलं जीवन क्षणार्धाचंही नसेल. असो.
तर ह्या स्वप्नाचा काय अर्थ असू शकेल मग? मला जाणवणारा अर्थ हा आहे की, माझ्या मित्राच्या संदर्भातील व्यक्तींसोबत कदाचित असं काही घडू शकेल. किंवा अशा स्वरूपाचा एखादा प्रश्न/ स्थिती/ समस्या त्याच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीसोबत होऊ शकेल. मला स्वप्नात जे जाणवलं ते इतकं डायरेक्ट आणि प्रखर होतं, ती भितीसुद्धा इतकी प्रखर होती की, हे लिहून काढताना त्यात मला बदल करावे लागले. नाव व संदर्भ बदलून थोडं ते सौम्य करावं लागलं. इतकं ते स्वप्नात स्पेसिफिक जाणवलं होतं. ह्यावर उपाय काय मग? तर उपाय हाच की, आपण ज्या गोष्टी करतो त्या अधिक सजगपणे करायच्या. आपल्याला ज्यांची काळजी वाटते, ज्यांच्या काळजीच्या वेव्हज येतात त्यांच्याशी बोलायचं. आपल्याला न दिसणा-याही अनेक गोष्टी असतात ही जाणीव ठेवायची. असो.
हे वाचल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! हे लेखन आपल्याला रिलेट झालं का, हे नक्की कळवाल. धन्यवाद.
निरंजन वेलणकर 09422108376
17 ऑक्टोबर 2023
कोट केलेलं वाक्य वाचा
कोट केलेलं वाक्य वाचा
तुम्ही उलट उदाहरणं दिले आहे
स्वप्न म्हणजे काय हे आज पण
स्वप्न म्हणजे काय हे आज पण अंनुतरित प्रश्न च आहे.
1) मनी वसे ते स्वप्नी दिसे हे साफ चूक आहे कधीच विचार न केलेल्या गोष्टी पण स्वप्नात दिसतात.
२) स्वप्नात बघितलेल्या गोष्टी पुढे रिअल लाईफ मध्ये पण घडू शकतात.
ह्या दोन्ही गोष्टींचा खूप लोकांस अनुभव आहे.त्यांचा अनुभव हाच पुरावा पण सर्व खोटे बोलत आहेत असे म्हणता येत नाही.
३) एक च स्वप्न सारखे पडू शकते.असे का घडते ह्याचे उत्तर नाही.
४) काही लोकांना स्वप्न च पडत नाहीत .
असे का घडते ते पण माहीत नाही.
आणि सर्वात महत्वाचे सेक्स चे स्वप्न जेव्हा पडते तेव्हा शरीरातील अनेक यंत्रणा कार्यान्वित होवून वीर्य बाहेर पडते.
शरीरातील ह्या सर्व यंत्रणा ज्या ते घडण्यास कारणीभूत असतात त्या active का होतात.
कोणाच्या आदेशाने कारण आदेश देणारा मेंदू चा भाग झोपेत असताना सुप्त अवस्थेत असतो.
मग कोण आदेश देतो
किंवा लोक स्वप्नात चालतात पण.
चालण्या साठी किती तरी यंत्रणा कार्यान्वित होण्याची गरज असते.
पण तसे घडते खर
जे जागृत अवस्थेत अनुभवतो ते
जे जागृत अवस्थेत अनुभवतो ते स्वप्न असतं आणि जे स्वप्नात दिसतं ते वास्तव असतं.
दिवा येत असताना पडते ते
दिवा येत असताना पडते ते दिवास्वप्न
आणि ठाणे आल्यावर दिसते ते ठाणेस्वप्न
धाग्यावर लोक गंभीर बोलत असतात
धाग्यावर लोक गंभीर बोलत असतात .
उत्तर माहीत नसेल तर शांत बसावे.
अडाणी, अशिक्षित असल्या सारखे उनाड कॉमेंट करू नयेत.
कोट केलेलं वाक्य वाचा
कोट केलेलं वाक्य वाचा
तुम्ही उलट उदाहरणं दिले आहे>>> जरी उलट उदाहरण दिलं असलं तरी सकृत दर्शनी माझा स्वभाव दिलेल्या उदाहरणांत निडर वाटतो, आणि तुमच्या गृहीतकाप्रमाणे (जेवढ मला समजतयं) मला स्वप्नातही निडर रहायला हवं, पण प्रत्यक्षात तसं होत नाही आहे...मी काही चुकीचं समजतोय का??
मी काही चुकीचं समजतोय का??
मी काही चुकीचं समजतोय का??
>>>> मला तरी नाही वाटलं... तुम्ही योग्य उदाहरण दिल आहे.
मला पण साप, भुत वगैरे ची भिती वाटतं नाही पण स्वप्नात अगदी उलट परिस्थीती असते.
लुटुपुटुचा खेळीया >>>
लुटुपुटुचा खेळीया >>> प्रत्यक्षात निडर असून स्वप्नात घाबरता यामागे काही कारणे असू शकतात. काही शक्यता तुम्हीच तुमच्या पोस्टमध्ये व्यक्त केल्या आहेत जसे की स्वप्नातली स्थिती वेगळी असू शकते.. याऊपर असेही असू शकते की जरी तुम्ही एखादी गोष्ट निडरपणे करत असला तरी ती धोकादायक आहे हे आतून तुम्हाला कुठेतरी ठाऊक असते. आणि त्याची एक भिती अंतर्मनात असू शकते जी स्वप्नात बाहेर पडते.
पण उलट होणे अवघड आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीला प्रत्यक्षात घाबरता तर स्वप्नात खोटा आव आणू शकत नाही. कारण तिथे आपण एक सत्यच जगत असतो. जसे आहोत ते बाहेर पडते.
भुताची भिती मलाही प्रत्यक्षात वाटत नाही. मी देव भूत मानत नाही. आव्हान घेऊन भुतांच्या जागी मी फिरलो आहे. पण तरीही अंतर्मनात ती भिती असतेच. मलाही हॉरर स्वप्ने पडतात आणि मी दचकून घाबरून उठतो..
आणि हो, मी भूताला घाबरत नाही हे बोलणे आणि तसे वागणे जमते. कारण प्रत्यक्षात भूत कधी दिसले नसते. पण स्वप्नात ते दिसलेले असते.
जरी तुम्ही एखादी गोष्ट
जरी तुम्ही एखादी गोष्ट निडरपणे करत असला तरी ती धोकादायक आहे हे आतून तुम्हाला कुठेतरी ठाऊक असते.>>> हे असायला हरकत नाही, आणि तसंही दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीत/प्रसंगात रिस्क इनव्हाॅल्व्ह असतेच. कदाचित स्वप्नांत त्या रिस्क्स मॅग्नीफाईड होऊन दिसत असतील, तसेच त्यावरचे योग्य रिस्पॉंन्स ट्रिगर होत नसतील.
कधी अनुभव पण न घेतलेल्या ,कधी
कधी अनुभव पण न घेतलेल्या ,कधी विचार पण केलेल्या.
कधी कल्पना पण न केलेल्या गोष्टी स्वप्नात येतात आणि त्या स्वप्नातील गोष्टी आपल्याला परिचयाच्या वाटतात.
ह्या वर बोला
बार्ड ला प्रश्न विचारला असता
बार्ड ला प्रश्न विचारला असता खालील उत्तर मिळाले -
There are a few reasons why dreams are mostly frightening.
Our brains are more likely to remember and recall negative emotions. This is because negative emotions/stimuli are associated with survival, so our brains are programmed to pay more attention to them. This is known as the negativity bias. This means that we are more likely to remember and recall frightening dreams than pleasant ones.
Dreams can be a way for our brains to process difficult emotions and experiences. When we are asleep, our brains are able to relax and let go of some of the controls that they have over our thoughts and emotions. This can lead to dreams that are more vivid and emotional than our waking thoughts. If we are experiencing a lot of stress or anxiety in our waking lives, our brains may use dreams to process these emotions in a safe and controlled environment.
Frightening dreams can be a way for our brains to prepare us for potential dangers. Our brains are constantly scanning our environment for potential threats. Even when we are asleep, our brains are still active and monitoring our surroundings. If our brains detect something that could be a potential threat, they may trigger a frightening dream to help us prepare for it.
Our brain's need to consolidate memories. Sleep is important for consolidating memories. When we sleep, our brains review and strengthen the memories that we formed during the day. This process can sometimes lead to dreams that are based on our recent experiences, both positive and negative. If we have experienced a lot of negative events recently, our brains may be more likely to consolidate these memories in our dreams, leading to more frightening dreams.
Additionally, some research suggests that frightening dreams may be more common than pleasant dreams because they serve an important evolutionary purpose. In the past, when humans were living in a more dangerous world, frightening dreams may have helped to keep us safe by preparing us for potential dangers. For example, if a human dreamed about being chased by a predator, they were more likely to be alert and aware of their surroundings when they were awake, which could have helped them to avoid being attacked.
It is also important to note that not everyone has frightening dreams. Some people have dreams that are mostly pleasant or neutral. However, frightening dreams are more common than pleasant dreams.
आम्हाला इंग्लिश येत नाही थोडे
आम्हाला इंग्लिश येत नाही थोडे कष्ट करा आणि मराठी मध्ये माहिती ध्या
इथे स्वप्नांचा अर्थ हा विषय
इथे स्वप्नांचा अर्थ हा विषय सुरु आहे तर मलापण काहितरी सांगायचे आहे.
मला स्वप्न नेहमीच पडतात परंतू त्यात वारंवार येणारी एक विचित्र गोष्ट म्हणजे मी त्या स्वप्नात संपूर्ण नग्न असते. कधी कधी मी स्वतः कपडे घालायला विसरते तर कधी कशात तरी अडकून कपडे फाटतात तरी कधी इतर कारणाने.
लाज, शरम, भिती सगळ्या भावनांनी घेरलेल्या मला स्वतःला लपविण्यासाठी कुठेच अडसर सापडत नाही कि एखादा कपडा पण नाही मिळत. मग दचकून मी नेहमी जागी होते.
या स्वप्नाचा मी इतका धसका घेतलाय की घरातून बाहेर पडताना कपडे व्यवस्थित घातलेत का?, पायजमा घातला हे चार चार वेळा तपासून पाहते.
कधी अर्थ लावायला गेले तर असे वाटते कि काहीतरी मेजर अपमान वैगरे होणार आहे, चारचौघात लाज निघणार असावी. (असं काही होऊ नये रे देवा)
जर तुम्ही स्वतःला बराच वेळ
जर तुम्ही स्वतःला बराच वेळ सतत नग्न पाहत असाल तर ही समस्या आहे. हे चांगले स्वप्न मानले जात नाही. स्वप्नात स्वतःला नग्न पाहणे म्हणजे शारीरिक त्रास. तुम्हाला लवकरच अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. स्वप्नात तुम्ही स्वत:ला नग्न पहा किंवा दुसऱ्याला नग्न पाहा, सर्वांचे परिणाम वाईटच असतात.
स्वतःला गाढवावर बसलेले पाहणे, नग्न स्थितीत पाहणे, पायरीवरून गडगडत खाली घसरताना पाहणे, हरवणे, परीक्षेच्या भीतीने घाम फुटणे अशी स्वप्नं अस्वस्थ मनस्थितीचे दर्शन घडवतात.
कधी अर्थ लावायला गेले तर असे
कधी अर्थ लावायला गेले तर असे वाटते कि काहीतरी मेजर अपमान वैगरे होणार आहे>>>
हे स्वप्न वारंवार पडते हे पाहता, प्रोफेशनल तज्ञ सायकॅट्रिस्टच याबाबत तुम्हाला मदत करू शकेल. उगाच कोणाच्याही सांगण्याने किंवा इंटरनेट वर वाचून तुम्हाला यावर उत्तर सापडणार नाही. सापडले तरी ते अर्धवट ज्ञानाच्या आधारावर असण्याची शक्यता अधिक आहे. या स्वप्नाचे मूळ शोधत, वैयक्तिक जिवनातील नको त्या गोष्टींचा इथे उहापोह करण्यात हशील नाही या मताचा मी आहे.
+१११.
+१११.
हेमंत, हे आधी कुठेतरी पाहिले
हेमंत, हे आधी कुठेतरी पाहिले आहे असे वाटणे देजावू झाले. त्यामागचे शास्त्रीय कारण वेगळे आहे. ते स्वप्न नसते.
कधी कल्पना पण न केलेल्या गोष्टी स्वप्नात येतात >>>>> म्हणजे नक्की काय? उदाहरण देऊ शकाल का? कारण आपण कथा वाचतो, चित्रपट पाहतो त्यावेळी आपल्याही नकळत काही संदर्भ, काही कल्पना, मनात जाऊन लपलेले असतात.
Submitted by लुटुपुटुचा
Submitted by लुटुपुटुचा खेळीया on 27 October, 2023 - 16:17
>>>
+७८६
आम्हाला इंग्लिश येत नाही थोडे
आम्हाला इंग्लिश येत नाही थोडे कष्ट करा आणि मराठी मध्ये माहिती ध्या >>>>
स्वप्ने मुख्यतः भयानक का असतात याची काही कारणे आहेत.
आपला मेंदू नकारात्मक भावना लक्षात ठेवण्याची अधिक शक्यता असते. याचे कारण असे आहे की नकारात्मक भावना/उत्तेजना जगण्याशी / उत्क्रांतीशी संबंधित आहेत, त्यामुळे आपल्या मेंदूला त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्यासाठी प्रोग्राम केलेले आहे. याला नकारात्मक पूर्वाग्रह म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ असा की आपल्याला आनंददायी स्वप्नांपेक्षा भयावह स्वप्ने आठवण्याची अधिक शक्यता असते.
जटील भावना आणि अनुभवांवर प्रक्रिया करण्याचा स्वप्ने एक मार्ग असू शकतात. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले मेंदू आराम करण्यास सक्षम असतो आणि आपल्या विचारांवर आणि भावनांवर असलेले काही नियंत्रण सोडू शकतो. यामुळे आपल्या जागृत विचारांपेक्षा अधिक ज्वलंत आणि भावनिक स्वप्ने दिसू शकतात. जर आपण आपल्या जागृत जीवनात खूप तणाव किंवा चिंता अनुभवत असाल, तर आपले मेंदू सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात या भावनांवर प्रक्रिया करण्यासाठी स्वप्नांचा वापर करू शकतात.
भयावह स्वप्ने आपल्या मेंदूला संभाव्य धोक्यांसाठी तयार करण्याचा एक मार्ग असू शकतात. आपले मेंदू सतत संभाव्य धोक्यांसाठी आपले वातावरण स्कॅन करत असतात. आपण झोपेत असतानाही आपला मेंदू सक्रिय असतो आणि आपल्या सभोवतालचे निरीक्षण करत असतो. जर आपल्या मेंदूला संभाव्य धोका असू शकते असे काहीही आढळले तर ते आपल्याला त्याच्यासाठी तयार करण्यात मदत करण्यासाठी एक भयानक स्वप्न ट्रिगर करू शकतात.
आपल्या मेंदूला आठवणी एकत्रित करणे आवश्यक आहे. आठवणी बळकट करण्यासाठी झोप महत्त्वाची आहे. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपला मेंदू दिवसभरात तयार केलेल्या आठवणींचे पुनरावलोकन करतो आणि मजबूत करतो. या प्रक्रियेमुळे कधीकधी सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या आपल्या अलीकडील अनुभवांवर आधारित स्वप्ने पडू शकतात. जर आपण अलीकडे बर्याच नकारात्मक घटनांचा अनुभव घेतला असेल, तर आपला मेंदू आपल्या स्वप्नांमध्ये या आठवणी एकत्रित करण्याची अधिक शक्यता असते, ज्यामुळे अधिक भयावह स्वप्ने येतात.
याव्यतिरिक्त, काही संशोधन असे सूचित करतात की भयावह स्वप्ने आनंददायी स्वप्नांपेक्षा अधिक सामान्य असू शकतात कारण ते एक महत्त्वपूर्ण उत्क्रांतीवादी उद्देश पूर्ण करतात. भूतकाळात, जेव्हा मानव अधिक धोकादायक जगात राहत होते, तेव्हा भयावह स्वप्नांमुळे आपल्याला संभाव्य धोक्यांसाठी तयार करून सुरक्षित ठेवण्यास मदत झाली असावी. उदाहरणार्थ, एखाद्या भक्षकाने पाठलाग केल्याचे स्वप्न एखाद्या मानवाने पाहिले, तर ते जागृत असताना त्यांच्या सभोवतालच्या परिस्थितीबद्दल सावध राहण्याची आणि जागरुक राहण्याची शक्यता असते, ज्यामुळे त्यांना ते टाळण्यास मदत झाली असावी.
हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की प्रत्येकाला भयानक स्वप्ने पडत नाहीत. काही लोकांची स्वप्ने असतात जी बहुतेक आनंददायी किंवा तटस्थ असतात. तथापि, आनंददायी स्वप्नांपेक्षा भयावह स्वप्ने अधिक सामान्य आहेत.
ओहहह!!! एवढी चर्चा!!! चर्चेत
ओहहह!!! एवढी चर्चा!!! चर्चेत भर घालणा-या सर्वांना धन्यवाद.
धाग्यावर लोक गंभीर बोलत असतात
धाग्यावर लोक गंभीर बोलत असतात .
उत्तर माहीत नसेल तर शांत बसावे.
अडाणी, अशिक्षित असल्या सारखे उनाड कॉमेंट करू नयेत. >>>>>> मी तर अशिक्षित अडाणी आणि उनाडच आहे. टेस्ला एकदा म्हणाला होता कि त्याला राजस्थानातील वाळवंटाच्या वाळूच्या कणाइतकाही ज्ञान नाही. त्याच्यापुढे आपण ते काय. जाऊ दे तसही मायबोलीवर अकाऊंट उघडायला माणूस शिक्षित आणि रोजगार असलेला पाहिजे अशी काही अट नाही. उलट माणूस जेव्हडा अशिक्षित आणि उनाड तेव्हडी तो जास्त मजा आणतो.
असा प्रसंग कोणाच्या हि
असा प्रसंग कोणाच्या हि आयुष्यात एकदा तरी येतोच.
झोपेत नसतो ,अर्धवट झोपेत असतो.. आजू बाजूला काय घडत आहे ते सर्व दिसत असते, डोळे पण उघडते असतात.
सर्व शरीर जागे असते.
फक्त आपल्या अवयव वर आपले बिलकुल नियंत्रण नसते.
आपण उभे राहायचे ठरवतो पण पाय योग्य ती हालचाल करत नाहीत.
कंबर योग्य ती हालचाल करत नाही.
आपले अवयव आपले काहीच ऐकत नाहीत.
ह्याला जुन्या भाषेत दडपणे म्हणतात.
झाडाखाली झोपल्यावर सरासरी असा अनुभव येतो किंवा तुळवी खाली.
लहान असताना आणि नंतरही टीन एज
लहान असताना आणि नंतरही टीन एज संपल्यावर पण थंडी ताप भरून आल्यावर पाण्याच्या प्रवाहात वेगाने पोहत असल्याचं स्वप्न पडायचं. सगळं शरीर हलकं हलकं असल्यासारखं वाटायचं. हे फक्त थंडी तापातच व्हायचं.
पूर्वी नियमित पडणारी बरीचशी स्वप्नं आता आठवत नाहीत. काही वेळा चमत्कारिक स्वप्नं पडायची. ती काही काळ लक्षात रहायची. नंतर पूर्णपणे विस्मरणात जायची. आता स्वप्नं पडत असतील तरी सकाळी आठवत नाहीत. पण काही काही स्वप्ने लक्षात राहिली आहेत.
त्यातलं एक भयानक होतं.
एक तुटलेला भला मोठा पंजा रात्रीचा पाठलाग करायचा, आम्ही त्याच्या पासून लपायला घराच्या आवारात पळत असायचो. पाठीमागे एक झोपडी सारखी खोली होती. त्यात लपून बसलो होतो पण त्या पंजाला समजलं. त्याने दाराकडे मोर्चा वळवला आणि दारावर टकटक सुरू झाली. ती एव्हढी वाढली कि दरवाजा मोडून पडेल...
वडलांनी पाणी टाकून उठवलं. मी घामाघूम झालो होतो. बहुतेक ओरडत असेन. वडलांना ते आवडलं नाही. खूप ओरडले.
अशीच आणखी काही स्वप्ने होती.
आता त्यांचा अर्थ सांगू शकतो. त्या वेळी घरात नारायण धारपची पुस्तकं असायची. ती चोरून वाचायची सवय लागली होती. त्यात एक गोष्ट तुटलेल्या पंजाची होती. ते चित्र मनाने उभं केलं होतं. तेच स्वप्नात पाहिलं.
@ हेमंतआपले अवयव आपले काहीच
@ हेमंत
आपले अवयव आपले काहीच ऐकत नाहीत.
>>>
Sleep paralysis occurs when a person's consciousness is awake, but their body is still in a paralyzed sleep state. A person may be unable to speak and feel pressure on their chest, among other symptoms. During sleep paralysis, a person's senses and awareness are active and awake, but their body cannot move.
एकदम बरोबर
एकदम बरोबर
ही स्थिती जास्त वेळ टिकत नाही..
पण सर्व कळतं असते पण आपण काहीच हालचाल करू शकत नाही आणि बोलू पण शकत नाही.
मी अनुभव घेतला आहे.
टलेल्या पंजाची होती. ते चित्र
टलेल्या पंजाची होती. ते चित्र मनाने उभं केलं होतं. तेच स्वप्नात पाहिलं.
जे मनात असते तेच स्वप्नात दिसते हे गृहितक साफ चुकीचे आहे...
१% पण सत्यता त्या मध्ये नाही
टलेल्या पंजाची होती. ते चित्र
टलेल्या पंजाची होती. ते चित्र मनाने उभं केलं होतं. तेच स्वप्नात पाहिलं.
जे मनात असते तेच स्वप्नात दिसते हे गृहितक साफ चुकीचे आहे...
१% पण सत्यता त्या मध्ये नाही >>> मी तुमचे अनुभव लिहीलेले नाहीत. माझे अनुभव लिहीलेत. आता माझ्या अनुभवांवर तुमच्या एक्स्पर्ट कमेण्ट वाचायच्या का ?
एखाद्याला आपले अनुभव, आपले जग हेच अंतिम असून इतरांचे अनुभव किंवा त्यांचे जग हे थोतांड आहे असे वाटू लागते तेव्हां त्या इसमाबद्दल सहानुभूती दाटते. असा मनुष्य इतरांचा सल्ला ऐकण्याची शक्यता दुरापास्त असते.
तुमचे प्रतिसाद बहुतेक वेळा इग्नोर करण्याच्या लायकीचे असतात किंवा टर उडवण्याच्या. एखाद्याला सांगूनही समजत नसेल तर त्याला समजावण्याच्या भानगडीत पडू नये. तुम्ही सर्वज्ञ मोड मधे पोहोचला आहातच पण इतरांना काहीही कळत नाही हा मोड सुद्धा ऑन आहे तुमचा. तुम्हाला इलाजाची गरज आहे हे जाणवल्याने अपार करूणा दाटून आल्याने हे सांगत आहे.
100लोकांचे खरे अनुभव तपासले
100लोकांचे खरे अनुभव तपासले तर तुमचे मत साफ चुकीचे सिद्ध होईल.
उगाच काही तरी विरुद्ध लिहायचे म्हणून लिहू नका.
ह्याच धाग्यावर सर्व प्रतिसाद वाचा
तुमच्या मताशी किती टक्के प्रतिसाद एकरूप वाटत आहेत ते तपासा
हेमंत, इतका अवाढव्य मूर्खपणा
हेमंत, इतका अवाढव्य मूर्खपणा अनुभवण्यासाठी तुमच्या सारख्या आयडीची गरज होती. माझे अनुभव खरे कि खोटे हे ठरवायला तुमच्या सारख्या विक्षिप्त इसमाची मला गरज नाही. तुम्हाला काय वाटतं याच्याशी मला घेणं देणं नाही , ना त्याची किंमत वाटते.
नशीब तुम्ही साहित्य वाचत नाहीत. नाहीतर लोकांची प्रवासवर्णनं, आत्मचरित्र सुद्धा तुम्ही खोटी ठरवली असती.
Very good. अशीच प्रगती करा.
ह्या वर जास्त लीहण्यात अर्थ नाही.
तुमची मत तुम्ही मांडली माझी मत मी मांडली..
मीच जगात सर्व ज्ञानी ही भावना खूप वाईट नी ती मी कधीच ठेवत नाही.
आणि कोण विषयी पूर्व ग्रह पण ठेवत नाही.
हा विषय सोडा आणि तुमचे बाकी अनुभव येवू ध्या
Pages